मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|शुकाख्यान| अभंग १२६ ते १५० शुकाख्यान अभंग १ ते २५ अभंग २६ ते ५० अभंग ५१ ते ७५ अभंग ७६ ते १०० अभंग १०१ ते १२५ अभंग १२६ ते १५० अभंग १५१ ते १७५ अभंग १७६ ते २०० अभंग २०१ ते २२५ अभंग २२६ ते २५० अभंग २५१ ते २७५ अभंग २७६ ते ३०० अभंग ३०१ ते ३२५ अभंग ३२६ ते ३५० अभंग ३५१ ते ३७१ शुकाख्यान - अभंग १२६ ते १५० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल अभंग १२६ ते १५० Translation - भाषांतर मग पुसत तूं कोण । येरु ह्मणें मी दशरथ जाण । श्रावणाचें वर्तमान । सांगता झाला ॥१२६॥आतां उदक श्रावणाविण आह्मीं न घेऊं जाण । ऐसें म्हणोन प्राण । सोडिला त्यांहीं ॥१२७॥पुत्राकारणें पाही । शोक लागला देहीं । भेटी देऊनि जाई । योगेश्वरा ॥१२८॥आतां पुत्रपण सत्य करीं । माता पिता मुखी करी । पाहा त्या सगरीं । काय केलें ॥१२९॥साठीसहस्त्र संवत्सर । युद्ध केलें नृपवरें । सूर्यवंशीं महावीर । पवित्र राजा ॥१३०॥त्यांनीं अश्वमेध मांडिला । शामकर्ण वारु आणिला । तो पृथ्वीवरी सोडिला । युद्धालागीं ॥१३१॥ते इंद्रें ऐकिली मात । अश्वमेध करिती सगरसूत । मग मंत्र एक त्वरित । रचिता झाला ॥१३२॥त्यावरी इंद्रें घोडा चोरिला । अदृश्य रूपें । नेला नेऊनि गुंफेमाजी बांधिला । मुनीचिया ॥१३३॥पाताळीं कपील मुनी । सगरीं खणिली मेदिनी । अंबरीं जाहली आकाशवाणी । सांभाळारे सांभाळा ॥१३४॥बृह-स्पति सगराचा मामा । तो म्हणे रे उत्तमा । कां आलासी आश्रमा । या ब्राह्मणाचियां ॥१३५॥तुह्मी खणाल मेदिनी । येथें आहे कपिल मुनीं । तो भस्म करील शोधोनिं । सांडा गर्व ॥१३६॥येरुसी न आवरे कोपु । मेदिनी खणिती थोर मापु । प्रवेशले एकाएक । पा-ताळ भुवनीं ॥१३७॥ऐकोनि तयाच्या गजरु । डचकला तो ऋषे-श्र्वरू । येरि ह्मणती हाचि तस्करु । धरा वहिला ॥१३८॥यावरी कोपला महामुनी । तयासी शापिलें वचनीं । सागरु जाले तेच-क्षणीं । भस्म देख ॥१३९॥वडिलाचें वचन न ऐकती कानीं । आपणचि म्हणती ज्ञानी । तरी मूर्ख ते गांजणी । जाणावे गा ॥१४०॥एक सहस्त्र वर्षें जाहली सुमित्रा । तयाचे वंशीं जाहला पुत्र । अत्रिनें दिधला एक मंत्र । तयाचा भगिरथ ॥१४१॥गंगा स्वर्गाहुनी आणिली । ते मंदाकिनी स्वर्गा झाली । पाताळीं प्रगटली । ते भोगावती ॥१४२॥हिमाचलामाजी लपाली । येतां न देखोचि वहिली । मग बुद्धि विचारिली । तया भगीरथें ॥१४६॥राजा इंद्र विनविला । तेणें ऐरावतीं दिधला । पर्वत फोडोनि टाकिला । गंगाओघें ॥१४४॥सगरु जळत होते । विझविले गंगासुतें । ऐसें पुत्रपण तया भगी- रथें । सा़च केलें ॥१४५॥अरे पुत्रा आमुतें संतोषवीजे । मतापिता उद्धरिजे । डोळे झांकती मग जाइजे । हा धर्म चोख ॥१४६॥पुत्र कष्ट झाले गा थोर । मातेचें गाजिलें बा शरीर । अद्यापि कां निषुर । बोलसीना ॥१४७॥ऐसें ऐकतां नेटकें । शुक-देव पुढें चमके । यावरि दृष्टि देखे । वनस्थळीं ॥१४८॥शुक्र-देव अदृश्य झाला । व्यास त्वरित धरणीं पडला । थोर दु:खें आक्रंदला । व्याकुळ प्राण तयाचा ॥१४९॥पुत्राविणें संसारु । तो केवळ भूमिभारु । माझें उतरावयाचें तारूं । दूरि गेलें ॥१५०॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP