मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीकृष्णलीला| अभंग ५१ ते ५४ श्रीकृष्णलीला अभंग १ ते ५ अभंग ६ ते १० अभंग ११ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २५ अभंग २६ ते २९ अभंग ३० अभंग ३१ अभंग ३२ अभंग ३३ ते ३५ अभंग ३६ ते ३७ अभंग ३८ ते ४१ अभंग ४२ ते ४५ अभंग ४६ ते ५० अभंग ५१ ते ५४ श्रीकृष्णलीला - अभंग ५१ ते ५४ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल अभंग ५१ ते ५४ Translation - भाषांतर ५१.कृष्णातें चैतन्य गौळिया गोपाळा । जिवींचा जि-व्हाळा कृष्ण एक ॥१॥न गमेचि तया कृष्ण संगाविणें । कृष्णीं चरणीं मन सर्वकाळ ॥२॥कृष्ण सुख जिवीं कोंदलें सर्वांसी । उभे कृष्णपाशीं मागेंपुढें ॥३॥नामा ह्मणे कृष्ण भक्ताचें जीवन । कृष्णीं समाधान भक्तालागीं ॥४॥५२.आणा उचित उचित । भाणा भात आईतें ॥१॥भात सारा भात सारा । हरिहरस्मरणीं ॥२॥गाई गोपाळापें हरी । आणा तरी शिदोर्या ॥३॥नामा ह्मणे काळ मिसें । श्री निवास स्मरावा ॥४॥५३.आकाश गडगडी विद्युल्लता तळपती । अनिवार मेघ सणसणां वरुषती ॥१॥राखियलें येणें देवकीनंदनें । गोपाळ म्ह-णती आमुचें कान्हे ॥२॥गोवर्धनगिरी उचलोनी निजकरीं । राखिलें यापरी नामा म्हणे ॥३॥५४.गडयानों राजा कीरे झाला । कृष्ण सिंहासनीं बैसला ॥१॥पांवा मोहरी घोंगडी । आम्हीं खेळु यमुने तटीं । नाचा पाउला देहुडी । कृष्ण आमुचा किरे गडी ॥२॥खेळूं हुतुतु हुंबरी । थडक हाणो टीरीवरी । आतां चालिला दळभारी । आमचे यशो-देचा हरी ॥३॥कुस्ती खेळतां कासाविसी । शेंबुड खरकटें नाकासी । कडे घेऊं सावकासी । आतां बहु भितो यासी ॥४॥आम्ही तुम्ही सवें जाऊं । गाई वळावया जाऊं । त्याचे मानेंत बुक्या देऊं । जवळीं जावयासी भिऊं ॥५॥नामा म्हणे चला जाऊं । हात जोडोनी उभे राहूं । पाया पडून मागून घेऊं । जनींवनीं तोचि कृष्णजी ध्याऊं ॥६॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP