मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीकृष्णलीला| अभंग ३३ ते ३५ श्रीकृष्णलीला अभंग १ ते ५ अभंग ६ ते १० अभंग ११ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २५ अभंग २६ ते २९ अभंग ३० अभंग ३१ अभंग ३२ अभंग ३३ ते ३५ अभंग ३६ ते ३७ अभंग ३८ ते ४१ अभंग ४२ ते ४५ अभंग ४६ ते ५० अभंग ५१ ते ५४ श्रीकृष्णलीला - अभंग ३३ ते ३५ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल अभंग ३३ ते ३५ Translation - भाषांतर ३३.मंदिरा नेवोनि पलंगीं बैसविला । म्हणत हरीला तये-वेळीं ॥१॥ऐसिया समयीं थोर तूं अससी । तरी ह्लषिकेशी बरें होतें ॥२॥देखोनि तिचा भाव थोर झाला हरी । पाहूनि सुंदरी आन-दली ॥३॥सुखशयनीं राधा एकांतीं असतां । अनया अवचिता आला तेथें ॥४॥सक्रोध होऊनि बोलला राधेसी । कोणासी बोलसी गुजगोष्टी ॥५॥भ्रताराचा शब्द ऐकतां श्रवणी । दचकली मनीं रा-धिका ते ॥६॥हात जोडोनियां विनवित हरीसी । होईं ह्लषिकेशी सान आतां ॥७॥ऐकोनि करुणा बाळ झाला हरी । दहिंभात झडकरी ठेवीं पुढें ॥८॥कवाड उघडून बोलत अनयासी । घरांत ह्लषिकेशी जेवितसे ॥९॥कावड ठेऊनि घरांत तो आला । जेवितां देखिला कृष्णनाथ ॥१०॥नामा ह्मणे अनया आनंदला मनीं । ह्लदयीं चक्रपाणी धरियेला ॥११॥३४.राधेप्रती अनया बोले तयेवेळीं । घरांत एकली अससी तूं ॥१॥एकलें हें तुज कर्मेना मंदिरीं । खेळावया हरी आणीत जाईं ॥२॥भ्रतार वचन राधेनें ऐकोनी । आनंद तो मनीं थोर तिच्या ॥३॥स्वामी तुमची आज्ञा मजलागीं प्रमाण । म्हणोनी चरण वंदियेले ॥४॥सुखशयनीं राधा भोगित अनंता । गोकुळांत वार्ता प्रगटली ॥५॥राधेचिया घरीं थोर होतो हरी । गोकुळींच्या नारी गुजगुजती ॥६॥यशोदे मातेसी सांगती सुंदरी । आवरीं मुरारी आपुला हा ॥७॥तैसीच जाऊन राधेच्या गृहासी । सांगती सासूसी तिच्या तेव्हां ॥८॥राधेलागीं वृद्धा म्हणे तयेवेळीं । घरासी वन-माळी आणूं नको ॥९॥नामा म्हणे लोकीं पडियेली तुटी । तीसी जगजेठी अंतरला ॥१०॥३५.प्रात:काळीं राधा उठोनियां जाण । नंदसदनावरून पाण्या जात ॥१॥इकडे गोदोहन करीतसे हरी । पाहे उभी द्वारी राधिका ते ॥२॥विसरे गोदोहन वृषभाखालीं बैसत । कृष्णजीचें चित्त वेधियेलें ॥३॥भरणा रिचवोनी बाहेर आली माता । वृषभ दोहतां हरि देखे ॥४॥माता ह्मणे काय करीसी घननीळा । प्रत्युत्तर त्यावेळां हरि देत ॥५॥दाराकडे पाहे राधेसी न्याहाळून । मातेसी वचन बोलतसे ॥६॥भरणा भरला आतां जांई तूं घेऊन । माता क्रोधायमान झाली तेव्हां ॥७॥कृष्णासी यशोदा ह्मणे खालीं पाहे । वृषभ कीं गाय दोहतसे ॥८॥कृष्ण खालीं पाहे वृषभ देखिला । ह्मणे यशोदेला ऐक एक ॥९॥देवाचा नवस चुकली बहुतेक । चौ थानांचें थान एक झालें ॥१०॥वचन ऐकोनी हांसत यशोदा । द्वारीं उभी राधा देखियेली ॥११॥कांगे येथें उभी घेऊनि घागर । जातसे सत्वर राधा तेव्हां ॥१२॥नामा म्हणे ऐसें झालें । मुख प्रक्षाळून हरि जेविले ॥१३॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP