मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीकृष्णलीला| अभंग ११ ते १५ श्रीकृष्णलीला अभंग १ ते ५ अभंग ६ ते १० अभंग ११ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २५ अभंग २६ ते २९ अभंग ३० अभंग ३१ अभंग ३२ अभंग ३३ ते ३५ अभंग ३६ ते ३७ अभंग ३८ ते ४१ अभंग ४२ ते ४५ अभंग ४६ ते ५० अभंग ५१ ते ५४ श्रीकृष्णलीला - अभंग ११ ते १५ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल अभंग ११ ते १५ Translation - भाषांतर ११.गोकुळा येवोनी भेटे नंदादिकां । वैकुंठनायका सांगतसे ॥१॥कंसानें मांडिला अधर्म बहुत । मारावें त्वरित तयालागीं ॥२॥लावोनियां आग आपण विझविली । तेंचि परी केली नारदानें ॥३॥सांगोनियां ऐसें विणा सांवरोन । निघाला तेथून नामा म्हणे ॥४॥१२.कंसा हातीं विडा पाहे चहूंकडा । पूतन त्या पुढां काय बोले ॥१॥जाईन गोकुळा वधीन त्या बाळा । ऐसी त्या चांडाळा बोलतसे ॥२॥विष भरूनि स्तन निघाली पूतना । तीतें देखुनी कान्हा दूध मागे ॥३॥येऊनि द्वारीं थोकली तंव यशोदा देखिली । कृष्णा आली माउली राहें उंगा ॥४॥तंव अधिकचि आळी करी वनमाळी । येरी म्हणे दे जवळी पाजीन दूध ॥५॥पूतने वोसंगा दिधलासे कान्हा । घटघट पय पाना करीतसे ॥६॥शोषियलें विश्व न धायची भूक । नामया स्वामी न राखे प्राण तिचा ॥७॥१३.श्रीकृष्ण जन्मला वार्ता ही ऐकोनी । चिंता कंसा मनीं प्रवर्तली ॥१॥उद्विग्न मानसीं कंस तो बैसला । सन्मुख देखिला महाबळ ॥२॥गौरवोनी त्यासी सांगे वर्तमान । शत्रूसी जाऊनि कोण मारी ॥३॥महाबळ दैत्य प्रतिज्ञा बोलत । शत्रूसी त्वरित मारीन मी ॥४॥नामा ह्मणे ऐसा बोलूनि निघाला । वेष धरिला तेणें कपट ॥५॥१४.विप्र वेष तेव्हां घेऊनि निघाला । गोकुळासी आला लागवेगें ॥१॥पुत्रोत्सव कोठें लोकांला पुसत । भावीत सांगत नंदाघरीं ॥२॥ऐकोनियां ऐसें आला अकस्मात । येशोदा देखत सन्मुख त्या ॥३॥श्रीकृष्णासी तेव्हां वोसांगीं घेतलें । दंडवत केलें ब्राह्मणासीं ॥४॥सन्मुख बैसोनि वर्तमान पुसे । बाळाचें या कैसें चिन्ह सांगा ॥५॥पंचांग त्या वेळीं टाकिलें कपटासी । मान तुकावोनि पाहातसे ॥६॥नामा ह्मणे मैंदें पंचांग पाहून । यशोदा लाऊन बोलतसे ॥७॥१५.तुझिया पुत्रासी लागलेंसे मूळ । करील निर्मूल सर्व-त्रांचें ॥१॥बाळकाचे अंगीं अवचिन्हें बहूत्त । नेऊनि गर्तेंत टाका यासी ॥२॥लोभ धरूनियां ठेवाल बाळाशी । ग्रासील सर्वांसी एक-दांची ॥३॥ऐकोनी यशोदा गहिवरोनी बोले । गर्गानीं कथिरेले उत्तम गुण ॥४॥अमंगळ वाणी पुनरपि बोलिला । गर्ग तो चुकला गणितासी ॥५॥स्तनपान करीत असतां श्रीकृष्ण । मांडिलें विंदान नामा ह्मणे ॥६॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP