कृष्णदासांची बाळक्रीडा - प्रसंग ८

श्री कृष्णदासांनी लिहीलेली काव्ये महानुभावीय स्वरूपाची आहेत.


मुळें पाठविली नृपवरां ॥ तेथें सोईरे आले आपार ॥ वाजांत्रांचें गजर ॥ तेण आंबर गर्जेंत असे ॥१५॥
पालकांची आईत केली ॥ जैसी सोनयांची मुस वोतीलीं ॥ तैसी बावनेंकसें घडिली ॥ विश्वकर्तेयानें ॥१६॥
खणोखणीं हिरे झळकती ॥ मानीक पुस्पेराज वोप देती ॥ संदी संदी ढाळ देती ॥ मुक्ताफळें ॥१७॥
त्यासी पाचीची मोहोटी ॥ तेथें रत्नांची प्रभावळी गोमटी ॥ त्यावरी ते झळकती पाटी ॥ सोनियांची ॥१८॥
तेथें झळकती हिरें ॥ मांचवे वोतीले नाना प्रकारें ॥ जैसा उदो केला पूर्णचंद्रें ॥ तैसें तेज फांकले ॥१९॥
पाटसुताची वीण करी ॥ वार्तीया सुवर्णगोप अवधारीं ॥ चंदनांचा दामोधरीं ॥ लांबीला पालकु ॥२०॥
सान सुपती गोमटी ॥ वरी पासोडा पोफळदुटी ॥ त्यांवरी खेळणी गोमटी ॥ जैसा श्रीमंतकु मनी ॥२१॥
नानापुष्पांचीया माळां ॥ कापुर कस्तूरी परिमळा ॥ नगरीचिया नारी सकळा ॥ आनीलीया मुळें करुनियां ॥२२॥
मग ब्राह्मणा जाला बैसकारू ॥ मिळाले वेदविद अपारू ॥ वेदाच घोक आपारू ॥ मंदिरीं उठिलें ॥२३॥
ब्राह्मणीं रासी नक्षत्र वतींलें ॥ नांव कृष्ण कान्हो यैसें सांगीतलें ॥ मग षोडश उपचारी पुजीले ॥ ब्राह्मणांसी ॥२४॥
वस्त्रींसुवर्णी आमरीं केलें ॥ मग नंद येशोदा हवनी बैसविले ॥ तेथें यज्ञ (याज्ञिक) सुखिये केले ॥ कृष्ण घातले पालखीं ॥२५॥
देवकन्या ऋषी बाह्मणी ॥ गीती गाती चक्रपाणीं ॥ पालकु बोटे हालउनी ॥ नांव कृष्ण म्हणताती जो जो हा ॥२६॥
या ऋषी ब्राह्मणी सकळ सोहासिनी ॥ वाणें दीधलीं मुक्ताफळें ताटें भरुनी ॥ गर्जे वाजंत्राची ध्वनी ॥ ऋषीं मुनी संतोषले ॥२७॥
तंव नंदु बैसला सभामंडपी ॥ पानें पोफळें वांटिती हडीपी ॥ (वस्त्रे अलंकार समर्पि ॥) भाट बंदीजन सुखिये केलें ॥२८॥
गाणें वानें नांचणें ॥ सुगड मृदंगध्वणें ॥ ताळ मंडळ धोक आळवणें ॥ तेथे इच्छादानें पडताती ॥२९॥
यैसा नटारंभ प्रवर्तला ॥ इंद्र देवांसहित पाहों ठेला ॥ पुष्प वरुषावो जाला ॥ देवी पुजीला देवोरावो ॥३०॥
आतां निरोपु ब्राह्मणा आरोगणें ॥ स्वयेंपाक सिद्ध अनेकें पक्वान्नें ॥ येमुनेसीं करीती स्नानें ॥ बुडिया देउनी ॥३१॥
ते उदकी बुडिया देती ॥ तंव तेथेंची (कृष्णाते) देखतीं ॥ उठौनी वरुतें पाहातीं ॥ जवं देखती आकाशीं ॥३२॥
जीकडे द्दष्टी जाये ॥ तीकडे दिसतुची आहे ॥ मग म्हणती हे नवल काये ॥ कवण आहे हे न कळें ॥३३॥
मग ताटें विस्तारिलीं बाह्मणी ॥ नंदु उभा संकल्पा लागुनी ॥ भोक्त परमात्मा म्हणौनि ॥ संकल्प घातला ॥३४॥
प्राणां आहुती घेतां ॥ तंव तेथें देखती कृष्णनाथा ॥ येरू म्हणती मज पांतां ॥ काय भूत असे ॥३५॥
येक येकांसी दाखविती ॥ तंव सर्वांचा ठांईं तैसीची मूर्ती ॥ येक आज्ञान कर्म जड ठावो सांडिती ॥ भक्तु म्हणती परमात्मा हा ॥३६॥
यैसा समयो प्रवर्तला ॥ तंव नंदु ऐकोनी पाहों आला ॥ तंव तो व्यापुनी राहिला ॥ सर्वां ठाईं ॥३७॥
नंदु विचारी आपुलां चित्तीं ॥ घरी पालकातु आहे ऐसीचि मूर्ती ॥ कवण जाणें कैसी गती ॥ तंव तो जाला अद्रुष्टु ॥३८॥
मग ब्राह्मण तृप्त जाले ॥ कर्पूरांसहित वीडे दीधलें ॥ नंद दक्षणा द्यावयासी उभे ठेले ॥ देती सुवर्ण गौ दानें ॥३९॥
यैसें बारसें जालें ॥ सकळांसी आहेर समर्पिलें ॥ यानंतरें नंदु सकळांहित बैसलें ॥ आरोगणेसी ॥४०॥
जीरेसाळी देवसाळी ॥ मंधुसाळी पंकसाळी ॥ नगर दाटलें सुपरिमळीं ॥ तैसा भात वाढीती ॥४१॥
सकळां अन्नांचें राजे ॥ म्हणौनि आधीं भात वाढीजे ॥ नारी वाढीती वोजें ॥ वरी घालिती घृत पहीत ॥४२॥
तक्राची रूचीकर कथिका ॥ नानापरीची पक्वान्नें देखा ॥ प्रभावळी पत्र शाखा ॥ जेविताती ॥४३॥
यैसीं षडुरसें पक्वानें ॥ सकळांची जाली जेवणें ॥ विडे देउनि वस्त्र दानें ॥ रायांसी पूजा केला ॥४४॥
मग सोईरया बहुडा जाला ॥ तेथें कंसु नाहीं आला ॥ पुढें तो काय करिता जाला ॥ तें सांग रे कृष्णदासा ॥४५॥

॥ प्रसंग आठवा ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP