कृष्णदासांची बाळक्रीडा - प्रसंग ६

श्री कृष्णदासांनी लिहीलेली काव्ये महानुभावीय स्वरूपाची आहेत.


भट म्हणें विनंती परियेसी ॥ रीठासुरु सांगातें दे मजसी ॥ मग कार्य करीन वोजेंसी ॥ ते परियेसी राजेंद्रा ॥२४९॥
तंव रीठासुर उभा राहिला ॥ तेणेंहीं विडा घेतला ॥ तो रीठेगाठीमाजी रीगाला ॥ मग भठु निघाला गोकुळासी ॥२५०॥
मग माभळभट गेला आपुलिया घरासी ॥ उपरवाया बोभाईला आपुलिये स्रीयेसी ॥ नवी प्रीती देई मज पासी ॥ मीं जातो गोकुळा ॥२५१॥
तंव ते म्हणें तुम्हीं जातां गोकुळा ॥ गौळी घृत देती सवें न्या नळा ॥ तंव भट म्हणें सकुनु अमंगळा ॥ आणि पापीनीं कारुटे आपुलां ॥२५२॥
मग तैसाचि निघाला ॥ आणि गोकुळासी आला ॥ नंदा मंदिरी प्रवेशला ॥ मग आशीर्वाद दीधला ॥ नंदासी तेणें ॥२५३॥
तव येशोएसी म्हणें नंदु राणा ॥ ये दंडवत करीं या ब्राह्मणा ॥ दंडवत करुनी पाट होता चौकोणां ॥ तो बैसावयासी दीधला ॥२५४॥
तव भटु म्हणें मागो आलों वरुसां सण ॥ नंदा कीर्ती बहुसाल होईल ज्ञान ॥ आम्हासी द्यावी गौ येकी तान्हीं ॥ नळा धृतालागी पाठविला ब्राम्हणीनें ॥२५५॥
मग चरणक्षाळण जाले ॥ गंध विडे समर्पीलें ॥ मग आश्चर्य वाटले ॥ माबळ भटासी ॥२५६॥
तव गोकुळामाझारी ॥ आनंदुची घरोघरी ॥ पाहों जाती नगरीच्या नारी ॥ पुत्रु जाला येशोदेसी ॥२५७॥
मग पुसे नंदा तुम्हा म्हणे पुत्र जाला ॥ सांगपा कवणे तिथी नक्षत्रीं जन्मला ॥ तंव नंदु म्हणें रोहिणी नक्षत्री जन्मला ॥ श्रावण वद्यी अष्टमीसी ॥२५८॥
याचे जन्मनाम सांगा आम्हासी ॥ तंव भत म्हणें पैल पाट दे मजपासीं ॥ येशोद याचे जातक वर्तुन देईण तुम्हासी ॥ मग दान बहुत होईल आम्हासी देखा ॥२५९॥
पुढें पातडे मांडिले उकलुनी ॥ तंव येशोदेणें पाट दीधला आणुनी ॥ आतां नंदा सावधान होउनी ॥ ब्राह्मवाणी आईक माझी ॥२६०॥
आंगोळीया लेखीत नवी प्रति पाहे ॥ डोई हालउनी पाट लिहितु जाये ॥ हसे नयनी उदक वाहे ॥ ह्मणें आहा कटा ऐसे काय जालें ॥२६१॥
तंव नंद ह्मणें भटो कैसें वर्तीलें ॥ याचें जातक कैसें निघाले ॥ तंव भट ह्मणें नव्हे भले ॥ यासी जन्म जालें मुळावरी ॥२६२॥
तुवां उपजली वेळ सांगीतली ॥ ते म्या तिथी नक्षत्रें गुणुन पाहिली ॥ मग भटें टाळी पिटीली ॥ हा मुळी लागला म्हणौनिया ॥२६३॥
शनी मंगळ राहो केतु ॥ दुष्ट ग्रह असें सांगतु ॥ भीन रात्री अष्टमी अंतु ॥ रोहिनी नक्षत्री जन्मला ॥२६४॥
अरे हा कुळाक्षो करील ॥ जयावरी द्दष्टी पडेल ते भस्म होईल ॥ हा ठावो वोस पडेल ॥ ऐसें सत्य जाणा ॥२६५॥
हा टाकीजें येमुनाडोहीं ॥ यासी विचारू आणीकु नाहीं ॥ परी मजपासीं आणीकु कांहीं ॥ उपावो असे ॥२६६॥
रीठेगांठीची माळा ॥ ते मीं घालीन याचीया गळां ॥ मग हा सीतळ सकळां ॥ जाईल नंदा ॥२६७॥
हा पुत्र तुम्हासी नव्हें लाहणा ॥ हा पोसना द्यावा कवणा ॥ नाही तरि यासी करावी यमुना ॥ नातरी संसारा मुकाल तुम्हीं ॥२६८॥
मुळीं लागला डोंगरी सांडा यासी ॥ नातरी पुत्रदान द्या आम्हासी ॥ काय करिती गौळी माभळभटासी ॥ तो रायाचा जोसी म्हणौनियां ॥२६९॥
तंव नंदुराजा विनंती करी ॥ स्वामी हे आवरी येखादीयेपरी ॥ तंव भटु म्हणें आणा बाहिरी ॥ तंव झडकरी आणीला ॥२७०॥
तंव भटें देखिला द्दष्टी ॥ तो चर्तुभुज जगजेठी ॥ माळ घातली कंठी ॥ तेणें कपटीयें भेटें ॥२७१॥
त्यां मनियांतु लपविला रिठासुरू ॥ तेणें त्या बाळकाचा करावा संहारु ॥ कंठ चेंपुनिया लेंकरू ॥ मारावे जंव ॥२७२॥
तंव तेणें बाळकें तो मणीं ॥ धरुनि घातला वदनी ॥ तो फोडिला कडाडुनी ॥ येशोदा मनी दचकली ॥२७३॥
तोंडी आंगुळिया घालुनी पाहिलें ॥ तंव अशुद्ध मांस देखिलें ॥ मग भटें घेतलें ॥ म्हणें नव्हें भले हें लेकरू ॥२७४॥
मग नंदे पाहिले जंवं मुखीं ॥ तंव ते बाळक रक्त धरणीये थुंकी ॥ तेवेळ देखिला येकायेकी ॥ रीठासुरु वधिला ॥२७५॥
भटु गजबजीला ॥ तो उठोंनीं पळो लागला ॥ पुढां काय वृत्तांतु वर्तला ॥ ते सांगेल कृष्णदासु ॥२७६॥

॥ प्रसंग साहावा ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP