मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री कृष्णदासांची कविता|कृष्णदासांची बाळक्रीडा| प्रसंग ४ कृष्णदासांची बाळक्रीडा माहिती व विवेचन प्रसंग १ प्रसंग २ प्रसंग ३ प्रसंग ४ प्रसंग ५ प्रसंग ६ प्रसंग ७ प्रसंग ८ प्रसंग ९ प्रसंग १० प्रसंग ११ कृष्णदासांची बाळक्रीडा - प्रसंग ४ श्री कृष्णदासांनी लिहीलेली काव्ये महानुभावीय स्वरूपाची आहेत. Tags : krishnadaspoemकविताकृष्णदासमराठी प्रसंग ४ Translation - भाषांतर यैसे बहुतेक दिवसु कर्मलें ॥ म्हणती रायाचें विघ्न चुकलें ॥ तव देवकिये गर्भ राहिले ॥ जाली गरोदरी ॥१०८॥मग जाणविले दैत्यानाथा ॥ सावचित केले रक्षणाईता ॥ नव मास कर्मले आतां ॥ प्रसुतकाळ प्रवर्तला ॥१०९॥तवं देवकीये पुत्रु जाला ॥ मग पींपळ झडाडीला ॥ कागासुर गर्जिनला ॥ भुकों लागला गंर्धउ ॥११०॥यैसा करुनियां बोभाट ॥ तवं पीटी माहाद्वारी जेंगट ॥ तो आईकोनी दनदनाट ॥ कंसरावो धांवीनला ॥१११॥हाकु देतसे गगनी ॥ तेणें थरारीली मेदनीं ॥ तंव नगरलोक ततक्षणी ॥ महावीर धांवीनले ॥११२॥तंव कंसासुरें काय केलें ॥ ते बाळक द्रुष्टी देखिलें ॥ मग धांवोनी चरणी धरिलें ॥ ते उचलिले आकाशी ॥११३॥महा प्रचंड द्वारी सीळा ॥ तियेवर आपटिले तया बाळा ॥ जैसा का खडकी भोंपळा ॥ ठीकरीया होये ॥११४॥मारुनी तया बाळकासी ॥ मग संतोष जाला सकळा नगरासी ॥ हाकु फुटली आकाशीं ॥ आनंदे गर्जतु असे ॥११५॥म्हणती रावो विजया जाला ॥ नगरी उछावो प्रवर्तला ॥ मग भर्वसा मानीला ॥ आतां भय नाहीं ॥११६॥आतां जें उपजैल लेंकरू ॥ त्याचा करूं संहारू ॥ यैसा जाला निर्धारू ॥ राया आणि सकळिकासी ॥११७॥यैसें जें उपजें तें मारीत जाये ॥ कांहीं कनव रायासी ना ये ॥ थोर दु:खीये बापुमाये ॥ तया बाळकावीसीं ॥११८॥यैसे तेणें सात गर्भ मारिलें । तेणें बहुत दिवस कडे लागले ॥ कंसे संतोषु मानिलें ॥ आनंदे मनामाजी ॥११९॥तंव कवणे येके दिवसीं ॥ दु:ख वाटले वसुदेवा देवकीयेसी ॥ तेणें दु:खें जाली पीसीं ॥ दोघे जणें ॥१२०॥रोजना करिती टळमळां ॥ म्हणती मारितो माझीया बाळा ॥ आणी दुसरी भोगितों आवकळा ॥ पांई साखळा बंदीखानी ॥१२१॥मग वसुदेव बोलिला ॥ आतां मीं प्राण तजीन आपुला ॥ बहुत दु:खें आरंबळला ॥ नेघें आन्न उदक ॥१२२॥आस्वपात न तुटती दोघांचा नेत्रीं ॥ तवं प्रवर्तली रात्री ॥ मग येकांता जाउनी वसुदेवाची आस्त्री ॥ करी धांवा धरत्रीचा ॥१२३॥मग सुश्नात होउनी ॥ सोवळे नेसली ते जननी ॥ करसंपुष्ट जोडुनी ॥ विनविती जाली ॥१२४॥वसुदेवें दु:खें निद्र केली ॥ सकळ नगरी नीजैली । ए समईं देवकी काय करिती जाली ॥ दु:खें उचंबळलीं ह्रदै ॥१२५॥साष्टांगीं घालुनी दंडवतु ॥ अवो धरत्री ये माये मांडला आकांतु ॥ भ्रतार करिल आत्मघातु ॥ ते न देखवे मज ॥१२६॥अवो माये बीस्याळे ॥ तुजवरी उपटिली माझी बाळे ॥ येणें कंसासुरें चांडाळें ॥ आम्हां आकांत मांडिला ॥१२७॥अवो माये भेदिनी ॥ तु जगत्रजननीं ॥ मी परदेसीनी ॥ अनाथनाथें ॥१२८॥आवो माये वीसंमरें ॥ अंबिके जगदाधारें ॥ सकळ हे तुजची आधारे ॥ देव आदी करूनी ॥१२९॥सकळ सामाविसी उदरीं ॥ म्हणौन जगत्रजननी कुमारी ॥ सकळै भार तुजवरी ॥ म्हणौनी वीस्वंभरां तु ॥१३०॥मळमूत्र मेळउनी ॥ म्हणौनी नांव साजे मेदनीं ॥ तीन्हीं लोक राखिलें धरूनी ॥ म्हणउनी धरत्री नांव तुझे ॥१३१॥हा भूतासनु करीतसे होळी ॥ म्हणउनी नांव तुझे भूतळी ॥ तुझीं वहनें पाताळीं ॥ शेष कूर्म बर्हाह ॥१३२॥तुजपासुनी जगा जीवन ॥ म्हणौनी नांव साजे संजयेन ॥ सप्त समुद्र तुजपासुन ॥ म्हणौनी सीधवहनी नांव साजें ॥१३३॥जगासी उत्पत्ती तुजपासुनी ॥ म्हणौनी नांव जगत्रजननी ॥ चौदा भुवनें धरुनी ॥ वसीजे भूतळीं ॥१३४॥च्यारी खाणी चारी वाणी ॥ चौर्यांसी लक्षें जीवा यौनी ॥ पर्वत मेरू आदी करुनी ॥ समुद्र सरीता तुज माजी ॥१३५॥गणित नाहीं अरुप आकारा ॥ माहा ढीसाळ तु संदरा ॥ तुं गाईत्री म्हणउनी वसुंधरा ॥ त्रिचरण दश कर ॥१३६॥यैसी तुं अपरांपरे ॥ आदी शक्ती नीराकारें ॥ अवतार धरिले सर्वेश्वरें ॥ आणंत तुजवरी ॥१३७॥तु कवणासी नुवगेसी ॥ कवण्याकाळीं न वीक्तरेसी ॥ तु जरी उबगेसी ॥ तरी हे जगत्र कैंचें ॥१३८॥तुवां विश्वासा मांडिलें उदरीं ॥ तरि माझा सांभाळ कवण करी ॥ आतां मज पावे झडकरी ॥ अनाथनाथे तुं ॥१३९॥आतां तु दोनी भाग होई ॥ आणि मज उदरी ठावो देई ॥ कीं म्या पूर्वीं पाप केलें कांहीं ॥ म्हणौनि मज आव्हेरीलें ॥१४०॥काय म्या गुरुनिंदा केली ॥ कीं मायबापें दु:खविली ॥ कीं आस्रीरीतु चुकली । परद्वार करितां ॥१४१॥काय म्या विश्वासघात केला ॥ कीं मज गोत्रेवधु घडला ॥ कीं ब्रह्म दोष घडला । म्हणौनी मज ऐसे जालें ॥१४२॥कीं साधु संताची निंदा केली ॥ सुपात्री दाने नाहीं दिधली ॥ कीं जे निरोपीली वडीली ॥ ते मी न करीची ॥१४३॥येक तस्कर वाट पाडिती ॥ येक पारधी करूनी पोटें भरिती ॥ ते हरणी पाडसा वीघडनी करीती ॥ ते काई मज घडलें असैल ॥१४४॥कीं जाळे टाकुनी जळी ॥ कीं आवेश लाउनि गळी ॥ कीं गौग्रास जाळी ॥ तेणें पाप ऐसें जालें मज ॥१४५॥कीं द्वारासी अतीतु आला ॥ तो म्या असैल बोभावीला ॥ कीं म्या वेव्हार खोटा केला ॥ धर्मसभे बैसोनियां ॥१४६॥कीं फासे मांडुनी पक्षकुळा ॥ तडातोडी केली त्याचीया बाळा ॥ म्हणउनी मज ऐसी अवकळा ॥ करूनी दु:ख भोगीले ॥१४७॥कीं हरीकथा सांडून ॥ केले म्या वेस्यागमन ॥ कीं महातीर्थें सांडुनी ॥ गेलीये भूतां पुजुं ॥१४८॥कीं सांडुनी हरी जागरू धूपारती ॥ पाहों गेलियें गळवोशदी ॥ कीं चाहाडी करुनी बंधी ॥ घातले आसैल कवनासी ॥१४९॥कीं मी वाचेन मनेंची परमेश्वरू ॥ करी मीं भूतांचा उचारू ॥ कीं घेतला असैल मंत्रु ॥ लावकाचा ॥१५०॥कीं मीं चुकलियें परमेश्वरभक्ती ॥ म्हणौनी हें मीं पावलीयें दु:खप्राप्ती ॥ तो अपराध न धरावा चित्तीं ॥ कृपावसें पाव माये ॥१५१॥यैसा दु:खे धांवा करितां ॥ पावली ते जगत्रमाता ॥ मग शब्द बोलिली अवचिता ॥ नाभी वो नाभी म्हणतसे ॥१५२॥मग म्हणें मीं पावलीये मेदिनीं ॥ येरी लागली तीचा चरणीं ॥ म्हणें मीं प्रसने जाहालीये झडकरुनी ॥ मागें वरु ॥१५३॥तव देवकी म्हणें तु पावलीसी ॥ तरी माझे दु:ख तुं काय नेणेंसी ॥ आतां माये तु जाणसी ॥ तेंची करीं ॥१५४॥तंव ते म्हणें मीं जालीये प्रसन्न ॥ तरी का न मागसी वरदान ॥ येरी म्हणें मीं मागैन ॥ ते मज देई मायें ॥१५५॥जे यैसा मज पुत्र देई ॥ या कंसासुराचे न चले कांहीं ॥ आणि उधरावया कुळे दोहीं ॥ सुंदरू आणि क्षेत्रिया ॥१५६॥तंव धरत्री म्हणें हा कंसासुरू ॥ यासी जिणें यैसा नाहीं वीरू ॥ आणि उपजलें लेंकरू ॥ मारीत असे ॥१५७॥यैसा कवणु असैल ॥ जे उपजतांची जुंझेल ॥ आणि पवाडे करील ॥ उद्धरील दोहीं कुळा ॥१५८॥ तरी स्वर्ग मृत्य पाताळीं ॥ येसा कवणी नाहीं बळी ॥ जो उपजतां रवंदळी ॥ जीनेल कंसा ते ॥१५९॥हा कंसासुरू दारुण ॥ त्यासी महोदेवी प्रसन्न ॥ हा जिंतोसकें त्रिभुवन ॥ यासीं कवण जुंझैल ॥१६०॥आवो तुबां जें मागीतले ॥ तों आम्हासी आजोग जालें ॥ पर येक आठवलें ॥ तें तुझें तुटैल बंधन ॥१६१॥तरी तुं वचन परियेसीं माझें ॥ तूंची तीसी होईल जाण तुझें ॥ फेडावया पृथ्वीचे वोझें ॥ परमेश्वरू पावैल तुज ॥१६२॥जो या त्रिभवनाचा दातारू ॥ तो या सकळ देवांसी आगोचरु ॥ तोचि करील संव्हारू ॥ यां सकळ दैत्यांचा ॥१६३॥आतां तुझीये उदरीं ॥ येईल परमानंदु श्रीहरी ॥ म्हणौनि अमयें करू सीरी ॥ देउनि गेली ॥१६४॥जेधवां हात मस्तकीं ठेविला ॥ तेव्हेंळीची गर्भु राहिला ॥ परमानंद उदरासी आला ॥ देवकीचिया ॥१६५॥येथौनि पुढां पवित्र कथा ॥ सांबैल कृष्णदासु आतां ॥ देवकीये नव मास कर्मता ॥ तेची वेळे उपजेल ॥१६६॥॥ प्रसंगु ॥४॥ चौथा ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP