TransLiteral Foundation

गंगारत्‍नमाला - भाग ७

कवी नरहरी यांनी पौराणिक काव्य लिहून मराठी भाषेला एक आगळीच झळाळी दिली.

भाग ७
शा०वि०
रम्य क्षेत्र तसे पुढे दिसतसे ज्या ऊपमा ही नसे ॥
ब्रह्मावर्त असे जयासि विलसे नाव स्वये स्वर्गसे ॥
गंगा-काठि वसे जयांत निवसे ब्रह्मेश्वर-श्री रसे ॥
सं-पूर्ण स्व-यशे जनाघ दवसे नाशी सुखा देतसे ॥१२३॥
पृथ्वी
पुढे सरळ चालली निज-पतीस भेटावया ॥
हिमाचल-सु-कन्यका पितृ-कुला त्यजोनी दया ॥
सती पितृ-गृहांतुनी श्वशुर-गेहि जाता तशी ॥
पुन्हा न परते जनी कुल-पती-सुता ही तशी ॥१२४॥
हिमाद्रिंतुनि ये मधे कुशिक-सिंधु भेटीस ती ॥
समर्थ तनया निघे सखिस देत भेटी सती ॥
पुरे उभयता तती असति दोन ही ती तशी ॥
प्रकाश-कर शोभती श्रवण-भूषणे ति जशी ॥१२५॥
शिखरिणी
पुढे आली रामा करित तत-देशा स-फळ ती ॥
करावे ज्या कामे भजन वि-मदे त्यास फलती ॥
सुता द्याया धावे जननि पय जे कश्मल हरी ॥
हका मारी शब्दे करुण स-दया पुण्य-लहरी ॥१२६॥
शा०वि०
आली धावत जी तशि च यमुना भागीरथी-भेटिला ॥
हर्षे पाहुनि पातली निज-सखी घे तीहि पोटी तिला ॥
दावायासि जगी अ-भेद यमुना ही वैष्णवी श्यामला ॥
गंगा जी शिव-शक्ति तीत मिसळे ज्ञानेच दृश्या मला ॥१२७॥
दोघी सं-गति पावता चि तिसरी ब्राह्मी तदंशाच ती ॥
दावी गुप्त सरस्वती हि असता प्राकट्य मध्ये सती ॥
गंगा आणि सरस्वती हि यमुना ज्या ठायि झाल्या जमा ॥
मोक्ष-द्वार सख्या त्रि-वेणि म्हणती लोकी तया सं-गमा ॥१२८॥
ब्रह्मा-विष्णु-महेश-शक्ति मिळती त्या एकमेकींमधे ॥
यांचा स-गम देवतांसि अवघ्या स्वर्गाहुनी सौख्य दे ॥
आले देव समस्त यास्तव तया ठायासि सानंद ते ॥
पुष्पे वर्षति गाति नाचति स्वये स्तोत्रे करिती शते ॥१२९॥
स्त्रग्धरा
ब्रह्म्याने सोम-याग प्रथम करुनि तत्तिरि सोमेश्वरासी ॥
स्थापोनी दीधलासे वर जरि असला नीच ही पाप-राशी ॥
वेणी-स्नाने चि त्याचे सकल अघ हरे पूजिल्या देव भुक्ती ॥
स्वर्गी रोवी ध्वजा जो सुर-पति-पद घे देह-पाते हि मुक्ती ॥१३०॥
उ०जा०
वेणीपरी सं-गम जाहलासे ॥
त्रि-वेणि हे नाव मनो-ज्ञ भासे ॥
सर्वामरी यज्ञ उदंड केले ॥
प्रयाग हे नाव म्हणोनि झाले ॥१३१॥
शा०वि०
गंगा होउनि पश्चिमाभि-मुख त्या कालिंदिला भेटली ॥
जेथे ते स्थळ तीर्थ-राज म्हणुनी प्रख्यात बा भू-तळी ॥
तेथे माधव लोक-मुक्तिकरिता प्रीती धरोनी वसे ॥
तीर्थे ज्यात अनंत तीर्थ दुसरे ऐसे न कोठे असे ॥१३२॥
शा०वि०
वेणी-माधव तीर्थ-राज म्हणती तो हा प्रयागाभिधे ॥
राहे कल्प-तरूच काम-द जना भू-मंडलाच्या मधे ॥
पापांधार हरावया उगवला की सूर्य भूमीवरी ॥
तीर्थ-क्षेत्र हरि-प्रिय त्रि-जगती नाही दुजे यापरी ॥१३३॥
गीति
सित-कृष्ण तोय भासे अद्यापी पावली जिथे संगा ॥
पूर्वाभिमुखी होउनि यमुनेसह चालली पुढे गंगा ॥१३४॥
व०ति०
पाणी सु-निर्मळ जिचे अति रम्य भासे ॥
मोठे लहान फिरती अ-गणीत मासे ॥
तैसे च कच्छप अ-संख्य जळात काही ॥
तीरी बहूत रमती तप घ्यावया ही ॥१३५॥
भौरे अनंत फिरताति अ-गाध पाणी ॥
तेथील नक्र-समुदाय न अंत जाणी ॥
लाटांवरी भिडति येउनि उंच लाटा ॥
तीरास लागति न होय जळांत साठा ॥१३६॥
उ०जा०
एकापुढे एक सहस्त्र नावा ॥
धावोनि जाताति नसे विसावा ॥
तरंग-वेगे वर-खालि होती ॥
होड्या किती त्यातुनि पार जाती ॥१३७॥
भागीरथी शब्द करीत वेगे ॥
येऊन सारी यमुनेसि मार्गे ॥
येता तिचा ओघ मिळोनी दोघी ॥
प्रेमे पुढे चालति पूर्व-भागी ॥१३८॥
भागिरथीचे अति शुभ्र वारी ॥
काळी दिसे सूर्य-सुता हि भारी ॥
दोघीमधे जे जळ लाल आहे ॥
सरस्वती ती प्रकटोनि वाहे ॥१३९॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-04-10T05:35:21.5100000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

स्फुंदणें स्फुंदस्फुंदणें

 • v i  Sob. स्फुंदन 
 • n  Sobbing. 
RANDOM WORD

Did you know?

शंकराला अर्धी प्रदक्षिणा कां घालतात ?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,450
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,879
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.