TransLiteral Foundation

गंगारत्‍नमाला - भाग ५

कवी नरहरी यांनी पौराणिक काव्य लिहून मराठी भाषेला एक आगळीच झळाळी दिली.

भाग ५
पृथ्वी
करी स्मरण भू-पती जंवर आठवोनी पदा ॥
बसे सुर-तरंगिणी नृ-पति-दक्षिणांकी तदा ॥
म्हणे भगिरथा तुझी समज कन्यका बा मला ॥
पतीजवळि पोचवी जगति हो यशस्वी भला ॥८१॥
विलोकुनि म्हणे तिला नृ-प दिली मला पामरा ॥
पितृ-त्व वदवी तुवा जननि वंद्य जी सामरा ॥
महत्त्व दिधले तसे झटिति तात-कार्या करी ॥
शिरी तुज धरी जगत्प्रभु अताचि ये भूवरी ॥८२॥
व०ति०
त्याते तथास्तु म्हणुनी मग गुप्त झाली ॥
येण्यासि भूमिवरि वेग-बळे निघाली
भागीरथी म्हणत्ति यद्दुहिता म्हणोनी ॥
गंगेसि धन्य गमला न तदन्य कोणी ॥८३॥

कटाव
सुर-लोकाहुनि गंगा खाली, भूमीवरि येण्यासि निघाली, शर्व-जटी ती उडीच घाली, देव-मंडळी पाहू आली, फिरति विमाने दाटी झाली, मुनि-गण-सं-तति सर्व मिळाली, जयोऽस्तु म्हणुनी स्तवने करिती, सुरांगना  ओवाळिति आरती, किन्नर टाकिति पुष्पे वरती, हाहा हूहू तुंबरु गाती, सर्व अप्सरा प्रेमे नाचति, घो घो शब्दे पूर चालला, अरुण सांवरी सूर्य-रथाला, नक्षत्रांच्या वाहती माळा, मोत्यांपरि त्या दिसति तळाला, पाहुनि पर्वत-फेन-मळाला, ऐरावतिचा सर्व गळाला, द्वि-रदंगापरि लाटा वाहती, विमान-नावा वरी पोहती, वि-चित्र रंगा तरंग दाविति, भुजंगापरि प्र-वाह धावति, लयासि कच्छप मत्स्य पावती, तरंग-वाते पाप हरावे, स्मरण करिता निर्मळ भावे, काळाचे भय मुळी न पावे, स्नाने विष्णु-पदाला जावे, पवित्र ज्यांनी चरित्र गावे, एकवीस कुळ उद्धरावे, त्या गंगेचे दर्शन घ्यावे, तरीच मनुजे जन्मा यावे, गंगा आली शिवजटेत गुप्त झाली ॥८४॥
शा०वि०
गंगा-गर्व हरावया सगर-जा तारावया गावया ॥
कीर्ती भक्त-जनी पवित्र हि जगत्पापा वि-नाशावया ॥
व्हाया शांत विषोत्थ-ताप स-दये श्री-विष्णु-पादोद्बवा ॥
गंगा मस्तकि घेतली सुर-वरे वर्णू किती त्या भवा ॥८५॥
होता गर्व नदीस वेग धरिता नाही च कोणी परी ॥
येता शंभु-जटेत सर्व हरला बिंदूपमेला धरी ॥
झाली गुप्त जटांतरी न कळली जावोनि कोठे वसे ॥
थोरांशी अभि-मान जो धरि तया लोकांत थारा नसे ॥८६॥
होता गुप्त शशांक-शेखर-जटी भागीरथी तेधवा ॥
होता खिन्न करोनि यत्‍न पहिला त्या खेद झाला नवा ॥
भ्याला भू-प म्हणे अता करु कसे देवाधि-देवा मला ॥
रक्षी दे पितरांसी स्वर्ग-गतिला सोडोनि गंगा-जळा ॥८७॥
ऐकोनि करुणार्द्र-वाक्य द्रवला शंभू नृ-पाचे तदा ॥
टाकी त्या च हिमालयी अति शुची गंगा-प्र-बाहा मुदा ॥
सं-पादोनि परा-क्रमे चि दिधली जांवाइ याने खरी ॥
दावायासि गमे जना श्वशुर त्या कीर्तिस वाहे शिरी ॥८८॥
शा०वि०
झाले सात प्र-वाह त्यांत इतर-द्वीपी सहा चालती ॥
आला एक भगीरथार्थ जहला तो तीन भागाकृती ॥
ब्रह्मा-विष्णु-शिवात्मक प्रकृतिचे त्रैगुण्य ते भिन्न-ता ॥
पावे काय, जगच्छिवार्थ वहते स्वीकारुनी तोय-ता ॥८९॥
गंगोत्री पहिली दुजीस म्हणती मंदाकिनी यापरी ॥
तत्पूर्वेस असे जिला अलकनंदा नाव ती तिसरी ॥
गंगोत्रीत असे भगीरथ-शिळा केदार मंदाकिनी ॥
कांठी तीसरिचे वसे नर अणि नारायण श्री-मुनी ॥९०॥
मालिनी
निज-पद-वि-भवाचे काय माहात्म्य आहे ॥
समजुनि मन घ्याया येउनी विष्णु राहे ॥
नर-सह तप चाले उग्र रामायणाचे ॥
सुर-मुनि अति हर्षे पाहुनी गात नाचे ॥९१॥
हरि-हर वसती ज्या स्वर्नदी-पुण्य-काठी ॥
सतत सुर-मुनींची दर्शनालागि दाटी ॥
अनुपम किति वानू स्थान ते मी स्व-वाचा ॥
शत-जनु-कृत-पुण्ये लाभ होतो तयाचा ॥९२॥
सु-लभ सुर-पदाचा लाभ यज्ञादि-कर्त्या ॥
अ-सुलभ बदरीच्या काननी वास मर्त्या ॥
करुनि सुर-नदीचे स्नान केदार-नाथा ॥
नमि जरि नर त्याच्या येतसे मुक्ति हाता ॥९३॥
अति-शय महिमा तो थोर नारायणाचा ॥
भव-भय हरि ज्याचे नाव घेतांचि वाचा ॥
करुनि अलकनंदा-स्नान जो मूर्ति पाहे ॥
सकृदपि नर वैकुंठासि जावोनि राहे ॥९४॥
व०ति
अन्वर्थक प्रकट नाव हिमालयाचे ॥
भारीच बर्फ दिसताति थवे जयाचे ॥
षण्मास यास्तव सु-पुण्य तया स्थळासी ॥
देवविणे गमन-शक्ति नसे नरासी ॥९५॥
भु०प्र०
पुढे ओघ तेथोनि येतात खाली ॥
मधे ऐक्य-ता त्यांत दोघांसि झाली ॥
मिळे यत्र गंगोत्रि मंदाकिनीते ॥
धरी स्थान रुद्र-प्रयागाभिधेते ॥९६॥
दिला भाग रुद्रासि तेथे सुरांनी ॥
असे सेविता मुक्ति दे जे नरांनी ॥
तया तीर्थि साहोनिया ताप साचा ॥
तपाते करी स्तोम तो तापसांचा ॥९७॥
असे श्री-पुरी पूर्व अंगास खाली ॥
रमाकांत-नारायणासाठि आली ॥
तपो-भंग-भीत्यर्थ दूरीच राहे ॥
म्हणोनी पुरी श्री असे नाव वाहे ॥९८॥
पुढे तीनही ओघ एकेच ठायी ॥
मिळाले मुळी भिन्न-ता ज्यांसि नाही ॥
अवस्था-त्रयी- द्वैत-भावासि वाहे ॥
परी आत्म-रूप स्वये एक आहे ॥९९॥
सुरेंद्राचि ती वृत्र-हत्या हराया ॥
सुरी याग केला असे याचि ठाया ॥
तशा देव-यज्ञी हरी तुष्ट झाला ॥
म्हणे काही मागा सुरांते वराला ॥१००॥
तया बोलिले देव देसी वरासी ॥
तरी इतुके दे दयाळा अम्हांसी ॥
अम्ही याग एथे असे आजि केला ॥
धरो तीर्थ देव-प्रयागाभिधेला ॥१०१॥
करी स्नान जो दान त्या मुक्ति व्हावी ॥
तपा जो करी त्या स्व-रूपासी दावी ॥
तथास्तू म्हणोनी हरी गुप्त झाला ॥
वसे नाव देव-प्रयाग स्थळाला ॥१०२॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-04-10T05:34:01.4630000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

ŚATĀNĪKA I(शतानीक)

RANDOM WORD

Did you know?

भारतीय विवाहसंस्थेचा पाया केव्हां घातला गेला?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,108
  • Total Pages: 47,439
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 326,018
  • Marathi Pages: 28,417
  • Tags: 2,707
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.