मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नरहरि|गंगारत्नमाला| भाग ३ गंगारत्नमाला भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ गंगारत्नमाला - भाग ३ कवी नरहरी यांनी पौराणिक काव्य लिहून मराठी भाषेला एक आगळीच झळाळी दिली. Tags : kavyanarahariramकाव्यनरहरिराम भाग ३ Translation - भाषांतर उ०जा०भगीरथे आइकिले स्व-कानी ॥ केले महत्पाप मदे स्वकांनी ॥पिता परं-धाम-पदास गेला ॥जाणोनि पुत्रे मग यत्न केला ॥४०॥देवोनि राज्यासि निजात्मजाते ॥निघे मुनी वानिति देव ज्याते ॥गंगा-जळाते पितरांसि द्याया ॥सु-पुत्र ये काननि राम-राया ॥४१॥जेथे अ-संख्यात अ-मर्त्य येती ॥गंधर्व विद्याधर सिद्ध गाती ॥अ-गम्य जो पातकि-मानवाला ॥हिमाचळी त्या नर-पाळ आला ॥४२॥जेथे दिसे उंच पवित्र झाडी ॥स्व-पल्लवे स्वर्ग-मलासि झाडी ॥कोंदाटली पक्षि-रवे वने ती ॥बोलावुनी देव-गतीस नेती ॥४३॥हिमाचळी जे सुख देव याते ॥न होय ते नंदनि मंद-वाते ॥कळेल कोणा महिमा तयाची ॥रामा, सुता ती गिरि-जा जयाची ॥४४॥भु०प्र०करी व्याघ्र शब्दासि एके ठिकाणी ॥कडेलोट चाले खळाळोनि पाणी ॥पडे ओघ खाली जळांचा कडाडे ॥न त्या साहता ती मही ही धडाडे ॥४५॥कडे तूटले एक ठायासि खाली ॥मदे मत्त-दंते-कदंबे निघाली ॥तशा हत्तिंना पाहता शैल-काया ॥गमे मेघ जाती तळी काय राया ॥४६॥गुहेमाजि जे नीजले सिंह त्याला ॥महत्तो-शब्दे गमे शत्रु आला ॥प्रति स्पर्धितेने स्वये गर्जताती ॥तया ऐकता श्वापदे दूर जाती ॥४७॥तपस्वी उभे राहिले एक-पायी ॥तसे बैसले नेत झाकोनि काही ॥नसे मांस देही त्वगस्थी च राहे ॥दिसे एक डोयी जटा-भार वाहे ॥४८॥किती पर्ण भक्षोनिया राहताती ॥जितेंद्रीय कोणी सदा ब्रह्म ध्याती ॥किती वायु-भक्षी किती धूम्र-पानी ॥किती देह टाकोनि जाती विमानी ॥४९॥कामदा.एक ठायि ते वाहती झरे ॥कूट-तुल्य ही बर्फ पाझरे ॥तूटले कडे श्वापदा नसे ॥मार्ग पाहता भीति होतसे ॥५०॥म्लान दीवसा ज्या वनस्पती ॥अग्निचे परी रात्रि दीसती ॥त्या मणि-प्रकाशीत वारुळी ॥बैसले किती थोर कुंडली ॥५१॥चंदनाचिये वृक्षि वेष्टना ॥करुनि डोलवी कुंडली फणा ॥जो कधी नसे पक्षि पाहिला ॥नृप विलोकिता स्तब्ध राहिला ॥५२॥पर्वताचिये शीखरावरी ॥शरभ बैसुनी ओरडा करी ॥वनतेय ही त्याच काननी ॥धरुनिया उडे सर्प आननी ॥५३॥कामदा.खालि पाहुनी हस्ति केसरी ॥वरुनि घे उडी मस्तकावरी ॥वानरे उड्या वृक्षि मारिती ॥तनय घेउनी पोटिशी किती ॥५४॥पायि चालता सर्प थोरले ॥अजगरादि ते मत्त पाहिले ॥पाहि जो पुढे व्याघ्र एकला ॥महिष फाडुनी खात बैसला ॥५५॥उ०जा०करी तशा घोर नगी तपाला ॥भक्षोनिया शुष्क गलीत पाला ॥जिंकोनि सर्वेंद्रिय-वृत्ति राही ॥कित्येक संवत्सर पी निरा ही ॥५६॥शिखरीणीसहस्त्राब्दे ऐसे भगिरथ करी उग्र तप जे ॥तया योगे गंगा-ह्रदयि करुणा फार उपजे ॥धरोनी देहाते सकळ-जनता-पाप-हर ती ॥उभी राहे भावे नृ-प-निकट रामा प्रहर ती ॥५७॥जया पाहे त्याते करिल नयने भस्म यतिला ॥अशा पाहोनी त्या बहुत उपजे वि-स्मय तिला ॥म्हणे राया पाहे नयन उघडी चिंतिसि जिला ॥प्रसन्ना मी आहे वद कवण बा कष्ट तुजला ॥५८॥नृ-पाच्या गंगेचा मधुर श्रवणी शब्द पडला ॥तृषार्ताच्या जैसा वदनि अमृत-स्त्राव घडला ॥किती वानू झाला तिजसि बघता हर्ष न मिती ॥उभी गंगा जेथे विधि-मुख जिला देव नमिती ॥५९॥सहस्त्रादित्यांची जणु सम रुची एकवटली ॥जगत्पापांधारा खनन करण्या काय नटली ॥अशी देखे माता चरणि करि लोटांगण तदा ॥नृ-प क्षाली प्रेमोद्गत-नयन-तोये मग पदा ॥६०॥झाला नृ-पासि अति-हर्ष न माय चित्ती ॥रोमांच-रूप उमटे सकलांग-भित्ती ॥प्रेमे तदक्षि-युगलांतुनि जाय पाणी ॥होता स-गद्गद गळा वदवे न वाणी ॥६१॥पाहोनि माय करिता नमना तयाला ॥आणी कृतार्थ करणे चि मनात याला ॥ठेवी भगीरथ-शिरी कर-पंक-जा ती ॥जेणे सुरेंद्र-पदवीसहि मर्त्य जाती ॥६२॥ N/A References : N/A Last Updated : April 10, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP