सप्तम स्कंध - अध्याय तेरावा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । नगराजेंपुसिलेतेसमईं । अंबेभक्तिसांगज्ञानमईं । मध्यमासीजेवींज्ञानहोई । तेवीवर्णीदयाळें ॥१॥

देवीम्हणेशैलवरा । मार्गतीनमोक्षद्वारा । कर्मभक्तीज्ञानविचारा । परीसुलभभक्तिमार्ग ॥२॥

भक्तीचेभेदतीन । झालेतेगुणेकरुन । परपीडार्थमाझेसेवन । दंभेकरीतामसती ॥३॥

आपुलेंव्हावेहित । भजेपरपीडारहित । भेदबुद्धीभोग इच्छित । राजसजाणतीभक्ती ॥४॥

पापव्हावेंक्षालन । कर्मकरीमदर्पण । भेदबुद्धीमजठेऊन । सेवाकरीसात्विकती ॥५॥

तमरजदोनीभक्ती । तेणेंनपवेपरभक्ती । तृतीयजेसत्वभक्ती । परभक्तीदायकही ॥६॥

परभक्तीमोक्षसाधन । तिचेंऐकलक्षण । सदाऐकेमदगुण । कीर्तनसदाकरीतसे ॥७॥

कल्याणगुणाचिखाणी । ऐसीमजजाणोनि । मनधरीगुणकीर्तनीं । अखंडजेवीतैलधार ॥८॥

हेतुसेवनींकांहींनसें । चारीमुक्तीनेंच्छितसे । सेव्यसेवकभावासरिसे । सुखनाहींम्हणेतो ॥९॥

भेदबुद्धीतोनधरी । सेव्यसेवकताअंगिकारी । मजचीसर्वचराचरी । पाहेंआणिनमीतसे ॥१०॥

माझींपूजामाझेंदर्शन । मत्क्षेत्रांमाजीगमन । मममंत्राचेउच्चारण । मत्शास्त्रसदाआवडे ॥११॥

माझीव्रतेंममगायन । प्रेमेंकरीलज्जाहीन । सदगदकंठ अश्रुपूर्ण । प्रेमयुक्तसर्वदा ॥१२॥

माझेचपाहीउत्सव । माझेंच आवडेंवैभव । मद्रूपझालेसर्व । अहंकारनासला ॥१३॥

ऐसीभक्तीवाढली । ज्ञानमात्रासंपादिली । भक्तीचीसीमाबोलिली । ज्ञानतोंचिभूधरा ॥१४॥

वैराग्याचाजोअंत । ज्ञानतेहीम्हणवत । एवंभक्तीजोकरीत । परभक्तीमोक्षदाही ॥१५॥

प्रारब्धयोगेंकदाचित । ज्ञानजरीनलाभत । तरीतोमणिद्वीपांजात । अखिलभोगभोगितसे ॥१६॥

मगहोयमाझेंज्ञान । मोक्षतेव्हांतयालागून । मोक्षकदाज्ञानावांचून । नोहेसिद्धांतजाणिजे ॥१७॥

जरीअसेवैराग्यवान । मरणपावेज्ञानहीन । ब्रम्हलोकींजाऊन । कल्पपर्यंततोराहे ॥१८॥

मग उपजेसत्कुळीं । ज्ञानसंपादीसकळी । मोक्षतेव्हांचिआकळी । कृतार्थहोयतेधवा ॥१९॥

अनेकजन्मेंपावेज्ञान । ज्ञानाचाचकीजेयत्न । पदींपदींवाजियज्ञ । ज्ञानसाधन आचरितां ॥२०॥

दुग्धांमाजीजेवींघृत । तेवींज्ञानभूतांत । परीमंथनावांचूनप्राप्त । कदानोहेभूधरा ॥२१॥

हिमाचलम्हणेजननी । तूंवससीकितीस्थानीं । मुख्यकोणचीभवानी । सांगमजकृपाळे ॥२२॥

व्रतेंसांगपुण्यकर । पूजनाचाप्रकार । सांगमजसविस्तर । कृतकृत्यहोईनमी ॥२३॥

देवीम्हणेदृश्यस्थान । सर्वमाझेचिजाण । सर्वकालव्रतपूर्ण । सर्वरुपामीजरी ॥२४॥

तथापिभक्तीनेंतुष्टलें । यास्तवपाहिजेवर्णिलें । कोल्हापुरस्थानपाहिले । सर्वोत्कृष्टजाणतू ॥२५॥

महालक्ष्मीचानिवास । आद्यरुपमाझेंविशेष । मातापुरहेंरेणुकेस । स्थानदुसरेंमाझेंची ॥२६॥

तिसरेंजाणतुळजापुर । चौथेंसप्तशृंगसुंदर । हिंगुलापांचवेप्रियकर । ज्वालामुखीसहावें ॥२७॥

शांकभरीसप्तमस्थान । भ्रामरीअष्टमजाण । श्रीरक्तदंतीकास्थान । नवमजाणनगेश्वरा ॥२८॥

दाहवेंमाझेंविंध्याचल । नंदास्थानगंगाकाल । अन्नपूर्णामहास्थल । कांचीपुरीविराजे ॥२९॥

बारावेंभीमास्थान । तेरावेंविमलादर्शन । श्रीचंद्रलाभुवन । कर्नाटकीपंधरावें ॥३०॥

सोळावेंकौशिकीक्षेत्र । नीलांबेचेंपरमपवित्र । नीलपर्वतींतेंसुचित । सत्रावेंजाणशैलेशा ॥३१॥

जांबूनदेश्वरीस्थल । अठरावेंजाणनिर्मल । श्रीनगरस्थानसोज्वळ । एकुणिसावेंजाणपा ॥३२॥

गुह्यकालीमहास्थान । नेपाळींतेंपावन । मीनाक्षीचेंपरस्थान । चिदंबरीहालास्यी ॥३३॥

वेदारण्यांतसुंदरी । एकांबरीभुवनेश्वरी । जेजूरीतयोगेश्वरी । नीलसरस्वतीचीनांत ॥३४॥

वैद्यनाथीसव्वीसावें । बगलास्थानबरवें । मणिद्वीपींसत्ताविसावे । मुख्यस्थानमाझेंच ॥३५॥

कामाक्षीदेवीस्थान । कामरुदेशांतजाण । मासांतीमूर्तिआपण । स्वयेहोतरजस्वला ॥३६॥

गौरीदेहयोनिस्थान । तेथेंझालेंतेंपतन । स्थानझालेअतिपावन । अनुपम्यत्रिभुवनी ॥३७॥

तेथीलसर्वदेवता । पर्वतरुपचिनिश्चिता । भूमीसर्वपरदेवता । रुपजाणतेथील ॥३८॥

पुष्करीगायत्रीस्थान । अमरेशीचंडीस्थान । प्रभासांतदिव्यस्थान । पुष्करिणीबत्तिसावी ॥३९॥

नैमिषांतलिंगधारिणी । पुरुहूतींपुष्कराक्षवासिनी । आषाढीरतिरुपिणी । चंडमुंडीमहास्थल ॥४०॥

दंडिनींचेमहास्थल । भारभूतींभूतिस्थल । नकुलेश्वरीजेथेंनकुल । हरिश्चंद्रिचंद्रीका ॥४१॥

श्रीगीरीवरीशांकरी । त्रिशूलातेजप्येश्वरी । सूक्ष्माआम्रातकेश्वरी । स्थानेंजाणत्रेचाळीस ॥४२॥

महाकालीशांकरी । शर्वाणीमध्यमपुरी । मार्गदायिनीकेदारी । भैरवीभैरवांतजाणिजे ॥४३॥

मंगलावसेजेथेंगया । कुरुक्षेत्रींस्थाणुप्रिया । स्वायंभुवीनगवर्या । नाकुलांतवसतसे ॥४४॥

उग्रास्थानकनखली । विश्वेशाविमलस्थली । महानंदाभद्रकाली । अट्टहासीविराजे ॥४५॥

महांतकामहेंद्रांत । भीमेश्वरीभीमक्षेत्रांत । वस्त्रापतस्थानांत । पुन्हातेचिछप्पन्न ॥४६॥

भवानीचेंदिव्यस्थान । शांकरीचेअठठावन । रुद्रकोटीमहास्थान । रुद्राणीचेंनगोत्तमा ॥४७॥

विशालाक्षीकाशींत । महाभागामहालयांत । गोकर्णांमाजीविख्यात । बासष्टावेंभद्रकर्णी ॥४८॥

भद्रकर्णीभद्रास्या । उत्पलाक्षीमहौजसा । सुवर्णाक्षस्थानदेशां । शोभविलेंजियेनें ॥४९॥

स्थाणुसंज्ञकमहास्थान । प्रसिद्धजेंज्ञानारण्य । अंबोनिधीजेथेंदक्षिण । रत्नाकरविराजे ॥५०॥

समुद्राचेंतीरावरी । महास्थानकन्याकुमारी । स्थाण्वीशाहेंचनिर्धारी । वज्ररत्नभूपिता ॥५१॥

लावण्याजिचेंअतिगहन । पूर्वाभिमुखींप्रसन्न । स्थानामाजीमुख्यस्थान । माझेंजाणनगोत्तम ॥५२॥

अन्नरुपेसैकत । जिचेसंनित्धशोभत । पासष्टावेंअतिविख्यात । सिद्धस्थानमाझेंहें ॥५३॥

कमलालयांतकमला । छगलंडींप्रचंडाप्रबला । त्रिसंध्यातकुरडला । माकोटींमुकुटेश्वरी ॥५४॥

शांडकीमंडलेश्वरी । कालीस्थानकालजरी । शंकुकर्णीध्वनिसुंदरी । स्थूलकांतस्थूलास्या ॥५५॥

ज्ञानियाचेह्रदयांत । हल्लेखामीविलसत । हींस्थानेंतुजविख्यात । वर्णिलीजाणसंक्षेपें ॥५६॥

सर्वस्थानेंकाशीत । माझींपर्वताआहेत । आतांऐकिजेव्रत । पुण्यकार उत्सवते ॥५७॥

तृतीयाअष्टमीनवमी । व्रतेंमाझीकरानियमीं । प्रदोषचतुर्दशीसंयमी । पूर्णिमेसिव्रतकीजे ॥५८॥

सोमशुक्ररविमंगल । व्रतमाझेंनिर्मळ । नवरात्रद्वयकेवळ । सर्वदायकहोतसे ॥५९॥

दोलोत्सवशयनोत्सव । जागरोत्सवरथोत्सव । दमनोत्सवपवित्रोत्सव । प्रीतिदायकमाझेहे ॥६०॥

कन्यासुवासिनीब्राम्हण । यांशींद्यावेंभोजन । निगमोक्ताविधान । पूजनमाझेंकरावें ॥६१॥

अथवाआगमोक्तपूजन । करावेंभक्तीकरुन । वित्तशाठयवर्जून । यथाशक्तीकरावे ॥६२॥

एवंकरीजोनर । भुक्तीमुक्तीइछितवर । पावेलमजपासूनिर्धार । निश्चयेजाणहिमालया ॥६३॥

व्यासम्हणेभारता । एवंवदोनिजगन्माता । अंतर्धानझालीतत्वता । देवगेलेस्वस्थानी ॥६४॥

मगहिमालयाचेघरी । प्रगटझालीकन्यागौरी । वरिलीतीसशंकरीस्कंदपुत्रजाहला ॥६५॥

तेणेवधिलातारकासुर । देवीकेलासैन्येश्वर । पूर्वींमंथिलासागर । रत्नेंतेव्हांनिघाली ॥६६॥

देवीप्रार्थिलीदेवानीं । लक्ष्मीप्रगटेजळांतुनी । वरिलेंतिसविष्णुनी । शमसर्वजाहलें ॥६७॥

लक्ष्मीगौरीजन्मकथन । गीतारहस्यपावन । तुजसांगितलेंविस्तारुन । आणिककाय ऐकसी ॥६८॥

सूतशौनकासांगत । व्यासजन्मेजयाप्रत । तेचयेथेंकथामृत । श्रोतीजनांनिरुपिले ॥६९॥

हीरसाळदेवीगीता । भक्तिभावेंपठनकरितां । अर्थामाजीमनघालिता । खरास्वार्थकळेल ॥७०॥

शतएकपंच्यायशी । भागवताचेश्लोकासी । प्राकृतेंवदेसप्तमस्कंदासी । परांबातीवत्सला ॥७१॥

इतिश्रीदेवीविजयेसप्तमस्कंदेत्रयोदशोध्यायः ॥१३॥

स्कंदः समाप्त । श्रीअंबिकार्पणमस्तु ॥६॥

इति श्रीदेवीविजये सप्तम स्कंदः समाप्तः

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP