मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री देवी विजय|सप्तम स्कंध| अध्याय तिसरा सप्तम स्कंध अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा सप्तम स्कंध - अध्याय तिसरा श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय. Tags : devi vijaypothipuranदेवी विजयपुराणपोथीमराठी अध्याय तिसरा Translation - भाषांतर श्रीगणेशायनमः । भार्येंसहमहामुनी । रम्यरुपेंदोघेंजणी । राहतींप्रेमेंसुखेंकरुनी । आश्रमामाजीदेवसे ॥१॥इकडेशर्यातीचीकांता । सुकन्येचीजीमाता । कन्याविरहेंदुःखिता । प्रार्थीतसेपतीशी ॥२॥कन्यादिलीअंधासी । राहेऋषीवनवासी । सुखदुःखकायतीशी । नकळेंकांहींनृपवर्या ॥३॥वर्षेझालीबहुत । कन्याआहेकीजिवंत । पाहूंएकदांनिश्चित । दुःखमजनसोसवें ॥४॥आवश्यम्हणेनृपती । भार्येसहवनाप्रती । येऊनपाहेदिव्यकांती । आश्रमामाजीपुरुषाते ॥५॥पाहतांचिनृपेंदुरुन । बुडविलेंम्हणेकन्येन । वृद्धब्राम्हणामारुन । तरुणदुजाआणिला ॥६॥निश्चयकेलालग्नसमई । तोभंगिलायेसमई । तारुण्यदोषेंनिर्दईं । झालीक्रूरकन्यका ॥७॥डागलागलाकुळाशीं । निपजलीहीकन्याकैंशीं । एवंदुखेंमानसीं । खवळलानृपवर्य ॥८॥पितापाहिलादुरुनी । सुकन्याआलीधाऊनी । मातपितरानमूनी । उभीराहिलीसमीप ॥९॥नृपक्रोधेंतिरस्कारी । म्हणेदुष्टेंहोयदुरी । वृद्धपतीमारुनकरी । तरुणपुरुष आणिला ॥१०॥कांनझालागर्भपात । दुष्टानिपजलीसकुलांत । गोडबोलुनिअदभुत । ठकविलेंसपापिष्ठे ॥११॥पित्याचेंवाक्य ऐकोन । कन्याबोलेमृदुवचन । अन्यनसेपतीच्यवन । दिव्यकेलासूर्यपुत्रें ॥१२॥चलावेंत्वांतेथवरी । कळेलवृत्तनवलपरी । निरपराधीक्रोधनकरी । लाडकीतुझीकन्यका ॥१३॥नृपझालाकोपशांत । सर्व आलेआश्रमांत । परस्परेंअभिवंदित । कुशलप्रश्नपरस्परें ॥१४॥विचारितांसर्वकळलें । नृपचित्तसंतोषलें । च्यवनतेव्हांनृपाबोले । पूर्ववाक्यस्मरोनी ॥१५॥सूर्यपुत्रांदिलेंवचन । करवीनतुम्हांसोमपान । राजेंद्राकरीतूंयज्ञ । होईनस्वयेंअध्वर्यु ॥१६॥इंद्रादिसर्वदेवता । प्रत्यक्षयेतीलतत्वता । सोमपीथदस्राकरवितां । यशहोईलतुझेंमाझें ॥१७॥व्यासम्हणेंनृपाळा । ऐकूनिरावहर्षला । मंडपतेथेंउभारिला । संभारसर्वमेळविलें ॥१८॥सर्वनृपसर्वऋषी । पाचारिलेबहुमानशी । यथायोग्यसर्वांसी । दानमानेंतोषविलें ॥१९॥वसिष्ठादिमहामुनी । ऋत्विज असतीसोमयज्ञीं । च्यवनशर्यातीलागुनी । दीक्षादानकरीतसे ॥२०॥देवासहपाकशासन । मंडपींबैसेयेऊन । दोघेंआलेमित्रनंदन । सभास्थानींबैसले ॥२१॥इंद्रेंतयांपाहुनी । शंकितझालामनी । पुसेदेवांलागूनी । केवींआलेअयोग्यहे ॥२२॥योग्यनसतांसोमपानी । यांसींपाचारिलेकोणी । उत्तरनदेतीसभास्थानी । देवसर्वचकितसे ॥२३॥च्यवनेंतेव्हांकायकेलें । इंद्रार्थपात्रस्थापिल । सवेंचिदस्रार्थठेविले । चमसदोनच्यवनानें ॥२४॥इंद्रेंपात्रेंपाहून । म्हणेयोग्यनाहींतदोघेजण । नकरावेपात्रस्थापन । च्यवनऋषेयाज्ञिका ॥२५॥ऋषाम्हणेदोषकाय । मित्रपुत्रतेजोमय । धर्मपत्नीपासूनसूर्य । प्रकटकरीविधीनें ॥२६॥नाहाततसकर । किमर्थत्यांचातिरस्कार । म्याआजिनिर्धार । सोमाधिकारीतेकेलें ॥२७॥शक्रम्हणेचिकित्सक । नासत्यहेनिःशंक । त्याज्य असतांठाऊक । भंगिशीकेवींमर्यादा ॥२८॥च्यवनतेव्हांकोपला । अवश्यदेईनसोमाला । वृथाकरशीकलकला । अहल्याजारावृत्रघ्ना ॥२९॥सर्वदेवनबोलती । तूंचिवारिसीदुष्टमती । कदांनायकेनिश्चिती । देईनसोम अवश्य ॥३०॥सत्य असतांसूर्यकुमर । स्वयेंझालेभिषग्वर । करितीसर्वांपरोपकर । रोगनाशितीतुमचे ॥३१॥रोगचिकित्साकरिती । दोषनसेतयाप्रती । तुंनजाणसीमंदमती । द्रोहकरिसीमानयोगें ॥३२॥वैद्यक असेंपरोपकार । निंदिसीतूंपामर । मजवरीत्यांचाउपकार । देवतुल्यमजकेले ॥३३॥मीदिधलेयांवचन । तुम्हांसोमार्हकरीन । आग्रहीनघालीमन । नचलेयेथेंपुरंदरा ॥३४॥व्यासम्हणेनृपती । क्रोधेंखवळेसुरपती । बोलेमगच्यवनाप्रती । बलयुक्तगर्विष्ट ॥३५॥द्विजाधमाममवचन । तोडितांशिरतोडीन । विश्वरुपाचेंहनन । केलेंजेवींगर्विष्टा ॥३६॥ऐकतांचिऐसीमात । चमसघेईंहस्तांत । सोमघालीमंत्रपूत । नासत्यार्थनिःशंकतो ॥३७॥एवंइंद्रेंपाहिले । कोपेंमगवज्रप्रेरिले । च्यवनेंतैंस्तंभविलें । तपोबळेंसहस्त ॥३८॥कोपलातेव्हांच्यवन । समंत्रकरितांहवन । कृत्यप्रगटेअग्नींतून । मदनामेंराक्षसतो ॥३९॥काजळाचामहामेरु । तेवींत्याचादेहथोरु । उर्ध्वकेशभयंकरु । नयनदोनीकाळाग्नी ॥४०॥नासिकेचीदोनीविवरें । मेरुचींतींमहागव्हरें । मुखत्याचेबहुविस्तरे । सहस्रयोजनपर्यंत ॥४१॥शतयोजनलंबित । चारदंष्ट्रभयप्रांत । दशयोजनविस्तृत । सर्वदंतजयाचे ॥४२॥जिव्हांभ्यासुरविशाळ । दाढाचाटीकराळ । सर्पापरीलळलळ । ब्रम्हांडग्रासकरीलकीं ॥४३॥अधरोष्टलागलाधरे । उत्तरोष्ठगगनींफिरे । बाहूदोनगिरिमंदरे । विशाळशूलकरतळीं ॥४४॥उदराचीझालीबखळ । ब्रम्हांडसर्वसांठवेल । धांवलातो उतावेळ । शक्रभक्षणाकारणें ॥४५॥झालाएकचिहक्कार । आक्रोशतीसर्वसुर । मेलाम्हणतीपुरंदर । नसुचेंकांहींकोणाशीं ॥४६॥स्तंभिलासेंइंद्रहस्त । कैंचेबळजाहलात्रस्त । मानसेतेव्हांगुरुस्मरत । तत्काळ आलापुरोधा ॥४७॥म्हणेइंद्राचुकलासी । छळिलेंत्वांदेवीभक्तासी । शक्तिनसेअन्यासी । असुरधारणीसांप्रत ॥४८॥स्व इच्छतेदेवीभक्त । करितीसदामनःपूत । कोणतयांवारित । शक्तिसमशक्तते ॥४९॥च्यवनाहोईशरण । तोचकरीलरक्षण । ऐकतांच इंद्रेंचरण । दृढधरिलेच्यवनाचे ॥५०॥चुकलोंआतांक्षमाकरी । कृत्य आपुलेंनिवारी । शरणांगतासीतारी । दयार्द्रहोईभार्गवा ॥५१॥सोमपीथेनासत्य । तववचनेंहोवोंतसत्य । मानीनतयांमीनित्य । वचनसत्य असोतुझें ॥५२॥एवंवाक्य ऐकिलें । इंद्रासिमग आश्वासिले । मदाचेतेणेंभागकेले । चारजागीस्थापिला ॥५३॥द्यूतमदिराकामिनी । मगयाएवंचतुःस्थानी । च्यवनेंमदास्थापुनी । स्वस्थकेलाशक्राते ॥५४॥देवांसर्वांबैसवुनी । नासत्यकेलेंसोमपानी । यज्ञसर्वसंपऊनी । मुनीझालाकृतकार्य ॥५५॥च्यवनझालासुंदर । तीर्थझालेंसरोवर । यूपयुक्त आश्रमथोर । ऋषिराहिलासुखानें ॥५६॥ गृहींगेलामनुसुत । कीर्तिध्वज उभारित । तयाचापुत्र आनर्त । रैवतपुत्रतयाचा ॥५७॥तयासीझालेपुत्रशत । ककुद्मीज्येष्ठसर्वांत । रेवतीनामेंगुणवंत । कन्याएकरैवत ॥५८॥कन्याद्यावीकोणास । एवंपुसायाविधीस । रैवतगेलासत्यलोकांस । कन्येसहब्रम्हसभे ॥५९॥देवीभक्ताचेंआख्यान । अतिशयपुण्यपावन । करितांश्रवणपठण । सत्कीर्तिलाभतसे ॥६०॥शत्तोतरश्लोकतेरा । भागवताच्याविस्तारा । च्यवनकथामनोहरा । गाइलीयेथेंअंबेनें ॥६१॥देवीविजयेच्यवनोपाख्यानेंसप्तमेतृतीयः ॥३॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP