तृतिय स्कंध - अध्याय तिसरा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । जन्मेजयपुसेकृष्णासी । कोणतोमूढतापसी । केंविउद्धरिलेत्यासी । सांगाचरित्र अंबेचें ॥१॥

व्यासम्हणेकुरुनंदना । करीत असतांतीर्थाटना । पातलोंमीनौमिषारंण्या । वंदूनीवैसलोंसर्वांशी ॥२॥

ऋषिसमाजतेथेंअसे । सर्वांसीजमदग्नीपुसे । मानसीएकसंदेह असे । निःसंदेहकरावे ॥३॥

सर्वदवांमाजीश्रेष्ठ । कोण असेवरिष्ठ । सेवनेंअतिउत्कृष्ठ । सुखकोणदेतसे ॥४॥

ऐकतांऐसेंवचन । बोलिलेलोमेश आपण । जमदग्नेनिश्चयेंजाण । श्रेष्टसर्वपरांबा ॥५॥

ब्रह्मादिकांचीजननी । संसारवृक्ष उपादिनी । स्मरणमात्रेतीभवानी । इच्छितपुरवीजनाचे ॥६॥

ऐकासांगतोइतिहास । दिव्यतीचेंप्रभावास । देवदत्तनामेंद्विजास । पुत्रनव्हतानिर्धारे ॥७॥

कोसलदेशीराहेद्विज । मेळवूनिविप्रसमाज । तमसातीरींपुत्रकाज । यज्ञतेणेंआरंभिला ॥८॥

मंडपरचिलासुंदर । विधियुक्तवेदीहार । ऋत्विजवर्णिलेअतिचतुर । वेदज्ञशास्त्रज्ञयाज्ञिक ॥९॥

अग्नीचेकरुनिस्थापन । पुत्रेष्टीकरीयजमान । सुहोत्रनामेंतपोधन । ब्रह्माकल्पिलातयासी ॥१०॥

याज्ञवल्क्यऋषिसत्तम । अध्वर्यूतेथेंउत्तम । होतातैसाचीउत्तम । बृहस्पतीजाहला ॥११॥

प्रस्तोताअसेपैल । उदगातातोगोमिल । आणिकहीसभ्यसकल । विद्वज्जनबैसले ॥१२॥

रथंतरासामगायन । करीगोमिलब्राह्मण । स्वरभंगहोयक्षणोक्षण । श्वासयोगेंतयाचा ॥१३॥

कोपेंबोलेयजमान । केवींकरिसीगायन । स्वरभंगहोयप्रतिक्षण । मूर्खापरीनेणसी ॥१४॥

ऐकतांऐसेंवचन । सहननझालाअवमान । म्हणेमाझादोषनसून । मूर्खम्हणसीमजलागी ॥१५॥

देहामाजीचालेंपवन । तेणेंझालास्वरक्षीण । माझेंनसेंमूर्खपण । शतमूर्खपुत्रतुझा ॥१६॥

माझाकेलाअपमान । मूर्खपुत्रेंतव अपमान । होईलममशापेंकरुन । निश्चयेंजाणदेवदत्ता ॥१७॥

ऐकूनिघाबरलामुनि । लागलागोमिलाचेचरणी । ह्मणेक्षमाकींजेयेक्षणी । यजनमाझेंव्यर्थगेलें ॥१८॥

स्वल्पापराधीदंडथोर । पुत्रहोतामूर्खफार । सर्वकर्मीअयोग्यसाचार । उःशापमजदेइजे ॥१९॥

लोमेशम्हणेऋषिवर्या । गोमिलाआलीदया । म्हणेपूर्वींमूर्खहो उनिया । उदयापुत्रयेईल ॥२०॥

उःशापलाधलादेवदत्त । यज्ञझालासमाप्त । रोहिणीभार्येसीपुत्रहोत । नक्षत्ररोहीणीजन्माचें ॥२१॥

पुंसवनादिसंस्कार । ब्राम्हणकरीआनंदथोर । जातकर्मनामकर्मसाचार । उतथ्यनामठेविले ॥२२॥

अष्ठमवर्षेंउपनयन । केलेंतेणेंसांगविधान । बाळासीकरवितांवेदाध्यन । अक्षरएकनकळेत्या ॥२३॥

द्वादशवर्षेपर्यंत । श्रमकेलेंबहुत । परीएकवर्णहीनयेत । मुखींत्याचेशापयोगें ॥२४॥

निंदोलागलेंजन । निंदीपिताआपण । वैराग्यपावलेंअंतःकण । उतथ्यगेलावनासी ॥२५॥

पर्णकुटीकरोन । राहीलाफलाहारीहोऊन । व्रतधरिलेंसत्यभाषण । गंगातीरसेविलें ॥२६॥

नासंध्यानाहींस्नान । कैचाजपकैचेंध्यान । बैसेतेथेंशुद्रासमान । सत्यमात्र अंगिकारिलें ॥२७॥

तर्कवितर्ककरीमनीं । वृथागेलोंजन्मघेंउनी । विद्यानसे आपणालागुनी । विप्रकुळींव्यर्थजन्म ॥२८॥

पूर्वजन्मीसुकृत । नाहींकेलाकिंचित । नसतातेंपूर्वदत्त । प्राप्तकेवींमजलागी ॥२९॥

सर्व असेंदैवाधीन । व्यर्थ उद्योगाचाशीण । कालवशहेंसंपूर्ण । उपायकाय असेयाशी ॥३०॥

एवंनानातर्ककरी । बारावर्षेवनांतरी । राहेसत्यकरुनवैरवरी । प्रसिद्धतेणेंसत्यतपा ॥३१॥

तवएकेदिवसींवनांत । फिरत असतांकिरात । सूकरापाहूनित्वरित । बाणमारीतयाशी ॥३२॥

शरभिन्नतोसकर । दुखपळालासत्वर । ओरडेदीर्घस्वर । बाणपीडीतजाहला ॥३३॥

आश्रमासमोरजैंआला । शरभिन्नद्विजेंदेखिला । दयेनेंमनाकळवळला । कोमलह्रदयब्राह्मण ॥३४॥

पाहताचि तेणेंसूकर । जेविऐकलातयाचास्वर । तेवीचकरीउच्चार । घाबरुंनीमूढतो ॥३५॥

तेंवाग्भवबीज । बिंदुहीननिघालेंसहज । तोत्याचेंनेणेंगुज । परीतोषलीपरांबा ॥३६॥

सूकरगेलानिबिडवनीं । किरातयेतसेमागुनी । सूकरनदिसेनयनी । तवपाहिलेंब्राह्मणा ॥३७॥

मनीविचारीकिरात । विप्रहोयसत्यव्रत । विचारितासांगेलसत्य । कार्यहोईल आपुलें ॥३८॥

म्हणोनीआलासमोर । बोलेजोडूनीदोनिकर । मुनेगेलामाझासूकर । सांगाजरीपाहिला ॥३९॥

आमुचीअसेहीचिवृत्ती । घरीमुलेंवाटपाहती । कोलजरीलागेलहाती । पोसेलमाझेंकुटुंब ॥४०॥

ऐकुनीविचारीमनी । क्रोधदिसतसेनयनीं । वदताचीजीवहानी । करीलकींदुष्ठहा ॥४१॥

जरीयासीनवदावें । तरीसत्यगमवावे । सत्यजरीरक्षावें । पदरीपापयेईल ॥४२॥

हिंसायुक्तजरिसत्य । तरीसत्यतेंचिअस्त्य । जेणेंहोयलोकहित । खोटेंहीसत्यजाणावें ॥४३॥

खोटेंनसोममवचन । सूकराचवाचोप्राण । ऐसेवाक्यनिवडून । बोलुकाययेसमईं ॥४४॥

एवंमानसीचिंतित । विप्र असेदयान्वित । तेसमईंकृपाकरित । बीजोच्चारेमहापूर्वा ॥४५॥

दिव्य उपजलेज्ञान । जाहलावाल्मिकासमान । श्लोकनिघालामुखांतून । कृपाकटाक्षेंशिवेच्या ॥४६॥

श्लोकयापश्चतिनसाब्रूतेसानपश्यति । अहोव्याधस्वकार्यार्थिनकिंपृच्छसिपुनः पुनः ॥१॥

अर्थ । सन्मुखतयापाहून । विप्रबोलेयुक्तवचन । जोपाहतेनिरखून । कदाकाळींनबोलेती ॥४७॥

दृष्टींपाहेचहूंकडे । तीसिबोलणेनातुडे । वाणीबोलेपवाडे । पाहणेंटाकस्विंयेती ॥४८॥

एवंअसेकर्मभिन । व्यर्थकरिसिव्याधाप्रश्न । जेंकार्यघडेलदोघान । एककेवीकरील ॥४९॥

कार्यार्थीतूंअससी । आश्चर्यरुपबोलशी । पुनः पुनःतेचीपुससी । अशक्यकेवीघडेल ॥५०॥

ऐकूनजाहलानिरास । व्याधगेलाघरास । वार्ताकळलीदेवदत्तास । सिद्धीजाहलीसुताशी ॥५१॥

ऋषीसमाजेयेऊन । नेलातयासत्कारुन । महाकवीतोसज्ञान । झालाशास्त्रवेदवेता ॥५२॥

सत्यतयाऋषेश्वर । किर्तीपावलाअपार । बिंदुहीनबीजोच्चार । करितांद्रवलीपरेशी ॥५३॥

जमदग्नीशीसांगेलोमश । सेवनीयादेवीविशेष । तिजसेवितांनिःशेष । सेविलेतेणेसर्वदेवां ॥५४॥

जगींपहावेंअनुमान । जेदरिद्रिरोगीदीन । मूर्खक्रुर अंगहीन । नकेलीत्याणेदेवीसेवा ॥५५॥

जेसुरुपसांगविद्वान । निरोगीपुष्ठसधन । केलेंत्याणीदेवीसेवन । पूर्वजन्मीनिश्चये ॥५६॥

व्यासह्मणेहेंचरित्र । ऋषिमुखेंऐकिलेंपवित्र । वर्णिलेंतुजपरमचित्र । देवीसेवनकरीबा ॥५७॥

हेंसत्यतपाख्यान । भक्तिभावेंकरितीपठण । अथवाजेकरतीलश्रवण । प्रेमान्वितहोऊनी ॥५८॥

महाविद्यातयावरी । कृपाकरीलपरोपरी । विद्याधनसुखकरी । होईलतयासीनिश्चयें ॥५९॥

जयसरस्वतीमुळमाये । कृपासागरेकरुणालये । वेदजननीसत्यमये । कृपार्द्रहोईमजवरी ॥६०॥

वेडाभ्याड अतिकामी । परीअनुसरलोंतवनामीं । आतांकीजेंसर्वातनामी । आईआतांनुपेक्षावे ॥६१॥

तेवीसश्लोक एकशत । सत्यतपाचेहेंचरित । अंबाकृपेझालापंडित । महामूर्ख उतथ्यहा ॥६२॥

देवीविजयेतृतीयस्कंदेतृतियोध्यायः ।   

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP