तृतिय स्कंध - अध्याय चवथा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । पूर्वींचेकथानुसंधान । विस्तारेंवदेबादरायण । ऐकाश्रोतेस्वस्थचित्तें ॥१॥

विधीयज्ञतीनप्रकार । रजसत्वतमाकार । विप्रकरितीसाचार । सात्विकजाणतोयज्ञ ॥२॥

राजेकरितीतोराजस । राक्षसांचातोतामस । ज्ञानियांचाविशेष । गुणरहितयज्ञ असे ॥३॥

देशकालद्रव्यमंत्र । श्रद्धासात्विकीपवित्र । शुद्धपाहोनिसर्वत्र । कल्याणदायकतेधवा ॥४॥

अन्यायेंद्रव्यमिळविलें । सुकृततेणेआरंभिलें । सर्वकर्मव्यर्थझालें । अनर्थासिकारण ॥५॥

प्रत्यक्षपाहेप्रमाण । पांडवेंकेलाराजसूययज्ञ । भारद्वाजसमानब्राह्मण । साक्षात्कृष्णस्वयेतेथें ॥६॥

यज्ञाहोताचीएकमास । त्याणीभोगिलावनवास । दुःखझालेंद्रौपदीस । यज्ञपुण्यकायझालें ॥७॥

जरीभवितव्यह्मणावें । यज्ञनिष्फलमानावे । कर्माचेभेदनेणवे । विपरीततेणेंगुणे ॥८॥

विपरीतकर्महोतां । फलतैसेंचीतत्वता । सांगतेंचीकेलेंअसतां । उत्तमफलदेतसे ॥९॥

वेदाज्ञाहीव्यर्थनसे । दैवहीबलवान असें । दैवबलेंवैगुण्यहोतसे । कर्मामाजिराजया ॥१०॥

पूर्वीइंद्रेंकेलागुरु । विश्वरुपऋषीथोरु । विपरीतकर्मकारु । ऋषीजाहलाइंद्राशी ॥११॥

मातृपक्षत्याचाअसुर । रक्षीत्याशीऋषीश्वर । पाहूनकोपेंदेवेश्वर । शिरेंछेदिलींतयाची ॥१२॥

होतांकर्मविपरीत । अनर्थ इंद्रासीबहुत । संकटेंझालीप्राप्त । स्वर्गभ्रष्टजाहला ॥१३॥

द्रुपदक्रोधेकरुन । द्रोणामारावेह्मणून । विधियुक्तहोतात्याचायज्ञ । सिद्धीझालीतयाशी ॥१४॥

पुत्रझालाधृष्टद्युम्न । द्रौपदीप्राप्तवेदींतून । दशरथेंकरितांयज्ञ । चारपुत्रजाहले ॥१५॥

कूद्रव्यतेंदुःखकारण । पांडवाझालेंसत्यजाण । दुर्लभतोसात्विकयज्ञ । तपस्वीचजाणती ॥१६॥

मुनीचातोमानसयज्ञ । वेदींगाईलासंपूर्ण । द्रव्यकालादिसाधन । तेथेंकांहींनलागे ॥१७॥

देवीयज्ञतूंकरी । जेवीपूर्वीविष्णुकरी । रावपुसेतेअवसरी । विष्णुकृतमखाते ॥१८॥

सांगेसत्यवतीसुत । हरिहरविरंचीसहित । आलेजेव्हांपूर्वस्थळाप्रत । दर्शनकरोनिदेवीचे ॥१९॥

आधारशक्तीचेआधारा । उत्पन्नकेलीतेथेंधरा । पसरलामेदसारा । मधुकटभासमग्र ॥२०॥

तेणेंजाहलीमेदिनी । अभक्ष्यतीमेदह्मणोनी । वरीमेरुनिर्मुनी । स्थानेंकेलीदेवाची ॥२१॥

महीठेविलीशेषावरी । पर्वतदडपिलेतियेवरी । ब्रह्मदेवसृष्ठीकरी मनापासुनीनृपाळा ॥२२॥

मरीचिनारद अत्रिशी । पुलस्त्यपुलहक्रतूंशी । दक्ष आणिवसिष्टासी । उत्पादिताजाहला ॥२३॥

कश्यपमरीचीचासुत । तेराकन्यादक्षासीहोत । त्यापासूनदेवदैत्य । उत्पन्नझालेसमग्र ॥२४॥

कश्यपापासूनसर्वसृष्टी । स्वायंभूमन्‍ सपरमेष्ठी । दक्षिणांगापासावसृष्ठी । डावेंअंगीशतरुपा ॥२५॥

तीसझालेलेसुत । वडीलतोप्रियव्रत । धाकटाउत्तानपादहोत । कन्यातीनतिजलागी ॥२६॥

मेरुचेउंचशिखरीं । सत्यलोकविधीकरी । वैकुंठहीनिर्माणकरी । नारायणस्वयेची ॥२७॥

शिवेरचीलाकैलास । तिघेहीकरितीनिवास । एकदांवाटलेविष्णूस । देवीयजनकरावें ॥२८॥

देवर्षीसर्वपाचारिले । अनेकविधद्रव्य आणिलें । आराधिलीपरांबा ॥२९॥

आगमोक्तजेविधान । तैसाचिपूर्णझालायज्ञ । परांबातेणेंसंतोषोन । निराळवाचाबोलली ॥३०॥

जगामाजीधन्यमान्य । तुजसमनसेअन्य । माझेंप्रसादेंकरुन । वरदहोसीलसर्वांशी ॥३१॥

एवंलाधलावरदान । केलासमाप्ततोयज्ञ । आप आपलेंस्थान । पावलेसर्वदेवऋषी ॥३२॥

एकशतशेचाळीस । श्लोकभागवताचेसुरस । विष्णुकृत अंबामखास । वेदव्यासेंवर्णिलें ॥३३॥

देवीविजयतृतीयस्कंदेचतुर्थोध्यायः ॥  

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP