तृतिय स्कंध - अध्याय सहावा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । पुत्राचानिश्चयपाहूनी । मनोरमेसभयवाटुनी । दुःखयुक्तसाश्रुनयनी । बोलेपुत्रासीतेधवा ॥१॥

ह्मणेबाळासुकुमारा । नकोजाऊंस्वयंवरा । साह्यनसेकींदुसरा । रक्षीकोणतुजतेथें ॥२॥

तोरावयुधाजित । चिंतीतसेतुजघात । एकलाजातांचितेथ । मारीलतुजनिश्चयें ॥३॥

एकपुत्रामीनिराधार । तुजपाहूनीनिरंतर । आयुष्यकंठितेसाचार । निराधारीमजनकीजे ॥४॥

मातेसीह्मणेसुदर्शन । भावींसर्वदैवाधीन । कायव्यर्थभयमानून । कल्पांतीहीचुकेना ॥५॥

देवीचेआज्ञेकरुन । निर्भयकरितोंगमन । सुस्थिरकीजेतुवांमन । क्षत्रियाआहेसधीरधरी ॥६॥

ऐसेंमातेसीवदून । रथींबैसेतिजवंदून । निश्चयतयाचापाहून । कवचकरीमनोरमा ॥७॥

पुढेंआणितुजपाठीं । रक्षोअंबिकापार्वती । पार्श्वभागींसर्वगती । पार्वतीशिवातुजरक्षो ॥८॥

वाराहीरक्षोकठिणमार्गीं । दुर्गारक्षोतुजदुर्गी । कालिकातीदुप्टवर्गी । रक्षोसंकटींपरेशा ॥९॥

मातंगीतुजमंडपांतरी । रक्षोसौम्यास्वयंवरी । नृपसमूहामाझारी । भवानीतुजसांभाळो ॥१०॥

गिरिजारक्षोडोंगरी । चामुंडातुजचत्वरी । कामगातीवनांतरी । सनातनीतुजपाळो ॥११॥

वादामाजीवैष्णवी । रणामाजीभैरवी । सर्वदातुजशांभवी । भुवनेश्वरीरक्षोतुज ॥१२॥

व्यासनृपासांगती । आशीर्वादोनिसुताप्रति । ह्मणेमीतुजसांगाती । येतेंह्मणोनीरथींबैसे ॥१३॥

दासीविदल्लासहित । निघालेसवेंचीत्वरित । ऋषीतयाआशीर्वादित । हर्षयुक्तचालिले ॥१४॥

एकरथेंतोराघव । पातलाकाशीसनिर्भय । ऐकोनिसुबाहूसविस्मय । पूजिलातेणेंसन्मानें ॥१५॥

गृहअंनादिसेवक । पोंचविलेंअवश्यक । राहिलातोहीनिःशंक । अंबाभक्तसभाग्यतो ॥१६॥

नृपपातलेबहुत । आलातेथेंयुधाजीत । स्वयेंपातलाकन्यासुत । रक्षणार्थ अभिमानें ॥१७॥

त्रेसष्ट अक्षौहिणीसेना । पातलीतेथकरुनदना । सुबाहूकरीतसन्माना । यथायोग्यसर्वांशी ॥१८॥

मंडपरचिलासुशोभित । मंचकतेथेंअसंख्यात । चित्रविचित्रकेलेंरंगित । सुवर्णादिरत्नादिकें ॥१९॥

अनेकतोरणेंदीपावली । चित्रांच्यारचिल्याओळी । नगरश्रृंगारिलेंसकळीं । महोत्सवचालला ॥२०॥

राजसमाजएकत्रजाहला । गोष्टीसंवादचालला । ह्मणतीसुदर्शनएकला । पातलासेस्वयंवरी ॥२१॥

नाहींराज्यनाहींकोश । नासैन्यनाबलविशेष । कन्यामाळघालीलयास । काय आश्चिर्यवदावें ॥२२॥

अनेकतर्कवितर्कहोत । तवबोलेयुधाजित । कन्यार्थेंमीनिश्चित । मारीन आतांसुदर्शना ॥२३॥

केरलेशबोल ऐकुनी । युद्धनकरणें यास्थानीं । इच्छास्वयंवरसुबाहूनी । रचिलेंकींनृपश्रेष्ठा ॥२४॥

येथेंनाहींकेलापण । अथवानसेंबलहरण । तुवांपूर्वीच अनीतिकरुन । राजभ्रष्टातयाकलें ॥२५॥

आपलेदौहित्राकारण । बलात्कारेंकेलेंहरण । काकुस्थतोनृपनंदन । केवीमारिसीअन्यायें ॥२६॥

जगताचाकोणीनियंता । असेंवर्तेंत्याचीसत्ता । अन्यायफळतत्वता । पावसीलनिश्चयें ॥२७॥

धर्मजेथेंजय । अधर्मतेथेंपराजय । नकरीराजेंद्राअन्याय । सत्येंजयसर्वदा ॥२८॥

तुझाहीपातलादौहित्र । आणीकहीआलेराजपुत्र । असेलजेथेंब्रह्मपुत्र । माळघालीलकन्यातेथें ॥२९॥

विवादाचेंकायकारण । सर्वनृपींस्वयेंआपण । कन्यायेऊनीमालापण । करितांवादकायसा ॥३०॥

युधाजितम्हणेकेरलेश्वरा । नीतिवदसीबुद्धीमत्तरा । परीभ्रष्टराज्यकिशोरा । माळघालणेंउचितकीं ॥३१॥

आणीकसर्वनृपकुमर । बलसंपन्नसुंदर । सर्वांचाहोय अनादर । दुर्बळासीवरिताची ॥३२॥

पणकरावास्वयंवरी । अन्यथानृपमंडलामाझारी । सुदर्शनाशीकन्यावरी । कलह अवश्यहोईल ॥३३॥

एकसुदर्शनसोडून । अन्यकोणीनृपनंदन । वरितांमज असेमान्य । इच्छास्वयंवरसुख असो ॥३४॥

ऐकूनीऐसेवचन । सर्वांनींसुबाहूसीपाचारुन । ह्मणतीआलासेसुदशन । कायविचारत्वांकेला ॥३५॥

सुबाहूम्हणेसर्वांसी । कन्येनेंवरिलेंतयाशी । नायकेतीममवाक्याशी । करावेकायम्याआतां ॥३६॥

घालीतसेमीसमजूत । जेवीकलीनहोनृपांत । क्रोधकरीतांतियेप्रत । घातकरीलजिवाचा ॥३७॥

सूतसांगेऋषीसी । नृपजातांघरासी । बोलाऊनीसुदर्शनासी । राजेसर्वविचारिती ॥३७॥

सुदर्शनानृपकुमारा । किमर्थ आलासीस्वयंवरा । सैन्यधनराजपसारा । कांहींचनसेतुजपाशी ॥३८॥

कोणीबोलाविलेंतुजसी । नृपसिद्धझालेयुद्धासी । भ्रातातुझाबलविशेषी । तुझाघात इच्छीतसे ॥३९॥

तयाचेसाह्यकराया । युधाजितपातलाठाया । विचारकरुनानृपवर्या । राहेअथवाजायतूं ॥४०॥

उत्तरवदेसुदशन । नसेमजराजसैन्य । परीनाहींमजदैन्य । अवश्यभावींमीजाणें ॥४१॥

अंबेचेआज्ञेवरुन । पातलोयेथेंसुखान । सर्वत्र अंबापरिपूर्ण । शत्रुमित्रनेणेंमी ॥४२॥

तिचेइच्छेवांचून । वृक्षाचेंनचळेंपान । ब्रह्मादिकाचेविंदान । नचलेतियेवांचूनी ॥४३॥

मीनकरीकदांवैर । मज अंबारक्षणार । कर्मफलजसाचार । अवश्यसर्वाभोगणें ॥४४॥

कालयोगेंहोयजनन । कालयोगेम्चिहोयमरण । निमित्तमात्रकारण । होतमनुष्यभोगाया ॥४५॥

सिंव्हेंममपितामारिला । आजायुधाजितवधिला । निमित्तमात्र असेबोला । कालयोगेंघडेसर्व ॥४६॥

सुखेंयेवोयुधाजित । मीतयासीनाहींभीत । नहोयमीलज्जित । पराजयेंकरुनी ॥४७॥

लाजमाझीतियेशी । वैरजोकरीलमजसी । शास्तादेवीतयाशीनसें । मजभयचिंता ॥४८॥

दयाकेलीमजवरी । संबोधिलेनृपवरी । भयनसेमाझेंअंतरी । स्वस्थ असेंसर्वदा ॥४९॥

ऐकूनीतयाचेंवचन । भूपह्मणतीधन्यधन्य । गृहींपातलासुदर्शन । निरोपघेऊनीसर्वांचा ॥५०॥

मंडपामाजीदुसरेदिवशीं । बोलाऊनीसर्वनृपांशी । माळघेऊनीकन्येशी । मंडपीजायह्मणेपिता ॥५१॥

शशिकलाह्मणेपितयाशी । नजायमीमंडपाशी । नदेखेंमीअन्यनृपाशी । सतीत्वमाझेंनासेल ॥५२॥

वरिलेंजयाशीस्वमनें । तयासींचमजदेणें । अन्यकरितांयेक्षणें । प्राणघातकरीनमी ॥५३॥

परिसूनिनिश्चलवाणी । रावदुःखितझालामनीं । ह्मणेकन्येआग्रहनाणी । ऐसामनींआपुलें ॥५४॥

मिळालेसर्वभूपती । तुजसाठींतेभांडती । राज्यप्राणहीनासती । तुजकरितांकन्यके ॥५५॥

माळघेऊनीहातीं । जाऊनीत्वांमंडपाप्रती । घालीमाळस्वेच्छिती । होणेंतेंमगहोईल ॥५६॥

कन्याबोलेमागुती । तुवांजावेंसभेप्रती । उदईकयेईलमंडपांती । कन्याऐसेवदावें ॥५७॥

समजाऊनीसमस्ताशी । बोलवावेंशिबिराशी । कन्यादानकरावें ॥५८॥

भयनसोतवामानसी । अंबारक्षीलसर्वांशी । तिच्याचवचनासरसी । वरिलासेराजपुत्र ॥५९॥

पाहूनीतिचानिश्चय । सुबाहूमंडपीसविनय । येऊनीम्हणेसर्वनृपवर्य । कृपाकीजेमजवरी ॥६०॥

हट्टापेटलीममकुमरी । नयेतीमंडपांतरी । समजाऊनीपरोपरी । उदईकतिज आणितो ॥६१॥

तोंवरीशिबिरीराहिजे । यथेच्छ उपभोगघेईजे । अर्पिनसर्वांसर्वचोंजें । कृपाकीजेसर्वस्वे ॥६२॥

इत्यादिवाक्येंऐकून । नृपगेलेशिबिरालागून । ह्मणतीआम्हांठकवून । करुंपाहेलग्नहा ॥६३॥

असोइकडेकाशिभूपती । रात्रीआणूनिसुदर्शनाप्रती । आधींपुजूनगणपती । देवकसवेंस्थापिलें ॥६४॥

सपत्नीसहपुरोहित । जामाताचेकरुनीसीमंत । निश्चयसुपारीहातींदेत । वरमातेच्याआनंदे ॥६५॥

सवेंचीदेऊनीरुखवत । मुलाकरुनीभूषणान्वित । अश्ववाहनेंमंडपात । आणिलास्मरोनिअंबेसी ॥६६॥

मधुपर्ककरोनीआधीं । हरिद्रामयकेलीवेदी । अक्षतपूजायथाविधीं । उभीकेलीवधुवरे ॥६७॥

तेक्षणीचसुमुहूर्ती । मंगलाष्टकेंविप्रगाती । सावधान ऐसेंम्हणती । गजरकरितीवाद्यांचा ॥६८॥

माळाघालितीपरस्पर । तोफांचाजाहलाभडिमार । ऐकतांचिनृप अपार । कोपाविष्टजाहले ॥६९॥

ह्मणतीआह्मांसीबोलाऊन । केलायेणेंअपमान । बोळवीलजेव्हांजावयालागून । समाचारघेऊंयांचा ॥७०॥

एवंसर्वचिवदती । सोहाळेकरीतसेनृपती । विप्रतेव्हांआशीर्वादिती । वेदसूक्तेंकरुनिया ॥७१॥

देऊनीतयासीदक्षणा । करवितीतेव्हांपाणिग्रहणा । लज्जाहोमादितत्क्षणा । सप्तपदीजाहली ॥७२॥

वधूघेऊनीकडियेशी । प्रदक्षिणाकरिअग्नीशी । कौतुकझालेंसर्वांशी । आनंदलीमनोरमा ॥७३॥

दोनशेंरथ उत्तम । अश्वयुक्तशस्त्रादिपरम । सवाशेंतैसेगजोत्तम । दासीशतबहुरत्नें ॥७४॥

डेरेरावटयाचिलखत । शालेदुशालेअपरिमित । दोनसहस्त्र अश्वदेत । उटतीनशेंदीधले ॥७५॥

शकटदोनशेंसुंदर । नानारसदेऊनीअपार । मनोरमेसीम्हणेनृपवर । दासतुझाअसेमी ॥७६॥

ऐकूनीमनोरमाबोलिली । बंदीमागधीनसेवहिली । कायस्तवावेंथोरबोली । येसमयींतुजनृपाळा ॥७७॥

नाछत्रनासिंव्हासन । नाहींसैन्यनाहींधन । तुवांपरीकन्यादेऊन । मेरुतुल्यपुत्रकेला ॥७८॥

धन्यनृपतीतुझेंधैर्य । अव्हेरुनिसर्वनृपवर्य । कन्यादानमहत्कार्य । वनस्थासीतुवांकेलें ॥७९॥

सुबाहुह्मणेसुदर्शन । स्वराज्यींबैसवीन । होऊनीयामीप्रधान । वर्तेनपुढ आनंदें ॥८०॥

सर्वभूपासीजाऊन । करुनियादानमान । आधींतयासमजावीन । नातरीयुद्धकरीनमी ॥८१॥

जयाजयदैवाधीन । तथापिधर्मजयाचेस्थान । दुर्गाकरीलरक्षण । सर्वथानिश्चयेंमीजाणें ॥८२॥

मनोरमाआनंदेकरुन । म्हणेनृपातुज असोकल्याण । ससुतेस्वपदींनिधान । बोळीव आम्हांआनंदें ॥८३॥

परांबाकृपेंममकुमर । प्राप्तहोईल अयोध्यापूर । चिंतानसेमानसांतर । कृपाकटाक्षेंतियेच्या ॥८४॥

एवंरात्रगेलीसकळ । प्रकाशलेंसूर्यमंडळ । सुबाहुप्रवेशेराजमंडळ । हस्तजोडूनीबोलतसे ॥८५॥

आग्रहपाहूनीकन्यकेचा । विवाहकेलामीसाचा । सत्यसांगतोंत्रिवाचा । उपायमाझानसेची ॥८६॥

सर्वाहींदयाकरुन । कन्याआपुलीमानुन । ममगृहींकीजेंभोजन । मानयुक्त आनंदें ॥८७॥

क्रोधेंतेव्हांसर्वनृपती । भोजनजाहलेंआमुचेंम्हणती । यथेष्टकीजेशेषकृती । स्वगृहांजाईनृपतेतूं ॥८८॥

आप आपुलेंस्वगृहीं । राजेजातीलसर्वही । शंकितसुबाहूस्वगृहीं । परतोनिआलातेधवा ॥८९॥

इकडेसवराजेमिळोन । राहिलेमार्गरोधून । म्हणतीयेतांचिसुदर्शन । तयामारुंहरुकन्या ॥९०॥

कित्येकम्हणतीकायकरणें । कायहोईलतेंपाहणें । मग आपुलेंगृहांजाणें । एवंसर्वस्थिरावती ॥९१॥

सुबाहूकरीसोहळा । सहादिवस अति प्रेमळा । सुदर्शनम्हणेवेळा । बिदाकिजेआम्हासी ॥९२॥

द्रव्यदेऊनीअपार । नृपबोळवीसत्वर । स्वयेंघेऊनीसैन्यभार । साह्यार्थयेतसवेंची ॥९३॥

निघतांचिनृपनंदन । जाहलेंजेंवर्तमान । पुढिलेअध्यायेकरुन । वर्णिजेलचरितें ॥९४॥

त्रेचालीसदोनशत । श्लोकेंसुदर्शनचरित । अंबावदेप्राकृत । रसिकश्रोतींपरिसिजे ॥९५॥

श्रीदेवीविजयेतृतीयस्कंदेषष्ठोऽध्यायः ॥६॥     *        *        *        *        *

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP