TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

वैधानिक कार्यपद्धती - कलम १९९ ते २०१

भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत .

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अंमलात आली .


कलम १९९ ते २०१

" धन विधेयके " यांची व्याख्या . १९९ .

( १ ) या प्रकरणाच्या प्रयोजनार्थ . एखाद्या विधेयकात पुढील सर्व किंवा त्यांपैकी कोणत्याही बाबींशी संबंधित असेल्या तरतुदीच केवळ अंतर्भूत असतील तर . ते धन विधेयक असल्याचे मानले जाईल . त्या बाबी अशा .---

( क ) कोणताही कर बसवणे , तो रद्द करणे , तो माफ करणे . त्यात फेरबदल करणे किंवा त्याचे विनियमन करणे ;

( ख ) राज्य शासनाने पैसा कर्जाऊ घेणे किंवा कोणतीही हमी देणे यांचे विनियमन . अथवा राज्य शासनाने पत्करलेल्या . किंवा पत्करावयाच्या कोणत्याही वित्तीय आबंधनाबाबतच्या कायद्याची सुधारणा ;

( ग ) राज्याचा एकत्रित निधी किंवा आकस्मिकता निधी यांची अभिरक्षा करणे , अशा कोणत्याही निधीत पैशांचा भरणा करणे किंवा त्यातून पैसे काढणे ;

( घ ) राज्याच्या एकत्रित निधीतील पैशांचे विनियोजन ;

( ड ) कोणताही खर्च . राज्याच्या एकत्रित निधीवर भारित असलेला खर्च म्हणून घोषित करणे . किंवा अशा कोणत्याही खर्चाची रक्कम वाढवणे ;

( च ) राज्याच्या एकत्रित निधीच्या किंवा राज्याच्या लोकलेख्याच्या खाती पैशांची आवक किंवा अशा पैशांची अभिरक्षा किंवा जावक ; किंवा

( छ ) उपखंड ( क ) ते ( च ) यांत विनिर्दिष्ट केलेल्यांपैकी कोणत्याही बाबीला आनुषंगिक असलेली कोणतीही बाब .

( २ ) एखादे विधेयक हे दंड किंवा अन्य द्रव्यशास्ती बसवण्याकरता अगर लायसन फीची किंवा दिलेल्या सेवेबद्दलच्या फीची मागणी किंवा भरणा करण्याकरता तरतूद करते एवढयाच कारणाने , अथवा कोणत्याही स्थानिक प्राधिकार्‍याने किंवा निकायाने स्थानिक प्रयोजनाकरता कोणताही कर बसवणे . तो रद्द करणे . तो माफ करणे . त्यात फेरबदल करणे किंवा त्याचे विनियमन करणे याकरता तरतूद करते . एवढयाच कारणाने ते धन विधेयक असल्याचे मानले जाणार नाही .

( ३ ) जेथे विधानपरिषद आहे अशा राज्याच्या विधानमंडळामध्ये प्रस्तुत केलेले एखादे विधेयक हे , धन विधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न उद्‌भवल्यास , अशा राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षाचा त्यावरील निर्णय अंतिम असेल .

( ४ ) प्रत्येक धन विधेयक . अनुच्छेद १९८ खाली विधानपरिषदेकडे पाठवण्यात येईल तेव्हा . व अनुच्छेद २०० खाली राज्यपालास त्याच्या अनुमतीकरता सादर करण्यात येईल तेव्हा . ते धन विधेयक आहे . असे विधानसभेच्या अध्यक्षाच्या सहीचे प्रमाणपत्र त्यावर पृष्ठांकित केलेले असेल .

विधेयकांना अनुमती . २०० .

एखादे विधेयक राज्याच्या विधानसभेकडून पारित झालेले असेल किंवा विधानपरिषद असलेल्या राज्याच्या बाबतीत . राज्याच्या विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांकडून पारित झालेले असेल तेव्हा ते राज्यपालास सादर केले जाईल आणि राज्यपाल . एकतर आपण त्या विधेयकास अनुमती देत आहोत असे किंवा त्यास अनुमती देण्याचे रोखून ठेवीत आहोत किंवा ते विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवीत आहोत असे घोषित करील ;

परंतु , विधेयक राज्यपालास अनुमतीकरता सादर केल्यानंतर , ते धन विधेयक नसल्यास शक्य तितक्या लवकर त्याला ते विधेयक सभागृहांकडे संदेशासह परत पाठवून अशी विनंती करता येईल की , त्यांनी त्या विधेयकाचा किंवा त्यातील कोणत्याही विनिर्दिष्ट तरतुदींचा फेरविचार करावा आणि विशेषत :, तो आपल्या संदेशात ज्यांची शिफारस करील त्या कोणत्याही सुधारणा प्रस्तुत करण्याच्या इष्टतेचा विचार करावा आणि विधेयक याप्रमाणे परत पाठवेल जाईल तेव्हा , सभागृह किंवा सभागृहे त्या विधेयकावर तद्‌नुसार फेरविचार करतील , आणि जर ते विधेयक सभागृहाने किंवा सभागृहांनी सुधारणेसह किंवा त्याविना पुन्हा पारित केले आणि राज्यपालास अनुमतीकरता सादर केले तर , राज्यपाल त्यास अनुमती देण्याचे रोखून ठेवणार नाही :

परंतु आणखी असे की , राज्यपालाच्या मते जे विधेयक कायद्याच्या रूपात आल्यास त्यामुळे उच्च न्यायालयाच्या अधिकाराचे अशाप्रकारे न्यूनीकरण होईल की त्यायोगे , त्या न्यायालयाला जे स्थान असावे असे या संविधानात संकल्पित आहे . ते धोक्यात येईल . अशा कोणत्याही विधेयकाला राज्यपाल अनुमती देणार नाही , तर ते राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवील .

विचारार्थ राखून ठेवलेली विधेयके . २०१ .

जेव्हा राज्यपालाने एखादे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवले असेल तेव्हा , राष्ट्रपती एकतर आपण त्या विधेयकास अनुमती देत आहोत असे घोषित करील किंवा त्यास अनुमती देण्याचे राखून ठेवीत आहोत . असे घोषित करील :

परंतु , ते विधेयक धन विधेयक नसेल त्याबाबतीत , राष्ट्रपती अनुच्छेद २०० च्या पहिल्या परंतुकात उल्लेखिलेल्या अशा संदेशासह ते विधेयक राज्याच्या विधानमंडळाच्या सभागृहाकडे , किंवा यथास्थिति , सभागृहांकडे परत पाठवण्याचा निदेश राज्यपालाला देऊ शकेल आणि , एखादे विधेयक याप्रमाणे परत पाठवले जाईल तेव्हा . असा संदेश मिळाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या कालावधीच्या आत . सभागृह किंवा सभागृहे त्यावर तदनुसार पुनर्विचार करतील आणि , जर ते विधेयक सभागृहाने किंवा सभागृहांनी सुधारणांसह किवा ताविना पुन्हा पारित केले तर . ते राष्ट्रपतीस त्याच्या विचारार्थं पुन्हाकेले जाईल .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-12-30T20:52:28.1800000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

heterophile antibody

  • अन्यासक्त प्रतिपिंड 
RANDOM WORD

Did you know?

कोणतेही कार्य करतांना मुहूर्त कां पहावा? त्यामागची संकल्पना काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site