TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

सर्वसाधारण - कलम १७० ते १७१

भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत .

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अंमलात आली .


कलम १७० ते १७१

विधानसभांची रचना . १७० .

( १ ) अनुच्छेद ३३३ च्या तरतुदींना अधीन राहून , प्रत्येक राज्याची विधानसभा , राज्यामधील क्षेत्रीय मतदारसंघांमधून प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडलेले जास्तीत जास्त पाचशे व कमीत कमी साठ इतके सदस्य मिळून बनलेली असेल .

( २ ) खंड ( १ ) च्या प्रयोजनार्थ , प्रत्येक राज्य अशा रीतीने क्षेत्रीय मतदारसंघांमध्ये विभागण्यात येईल की , प्रत्येक मतदारसंघाची लोकसंख्या व त्यास वाटून दिलेल्या जागांची संख्या यांचे गुणोत्तर , व्यवहार्य असेल तेथवर , राज्यात सर्वत्र सारखेच असेल .

[ स्पष्टीकरण .--- या खंडात , " लोकसंख्या " या शब्दप्रयोगाचा अर्थ , ज्या जनगणनेची संबद्ध आकडेवारी प्रकाशित झालेली आहे अशा लगतपूर्व जनगणनेमध्ये निश्चित करण्यात आलेली लोकसंख्या , असा आहे ;

परंतु , या स्पष्टीकरणातील " ज्या जनगणनेची संबद्ध आकडेवारी प्रकाशित झालेली आहे अशी लगतपूर्व जनगणना " या उल्लेखाचा अर्थ , सन [ २०२६ ] नंतर होणार्‍या पहिल्या जनगणनेची संबद्ध आकडेवारी प्रकाशित होईपर्यंत . [ २००१ ] सालच्या जनगणनेचा उल्लेख म्हणून लावला जाईल .]

( ३ ) प्रत्येक जनगणना पूर्ण झाल्यावर प्रत्येक राज्याच्या विधानसभेतील जागांची एकूण संख्या व प्रत्येक राज्याची क्षेत्रीय मतदारसंघांमध्ये केलेली विभागणी यांचे , संसद कायद्याद्वारे निर्धारित करील अशा प्राधिकार्‍याकडून व अशा रीतीने पुन : समायोजन केले जाईल :

परंतु अशा पुन : समायोजनामुळे त्यावेळी अस्तित्वात असलेल्या विधानसभेचे विसर्जन होईपर्यंत त्या सभागृहातील प्रतिनिधित्वावर परिणाम होणार नाही :]

[ परंतु , आणखी असे की , असे पुन : समायोजन , राष्ट्रपती आदेशाद्वारे विनिर्दिष्ट करील अशा दिनांकापासून प्रभावी होईल आणि असे पुन : समायोजन प्रभावी होईपर्यंत , विधानसभेची कोणतीही निवडणूक अशा पुन : समायोजनापूर्वी विद्यमान असलेल्या क्षेत्रीय मतदारसंघाच्या आधारे घेता येईल :

परंतु तसेच , सन [ २०२६ ] नंतर होणार्‍या पहिल्या जनगणनेची संबद्ध आकडेवारी प्रकाशित होईपर्यंत .---

[( एक ) १९७१ सालच्या जनगणनेच्या आधारे प्रत्येक राज्याच्या विधानसभेमधील जागांची एकूण संख्या ; आणि

( दोन ) [ २२०१ ] सालच्या जनगणनेच्या आधारे पुन : समायोजित करण्यात येईल अशी प्रत्येक राज्याच्या क्षेत्रीय मतदार संघांमध्ये झालेली विभागणी ;

यांचे या खंडाखाली पुन : समायोजन करण्याची आवश्यकता असणार नाही ].

विधानपरिषदांची रचना . १७१ .

( १ ) विधानपरिषद असलेल्या राज्यांमधील अशा विधानपरिषदेतील सदस्यांची एकूण संख्या त्या राज्यातील विधानसभेच्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या [ एक - तृतीयांशाहून ] अधिक असणार नाही :

परंतु , राज्याच्या विधानपरिषदेच्या सदस्यांची एकूण संख्या काही झाले तरी चाळीसपेक्षा कमी असणार नाही .

( २ ) संसद कायद्याद्वारे अन्यथा तरतूद करीपर्यंत . राज्याच्या विधानपरिषदेची रचना . खंड ( ३ ) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे राहील .

( ३ ) राज्याच्या विधानपरिषदेच्या सदस्यांच्या एकूण संख्येपैकी ,---

( क ) शक्य होईल तितपत जवळजवळ एक - तृतीयांश सदस्य हे , त्या राज्यातील नगरपालिका , जिल्हा मंडळे आणि संसद कायद्याद्वारे विनिर्दिष्ट करील अशी अन्य स्थानिक प्राधिकरणे . यांचे सदस्य मिळून बनलेल्या मतदारगणांकडून निवडून दिले जातील ;

( ख ) शक्य होईल तितपत जवळजवळ एक - बारांश सदस्य हे भारताच्या राज्य क्षेत्रातील कोणत्याही विद्यापीठाचे , जे निदान तीन वर्षे पदवीधर आहेत अथवा संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्याखाली अशा कोणत्याही विद्यापीठाच्या पदवीधरांच्या अर्हतांशी तुल्य म्हणून विहित झालेल्या अर्हता निदान तीन वर्षे ज्यांच्या ठायी आहेत अशा . त्या राज्यात राहणार्‍या व्यक्त्तींनी बनलेल्या मतदारगणांकडून निवडून दिले जातील :

( ग ) शक्य होईल तितपत जवळजवळ एक - बारांश सदस्य हे संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्याखाली विहित केल्या जातील अशा व माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा खालचा दर्जा नसलेल्या अशा . त्या राज्यातील शिक्षणसंस्थांमध्ये अध्यापनाच्या कामात निदान तीन वर्षे असलेल्या अशा व्यक्त्तींनी बनलेल्या मतदारगणांकडून निवडून दिले जातील ;

( घ ) शक्य होईल तितपत जवळजवळ एक - तृतीयांश सदस्य हे , राज्याच्या विधानसभेच्या सदस्यांकडून त्या सभेचे सदस्य नसलेल्या व्यक्तींमधून निवडून दिले जातील ;

( ड ) बाकीचे सद्स्य खंड ( ५ ) च्या तरतुदीनुसार राज्यपालाकडून नामनिर्देशित केले जातील ( ४ ) खंड ( ३ ) चे उपखंड ( क ), ( ख ) आणि ( ग ) याखाली निवडून द्यावयाचे सदस्य संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्याखाली विहित केले जातील अशा क्षेत्रीय मतदारसंघांमध्ये निवडले जातील आणि उक्त उपखंड व उक्त्त खंडाचा उपखंड ( घ ) त्याखालील निवडणुका प्रमाणशीर प्रतिनिधित्य पद्धतीनुसार एकल संक्रमणीय मताद्वारे घेतल्या जातील .

( ५ ) खंड ( ३ ) चा उपखंड ( ड ) याखाली राज्यपालाने नामनिर्देशित करावयाचे सदस्य म्हणजे पुढे दिलेल्या बाबींसंबंधी विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेल्या व्यक्त्ती असतील . त्या बाबी अशा :---

साहित्य , विज्ञान , कला . सहकारी चळवळ व समाजसेवा .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-12-30T10:15:15.9000000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

वारळी

  • पु. वारली पहा . 
RANDOM WORD

Did you know?

आषाढी एकादशीला "देवशयनी एकादशी" का म्हणतात?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.