कुलदैवत - गण

मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.अधी नमो गणपती । कार्तिक आणि सरस्वती
संभो आणि पार्वती । नमो नमो त्या लक्ष्मीला
प्रार्थना मी करीतो । ब्रह्मदेव सावित्रीला
नारदांची करुन आरती । तया विना शोभे हाती
तीन्हीताळ गमन करती । आज नाचत यावे सभेला
धाव बलभिमा । संगे आणा त्या मारुतीला
मच्छे कच्छे वर्‍हाव नरसिंह । वामन परशुराम
सातवा स्मरु राम नाम । दहा आवतार अरे भगवंता
आठवा कृष्णनाथा । बोध विठोबा कलंकी सहीता
नमु नमु चंद्र । तेतीस कोटी देव इंद्र
नाथ गोरक्ष मच्छींद्र । नमू नमू साधू संताला
गुणी रामाला । हरी गुरुनी भेद दाखविला


नमू वक्रतुंडना । शुभ गण मुंडना
शुभ गण मुंडना । शुभ गण मुंडना ।
रणी माझ्या नाचत यावे शुभ झनानना
शुभ झनानना शुभ झनानना ।
मुळ माया सार झाला येतानी संगे आणा
येतानी संगे आणा येतानी संगे आणा ।
रनी माझ्या वैर्‍याच्या करु माना खंडना ।
पठ्ठे बापूराव कविचा । कविचा हो मोती राना


श्रीगणेशा ये नमा ओनमा । मूळ तत्वाच्या तू अगमा
आनंद कंद तुझे वर्णन करुनी । गेले निघोनी निजधामा
निळकंठाच्या तू गुनराशी । होशी प्रसन्न नित आम्हा
सुरवर मुनीजन गुन तुझे गाती । नाही गणती तुझे प्रेमा
कवि देवजी म्हणे लोभ असू देवा । करी क्षमा नित आम्हा


रंगणी माझ्या अंगणी नाचत । येई तू गौरीहारा
धन्य धन्य तुमची करणी ।
तुम्हा विन देवा लागलो झुरणी द्या मज चरणी थारा
ओंकाराच्या तू मूळ स्वरुपा ।
संकट समई लागली आशा तुम्ही जगयाचा तारा
विठ्ठल राणू म्हणे नटला हा अंत ।
कधि येऊन मन करील शांत कवि दशरथ म्हणे हिरा


वक्रदंता । ये गजा मुंडा
येऊन लावावा लावावा विद्येचा झेंडा
ज्ञान मती द्यावी गंगेचा लोंढा । सप्तसुर स्मरण
करितो तुझे नऊ खंडा । सभे यावे विघ्नाच्या खंडा


येई रणा चरणी गणा । करुया वंदना
तुच असे आमुचा कर्ता । तुच सारी विघ्न हरिता
गाणे गातो प्रेमाने पुरता । करु या वंदना
रिद्धि सिद्धिच्या तू दंता । किति हाका मारु अनंता
सारे विघ्न तुम्ही गुणीवंता । ठेवी बंधना
कवि बाबू गुण वर्णीता । महिना झाला एक पुरता
हीच सांगतो प्रेमाची विनंती । करु या वंदना  


या नाचत रंगणी गणोबा हो तुम्ही गबरीच्या दारकी ।
महा पंडीत, सभामध्ये बसला तुम्ही रत्न पारखी
महा माया सभेमध्ये आणाहो ब्रह्माची पोरकी
म्हणे पठ्ठे बापूराव कवी कवीचा फेरकी

चारी मुंड्या चीत मारो काळाचीया सूत माझ्या स्वामी यावे
दूत म्हा विर विर विर
शिवा चारी बांधोनीया तेस यशी सांधोनीया भूत सारी
जमली एका मंत्रा सारखी गंगली माझा गुरु आहे
जंगली फिर फिर फिर
येताळ ते खंकाळ मंकाळ उकीन ते अकराळ विकराळ
जीते परत पुजला तेथे लाखो मुडता नीजला
त्याला पाहून जिव माझा रोजला झाली कीर कीर कीर
या मसन खाई वरती केकांची हाडे करकरती
कोणी नरकी चारा चरती कोणी पिसाटा होऊन फिरती
कोणी राम नाम स्मरती रगू विर विर विर
बीज मंत्राचा रस पेता कविता सुचली अमुच्या चिता
म्हणे पठ्ठे बापूराव कवी आले आडूमाडू त्याला झाडू आम्ही
काडू सार निर निर निर

चला पाहूया गौरीच्या बाळा । रंग मंडपी खेळा
गळ्या घालून माळा । हिंडती कसे तो भोळा
जगाच्या तू जगदिशा व्हंकर पुरुषा । नाही रुप रेषा तुला
मिती तरी काळा । रणमंडपी खेळा गळा घालूनी माळा
हिंडती कसे तो भोळा
आंगी विभूतीची उटी बाबर झोटी । केशरी ललटी त्याते टिळा
हारी कवी म्हणे मुळ आगमा यावे आमच्या कामा ।
करमाच्या ठेवा आमचे विघन हे टाळा
१०
गण राज नमो तव पाई
सुबुद्धि आम्हा देई रे
विघ्न हरया ये धाऊनी ‘ पाठी राखा होई ’
न सुचे तुजवीण काही रे
तव पदकमली लीन सदोदीत
परी धावत तू येई
गरुडावर करुनी स्वारी रे
११
श्रीगणपति मंगल मूर्ति नमतो तुला सारी । चौदा विद्येच्या दाता
ही गुण गाती कवि सारी । बत्तीस दंत गुप्त मुकामध्ये दोन ठेवीले वरी
बत्तीस दोन्ही चौतीस झाले मनी हिसाब करी । प्रथम गणाचे
शिरसाना कुठे हुडकूनी लौकरी । म्हणे कुष्णाराम करी नको
तुझी पोकाळ किरकिर
१२
प्रार्थना करु आज या सभे गया बहुपती गौरीच्या गणराया
सर्वात श्रेष्ठ आहे तुझी वाणी तुला आठवा द्रड भवानी
लागीतो पाया बहुपती गौरीच्या गणराया ।
राखावी लाज माझी सभेत येऊनी मस्तक ठेवितो श्री चरणावरती ।
कृपा करा आज ठेवावी छाया बहुपती गौरीच्या गणराया ।
आबादास खास कविची वाणी मनेराजूरी त्याची रहानी वल्ली
शिरावरती छत्र धरुया बहुपती गौरीच्या गणराया
१३
तुम्ही मंगल मूर्ति दृष्टीजनी काहो गांजती ।
आकाशाप्रती मायारुपी शक्ती झाली ।
भव पार्वती तुझी मंगल मूर्ती ब्रह्म विष्णू आणि महेश्वर
माझ्यासमोर धाकटी पोरहून श्रीपती तुम्ही मंगल मूर्ती ।
दुष्टजना काहो गांजती ।
दगडू सावळा कविता रचली ।
कौसाला बडबड सुटली ।
झाले लाल किती तुम्ही मंगल मूर्ती ।
तुम्ही दुष्ट गणा काहो गांजती ।
१४
नमन करु आज गौरी बालका गुण तुझे वर्णू किती
द्यावी मला ज्ञान मती संगे घेऊनी सरस्वती आष्ट ही नायका
चौदा विध्या चौसष्ट कला सभेमध्ये विघ्नहराला ।
यावे पार्वतीच्या बाळा चक्रचालका ।
आबा कवीत्वाची लावी घडा ।
मनी द्यावी गणराज प्रसन्न व्हावे ।
आज ठावरिचा ।
बालका नमन करुया गौरीच्या बालका ।
१५
या नाचत रंगणी गणूबा गौरीच्या हारकी तुम्हा नारीच्या हारकी
महामाया सभेमधी आनवा ब्रह्माची पोर महामंडीत सभेत बसला
तुम्ही रत्नपारखी ।
म्हणे पठ्ठे बापूराव ऐका कवी त्याची हेरकी ।
१६
आधी प्रसंग गण गायक सुन आई विर मुल पडा सरसपतीची शीर
शाया खुप गायक मै रंग चढा
अब डूब मृदंग वाजे आसमाण उडती धड धडा छनाम छनाम
घुंगराचा आवाज शिव शक्तीचा एक लढा
शंकर सुर पुरविता आसे सुरत्या लोभे ताल बडा शप्त सूर
म्हणावा कशाला घ्यायचा घालून झपडा
प्रचयणे या माहाराज वल्लीच्या फडा बाडा मंच्या
झडप कैसा निघून जासी घाल मूडा
दगडू साळी गुरु हामारा आत्मा नका भला बुरा बारा गाय
साती पांढरे वस्त्र धोका नामा वडाळ
१७
गवरीचा बालक विचेचालक बुधीचा पालक आणा आणा
श्री गणे मुळ तत्र होम नमोची होम नमो वंथ सांभाळी
पात्र मजूळ गात्र वोवाळी मात्र काणा काणा
भात पूजूया रन प्रसंगी नौ विद्या भक्तीहिन वरंगी
लावू मूद बुद्धी समुंद्र शरुपी मुघ्र पाणा पाणा
सर्वा गुणाम तुमा सारखे नटले ऊनी हारी
कविला पटले कविचा खडा शश्रानी दंडा
वैशाला दंडा हाणा हाणा
१८
शुभ मंगल चरणी गण नाचला चला चरी पाहू
चला सार्‍या आंगणी रस उचरवीला छेतीस रागण्या
वसल्या ऊस्याला गण सार्‍यातल्या सुरा वर वर खर खर
चीम वाचवीला वाचविला नवह सागळा येचीवला उह सगळा
आगळा नीगळा मनु वेगळा खोचहा शुभ मंगल चरणी गण नाचला
गण हातीच्या पींडाचा गण वाकुड्या सोंडंचा आज
पाहून पडला त्याचा छुम छुम छंनना छुंम आवाज घुंगराचा जाहला
शुभ मंगल चरणी गण नाचला गणपती नाचुन गेल्या पाटी
शेंदूर ठेवला कोणा साठी पठ्ठे बापूराव कवीची दाटी
आटी मराठी वाले घाटी वर वर वरची भर भर भरची शाऊ
नगरची कोल्हापूरची पहा नीट पंच गंगेला पोचला शुभ मंगल
चरणी गण नाचला
१९
ये गजा वंदना ये गजा वंदना नाचत ये रंगणी
आधी तुझे नाम घेऊ मग सभेत उभे राहू
आनंद आनंद होईल माझ्या मना नाचत आहे
गणपती माये घागर्‍या वाजती पार्वतीच्या नंदना
नंदना वाजवीती ब्रह्म वीणा कवी सकाराम
शाहीर जोडी जसारणी बाण सोडी तोडू या
तोडू या वैर्‍याच्या माना रणाये गजा वंदना
ये गना वंदना आंगणी माझ्या रंगणी नाचत येई तू
गवरी हारा हॉम करस्था तुमळ पुर्‍या संकट समया

N/A

References :
संग्राहिका: डॉ. सरोजिनी बाबर

Last Updated : October 17, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP