कुलदैवत - गणेशस्थापना

मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.


जयजयाजी देवा गणेशा । मुहूर्ते स्थापी खांबाच्या प्रकाशा ॥
ढवळा गाईन सुरेशा । रघुनाथ नोवरा ॥
देव भक्तांचा कैवारी । गणेश विघ्ने निवारी ॥
नवरदेव नोवरी । दया करी तयावरी हो ॥
बरवे दोंद देवाचे । कंठी पदक नवरत्नांचे ॥
शेंदुर चर्चिला मस्तकावरी । जास्वन सुमनाची पूजा शिरी ॥
मोदक झेली तो हातावरी । विघ्नहरण गणराज ॥
बरवी सोंड या देवाची । कंठी माळ मोतीयाची ॥
हिरे शोभती तयाची । प्रकाश पडे उदरी ॥
सभे बैसला गणराजा । चरणी नमीते सारजा ॥
ब्रीद तोडा संकट निवारणा जा । भक्ताचा विघ्न हरणा गणराजा ॥

N/A

References :
संग्राहिका: सौ. कुमुदिनी पवार

Last Updated : October 17, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP