मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|कुलदैवत लोकगीते| हरहर महादेव कुलदैवत लोकगीते शंकर-पार्वती गिरजा शिव-गौरी हरहर महादेव शिवा शिवा महादेवा आम्हा संबाचं ध्यान शंकराचं लगीन शिव पार्वती प्रश्नोत्तरे भिल्लीण महादेव आरती आरती नमन घाणा गणेशस्थापना गौरीबाळा हरिजागर गण कुलदैवत - हरहर महादेव मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे. Tags : lokgeetoviओवीकुलदैवतलोकगीत हरहर महादेव Translation - भाषांतर देवा गा देवा देवा तुझ्या वाटीझालीसे पाच कणसाची चोरीकुणबी होता गा मैयावरीत्यानं काय ठोकली आरोळीउतरला मैयाच्या तो खालीउधळली धूर्याची अंबाळीसळवली सांबाच्या पाठीवरीटाकली हातामध्ये हातबेडी गापायामधी टाकुनी पायबेडीगिरजा माता भोळी गा हात कुणब्याला जोळीदेवा गा देवा देवा तुझ्यासाठीसारवल्यासे गा म्या उभ्या भिंतीत्यावर काढिले म्या गा चित्रकोटीडाव्या बाजूला शोभे सरोसतीउजव्या बाजूला शोभे गणपतीसमोर पारबतीच्या गा मूर्तीअंजनीच्या पोटी बाळ जन्मला मारोतीदशरथाला चार मुलंराम गा लक्षीमनआणिक भरत शत्रुघनगेले ते लंकेवर चालूनमारीलासे लंकेचा रावनराज ते करीतो बिभीषनआले काय जानकीला घेऊनआनिक सीतेला घेऊनअंजनीचे सुत त्याचे नाव हनुमंतदेवा देवा तुझ्या वाटीआहे कोकनाचे बनत्यावर संभाचे राखनत्याची सोनेरी गोफनगोटा मारला झोकूनमोती झाले दानोदानगिरजा माझी माता मोती घेतसे येचूनअन बेलगंगेला आला पूरतिचे पानी झाले लालभोळ्या संभाचे लगीनदिले गुलाबाचे पालबेलगंगेला आला पूरतो काय आलासे चौफेरआलासे चौफेर गामंधी गोसायाचे घरबेलगंगेला आला पूरतो काय आलासे चौकोनीआलासे चौकोनी गामधी गोसायाची धूनीअनु खांद्यावर खांदाघेतला घाई घाईघेतला घाई घाई गाघराच्या वैतागा पायीबानावाल्या दादा गातुझ्या बानाले तनाईचवर्याचे गडावरी गालागते नेत्रात पनाईकाठीवाल्या दादा गा तुझ्या काठीचा पैसा घे जो तुझ्या काठीचा पैसा घे जो काठी वाजवीत ने जोदेव देव करता गा संभा तुझे नाव गासंभा तुझे नाव तुह्या चरणी महाभावअनु भरल्या दुपारी पोवा चालला हासतअरं संभा संभा करता गा संभा सुंबरतआम्ही गाईचे वासईरं गा आलो हुंबरतसंभा संभा करता गा संभा नाही घरीडोईवर शिदोरी संभा गिरजाच्या माहेरीअरं संभा संभा करता संभा तुझ्या वाटीसांडली गा सुपारी पोवा चालला दुपारीअरं संभा संभा करता संभा तुझ्या वाटीसांडल्या गा लवंगा पोवा चालला तेलंगाअरं संभा संभा करता संभा नाई दिसेअरे भयान्या वनामंधी पोथी वाचयीत बसेअगं मांगणीच्या पोरी तुवा मांग कुठी गेलाआला वर्हाडाचा पोवा त्यानं वाजवत नेलाअगं बारनीच्या पोरी पानं देजो बारा तेरासंभाच्या लग्नासाठी विळा नेजो न गोजरासकाळच्या पारी कोंबडा देतो बांगअनु संभाच्या बागेमंधी केळीच्या पानावरी लह्या देतो डोब्या नागअरं डोब्या म्हणून नसे त्याले राग लई हायेमाह्या संभाच्या गळ्यामंधी राजा सृष्टीचा हायेअरं गडावरी गड गा गडावरी ताडंदुरुन दिसते गा नदी नर्मदाची धारअरं गडावरी गड गडावरी येळू गादुरुन दिसते नदी नर्मदाची वाळू गाअरं गडावरी गड गड चवर्याचा बाकातोंडी धरनी टाकू नकाअरं गडावरी गड एका गडाला कुलूपगड चढता दिसला टोपीवाल्याचा मुलूखअरं भिमाच्या मयावून मारे गीरजामाय हाकाझाडी वर्हाडाच्या लोका तुम्ही गर्दी करु नोकाअरं चौसर खेळता हात दुमता पळलाअरं गीरजाबाईची साडी केसावून गा बारीककेसावून गा बारीक नेसन्यावाल्याची तारीफगीरजाबाईची साडी दिसे बुट्टेबाजसाडी दिसे बुट्टेबाज गा मिरी पळे शंभर साठगीरजाबाईचा चुळा हिरवा कंकरढवळ्या नंदीवर बसून आले शंकरगाडीचा लोखंड सर्या रुळाले आटलंझाडी वर्हाडच्या लोका त्याचं नवल वाटलंशंकराच्या वाटी गा जातील भले भलेचवर्या येंगता येंगता झाले पखालीचे हेलेदेवा तुझ्या वाटीनं गा असे टोंगया टोंगया पानीसांबाच्या लग्नामंधी नंदी लागले पोहाळनीभयान्या वनामंधी गा वाद्याचा लागे मोठा भेववर्हाडच्या लोकांसाठी तथी बसे महादेववाघाचा केला नंदी अन सर्पाची केली येसनशंकर पारबती गा आले त्यावर बसून N/A References : संग्राहक: श्री. बाजीराव पाटील Last Updated : October 17, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP