मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|लग्नाची गाणी|
विंझना

लग्नाची गाणी - विंझना

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


विंझना
सागू फ़ुलेला एकू सागावं
चंदनू फ़ुलेला एकू चंदनावं..

ये ग चंदनाची एखली भारजा
भारजा घाली विंझनवारा
हातीचा विंझना खाली पडेला
खाली पडेला धुलीने माखला
धुलीने माखला दुधाने धुवेला
दुधाने धुवेला सलदी ठेवेला
सलद ग सोन्याची ढापना रूप्याचा
ढापना रूप्याचा बिखना मोत्याचा
(विंझना-पंखा, सलद-पेटी, ढापना-खाकन, बिखना-कडी)

पंखा
मोहोर आला एका सागाच्या झाडाला
मोहोर आला एका चंदनाच्या झाडाला

या ग चंदनाची एकटी बायको
बायको पंख्याने वारा घाली
हातातला पंखा पडला खाली
पडला खाली, माखला धुळीने
माखला धुळीने, धुतला दुधाने
धुतला दुधाने, ठेवला पेटीत
सोन्याच्या या पेटीचे ग झाकण चांदीचे
झाकण हे चांदीचे ग कडी आहे मोत्यांची

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP