TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|लग्नाची गाणी|
समारातू

लग्नाची गाणी - समारातू

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


समारातू
समारातू
गोणी भरल्या चावूलांच्या, चावूलांच्या ग
नेऊन टाकल्या टाकल्या, नवरीदारी ग
असा सासरा समरातू, समरातू ग
गोणी धाडल्या धाडल्या, चावूलांच्या ग

गोणी भरल्या दालीच्या, दालीच्या ग
नेऊन टाकल्या टाकल्या, नवरीदारी ग
असा सासरा समरातू, समरातू ग
गोणी धाडल्या धाडल्या, दालीच्या ग

गोणी भरल्या नारलाच्या, नारलाच्या ग
नेऊन टाकल्या टाकल्या, नवरीदारी ग
असा सासरा समरातू, समरातू ग
गोणी धाडल्या धाडल्या, नारलाच्या ग

गोणी भरल्या हलदीच्या, हलदीच्या ग
नेऊन टाकल्या टाकल्या, नवरीदारी ग
असा सासरा समरातू, समरातू ग
गोणी धाडल्या धाडल्या, हलदीच्या ग

गोणी भरल्या खारकांच्या, खारकांच्या ग
नेऊन टाकल्या टाकल्या, नवरीदारी ग
असा सासरा समरातू, समरातू ग
गोणी धाडल्या धाडल्या, खारकंच्या ग

गोणी भरल्या बदामांच्या, बदामांच्या ग
नेऊन टाकल्या टाकल्या, नवरीदारी ग
असा सासरा समरातू, समरातू ग
गोणी धाडल्या धाडल्या, बदामांच्या ग

गोणी भरल्या सोपार्‍यांच्या, सोपार्‍यांच्या ग
नेऊन टाकल्या टाकल्या, नवरीदारी ग
असा सासरा समरातू, समरातू ग
गोणी धाडल्या धाडल्या, सोपार्‍यांच्या ग
(समरातू-सम्राट, चावूल-तांदूळ, धाडणे-पाठवणे)

सम्राट
पोती भरली तांदूळाची, तांदूळाची ग
नेऊन टाकली देजापायी, नवरीदारी ग
असा सासरा आहे सम्राट ग
पोती पाठवली त्याने तांदूळाची ग

पोती भरली डाळीची, डाळीची ग
नेऊन टाकली देजापायी, नवरीदारी ग
असा सासरा आहे सम्राट ग
पोती पाठवली त्याने डाळीची ग

पोती भरली नारळांची, नारळांची ग
नेऊन टाकली देजापायी, नवरीदारी ग
असा सासरा आहे सम्राट ग
पोती पाठवली त्याने नारळांची ग

पोती भरली हळकुंडांची, हळकुंडांची ग
नेऊन टाकली देजापायी, नवरीदारी ग
असा सासरा आहे सम्राट ग
पोती पाठवली त्याने हळकुंडांची ग

पोती भरली खारकांची, खारकांची ग
नेऊन टाकली देजापायी, नवरीदारी ग
असा सासरा आहे सम्राट ग
पोती पाठवली त्याने खारकांची ग

पोती भरली बादामांची, बादामांची ग
नेऊन टाकली देजापायी, नवरीदारी ग
असा सासरा आहे सम्राट ग
पोती पाठवली त्याने बादामांची ग

पोती भरली सुपार्‍यांची, सुपार्‍यांची ग
नेऊन टाकली देजापायी, नवरीदारी ग
असा सासरा आहे सम्राट ग
पोती पाठवली त्याने सुपार्‍यांची ग
(लग्नात नवर्‍यामुलाकंडून नवरीला ’देज’ (हुंडा) द्यावा लागतो. त्यात तांदूळ, डाळ, नारळ, हळद,खारीक, बदाम व सुपारी अशा वस्तू देतात.)

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-02-12T20:57:05.8100000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

annuity policy

  • वार्षिक विमापत्र 
RANDOM WORD

Did you know?

सत्यनारायण पूजेला धर्मशास्त्रीय आधार आहे काय? हे व्रत किती पुरातन आहे?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.