मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री मुक्तेश्वरी पोथी|पूर्वार्ध| अभंग ७०१ ते ८०० पूर्वार्ध अभंग १ ते १०० अभंग १०१ ते २०० अभंग २०१ ते ३०० अभंग ३०१ ते ४०० अभंग ४०१ ते ५०० अभंग ५०१ ते ६०० अभंग ६०१ ते ७०० अभंग ७०१ ते ८०० अभंग ८०१ ते ८२३ पूर्वार्ध - अभंग ७०१ ते ८०० श्री मुक्तेश्वरी पोथी वाचल्याने आत्मिक समाधान मिळते. Tags : mukteshvaripothipuranपुराणपोथीमुक्तेश्वरी अभंग ७०१ ते ८०० Translation - भाषांतर शेतकरी शहाणा । अल्पजागीं पेरी बीबियाणा । बदल्यांत बहुत दाणा । पदरी पाडी ॥७०१॥परमात्मा देतो जसा । दान तूं करी तसा । विसरून नंतर जा कसा । सफल होई पूर्ण ॥२॥मधुर गोड हितकारी । वचना बोलसी सदा जरी । मुक्तानंदा, जरूर पडे कशास तरी । मंत्र पुरश्चरणाची ॥३॥प्रियवचन मधुर भाषण । रसुयक्त धार्मिक व्याख्यान । होऊनि जातें संकीर्तन । तेणें आपोआप ॥४॥करी करवी पाही यज्ञ । यथाशक्ती योग्यतेनें करून । जनतेची सेवा घे जाणुन । जनार्दन-यज्ञच कीं ॥५॥नको निंदूं यज्ञ । नको घालूं मध्यें विघ्न । करी पेक्षां मनन । यज्ञाची इष्टता ॥६॥तस्मात् सर्वगतं ब्रह्म । नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् । भगवन्ताचें इति वचनम् । गीतेमधुन ॥७॥यज्ञाचा महिमा पूर्णा । जाणी प्राज्ञ । न असे बुद्धिमान । पागल भ्रमिष्ट ॥८॥सुगंधाचें हुंगणें । अंतर तृप्ती तेणें । अन्नास भक्षणें । जठराग्नीची तृप्ती ॥९॥यदि रूप-दर्शन । नेत्रांची तृप्ती होऊन । स्वस्तुती ऐकून । सारे सुखावती ।७१०॥मग काय यज्ञामधुन । यज्ञदैवत नारायण । न राहणार पावुन । तृप्ती अशी ॥११॥अन्नमय पृथिवी । अन्नरसा उपजवी । आपणास जन्मवी । अन्नमय कोषांत ॥१२॥अन्नानें होतें पोषण । अन्नमय देहीं प्रेम किती पण । अन्नांत सामावे देह अन्नपूर्ण । अंतःसमयीं ॥१३॥पूर्ण ब्रह्म अन्न । खावें थोडेंच औषधासमान । प्रसाद मानुनी करितां ग्रहण । अमृत बने ॥१४॥औषधासाठीं मात्रेचे वळसे । अन्नही खावें मोजकें तसें । मर्यादेनें सम्मानानें खातां कसें । अन्न बने स्वर्ग ॥१५॥अन्न खावें जगण्यास रसाळ । प्रेमानें सेतोषानें वाढविण्या बळ । खाण्य़ासाठीं जगुं नये केवळ । अन्न हें पूर्णब्रह्म ॥१६॥आरोग्य बल कीर्ती । उत्साह आणि स्फूर्ती । सारे कांहीं उपजती । नियमीत आहारें ॥१७॥तसेंच नष्ट पावती । अनियमित आहारानें ती । याद राखुनी अस इती । मुक्तानंदा ॥१८॥अन्नानें समजोनि खाई । आत्मबोधें जीवन वितरी । नियमीत व्यवहार संयमही । मानवधर्म ॥१९॥धर्माविना जगणें । मानवतेस योग्य नसणें । धर्मापालन ज्ञात करणें । धर्मच ईश्वर ॥७२०॥सर्वांभूतीं एकात्म भावना । क्षमाशीलता स्वकष्ट-निर्मरतांना । परस्पर देवो भवाच्या आचरणा । जाणी मानवधर्म ॥२१॥विषम व्यबहारांतुन । आवश्यक समदर्शन । समत्व असे लक्षण । योगाचें कीं ॥२२॥डोळ्यांनीं बघतों । कानीं ध्वनी परिसतों । जिव्हेनें बोलतों, रस चाखतों । पदीं चालतों ॥२३॥इंद्रियें अशीं अनेक । व्यवहारी भिन्न प्रत्येक । परी शरीर एक । म्हणुनी सम असती ॥२४॥भेदद्दष्टी विषम व्यवहार । उच्चनीच भावनेचा आविष्कार । अंतःकरण स्थिति नष्ट करणार । समताच सुखदायी ॥२५॥कुटुंब ज्याचें मोठें । परिवार पुरा आपुला वाटे । बहुत राहती एककट्ठे । अभेद वृत्तीनें ॥२६॥एकाचाच सारा वंशविस्तार । असाच परमात्म्याचा संसार । वसुदेव कुटुम्बाचाच परिवार । विश्वव्यापी ॥२७॥वासुदेवैक कुटुंबकचें अज्ञान । ना विश्वबन्धुत्वप्रेमाचरण । मुक्तानंदा सुखी संसार-जीवन । तोंवरी नाहीं ॥२८॥परस्पर देवोभव । वृत्तीचा अभ्यास एव । साधनेनंतर आचरण हवं । मानवधर्म हाची ॥२९॥ह्यामध्यें राष्ट्रोन्नती । आहे भक्ती । पूर्ण योजनाही ती । विकासाची ॥७३०॥सर्वजण जोंवरी । परस्पर देवोभावाचाच परी । जपुनी न घे तरी । मंत्र हा साचा ॥३१॥भेदमंत्र तोंवरी । ह्रदयाच्या बाहेरी । घालविण्याची कामगिरी । न कोणी करी ॥३२॥परस्परांनीं एकमेकांप्रती । पूज्य सम्माननीय भाववृत्ती । मुक्तानंद, ठेवितो खरी शान्ती । स्वप्नींही न दिसे ॥३३॥घुबड जसा दिनसमयीं । प्रकाशा पाहात नाहीं । कावळा जसा रात्रीं । न देखे प्रकाश ॥३४॥मुक्तानंदा तसा ज्ञान दयेंत । विद्यमान, व्यवहारी जगतांत । दर्शन नसे करत । अज्ञानाचें ॥३५॥तत्त्वसमुदायाचें निरीक्षणा । करण्यानें शुद्धात्म बनुन । पुन्हा शुद्धता सोडुन । न राही आपुली ॥३६॥निद्रिस्त न देखे व्यवहारा । जागा न पाही स्वप्नपसारा । मुक्तानंदा, ज्ञानीही लोक सारा । न बघे ज्ञानावस्थेंत ॥३७॥कान असुनही बहिरा न ऐके । अन्ध दिवसाही द्दश्य न देखे । जीभ असुनी बोलूं न शके । मुका मनुष्य ॥३८॥गुरुप्रसादप्राप्त नर । जगातांतील व्यवहार । मुक्तानंदा असाच खरोखर । न पाही ॥३९॥अन्तर शान्ती, सौम्य स्थिती । अद्वैत वृत्ती, कल्पनातीत गती । मुक्तानंदा ही खरी प्राप्ती । अव्यवहाराही हाच ॥७४०॥समुदायी नर नारी । विलास सारा संसारीं । एका आत्म्याचाच तरी । दुजा न कोणाचा ॥४१॥निवृत्त करूं पाहतां वृत्ती । अंतरीं भासे बहु किती । नानात्व नाममात्राचें अती । पूर्ण सत्य एकच ॥४२॥निघाला सत्यापासूनी । नसे भिन्नता पावुनी । सत्यरूप सत्यांत असुनी । सत्यही मूर्तिमंत ॥४३॥मुक्तानंदा जें दिसे । तें सत्य असे स्वात्म-विमर्श होतसे । सत्यच ॥४४॥पंचतत्त्वाचे पंचवीस विभाग । त्यांच्यामध्यें रूप न्यूनाधिक । मानवी देहरचना आणिक । राही अशी ही ॥४५॥अण्डज जारज स्वेदज । चवथी उद्बीज । मुक्तानंदा पांच पंचवीसाची मोज- । दाद सारी ॥४६॥नको समजूं अलग । जगता व्यवहारिक । इथें तर पाही एकी । खालील गोष्टी ॥४७॥नित्यानन्द-वटिका वेदान्ता-शाला । शिकुनी घेण्याला । परीक्षा उत्तीर्ण करण्याला । तसेंच डिग्रीसाठीं ॥४८॥ह्रदयही वैकुंठ । भूलोक कैलास गोलोक । हो बैकुंठवार्ता नाहक । ह्रदयीं न देखतां ॥४९॥एक परम पिता । एक अव्यय माता । ह्यांचें कुटुम्ब तत्त्वतां । मानवसंसार सारा ॥७५०॥मनुष्य न बने जोंवरी । ह्या ज्ञानदशेचा पूजारी । आपुलें रुदन तोंवरी । ना थांबेल ॥५१॥मोह ईर्षा आशा । मध्यें भेदनिवास असा । भ्रमापासुनी येई दशा । अज्ञानवाढीची ॥५२॥अन्यांप्रती परभाव । मुक्तानंदा हेंचि दुःखाल्य । शांती कोठली तेथ होय । दूर ती राही ॥५३॥भेद केवळ मूढता । अशास्त्रीय सर्वता । ना मानवता । देखील ॥५४॥भेद नसे नीती । भेदभाव जगतीं । नरकवाद इती । जाणुनी घेई ॥५५॥परमात्मा एक । त्याची द्दष्टी एक । सन्तान एक-। सम त्याचें ॥५६॥भेद त्यांत न अधिक । न तो न्यूनाधिक । एकांतील अनेकता प्रत्येक । मुक्तानंदा, महामंत्र मृत्यूचा ॥५७॥देशदेशांतरीचा भेद । भाषाभाषावाद । नामरूपामधील भेद । हे सारे ॥५८॥मतामतांचा गलबला । मुक्तानंदा हा असला । यज्ञ-कुण्ड ठरला । नरकाचाच ॥५९॥विशाल पृथ्वी एक । जल एक, वायु एक । जळता अग्नी एक । हे सारे एकेक ॥७६०॥अवकाशाचें आकाश एक । सर्वाधार चैतन्यात्मा एक । मुक्तानंदा, असे का आणिक । अन्य कांहीं ॥६१॥व्यर्थ नरजन्मा येऊनी । संसारभारवाहु होवोनि । कोणता पुरुषार्थ करोनी । जगीं दाविला ॥६२॥नरदेह प्राप्त झाला । आहार निद्रा घेत गेला । भय, मैथुन विना न पावाला । परम अर्थ कांहीं ॥६३॥जगीं कशास आला । निःखार्थी विचार न केला । स्वार्थी जीवन जगला । ह्या क्षणापावेतों ॥६४॥द्वन्द्व धर्माची । रागद्वेषाची । पूजाविना प्रेम अप्रेमाची । न पावला आत्मविश्रांती ॥६५॥न जाणला आत्मा मुमुक्षुत्वानें । स्थिर न केला वैराग्यानें । न दिधलें दान खुल्या मनानें । परमेश्वरदत्त जें ॥६६॥मोक्षत्वाची नसे सिद्धता । न योगांगाची पारंगतता । भक्तीही न पावतां । राहिलें कोरडा ॥६७॥ संगती सिद्धाची न ठेवीली । न कुसंगती त्यागीली । सत्संगाची ना कास धरीली । आजपावेतों ॥६८॥निष्फल जीवन किती । आजतक घातविलें अती । जन्मा येऊनी जगतीं । कमाविलें काय ॥६९॥नियम पाळिलेस कोणते । पशुपक्षी कीटकाहुनी अधिक ते । कोणत्या पावलास सुखलाभातें । सांग पाहूं ॥७७०॥मुक्तानन्दा जसा । आलास गेलस तसा । नित्यानंदानुभूतीचा ना कसा । लाभ घेतलास ॥७१॥झोपुनी राही कोठवर । नाही का जागा होणार । इतका खुश कसा राहणार । अज्ञानदिद्रेमध्यें ॥७२॥संसारीं सारी रडकथाअ । हसणें सोडुनी सर्वथा । रडारडींत मानीशी का यथार्थता । पुर्या खुशीनें ॥७३॥निश्चिंतता सोडीशी । आरडाओरडा करीशी । रडत बसशी । सदोदीत ॥७४॥मरणारा मरण्यांत खुशी । मूढ मना चपलता जर त्यागीशी । बनुनी जाशी संतोषी । श्रीगुरुनित्यानंदीं ॥७५॥लोभाच्या लोलुपतेंत । क्रोधाग्नीमध्यें जळता । जीवन असे जगत । राहण्या का नरजन्म ॥७६॥आजतक पुरुषार्थ हाच मानला । संसारचक्कींत पिसुन निघाला । रडारडीचा धनी मात्र झाला । जन्मा येऊनी ॥७७॥आळसानें शुभकर्मत्याग केला । न गुरु ईश भक्तीनें पावला । तसाच ना पूर्ण विरक्तीला । प्राप्त केलें ॥७८॥संस्कारांचे मागें धावला । मुक्तानंदा परमार्थरूप असला । वैदूर्य हिर्यास मुकला । तेणेंकरूनी ॥७८०॥आज जें खाल्लें । तेंच उद्यां भक्षिलें । पुढेंही मिळेल ना म्हटलें । चिंता ही जाळी ॥८१॥न मानीला गुरुचा आदेश । न पाळीला शास्त्रांचा उपदेश । न केला सत्संग विशेष । केव्हांही कधीं ॥८२॥गाफील राहिला तूं मुक्तानंद । जागा होऊनि धर पदारविन्द। तव गुरुचे नित्यानंद । अजुनी तरी ॥८३॥म्हणे मी दास रामाचा । गुलाम परी दामाजीचा । श्वानापरी धंदा गल्लोगल्लीं फिरण्याचा । मुक्तानंदा, ही फकीरी कशी ॥८४॥ज्यानें न केलें प्राप्त अजुनी । त्याच्या सान्निध्यांतही जाऊनी । साथ न ठरे कोणी । बहुत काल ॥८५॥प्राप्त केलेल्याच्या ठायीं पूर्ण । केलें जाई समर्पण । माधारीं जाऊं शके कोणी न । त्यापासुनी ॥८६॥मानव यदि दुसर्या मानवास । संतुष्ट खुश करण्यास । यत्न करी खुशामती बनण्यास । जनादरास पात्र होई ॥८७॥झटे परकल्याणार्थ परंतु । ठेवुनि अंतरीं हेतु । परमात्म्याप्रीत्यर्थु । तरीच पावे सौख्यातें ॥८८॥परमात्म्याच्या जगतीं । सच्चेपणानें जे वर्तती । निर्मल आचरण ठेविती । त्यांना जरी ॥८९॥ कोणी न मानीलें । काय त्यांत बिघडलें । मुक्तानंदा, समज तुज वन्दीलें । सार्या जगानें ॥७९०॥परी जोंपर्यंत । राम नाहीं मानत । लौकिक सन्मानाचें तोंपर्यंत । प्रयोजन कसलें ॥९१॥परमात्म्याचा परिचय होतां । पूर्णरूपीं मिळुन जातां । सर्वांची ओळख तत्त्वतां । होऊन जाई ॥९२॥ह्रदयीं जर ह्रदयस्थ प्रगटेल । सर्व कलाकार देतील । सहकार्य पूर्ण मिळेल । सहजासहजीअं ॥९३॥बनविशी ह्रदय-महाल आदर्शपूर्ण । सर्वांचें होइल तें आकर्षण । दागेदार भटकण्याचें कारण । पडे कशाला ॥९४॥अन्तरींचें स्फुरण । बाहेरी होतें विलासपूर्ण । आंतबाहेरी एकच समान । मुक्तानंदा ही शिवद्दष्टी ॥९५॥भाग्य तोच मान । सौभाग्याचीही खाण । ह्रदयीं जो प्रकट असोन । रसमय परमात्मा ॥९६॥ह्रदयीं देदीप्यमान । ज्योतिर्मय आत्मा राही प्रकटुन । अंतरीं त्यातें न मानुन । राही जो आपुल्या ॥९७॥त्याची अशी गती । कल्पवृक्षाखालती । उभा परी दरिद्रीप्रती । अज्ञानानें ॥९८॥ह्रदयस्थ असोनी । अनेक पुण्यात्म्यांचा होवोनी । अनुभूतीचा विषय राहोनी । तरी देखील ॥९९॥आम्हा अनुभूती कां नसे येत । असे बोल जेथ उठत । ते अभागी नव्हत । का सांग ॥८००॥ N/A References : N/A Last Updated : July 01, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP