मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री मुक्तेश्वरी पोथी|पूर्वार्ध| अभंग २०१ ते ३०० पूर्वार्ध अभंग १ ते १०० अभंग १०१ ते २०० अभंग २०१ ते ३०० अभंग ३०१ ते ४०० अभंग ४०१ ते ५०० अभंग ५०१ ते ६०० अभंग ६०१ ते ७०० अभंग ७०१ ते ८०० अभंग ८०१ ते ८२३ पूर्वार्ध - अभंग २०१ ते ३०० श्री मुक्तेश्वरी पोथी वाचल्याने आत्मिक समाधान मिळते. Tags : mukteshvaripothipuranपुराणपोथीमुक्तेश्वरी अभंग २०१ ते ३०० Translation - भाषांतर पथभ्रष्ट स्वतः असतां । पूर्ण योगी ज्ञाता । म्हणुनि भासवी जगता । एक नंबरचा ॥२०१॥मीही असाच न जाणी । एका कृष्णाविना कोणी । पण निरापागलपणीम । हें बोलणें ॥२॥ योगांत सामर्थ्य पूर्ण । शक्ती राही असीम । आनंदमयी परम । शान्ती अपार ॥३॥पागर नटांना आराधितो । संस्कृतीचा भंग करतो । असा योगी नसतो । ना पूर्ण अँक्टरही ॥४॥नांव व्हावें म्हणून । मिळविण्या उच्च आसन । व्हावे अपार भोग संपादन । बहुत धनप्राप्तीही ॥५॥आणतो योग उपयोगांत । त्यापेक्षां जार-स्त्री बहुत । देहविक्रीनें जरी जीवन वेंचीत । श्रेष्ठ असे की ॥६॥वीस मण खाणें हत्तीचें । ढेरभर तसेंच उंटाचें । खाणें घोडेबैलांचे । किती असे ॥७॥पोट आपुलें सहज भरती । अर्था शेर तें असे किती । मुक्तानन्दा, तेवढयासाठीं । योगा कां विकसी ॥८॥बहुत बड्या मासळीयुक्त सागर । जयांचा पुष्कळ आहार । सहज परी खाती पोटभर । देवदयेनें ॥९॥मुक्तानंदा तव आहार । केवळ अर्धा शेर । योग कां वापरणार । पोट भरण्या ॥२१०॥योगाचें निदान । दयेनें करण्या दान । देण्या कृपेनें आशिर्वचन । योग असे कीं ॥११॥शिकविण्या कारुण्य भावांनीं । आपणास ऋषीमुनींनीं । अहेतुकपणें देऊनि । ठेविला असे जो ॥१२॥योगाची त्रयमंत्र संयम प्राप्ती । पूर्ण असतां योगी प्रती । ब्राह्म वस्तु संग्रहरीती । करणें कशाला ॥१३॥योगी योगबल सर्वसंपन्न । योग असे परिपूर्ण । सर्व लक्षणमय जाण । अनपेक्षित स्वतंत्रही ॥१४॥काया असे निरोगपूर्ण । तसाच राही व्यवहार संपूर्ण । निर्दोषपूर्णही जीवन । योग्याचें किती ॥१५॥निवृत्त योगी अलौकिक । असे सार्वाभौमिक । महाखतन्त्र कितीक । होऊनि वर्ते ॥१६॥स्वतंत्रता इंद्रियांची । स्वतंत्रता चित्ताची । स्वतंत्रता व्यवहाराची । ना ज्याच्यामध्यें ॥१७॥जन-खतंत्रता पूर्ण नाहीं । मुक्तानन्दा, ज्याच्या ठायीं । क्षणोक्षणीं परतंत्र राही । तो योगी नाहीं ॥१८॥मठ गुरुहीन । प्रजा राजाहीन । शासना विना गृहिणी सुखहीन । सर्वज्ञ वदती ॥१९॥वेदान्त कथितो । सर्वब्रह्म प्रसार असतो । सममान म्हणुनि तो । सर्वांचा करावा ॥२२०॥घेई जो समदर्शन । सर्वांचा ठेवी सम्मान । अन्य कोणतें पूजन । हवें करण्या ॥२१॥सम्मानानें सर्वत्र । बनती सर्व मित्र । प्रेम राही वर्धत । सम्मानानें ॥२२॥सम्मान असा ह्रदयांत । करी प्रेमरस प्रवाहीत । मुक्तानंदा, सम्मानाचें व्रत । पाळ तूं म्हणुनि ॥२३॥करणें सर्वांचा सम्मान । कर्तव्य मानीती महान । जो असे बुद्धीमान । त्याची ही रीत ॥२४॥ज्ञानीचें आचरण । दे सर्वां सम्मान । दीक्षा घे तू म्हणुन । सम्मानाची ॥२५॥साधुसंतांनीं केला सम्मान । राजांनींही केलें तें पालन । कुलशीलतेचें संपादन । होतें सम्मानानें ॥२६॥मुक्तिनगरीचें द्वार । सम्मान असे खरोखर । मुक्तानंदा, आत्मसात कर । सम्मानाला ॥२७॥प्राप्त होइ सद्बुद्धी । निजप्रज्ञेचीही वृद्धी । साध्य अभेद योगादी । सम्मानानें ॥२८॥सम्मानही सौंदर्य । दैवी संपदाच होय । प्रभावी त्याचें कार्य । केवढें असे ॥२९॥ करी अंतःकरण-पूर्ण शुद्धी । नष्ट होइ भेदबुद्धी । म्हणुनि सम्मानाचा निधी । प्राप्त करी ॥२३०॥करण्या पूजन । लगण्या ध्यान । घडण्या स्नान । सम्मान साधन ॥३१॥परमानंदाचें निधान । सर्व कांहीं सम्मान । करूं नको अनमान । तयालागीं ॥३२॥शीक करण्या सम्मान । होतो परमेश्वर प्रसन्न । शुद्ध होइ सारें अंतःकरण । सम्मानपूर्ण सेवेनें ॥३३॥सम्मानपूर्वक लावी शास्त्रार्थ । तेणें पूरें ज्ञान प्राप्त । मुक्तानंदा, सदासुखी जीवनार्थ । नित्यानंदांचा सम्मान ॥३४॥करी सदा समता प्राप्त । समताही राम सत्य । कमाई कर नित्य । समतेची ॥३५॥समता संपदा दैवी । समद्दष्टीनें सर्वां पाही । तीच ब्रह्मद्दष्टीही । असे म्हणुनि ॥३६॥समतावान तो । रामामधीं रमतो । योगी प्राप्त होतो । समतेला ॥३७॥समता ही पूर्ण सुखनिधी । समतेमध्यें लावी समाधी । मुक्तानंदा, समतेची बुद्धी । पूर्ण ब्रह्म नित्यानंद ॥३८॥समतेनें नष्ट विषमता । वैषम्य़नाशें चित्ताची स्थिरता । मुक्तानंदा, स्थिरचित्ती निर्विकारता । प्राप्तव्य जें आहे ॥३९॥असे जेथें समता । वसे तेथें एकाग्रता । चित्ताची प्रसन्नता । तेणें होई ॥२४०॥जाण प्रसन्न चित्ता । परिपूर्णतेचा ज्ञाता । मुक्तानंदा, म्हणुनि समता । प्राप्त करी ॥४१॥अयोध्येचा राम । गोकुळाचा श्याम । समतेचे परमघाम । असती पाही ॥४२॥शिव श्रीनीलकंठ । समतेचें रूप प्रगट । मुक्तानंदा, जप उत्कट । समतेला नित्य ॥४३॥ पूर्ण प्रज्ञा प्रदाता । यज्ञरूप इच्छित फलदाता ।’ प्राप्त करी पूर्ण समता ’ । आज्ञापिती नित्यानंद ॥४४॥समतेमध्यें राही रमत । सुभद्र नगरी सुरक्षित । समताचि स्नानतीर्थ । मलशुद्धी तेणें पूर्ण ॥४५॥समताग्नींत होतां दहन । पाप हो भस्म पूर्ण । निघे तावुन सुलाखुन । व्यक्तित्व सारें ॥४६॥नित्यानंदामृत हा सागर । समताजल पिऊनि वारंवार । मुक्तानंदा हो तूं अमर । अविनाशी ॥४७॥ समतेमध्यें वसे परमश्वेर । समता तूं प्राप्त कर । विषमता कर दूर । सदासाठीं ॥४८॥समतेंत निजशान्ति । योगी भक्तज्ञानी घेती । समतेमध्यें विश्रांति । ह्याचसाठीं ॥४९॥श्रीगुरु नित्यानन्दच ती । समतामुळीं असती । पूर्णब्रह्मत्व इति । जाणुनि घेई ॥२५०॥मंत्र उदय पावतो । वृत्तीचा अस्त होतो । पूर्णपणें लोपतो । समतेमध्येंच ॥५१॥जीव जगजीवनाची । उत्पत्तिस्थीतिलयाची । तोंडमिळवणी सार्याची । होते समतेंत ॥५२॥नित्यानंद स्वरूपच समता । होशील सुखी प्राप्त करतां । सर्व विषमता, निष्ठुरता । समता नसतां ॥५३॥होई श्रीगुरुकृपेस पात्रा । थांबेल सहज संसारसत्र । रसहीन संसार सर्वत्र । कृपेविना कसें सुख ॥५४॥पावेल कधीं का मूर्ख नर । गुरुकृपेविना खरोखर । पद ऐसें अमर । परमानन्दाचें ॥५५॥नित्यानंद कृपा जी । सहजासहजीं । तारी संसारामाजीं । करुनीया पार ॥५६॥असतां हरिकृपा पूर्ण । नर बने नारायण । पुरा खो देऊन । जीवत्वाला ॥५७॥शिवकृपाप्रभाव । बनवी नराला शिव । संसारसागर सर्व । तरूनी जाई ॥५८॥विद्येनें मूढ बने प्रज्ञावान । गुरुकृपेनें मुक्तानंद । पावुनि परमानंद । बनुनि जाई पूर्ण ॥५९॥पावोनि गुरुकृपाप्रसाद । विषयोन्मुक्त झाला गोपीचंद । एकलव्य धनुर्विद्यापांरगत । कृपाप्रसादें झाला ॥२६०॥कृपाप्रसादें गोपीचंद । पावला अमरपद । निद्रा घे अशी सुखद । गुरुसुखनिद्रेत ॥६१॥गुरुकृपेवीण । हो रसहीन । बन जीवन । शुष्क सारें ॥६२॥मानव भोगी पुरा । पूर्ण दुःखभोग सारा । संसारभ् रोग खरा । गुरुकृपा नसतां ॥६३॥म्हणुनि तूं मुक्तानन्द । गुरुकृपाप्रसाद । अमरतेचें पदा । पावुनि घेई ॥६४॥नराचा नारायण । जीवाला ब्रह्मपूर्ण । मर्त्यास अमर बनवुन । ठेवी कृपाजी ॥६५॥त्या कृपेवीण । सारें जीवन । केवळ मरण । नसे का ॥६६॥गुरुकृपाप्रसाद । दे कुण्डलिनी वरद । जीवनविकास-साद । तेणें लाभे ॥६७॥जीवनाचा विकास । परमानन्दप्राप्ती खास । नसे जागा संयमास । थोडी सुद्धां ॥६८॥तर गुरुकृपाहीन । नरकांतला किडा बनून । भवकूपांत बुडुन । पुरा जाइ ॥६९॥रडत रडत जीवन । घालविलें गुरुकृपेवीण । मुक्तानन्दा, शांती म्हणुन । कसली निळाली ॥२७०॥श्रीगुरुची कृपा । बने भवसागर नौका । मोक्ष नगरीचा चौक फुका । करी प्राप्त ॥७१॥देते अढळ पद । नित्यानन्दपद । मुक्तानन्दा, गुरुकृपाप्रसाद । मिळवी ऐसा ॥७२॥लाभता हरीगुरुप्रसाद । पावशी । सहज अमरपद । अंतःकरण प्रसन्न हो तद । ब्रह्मविद्याही तेणें ॥७३॥मूर्तिमन्त प्रसादरूप । परमेश्वर स्वरूप । परमात्मस्थिती प्राप्य । प्रसादानें ॥७४॥गुरु नित्यानन्दांचा । प्रसाद पावुनि साचा । अमर झाला मर्त्याचा । मुक्तानंद ॥७५॥कायाशुद्धि प्रथम कर । इंद्रियनिग्रह तदनन्तर । सत्कर्म तिसरा शुद्धिप्रकार । अंतःकरण प्रसाद लाभे ॥७६॥प्राणापानानें करी शुद्धता । अजपाजप सदोदिता । सहस्त्रनामपाठ गाऊनि गीता । मन वचन हो शुद्ध ॥७७॥महाप्रसाद भगवन्नामांत । परब्रह्म शिवशुद्ध वैष्णवांत । श्रद्धा नाहीं होत । प्रसादाविना ॥७८॥प्रसादें होऊनि प्रसन्न । परमेश्वर दे स्वरूप दर्शन । नित्यानन्द प्रसाद प्राप्त करून । सुखशांती पावशी ॥७९॥परमेश्वर प्रसादीं व्याप्त । परमात्मा जाण प्रसादांत । महाप्रसाद मंत्रप्रसादवत । गुरुप्रसाद भाग्योदय ॥२८०॥ गुरु प्रसादावीण । न करीशी संसार-तरण । नित्यानंद प्रसाद ग्रहण । करी जीवनमुक्त ॥८१॥यज्ञ प्रसाद गुरुप्रसाद । महान राही मंत्र प्रसाद । फळतां हरी गुरु प्रसाद । गोष्ट महान ॥८२॥प्रसाद जेथ पूरला । कायापालट पुरा झाला । मुक्तानन्द सहजयोग पावला. । नित्यानंद प्रसादें ॥८३॥पूर्ण तृप्ती आत्मानंदीं । स्थिर न हो जधीं । प्राप्त करी तो अवधी । प्रसादातें ॥८४॥ आपुल्या आपणामध्यें । संतृप्ति पावणें । हाच पूर्णपणें । खरा प्रसाद ॥८५॥ आपण भूलोनि । अन्य कोण ढुंढोनि । नको राहं होऊनि । दुःखी ऐसा ॥८६॥आपुल्यास आपुला करी । निजस्वरूपीं भरी । गुरुअ नित्यानंदांचा तरी । पावशी प्रसाद ॥८७॥श्रीगुरु प्रसाद रूप । जेथ असन तद्रूप । सुळावरीही शांती स्वरूप । पावशी मुक्तानंद ॥८८॥गुरुप्रसाद करीत । मनाला आनंद मस्त । कैवल्याचें पद देत । आणि अन्तीं ॥८९॥मानसिक द्वंद्वाची करामत । काय काय राही करीत । न कोणीही जाणत । कधीं कांहीं ॥२९०॥दुःखभोग कोठपर्यंत । भोगण्या अन् लावीत । गुरुकृपेवीण बहुत । कठीण जीवन ॥९१॥गाइ गुरुगुण । जपी गुरुस्मरण । करी गुरुध्यान । सदोदीत ॥९२॥इष्ट दैवत । ह्या जगतांत । गुरुच होत । परम आराध्यही ॥९३॥गुरु ज्ञानाचें मूळ । गुरु जगताचा शूल । आत्मतृप्ती लाभेल । गुरुप्राप्तीनें ॥९४॥निजान्यपूर्ती गुरुकडुन । मुक्तानंदा आपुला मान । कुलदेवतेसमान । श्रीगुरूला ॥९५॥गुरुच ब्रह्मविद्या । गुरूमध्यें योगविद्या । असेही मंत्र विद्या । गुरूमधेंच ॥९६॥गुरु दे करून । प्राप्त खरें ध्यान । मुक्तानंदा, सर्व विद्यांची खाण । गुरुदेवच होत ॥९७॥सेवेमध्यें गुरुसेवा । जप गुरुनामाचाच करावा । ध्यानयोग साधावा । गुरुमूर्तीध्यानानें ॥९८॥पूजावें तर गुरुपाद । गुरुपूपा मुक्तानन्द । सर्व सिद्धीप्रद । असे कीं ॥९९॥गुरु सत्य, गुरु नित्य । गुरु प्रेम गुरु अमृत । गुरुप्रेमरसपान करीत । मुक्तानन्दा अमर होइ ॥३००॥ N/A References : N/A Last Updated : July 01, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP