मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री मुक्तेश्वरी पोथी|पूर्वार्ध| अभंग ४०१ ते ५०० पूर्वार्ध अभंग १ ते १०० अभंग १०१ ते २०० अभंग २०१ ते ३०० अभंग ३०१ ते ४०० अभंग ४०१ ते ५०० अभंग ५०१ ते ६०० अभंग ६०१ ते ७०० अभंग ७०१ ते ८०० अभंग ८०१ ते ८२३ पूर्वार्ध - अभंग ४०१ ते ५०० श्री मुक्तेश्वरी पोथी वाचल्याने आत्मिक समाधान मिळते. Tags : mukteshvaripothipuranपुराणपोथीमुक्तेश्वरी अभंग ४०१ ते ५०० Translation - भाषांतर ब्रह्मविद्येंत कुशलता । योगविद्येमाजी सफलता । मुक्तानंदा जेथ आत्मवृत्ती-स्थिरता । मानी गुरु तो पूर्ण ॥४०१॥ज्याचा सत्संग । बने साधनेचें अंग । सहजी आंगोपांग । साध्य होई ॥२॥कठीण । सहजसुलभ बनुन । जाइ सारा सोपान । साधनेचा ॥३॥केवळ सहवासानें । आत्मजागृति होण्यानें । बनशील खास तेणें । आत्मरमण ॥४॥गुरु असे नित्यानंद । जाणुनि घे मुक्तानंद । प्राप्त करी सहवासानन्द । साथ सदा राही ॥५॥मुक्तानंद श्रीगुरुबोध उत्तम । ना करी केवळ मुक्त जीवन । पुरुषांतला पुरुषोत्तम । तेणें होशील ॥६॥मुक्तानंदा, ज्याच्यावर । ग्रुरु, कृपा पूर्ण करणार । सर्वजण त्याच्यवर । कृपा करीती ॥७॥ध्यानानें ध्येयप्राप्ती । सहजासहजी साधे ती । मुक्तानंदा, बनव चित्ताप्रती । ध्यानमग्न ॥८॥इच्छित फलदाता ध्यान । स्थिरचित्त बनवुन । मोक्षनगरीचेंही वाहन । हो ध्यानरत म्हणुन ॥९॥प्राण स्थिर होइ । काया बने निरोगी । होते शरीरसंशुद्धि । अतः हो ध्यानपुजारी ॥४१०॥होतसे व्यसनमुक्त । रसनाही स्वच्छ होत । बुद्धी कुशाग्र असे बनत । ध्यानातें पूजी ॥११॥आरोग्याचें राही सदन । देहा बनवी बलवान । सुखनिद्रा दे ध्यान । स्वर्गही पूर्ण ॥१२॥ध्यानानें आसनसिद्धि । लाभे स्फूतीं समृद्धी । सर्व इंद्रियतृप्तीही । कमी-पूतीं होई ॥१९॥असाध्याला साध्य । अप्राप्ताला प्राप्य । करण्या पूर्ण सामर्थ्य । ध्यानाठायीं ॥४२०॥ध्यानाविरहित । असे जें चित्त । तसेंच एकाग्रतारहित । जें मन राही ॥२१॥असलें ज्ञानविहीन । मुक्तानंदा जीवन । मृगजलनदसमान । शुष्क राही ॥२२॥ध्यानानें सर्वही ज्ञानकंद । तसाच परमानंद । पूर्णता लाभे मुक्तानंद । प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष ॥२३॥एकेका बिंदूनें । सागर बने । पैशापैशानें । रुपये हजार ॥२४॥नित्यप्रती वृक्ष जो वाढे । बने फलफुलांचा आश्रय पुढें । मुक्तानंदा नित्य ध्यान जोडे । समाधानसागर ॥२५॥करतां करतां ध्यान । अहंभाव जधीं हो लीन । जीवात्माही राही न । जाग्यावरी ॥२६॥केवळ शुद्ध असा । नित्यानन्दमयसा । संवित परमात्मा कसा । मात्र राही ॥२७॥तो शिव । तूं नसे काय । मी मांसमय । पागलपण हा सोड ॥२८॥देवत्व देई ध्यान । आत्मप्राप्तीही, संपे आवागमन । मुक्तानंदा, असें ध्यान नित्यानंद ॥२९॥मन राहतसे होऊनि मस्ता । दिलखुश होई ध्यानांत । मुक्तानंदा, त्यापुढें होत । इंद्र्ही भिकारी ॥४३०॥ध्यान शांतीचा मंत्र । ध्यान फळे शांतींत । ध्यान शांतीचें दैवत । मानवा प्राप्त कर शान्ती ॥३१॥शान्तीविना कसलें जीवन । सुखही कोठलें शांतीवीण । मुक्तानंदा प्राप्त करी ध्यान । शान्ती प्राप्त तेणें ॥३२॥स्त्री म्हणजे देह केवळ । पुरुषही देहच असेल । मी देह सदा जपशील । परी असें करूं नको ॥३३॥देहासक्त नर । मूढ होकर । सोऽहम् न जपणार । आत्मानंदीं डुबून ॥३४॥देहाहुनि तूं वेगळा । परमानन्दमय सगळा । परतर शिव तूं आगळा । शिवोऽहम् जप सर्व वेळा ॥३५॥जप ज्याचा करी । तैसा बने खरोखरी । शिव शिव भजावा तरी । देहातें न भज ॥३६॥राही सदा जप करून । फलदाता यज्ञ जप महान । असे मंत्रमय जीवन । महामंत्र जपी सदा ॥३७॥सिद्धि जप, सिद्धि जपत । ऐसें महादेव बोलत । राही श्रद्धा ठेवत । ह्या वचनावरी ॥३८॥जप अपुला ऋषी अजी । म्हणे गिरिराजजी । श्रीगिरिघर नागरजी । जपा ना ॥३९॥जपयोग असे । तेणें प्राप्त होतसे । मानव इच्छितसे । तें तें फळ ॥४०॥सर्व जपा, जप । जप असे रामाचें रूप । होतो पुरा फलद्रूप । होऊनि फलदायी ॥४१॥अजपाजप । सोऽहम् जप । निरन्तर जप । पापमुक्ती तेणें ॥४२॥अजपाजपाचा । जप कर साचा । कृपाप्रसाद नित्यानंदांचा । पावशील ॥४३॥अंतरंगीं एकान्त वृत्तींत । पातिव्रत्य चित्तांत । राही जप करीत । सदैव असा तूं ॥४४॥जपा करूनि निरन्तर । योगीजन होती ब्रह्माकार । जप कर, जप कर । म्हणुनि निरन्तर ॥४५॥आपुल्या अन्तरीं । होइल स्वरूपदर्शन तरी । सोऽहम् जपतां नरनारी । शिवरूप बनती ॥४६॥सहज जप जपुन । परमेश्वरप्रेरणा होऊन । त्याला घे जाणुन । तूं असा रे ॥४७॥सहज जपांत । सदा विराजत । भगवान नित्यानंद रहात । अरे साधका ॥४८॥सहज जपताम प्राप्त होणार । सुखद मोक्षनगर । पद लाभे अजरामर । मुक्तानंदा सहज जप कर ॥४९॥अक्षय होतां जप । जाणी तो सहज जप । सकारानें बाह्मजप । अकार अंतरजप ॥५०॥सकारानें अन्तर पलट । अकार जप बाहेरूनी उलट । निरन्तर जपानें पापपुण्यीं सूट । सोऽहम् अजपाजप ॥५१॥अरे मानवा ज्या स्थानीं । विश्वलय होवोनि । जाती भ्रम भेद सारे विरोनि । नाठविशी कसा तयाला ॥५२॥अद्वय निरामय परमानन्दा । तेंची तवा रूप नामप्रद । ऐसा जप सुखद ॥ कां नसे करत ॥५३॥देहातें मी मी समजुनी । मरणशील दुःखी छोटा बनुनी । सफलता पूर्ण पावोनि । जरी असशी ॥५४॥सोऽहम् सोऽहम् जपुनी । अजरा अमर सुखी शांत बनुनी । सफलता त्यांतुनी । कां न पावशी ॥५५॥पवित्र रामनाम उच्चारण । सोडोनि देऊन । सत्यातें त्यागुन । जपही सोडुन ॥५६॥सदा जपी असत्यातें । सोडुनि अशा जिव्हेतें । विषवेल कोणती असते । तीहुनि अधिक ॥५७॥सर्वयोगतन्त्राचा आधार । कुण्डलिनी खरोखर । सर्वयोग प्राप्त होणार । कुंडलिनी जागतां ॥५८॥अधिकार औषध देण्याचा । डॉक्टर असेल त्याचा । पंडित कायद्याचा । वकीलच असे कीं ॥५९॥प्रोफेसर अधिकारी । विद्यार्जना वितरी । गुरु कुण्डलिनी प्रवाहित करी । तयाचेंच कार्य ॥४६०॥जगद्व्यापिनी कुण्डलिनी। सर्वतन्त्राचें मूळ असोनि । अनुभवास न येवोनि । असे जर ॥६१॥कृपा तुझ्यावरी । तिनें न केली जोंवरी । मुक्तानंदा अकारण गुरुवरी । कां रुसतोसी ॥६२॥ज्ञानीला जी प्रकट । चिती ती उत्कट । पूर्णपणें अप्रकट । तुझ्यामध्यें ॥६३॥मुक्तानंदा असें असोन । मी बुद्धिमान । असणें वल्गना ही करोन । शरमेची गोष्ट ॥६४॥जिची जरूरत । हरिहरासीही पडत । सहाय्यता जिची घेट । ब्रह्मादि देखाल ॥६५॥जिच्या कृपेनें योगी । शुष्कता त्यागी । बने सर्वांगीं । रसमय ॥६६॥ती रसमय कुण्डलिनी । व्यवहारी आम्हा लागोनि । जरूरत कशास म्हणोनि । जर म्हणूं लागूं ॥६७॥मुक्तानंदा असें । बोलणारे कसे । बुद्धिहीन होतसे । नव्हे का ॥६८॥शरीरा संगठित । वृद्धा ते जवान । धातूला बलपूर्ण । करोनि ॥६९॥अमरतेची । अनुभूती करण्याची । कामगिरी कुण्डलिनीची । खरोखरी ॥४७०॥षड्कर्म फळवुन । प्राणापाना करी गतिमान । कुम्भकातें देऊन । ऊर्ध्व स्थिती ॥७१॥आत्म्यामधें रमण । करवीणें पूर्ण । कार्य हें संपूर्ण । कुण्डलिनीचेंच ॥७२॥चतुर्योग करकरवुनि । देहेंद्रियांना स्थिर करोनी । तैसेंच एकाग्र करोनि । मनालाही ॥७३॥परमानन्दमय । बनण्याची करी सोय । हें सारें कार्य । कुण्डलिनीचें ॥७४॥षड्चक्रातें भेदोनि । ग्रन्थित्रय छेदोनि । धुवुनि टाकोनि । मलत्रय ॥७५॥त्रिकुटीवरी । प्रभावित करी । कुण्डलिनीची न्यारी । करामत सारी ॥७६॥अवस्थात्रयीच्या वर । पंचकोषाच्या पार । त्रिगुणातीत खरोखर । होवोनि ॥७७॥सहज संवीदाचें जाण । जें असे स्फुरण । तें सारें कार्य प्रकरण । कुण्डलिनीचेंच ॥७८॥सहस्त्रारामाजी । कोटी सूर्य तेजी । अनुभूति त्याची जी । करवुनी देई ॥७९॥महाचैतन्यमण्डालांत । डोलायमान करवीत । कुण्डलिनी हो प्रभावीत । कार्य करी ॥४८०॥अतंरबाह्म मध्यरहित । शून्य इदम् अयम् विहित । बोलणें ऐकणें विना होत । सहजासहजी ॥८१॥ जो असे जसा । त्यासी घडवी तसा । मुक्तानंदा सारा असा । कुण्डलिनीचा प्रभाव ॥८२॥प्रणवरूपी कुण्डलिनी । पूर्णानन्द कारिणी । नरनारीमयी विद्यायोगिनी । योगेश्वरीही ॥८३॥सर्वश्री कुंडलिनी । योगाग्निमयी अग्नी । असे माया भक्षिणी । तशीच ॥८४॥विद्या रक्षिणी । पूर्णेश्वरी असोनी । अन्तर कार्यरूपिणी । अशी असे कीं ॥८५॥होतां कुण्डलिनी कृपजागृती । क्रिया अपसुख होंऊ लागती । पापतापनाशाची निवृत्ती ॥८६॥ परमानन्द उपजे । अंतरबाह्य क्रिया । राजहठभक्ती मंत्रयोग क्रिया । रसमय जीवनाची प्रक्रिया । हो तेणें ॥८७॥दिव्य ज्योतीचा उदय । मधुर नादमय । मुक्तानंदा जीवन हो अमृतमय । षड्रसपानानें ॥८८॥कुण्डलिनीचा भावावेश । शिवशक्तिचा समावेश । ग्रुरुकृपेंने ब्रह्मप्रवेश । मुक्तानंदा हा साक्षात्कार ॥८९॥दिव्य कुंडलिनी । त्रिकुटी भेदोनी । गतिमान होवोनी । जाई सहस्त्रारांत ॥४९०॥कुण्डलिनी,शक्ति, । अन्तर विकास, गुरुकृपा ती । मुक्तानंदा सारे असती । समानार्थी ॥९१॥जगत् जनता चितीमय । चितीमय विश्व, लोकसमुदाय । मुक्तानंदा मारें कांहीं होय । ही चितीही ॥९२॥प्राणापान होते चिती । चित्तानें चिन्तन करवी ती । मुक्तानन्दा, जीवत्वही चिती । न अन्य कांहीं ॥९३॥अखिल मा योगमयी । कुण्डलिनी मंत्रमयी । मंत्रस्वरूप होई । जी तेणें ॥९४॥श्रीगुरुप्रसाद मंत्रानें । विकास पावे तत्परतेनें । विकसीत म्हणजे उल्लसीतपणें । ती असे कीं ॥९५॥श्री भगवती । मंतमयी कुंडलिनी जागृती । उल्लसीत होण्याची प्रवृत्ती । दोन्ही एकच ॥९६॥मंत्र, गुरु, कुंडलिनी, चिती । वस्तुतः असती । चिदविलासिनी शक्ति । पारमेंश्वरी ॥९७॥मानव निवासी । प्रेम अशी । सर्वांहुली महानशी । संपदा होय ॥९८॥भगवन्त-रूप । प्रेमस्वरूप । प्रेमस्वरूप । प्रेम गुरुस्वभावानुरूप । गुण महान ॥९९॥करी प्रेमानें । भजन, पूजणें । ध्यान करणें । तेंही प्रेमानें ॥५००॥ N/A References : N/A Last Updated : July 01, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP