मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीज्ञानेश्वरसमाधी महिमा| अभंग ५६ ते ६१ श्रीज्ञानेश्वरसमाधी महिमा अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ४३ अभंग ४४ अभंग ४५ ते ५० अभंग ५१ ते ५५ अभंग ५६ ते ६१ श्रीज्ञानेश्वरसमाधी महिमा - अभंग ५६ ते ६१ श्रीसंतज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतलेली पाहून श्रीनामदेवांना भरून आले आणि त्यांनी श्रीसंतज्ञानेश्वरांच्या स्तुतीपर हे अभंग लिहीले. Tags : abhangbooknamdevअभंगनामदेवपुस्तकसंतमहिमा अभंग ५६ ते ६१ Translation - भाषांतर ५६मग सारोनी संध्यास्नान । देवभीक्त विष्णुपूजन ।पंक्ति आदरिलें आपोशन । मागुती भोजन करिताती ॥१॥धन्य धन्य तूं ज्ञानराजा । तूं आवडलासि केशिराजा ।पंक्ति करोनि द्विजा । वाढितसे रुक्मिणी ॥२॥राही रुक्मिणी सत्यभामा । वाढिती पंचामृत उत्तमा ।पुंडलिक बोलावुनि साउमा । ज्ञानदेवा पंक्ति बैसविलें ॥३॥निवृत्ती सोपान मुक्ताबाई । गोपाळ देव्हढे दोन्ही बाहीं ।रुक्मिणी सत्यभामा राही । वाढिती अन्नें नानाविधें ॥४॥वैष्णव प्रेमळाचे पंक्तीं । प्रार्थना करितसे श्रीपति ।सोपान ज्ञानदेव निवृत्ती । एकवट बैसविले ॥५॥गरुड तिष्ठत होता द्वारीं । त्यासी रुक्मिणी ताट करी ।मग गर्जिन्नले जैजैकारीं । गोविंद श्रीराम उच्चारें ॥६॥देव आकाशीं पाहाती । ब्रह्मादिक वंचलों म्हणती ।भाग्य केवढें यांचें क्षितीं । या भक्तजनांचें ॥७॥नामा म्हणे आळंकापुर । धन्य धन्य मनोहर ।आपण येउनि सारंगधर । समाधि देती ज्ञानदेवा ॥८॥५७तंव विनवी ज्ञानदेव । सकळांचा जाणोनी ठाव ।शुद्ध भक्ति प्रेमळ वैष्णव । सर्वभाव सख्य घेतां ॥१॥बैसोनियां एक आसनीं । देशभक्त चक्रपाणि ।तांबुल घेवोनियां वदनीं । सुखसंतोषें बोलती ॥२॥मग पाचारिला गरुड । भक्त पूंडलिक प्रौढ ।भक्त सोपान गम्यगूढ । जाणते भक्त ॥३॥केलें प्रयाणासि मुहूर्त । पंढरीस जावयाचें आर्त ।संवत्सरा जाऊनि त्वरित । समाधी देऊं सोपाना ॥४॥ऐसा निर्धार करुनि । समस्तां भोजने सारुनि ।सिद्ध जाली माता रुक्मिणी । दिन अस्तमाना गेला ॥५॥जावोनी तया पुष्पकावरी । शयन आरंबिलें हरी ।नारद तुंबर वैकुंठाभीतरीं । मंजुळ सुस्वरीं गातसे ॥६॥भक्त भागवत भाग्याचे । तीहीं जयजयकार केला वाचे ।ऐसें चतुर पाहार निशींचे । जागरण हरीचें कर्मिलें ॥७॥नामा म्हणे निघतां हरी । ज्ञानदेवो प्रार्थना करी ।देवा तूंचि वैकुंठहरी । आमचा ह्रदयस्थु ॥८॥५८उगवला दिन प्रभात । स्नान संध्या सारोनी समस्त ।उद्वव कर जोडोनी बोलत । पूर्ण आर्त सर्वांचे ॥१॥अनूपम इचा महिमा । न बोलवे जाहली सीमा ।आताम चला वेगीं पुरुषोत्तमा । आपले आश्रमा पंढरीसी ॥२॥गरुड सामोरा तिष्टत । भक्त भागवत समस्त ।मुनी पुंडलिक विनवित । केलें दंडवत साष्टांगें ॥३॥म्हणे ज्ञानदेव यजुर्वेदि । वाग्स्नेहो वाक्बुद्धी ।परंपरा याचि वैखरी । यासी मंत्रोक्त दिधली ॥४॥ऐसाचि सोपान मार्ग । तूंचि करितां पांडुरंग ।ग्राम लेखनाचा प्रसग । निरोपिला सांग कुळयाती ॥५॥सकळवंश परंपरा । न सोडावें तुम्ही आचारा ।आम्ही जातों पंढरपुरा । या विठोबा सांगातें ॥६॥सकळां आलिंगन दिधलें । मग गरुडावरी आरुढले ।ज्ञानदेवांनीं हरीची पाऊलें । दृढ धरिलीं निरंतर ॥७॥नामा नाचे हरिद्वारीं । आनंद जाला आळंकापुरीं ।विठठल देवो निघाले पंढरीं । ज्ञानदेवा समाधि देवोनि ॥८॥५९नामयाचा धरुनि हात । क्षणक्षणा पंढरिनाथ ।ज्ञानदेवातें आठवित । कंठ सद्गदित करुनियां ॥१॥उद्धवासी म्हणे पांडुरंग । या सज्जनाचा न व्हावा वियोग ।हें ह्रदय होतसे दोन भाग । जाणा अंतरंग तुम्ही माझें ॥२॥त्याविण गोड मज न वाटे । ऐसे जिवलग कैचे भेटे ।जे मनींचा वियोग दुःख तुटे । समाधान वाटे ह्रदयामाजीं ॥३॥ज्ञानदेवा ऐसो निधान । नाहीं धुंडितां त्रिभुवन ।न संपडे न देखो जाण । तुझी आणि उद्धवा ॥४॥धन्य धन्य हे तिघेजण । मुक्ताताई मुक्तरुपें पूर्ण ।हीं उद्धरिलें त्रिभुवन । भवदुःख दारुण नासीलें ॥५॥याचे निपडी पाडे । उपमेसी दीसे थोडे ।परी ज्ञानदेवा ऐसें रत्न जोडे । हें न घडे कल्पांतीं ॥६॥माझे जिवीचें गुह्यगुज । हें उद्धवा सांगितलें तुज ।कां नामदेव जाणे सहज । आणि सकळ संत सज्जन ॥७॥गुज सांगे रुक्मिणीसी । घडी घडी ह्रषिकेशी ।तंव रुक्मिणीसी । मानसीं । या जीवलागासी आठवि ॥८॥ज्ञानदेव तरी तुमचा अंश । केवळ स्वयंप्रकाश ।स्वात्मसुख निजरहिवास । स्वानंद असे उद्बोध ॥९॥निवृत्ति तुम्हां नाहीं भिन्नता । त्याचा आत्मा तुम्ही हो आनेला ।शिव विष्णु आईक्यता । असे स्वभावता मुळींच ॥१०॥सोपान तरि पोटींचा । तो प्रान असे तुमचा ।तेथें शब्द भिन्नपणाचा । कोठें मिरवेल ॥११॥।संतभक्त सकळ मिळोनि । मस्तक ठेवला श्रीचरणीं ।तंव बोले रुक्मिणी । तुम्हापासुनि दुरी नाहींत ॥१२॥नामयाचें धरुनि चरण । साष्टांगीं करुनि नमन ।म्हणे तूं सर्वांचे स्वानंद जीवन । मी दीन काय बोलों ॥१३॥६०भागवंत म्हणे नामयासी । हें यथार्थ तूं बोलसी ।परी क्षणक्षणा गुण आठवती मानसीं । या ज्ञानदेवाचे ॥१॥भक्त ज्ञानि आणि वैरागी । ज्ञानदेवा ऐसा चहुंयुगीं ।ना शको न देखो याची लागीं । खंती वाटे बहुत ॥२॥उद्धवें चरणावरी ठेउनि माथा । कांही एक विनंति जगन्नाथा ।ते सांगाअजी कृपावंता । गुज अंतरीचें स्वामी ॥३॥निवृत्ति ज्ञान सोपानासि । हे बैसविले जी समाधीसी ।मुक्ताताईची स्थिती कैसी । तें ह्रषिकेशी सांगावें ॥४॥मग देव म्हणे तूं काय नेणसी । जरी प्रीतीनें आम्हां पुससी ।तरी आइकें गा च्छिती ऐसी । उघडचि बोलों ॥५॥तरी नाथाचा हात ईचा शिरीं । यालागीं ते सत्यसनातन अवधारी ।महाकल्पाचा अवश्वरीं । हे सोडील देह ॥६॥तंववरी तिचें शरीर । अभंग चिरकाळ निरंतर ।महद्माया योगिणी साचार । मुक्ताबाई उद्धवा ॥७॥देवगन बैसोनि विमाना । गेले आपुलिया भवना ।सकळ महामुनि स्थाना । हरिचराणा वंदोनि ॥८॥म्हणती ज्ञानदेवाच्या प्रसादें । देखिली विठठल चरनारविंदें ।रुप पाहातां डोळ्या दोंदें । निघति स्वानंद सुखाचीं ॥९॥तरी ज्ञानदेव हा पायाळ जाण । निवृत्तिदेव तोचि अंजन ।सोपान तो नयन । तेथिचे सिखप्राप्ती ॥१०॥ऐसें करुनि साधन । साधिलें श्रीविठ्ठल निधान ।तेथिचे विभागीं ज्याचें भाग्य पूर्ण । तींही प्रत्यक्ष देखिलें ॥११॥या निधानासी कुरवंडी । मुक्ताबाई देह भावाची सांडी ।मग उभविली गुढी । आनंदाची सर्वकाळ ॥१२॥नामा म्हणे पंढरीसी । चालिले ह्रषिकेशी ।भक्ताचि मांदी देवासरीसी । नाम घोष गर्जत चालिले ॥१३॥६१ऐसियांचे चरित्र जो आवडी आईके । तो या भक्ताबरोबरी तुके ।भोगी वैकुंठींचीं निजसुखें । बोलिले मुखें श्रीविठठल ॥१॥धन्य धन्य ते भक्त । ज्या कारणें श्री भगवंत ।ऐसे पवाडे करित । विश्व उद्धरी तेणें करुनि ॥२॥जे भाग्याचे होति । त्यासिच हे होय प्राप्ती ।ते मागुते न येति पुनरावृत्ती । गर्भवासा ॥३॥नामा म्हणे नामस्मरण । तुटचि प्रपंचधरण बंधन ।सुख पावती निदान । समचरण देखलिया ॥४॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP