मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीज्ञानेश्वरसमाधी महिमा| अभंग ४१ ते ४३ श्रीज्ञानेश्वरसमाधी महिमा अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ४३ अभंग ४४ अभंग ४५ ते ५० अभंग ५१ ते ५५ अभंग ५६ ते ६१ श्रीज्ञानेश्वरसमाधी महिमा - अभंग ४१ ते ४३ श्रीसंतज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतलेली पाहून श्रीनामदेवांना भरून आले आणि त्यांनी श्रीसंतज्ञानेश्वरांच्या स्तुतीपर हे अभंग लिहीले. Tags : abhangbookdnyaneshwarnamdevअभंगज्ञानेश्वरनामदेवपुस्तक अभंग ४१ ते ४३ Translation - भाषांतर ४१ऐसे संतोषले देव । प्रसन्नरुपें माधव ।मग बोलती ज्ञानदेव । विठठलाप्रती ॥१॥धन्य धन्य तूं विठ्ठला । धन्य धन्य प्रत्यक्ष देखिला ।धन्य समारंभ येथिला । सोहळा करिसी भक्तांचा ॥२॥तुझेनि आम्ही धन्य । ये जगत्रयीं देवा मान्य ।म्हणती भक्तांसमान । न देखों त्रिभुवनीं ॥३॥तूं विश्वात्मा विश्वरुप । तूं जगाचें स्वरुप ।तुज न लिंपे पुण्यपाप । सदा शुद्ध बुद्ध अससी ॥४॥तूं आम्हां भक्तां सरिसा । सवें हिंडसी जगदीशा ।तुजविण अष्टदिशा । मज शून्य वाटती ॥५॥तरी तूं पाळिसी भक्त लळा । केला समाधीचा सोहळा ।तो दाखविला मज डोळा । दिव्य दृष्टी देवोनी ॥६॥तूं सत्वरजतमात्मक । तूं सकळ जीवांचा चालक ।तूंचि त्रिमूर्ती अवघा एक । विराटस्वरुप सकळ ॥७॥भक्तभाग्य भूमींतळीं । याकारणें तूं वनमाळी ।दहा अवतार भूमंडळीं । नाना चरित्रें खेळसी ॥८॥ऐसें महिमान अगाध । तें तुझें विश्वस्वरुप प्रसिद्ध ।कोण भाग्याचा मी प्रबुद्ध । तो तूं मजकारणें आलासी ॥९॥नामा म्हणे ज्ञानदेवें । ऐसी स्तुति केली स्वभावें ।तंव कृपा करुनियां देवें । अभयकर दीधला ॥१०॥४२चतुर्भुज श्याममूर्ति । शंखचक्राची आकृती ।पीतांबराची दिव्य दीप्ति । पाडिली सृष्टीवरी ॥१॥धन्य धन्य ज्ञानदेव । धन्य धन्य तो माधव ।मग आरंभिला अनुभव । ज्ञानदेवाचेनि मुखें ॥२॥देव म्हणे ज्ञानेश्वरा । तूं अवतरौनि माजि चराचरा ।हरिला महादेषथारा । तुझेनि कवित्वें ॥३॥तुझें कवित्व माझ्या गोष्टी । जो परिसेल हे सृष्टी ।तो येईल माझे भेटी । वैकुंठा पीठीं विष्णूच्या ॥४॥तुवां जो ग्रंथानुभव । गीतें सांगितला भाव ।तें मुख्य ठेवणें राणीव । अनुभवीच जाणती ॥५॥तैसाची अमृतानुभव । सिद्ध पीठ केलें भाव ।दाउनी मनोहर राणीव । निज गुह्य आमुचें ॥६॥वसिष्ठगीतेची टीका । भावार्थ काढिला श्लोका ।ग्रंथ संचिला नेटका । करुनि रचना दाविली ॥७॥तूं महाब्रह्मींचा अंश । पदपदांतरीं केला प्रवेश ।दाऊनियां उदास विशेष । या जीवांसी तारिलें ॥८॥तरी तूं आतां एक वेळ । माझी स्तुती करी निर्मळ ।जेणें करुनि तरती सकळ । वक्ते श्रोते ग्रंथकार ॥९॥नामा म्हणे परमानंद । पावोनियां उद्बोध ।केला ज्ञानदेव सावध । स्तुती उपरती मांडिली ॥१०॥४३ऐसें आळंकापुर पीठींचे । भक्त नांडती दैवाचे ।जे कां सागर भाग्याचे । ज्ञानउदयो प्रकासिते ॥१॥मग षोडश उपचारीं । पूजा ज्ञानदेव आदरीं ।दिव्यवाद्यें मंगलतुरीं । ओवाळिती पंचारतियां ॥२॥ज्ञान सोपान निवृत्ती । मुक्ताई प्रत्यक्ष ज्योती ।ओंवाळिती विष्णूमूर्ती । चतुर्भुज पैं ॥३॥पीतांबरधारी श्याममूर्ति । शंखचक्राची आकृती ।उद्धव अक्रूर ढाळिती । चवरें वरी ॥४॥प्रत्यक्ष लक्ष्मी आपण । दिव्य स्वरुप प्रसन्न वदन ।माजी मिरवे दिव्य सिंहासन । त्यावरी आरुढली ॥५॥पुढें गरुड जोडल्या करीं । उभा पक्षांचा फडत्कारी ।सूर्य लोपे तेजाकारी । अमृतकरु नाम एक ॥६॥गोपाळ देव्हडे उभे । मंजुळ पावे वेणुप्रभें ।शुभकाल सुप्रभें । माजी स्तुति मांडिली ज्ञानदेवें ॥७॥नामा म्हणे ऐका । पुढें ग्रंथाची पीठिका ।तो तारील सकळ लोकां । एक एक अक्षर आईकतां ॥८॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP