मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीज्ञानेश्वरसमाधी महिमा| अभंग ५१ ते ५५ श्रीज्ञानेश्वरसमाधी महिमा अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ४३ अभंग ४४ अभंग ४५ ते ५० अभंग ५१ ते ५५ अभंग ५६ ते ६१ श्रीज्ञानेश्वरसमाधी महिमा - अभंग ५१ ते ५५ श्रीसंतज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतलेली पाहून श्रीनामदेवांना भरून आले आणि त्यांनी श्रीसंतज्ञानेश्वरांच्या स्तुतीपर हे अभंग लिहीले. Tags : abhangbooknamdevअभंगनामदेवपुस्तकसंतमहिमा अभंग ५१ ते ५५ Translation - भाषांतर ५१परब्रह्म परममूर्ती । परमधाम परात्पर कीर्ति ।परमप्रियो परंज्योती । श्रुतिस्मृति स्वानुभव ॥१॥अकळ विकळ निरंजन । ज्ञाताज्ञेय विवेकधन ।संशय दृश्य निरसन । विश्वप्रिये ॥२॥नलिनीकमलविकाशा । नयनघन विश्वेशा ।नमन चरणलेशा । चित्सुखा ॥३॥चराचर सच्चिदानंदांग । शुद्धस्नान शंकर दिव्यांग ।विष्णुमूर्ति पांडुरंग । सगुणरुप भीमातटीं ॥४॥सजळ जलघना । दशन कोटी सूर्यकिरणा ।मुक्ताहार जडित रत्ना । किरिटी मुगुट विराजित ॥५॥नीलोत्पल नीलवर्णा । श्यामसुंदराअ मूर्तिघना ।स्तविताम सहस्त्रवदना । नकळे पार तुझा ॥६॥रजतमाचे मेहुडे । पाहतां तूं न सांपडे ।नाहीं तुझिया पडिपाडें । भूमंडळीं दैवत ॥७॥अनंत ब्रह्मांडधीशा । गुण न वर्णवे परेशा ।तुंवा ज्ञानदेव सर्वेशा । अपणामाजीं सामावला ॥८॥निवृत्ती म्हणे आम्ही दीनें । तारावीं तुम्ही नारायणें ।मग काय आदरिलें सोपानें । तेथवरी येणें घडेल ॥९॥ऐसी निवृत्तिदेवाची स्तुती । ऐकुनियां श्रीपती ।नामा म्हणे देव तयाप्रती । बोलत जाले ॥१०॥नारायणें स्तुति परिसिली । ऐकुनियां अव्यक्त बोली ।म्हणे तुवां गीतेची टीका केली । ते प्रमाण आम्हासी ॥११॥नामा म्हणे हरी देवें । जाणोनियां अंतर्भावें ।तुष्टले गुणगौरवें । निवृत्तीसी दिधले ॥१२॥५२म्हणे विठोजी शंकराचा । प्रत्यक्ष अवतार तुझा साचा ।स्तुति केली असे वाचा । विस्मयाचा पूर मज ॥१॥वसति सप्तद्वीप नवखंड । त्यामाजीं अनंत ब्रह्मांड ।रोमरंध्रीं ज्या अखंड । तो मनुष्यरुपें मेदिनी ॥२॥निवृत्तिनाथ नाना अवतारीं । तुमच्या सेवेसीं श्रीहरी ।जें जें प्रेरसी कामारी । सांगितलें करी उगाचि ॥३॥म्हणे देवाधिदेवा आतां । सांगाल तें करुं तत्वतां ।हरुं भवार्णवाची चिंता । या त्रैलोक्याची ॥४॥तंव निवृत्तीनें लोटांगन । म्हणे नाहीं तुज समान ।आम्हांकारणें नारायण । साहाकारी होसी ॥५॥आमुचा तपें समर्थें । तुवां सिद्धी पावविली जगन्नाथें ।सरते करुनियां आम्हांते । विष्णुमार्गें लाविलें ॥६॥देव म्हणे तूं आधीं । विष्णुमार्गींची सकळ सिद्धी ।जाणतां तूं एकत्र शुद्धी । निवृत्ती होसी ॥७॥नामा म्हणे ऐसे लळे । पाळिले तयाचे गोपाळें ।देऊनियां समाधिसोहळे । विष्णुधर्म प्रतिष्ठिला ॥८॥५३ऐसा निवृत्ती स्थिरावला । महाविष्णु संतोषला ।मग सोपानदेवें आरंभिला । स्तुतिवाद परियेसा ॥१॥जयजया तूं रामकृष्णा । भक्तभाविकां हरी तृष्णा ।देहीं दीपक सहिष्णा । रामकृष्ण म्हणतांचि ॥२॥नरहरि नरकेसरी । टाळी वाउनियां गजरीं ।टाळ मृदंग झणत्कारी । जयजय कृष्ण म्हणों आम्हीं ॥३॥एक हरिविण नाहीं सखा । त्रिभुवनीं आत्मा देखा ।समाधिसुखाविशेखा । चरणरजें डौरवावें ॥४॥धन्य हे भूमिका देश । आपण हरि जगन्निवास ।ज्ञानदेवीं केला वास । समाधिसुख घेऊनी ॥५॥निवृत्ती ऐसा श्रेष्ठ गुरु । तोहि समाधीसी होय स्थिरु ।तरि पुढें काय करणें विचारु । तो सांगावा स्वामिया ॥६॥देव म्हणे ब्रह्मावतारा । या अवघिया चराचरा ।श्रेष्ठ तूंचि निर्धारा । मनुष्यरुपें अवतलासी ॥७॥सकळ हे तुझे व्यापक । चराचर हें त्रैलोक्य ।अधर्मं जालिया चाळक । अवतार घेती तिघे ॥८॥ऐसें बोले पाडुरंग । सोपान निवाला सर्वांग ।म्हणे सांकडें फेडिता श्रीरंग । तूंचि श्री विठठला ॥९॥नामा म्हणे सोपानदेवें । मागुती स्तुति आदरिली भावें ।जेणें करुनियां बरवें । समाधिसेजेची ॥१०॥५४मुक्ताई म्हणे देवा । तूं विसावा सर्वां जीवां ।गुण गौरव अनुभवा । आम्ही जाणों तुज ॥१॥सत्य सत्य जनार्दना । सत्य सत्य नारायणा ।सत्य सत्य तूं आमुचें धना । जगज्जीवन जगदाकारा ॥२॥तुझेवांचेनि त्रिभुवनीं । दुजा न देखों नायकों कानीं ।वेदशास्त्रपुराणें । अगाध महिमा तुझा ॥३॥तूं देवा देवोत्तम । योगियांचा विश्राम ।शिवाचा ही आत्माराम । ऐसा नेम वेदाचा ॥४॥तरी भक्तांलागीं ऐसा । पावसी तूं ह्रषिकेशा । तुजविण नाहीं भरंवसा । आणिकां देवांचा ॥५॥तूं परत्रीचें तारुं । तुझा आगम निगम विचारु ।तुज चिंतलिया संसारु । निरसे हेंचि सत्य ॥६॥देव म्हणे मुक्ताबाई । चित्त समरसें जैं माझ्या ठायीं ।तैं तया जन्मचि नाहीं । हें सत्य जाणावें ॥७॥नामा म्हणे ऐसी स्तुति । मुक्ताबाई नंव करिती ।तंव संत विनविती । महाविष्णूसी ॥८॥५५तंव पुंडलिक पुढारला । कर जोडोनि वदला ।म्हणे वेदादिकां अबोला । तुझिया रुपाचा ॥१॥तो तूं प्रकट श्रीरंगा । भीमातटीं पांडुरंगा ।येउनि आमुचिया लोभा । भक्तजनां तारिसी ॥२॥नेणों कोण भक्तपण । नेणों तुमचें महिमान ।कोण तप कोण साधन । कोणें जन्मीं केलें होतें ॥३॥नीरे भिवरेचां संगमीं । चंद्रभागेचां उगमीं ।वेणुनाद परब्रह्मीं । गोपाळ गजरें गर्जती ॥४॥तरी स्वामी दयाळा । महाविष्णू गोपाळा ।भक्तालागीं कृपाळा । तारावया दासासी ॥५॥माझें करुनियां मिस । राहिलास युगीं अठठावीस ।धरुनि सगुण गुणास । माझे भक्ति लोधलासी ॥६॥तूं नियंता ईश्वरमूर्ति । सकळ गोसावी श्रीपती ।तुजवांचोनी नेणें मती । दयामूर्ति परब्रह्मा ॥७॥नामा म्हणे पुंडलिका । देवें म्हणती पुण्यश्लोका ।स्तुति आदर केला निका । धैर्य विवेक तूंचि होसी ॥८॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP