मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीज्ञानेश्वरसमाधी महिमा| अभंग ११ ते २० श्रीज्ञानेश्वरसमाधी महिमा अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ४३ अभंग ४४ अभंग ४५ ते ५० अभंग ५१ ते ५५ अभंग ५६ ते ६१ श्रीज्ञानेश्वरसमाधी महिमा - अभंग ११ ते २० श्रीसंतज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतलेली पाहून श्रीनामदेवांना भरून आले आणि त्यांनी श्रीसंतज्ञानेश्वरांच्या स्तुतीपर हे अभंग लिहीले. Tags : abhangbookdnyaneshwarnamdevअभंगज्ञानेश्वरनामदेवपुस्तक अभंग ११ ते २० Translation - भाषांतर ११तंव निवृत्तीसी उन्मनीं । बैसका होती सप्तदिनीं ।ते पालटोनि तत्क्षणीं । मूर्तीतं न्याहाळी ॥१॥निवृत्तिनिधान । सोपान निजधन ।ज्ञानदेव आपण । तिन्ही मूर्ती ॥२॥कोण भाग्याचे संतुष्ट । जेथें प्रगटलें वैकुंठ ।विठठलनामें पूर्ण पाठ । आळंकापुरीसी ॥३॥आदि क्षेत्र जुनाट । युगें सांगतां उद्भट ।जें कां पुण्यरुप प्रगट । सांगतसे महिमा ॥४॥ऐसा उत्साह गमला । निवृत्ति ध्यानीं निवाला ।सोपान आळंगिला । ज्ञानराजें ॥५॥निवृत्ति पाहे ज्ञानाकडे । येरु धांवे लवडसवडें ।तंव चरणरजामाजीं बुडे । मन निमग्न केलें ॥६॥तिन्ही देव एकत्र । सत्वरजमादि मंत्र ।हे गाताती नरे जे स्तोत्र । ते उद्धरती सर्वथा ॥७॥नामा म्हणे तिन्ही देव । मिळाले गुण सागर वैभव ।समाधि सेज माधव । देतु असे ज्ञानदेवा ॥८॥१२हस्तक ठेविला माथया । ज्ञानदेवा लागे पायां ।विठोजी म्हणे लवलाह्या । समाधीस बैसावें ॥१॥इंद्र चंद्र देव येती । ब्रह्मादिक गीती गाती ।यमवरुणबृहस्पति । विमानें दाटतें अंतरिक्षीं ॥२॥तंव पातले गरुडदेव । रुक्मणी सत्यभामा भाव ।राही माता गोपी सर्व । समाधि ज्ञानदेव पहावया ॥३॥ब्रह्मैंद्रप्रजापति । सर्व अंतरिक्षीं पाहती ।आळंकापुरीं ये श्रीपती । हरुष चित्तीं ज्ञानदेवा ॥४॥रुषिमुनी गणगंधर्व । पिशाच-गुह्यक सर्व ।धृव-अंबऋषि माधव । चित्तीं भाव पहावया ॥५॥ऐसी दाटलीं विमानें । संतीं जाणितलें ज्ञानें ।ज्ञानदेव ब्रह्म होणें । हें विदान विठठलाचें ॥६॥जयजय शब्दें ध्वनि गर्जे । तेणें स्वर्गमृत्युपाताळ गाजे ।पाताळीं शेष म्हणे भुंजे । प्रेमें फुंजे न समाये ॥७॥नामा म्हणे शिवादिक । सिद्धेश्वरीं मिळाले सकळिक ।पाहाती विठठलकौतुक । ज्ञानदेव समाधीचें ॥८॥१३वेदध्वनि केलिया मुनी । गंधर्वगायनें होती गगनीं ।ब्रह्मादिक इंद्र विमानीं । इंद्रायणी ज्ञानदेवी ॥१॥लागलिया मंगळतुरे ध्वनि । तीर्थे उभी असती कर जोडुनी ।विठठलदेव ज्ञान संजीवनीं । नयनीं न्याहाळिती ॥२॥राही रखुमाई माता । सत्यभामा गोपी समस्ता ।आरतिया ओवाळिती निभ्रांता । ब्रह्म त्वरिता ज्ञानदेवा ॥३॥देवऋषिगण सकळ । जयजयकार ध्वनि मंजुळ ।स्तुतिस्तोत्रें सकळ । नक्षत्रादिक गाती ॥४॥वरुषति दिव्यसुमनेम । निवृत्तिसोपान नारायणें ।संमोखिलें संजीवनें । नित्य पारणें हरिपाठें ॥५॥परिसा भागवत डुलत । विठठलीं जाला कृतकृत्य ।नामा असे शोकाकुलित । चरणीं रत विठ्ठलाचे ॥६॥शेज घालुनी सुमनीं । विठठल पाहे रुक्मिणी ।ज्ञानदेवाचे गुण मनीं । आठवती म्हणे हरी ॥७॥नामा जाला भयभीत चित्तें । ज्ञानासारखें रत्न मागुते ।न देखों ऐसें विठ्ठलातें । पुसे त्वरित रुक्मिणी ॥८॥१४देवो म्हणती रुक्मिणी । हा येचि युगीं देखिला नयनीं ।हेंचि ज्ञानसंजीवनी । जाण त्रैलोक्यासीम ॥१॥धन्य धन्य धरातळीं । जो यातें दृष्टीं न्याहाळी ।तो वात येईल टाळी । वैकुंठ भुवनासी ॥२॥जो करील याची यात्रा । तो तारील सकळ गोत्रां ।सकळही कुळ पवित्रा । याचेंनि दरुषणें होती ॥३॥आळंकापुरीं हें शिवपीठ । पूर्वीं येथें होते नीळकंठ ।ब्रह्मादिकीं तप वरिष्ठ । येथेंचि पैं केलें ॥४॥इंद्र येऊनियां भूमीसी । याग संपादिले अहर्निशीं ।इंद्रायणीं इदोरिसी । या पासोनि पंचक्रोशी ॥५॥येथें त्रिवेणी गुप्त वसे । भैरवापासूनि भागीरथी बसे ।पूर्ववटि माया दिसे । ते प्रत्यक्ष जाण पार्वती ॥६॥भोवतें वनवल्लिवृक्ष । येथें देव येउनी होताती पक्ष ।हे असे नित्य साक्ष । अस्थी नासती उदकीं ॥७॥पंढरीहुनी हें सोपें । जनाचीं हरावया पापें ।कळिकाळ कोपलिया कोपें । त्याचें न चले आळंकापुरीसी ॥८॥ऐसें सांगतां हरिसी । प्रेम ओसंडलें रुक्मिणीसी ।म्हणे धन्य धन्य जयाचे कुसीं । ज्ञानदेव जन्मले ।नामा म्हणे माझा स्वामी । सवें संतसमागमीं ।ऐसेम सांगितलें ग्रामीं । आळंकापुरीसी ॥१०॥१५तंव पुसती होय माता । तुम्हीं झणें खेद करा चित्ता ।तरी ज्ञानासारिखा कां आतां । समाधीसी बैसवितां ॥१॥हें सांगावेम सविस्तर । याचे कोण कोण अवतार ।बंधु त्रिवर्ग हे साचार । आणि ते भगिनी ॥२॥देव म्हणती ब्रह्मा होय । सोपान देव नेणसी काय ।निवृत्ति शिव ज्योतिर्मय । ज्ञानदेव ब्रह्म निघोंट ॥३॥ऐसे ब्रह्मा विष्णु हर । मुक्ताई ते मूळमाता साचार ।तारावया चराचर । कलिमाजीं अवतरलें ॥४॥रुक्मिणी पुसे देवासी । कां कलिमाजीम जन दोषी ।हे घातली देवा पुसी । ते सांगती महाविष्णु ॥५॥तरी ऐके हो साचार चित्तें । तूं काय नेणसी त्या व्यासातें ।ग्रंथीं सांगितलें भारतें । कलिमाजीं जन दोषी ॥६॥कृष्ण अवतार जाला । पांडवी निजठाव ठाकिला ।तेथून एक शकु जाला । जनमेजयापासूनि ॥७॥तया मार्गे विक्रमशक । पुण्यवित्र सकळ लोक ।कलियुगी पुण्यश्लोक । उज्जनिये नांदती ॥८॥तेणें एक शत पंचतीस । हरिले कळिकाळदोष ।पुढें शालिवाहन होवयास । अवतार जाण पैठणीं ॥९॥तो हा शालिवाहन । अठरा हजार जाण ।तें क्षेत्र प्रतिष्ठान । गंगातीरीं प्रत्यक्ष ॥१०॥या शकामाजीं प्रथम । राजा भोज उत्तम ।मग पुण्यपुरुष जन्म । थोडे घेती कलियुगीं ॥११॥राजे भ्रष्ट यवन जाले । ठायीं ठायीं दोष घडले ।मग इहीं अवतार घेतले । कलिदोष हरावया ॥१२॥रुक्मिणी म्हणे स्वामी । सत्य सांगितलें तुम्ही ।पुरानप्रसिद्ध आम्ही । अवतार चरित्र जाणतसों ॥१३॥नामा म्हणे पुढें हे जन । यवनसंसर्गें कठिण ।होता गातां हरीचे गुण । ते उद्धरती सर्वथा ॥१४॥१६पुष्पक विमानातळीं । हरि उतरले भूतळीं ।तंव उदयो पूर्वमेळीं । सूर्याचा जाला ॥१॥धन्य धन्य प्रश्नोत्तर । धन्य धन्य ते तरुवर ।धन्य ज्ञानदेव अवतार । तिन्ही देव प्रगटले ॥२॥संत सनकादिक देव । आणि भक्त आले सर्व ।स्नानें करुनियां भाव । हरिचरणीं ठेविला ॥३॥विलाप मांडियेला भक्तीं । खंति करिती त्रिजगतीम ।ज्ञानदेवासारिखी मूर्ति । न देखो म्हणती देवराय ॥४॥देव म्हणती निवृत्ति । तूं प्रत्यक्ष शिवमूर्ति ।तारावया क्षितीं । अवतार धरियेला ॥५॥सोपानें घातलें लोटांगण । मुक्ताया धरिले चरण ।संत करिताती स्तवन । पांडुरंगरायाचें ॥६॥मग संबोखोनियां हरी । सोपानदेवा धरिला करीं ।निवृत्ति मस्तकावरी । करकमळ हरि ठेवितसे ॥७॥नारा विठा पुढें चाले । ऐसे इंद्रायणीस आले ।सौंदडीवृक्षातळी बैसले । सपरिवारेम सकळैं भक्त ॥८॥न्याहाळिती कांसवदृष्टी । ऐसा हरि चालत सृष्टी ।नामा होतसे हिंपुटी । ज्ञानदेवाकारणें ॥९॥१७तंव अंतरिक्ष गगनीं । अवचिती जाली वाणी ।भक्त तरतील मेदिनी । ज्ञानदेव दरुषणें ॥१॥ऐसी खवाणी वदली । जयजयकारें टाळी पिटली ।तंव स्नानासंध्या सारिली । देवभक्तीं सकळिकीं ॥२॥धन्य धन्य वृक्ष अजान । धन्य धन्य सिद्धेश्वरस्थान ।ज्ञानदेवा समाधान । धन्य आळंकापुरी ॥३॥मग पाहोनियां शुभदिन । देवेम करुं आदरिलें प्रयाण ।नामा होतसे खेदक्षीण । ज्ञानदेवाकारणें ॥४॥१८मग प्रश्न आदरिला । नामा फुंदों जो लागला ।कां गा ज्ञानदेवो गेला । मज सांडुनियां ॥१॥कैसा होय तुझा दास । कैसी पाहों तुझी वास ।ज्ञानाकारणें कासाविस । जीव माझा होतसे ॥२॥देव म्हणे नामयासी । तूं झणीं कासाविस होसी ।तूं रे तयातें नेणसी । तें कैसें आईक पां ॥३॥ज्ञानदेव ज्ञानसागरु । ज्ञानदेव ज्ञानागरु ।ज्ञानदेव भवसिंधुतारुं । प्रत्यक्ष रुपें पैं असे ॥४॥ज्ञानदेवीम ज्ञानगम्य । ज्ञानदेवीं ज्ञानधर्म्य ।ज्ञानदेवी ज्ञाननेम । सर्वथैव पैं असे ॥५॥ज्ञानदेव हाचि देव । ज्ञानदेवीम धरलिया भाव ।ज्ञान होईल जीवां सर्व । यासी होय समाधान ।जीव शिवीं परिपूर्ण । एके रात्रीं कीर्तन केलिया ॥७॥झणें तूं व्याकुळ होसी चित्तें । मनीं आठवी गा मातेम ।नामस्मरणें एका चित्तें । रामकृष्ण गोविंद ॥८।नामा म्हणे तूं समर्थ होसी । अर्जुनीं प्रीति करिसी ।हें सांगितलें व्यासीं । एकादशाध्यायीं ॥९॥तैसा पावे तूं विश्व्शा । विश्वरुपा जगन्निवासा ।मी होतसे कासाविसा । ज्ञानदेवाकारनें ॥१०॥तरी तूं गा युगानयुगीम । असशी भक्तांचिया संगीं ।आम्ही विनटलों पांडुरंगीं । रंगारंगीं विठठलीं ॥११॥एक वेळ माझा शोक । दुरी जाय हरे विख ।तें करी निर्विशषे । नामा येतसे काकुळती ॥१२॥१९तंव नावेक श्रीहरी । तटस्थ घटिका चार्ही ।ध्यान धरुनी अंतरीं । निश्चळ राहिला ॥१॥जयजयशब्द नामा बोभाये । केशवा त्राहे त्राहे ।मी व्याकुळ होत आहें । ज्ञानदेवाकारणें ॥२॥नारायण त्राहे त्राहे । कृपादृष्टी तूं रे पाहे ।मी व्याकुळ होत आहें । ज्ञानदेवाकारणें ॥३॥तुझेनि दर्शनें । ज्ञानाचेनि अवलोकनें ।मज पंढरीस असणें । तुझे चरणी गा विठठला ॥४॥आतां मज तूं सांभाळी । ज्ञानदेवेंवीण सदाकाळीं ।मज न कंठे भूमंडळी । भानुसहित वर्ततां ॥५॥तूं माझी जनक जननी । परि ज्ञानदेवेंविण मेदिनी ।शून्य वाटे हे धरणी । जैसे मत्स्य जीवनेंविण ॥६॥तूं रक्षिता सर्व जीवांसी । तरी कां दुःख दिधलें आम्हांसी ।तूं जवळी असतां ह्रषिकेशी । ऐसी दशा हे प्राप्त ॥७॥नामा खेदें क्षीण जाला जीवें । तंव नेत्र उघडिले देवें ।आलिंगला केशवें । चार्ही भुजा पसरुनी ॥८॥२०नामा न राहे खेद करुं । केशव ठेवी अभय करु ।म्हणे तूं दुःखिया होसी थोरु । ज्ञानदेवाकारणें ॥१॥धन्य धन्य तुम्ही भक्त । नित्य विष्णुचरणीं रत ।पुण्यशील भागवत । ज्ञानदेव नामया ॥२॥तुमचेनि जग हें कृतार्थ । कवित्वें तरेल हें सत्य ।मायामोहो निरसे समस्त । नामस्मरणें तुमचेनी ॥३॥धन्य ज्ञानादेव ज्ञानशीळ । ज्ञानदेवा ऐसा सुढाळ ।मी न देखें भूमंडळ । सकळही पाहतां ॥४॥तूं करिसी खेद त्याचा । तरी तो आत्मा माझा साचा ।भाव सांडी सांडी द्वैताचा । निखळ स्वरुप पाहे पां ॥५॥तुम्ही भक्त अवघे आवडते । तुमचेनि साजिरे पूर्णचित्तें ।मज पंढरिये येणें आवडतें । नाम गाताती ये प्रीतीं ॥६॥पुंडलिक माझा भक्त सखा । परी प्रेमळ तुम्ही विशेषा ।तुमचेनि सर्व दुःखा । हरणें मी हें जाणावें ॥७॥नामा म्हणे ज्ञानदेवाचें । मज दरुषण होईल साचें ।तरीच रंगणी मी नाचें । हरिकीर्तनीं पंढरीये ॥८॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP