श्रीनृसिंहपूर क्षेत्र माहात्म्य - अध्याय ९

श्रीनृसिंहपूर क्षेत्राचे माहात्म्य वाचल्याने प्रत्यक्ष त्या क्षेत्री गेल्याचे पुण्य मिळते .


भगवान शंकरांनी पुढी सांगितले , की हे पार्व्ती , येथे गोतीर्थ नावाचे एक प्रसिद्ध तीर्थ आहे . परमभक्त प्रल्हाद श्रीनृसिंहचरनी लीन असतान दिव आणि ऋषी श्रीनरहरीच्या दर्शनासाठी आले . त्यांनी भक्तीपूर्वक अभिषेक करुन नृसिंहाचे स्तवन केले . क्षीरसागराचे पवित्र जलाने पंचामृतस्वान घातले ; आणि शेषाने आसन दिले . पृथ्वीने दिव्य वनस्पती अर्पण केल्या . त्यावेळी सहस्त्रावधी कामधेनूंना प्रभुप्रेमाने पान्हा फुटला . दुधाच्या धारांनी त्यांनी भगवंतास अभिषेकच केला . डाव्या बाजूस चिंतामणी देवास ओवाळून स्तब्ध राहिला . कामधेनू उजव्या बाजूस राहिल्या . त्यांच्या दिव्य भक्तीने प्रसन्न होऊन भगवान म्हणाले की कामधेनूंनी , तुम्ही आता उभ्या आहात ते ठिकाण गोतीर्थ वा धारातीर्थ या नावाने प्रसिद्ध होईल . भक्तजन येथे तृप्त होतील . पितरांना उत्तम गती लाभेल . गया , प्रयाग कुरुक्षेत्र या क्षेत्रातील क्रियाकर्मांचे फल येथे लाभेल . येथे स्नानदानादि कर्मे करणारा , अखेरीस माझ्या सन्निध येईल . उजवीकडील हे गोतार्थ डाव्याबाजूचे गणेशतीर्थ आणि पाठीमागे संगमावरील पिंपळवृक्ष मला प्रिय आहेत . पर्वकाळी स्नानपूजन यातीर्थांमध्ये केले असता मनोरथ पूर्ण होतील . असे यातीर्थाचे माहात्म्य आहे .

यामुळे भक्तगण या गोतीर्थात आपल्या परमश्रेयासाठी स्नानपूजन करु लागले . अंतकाळी दिव्य देह धारण करुन भगवंताचे स्तवन करु लागले . या विश्वाची उत्पत्ती लीलेन करणार्‍या , कृपादृष्टीने त्याचे पालन करणार्‍या दयाधन प्रभूला भक्तांची तृप्ती करणे सहज शक्य आहे . प्राणिमात्रांचे पूर्ण कल्याण करणार्‍या , मायातीत , विकारहित शांत , आणि कृपामय , अशा नृसिंहाचे स्वरुप ज्यांना कळले नाही , त्या मूढ जनांचा धिक्कार असो . हे प्रभो , आपण ब्रह्मदेवाचेही जनक असल्याने आम्हा मानवांचे प्रपितामह आहात . आपण पराप्तर गुरु असून पुण्यवान शरणागतांचे कल्याण करीत असता . आम्ही दिव्यदेहधारी पितर तृप्त असून आपल्या कृपादृष्टीने पूर्णत्व येते , हे आम्ही जाणतो . आपल्या नामात मग्न असणारे भक्त अन्य जनांचा उद्धार करु शकतात , तर आपल्या सामर्थ्यास कोणती मर्यादा असून शकेल . हे गोतीर्थ स्नानादि कर्मे करणार्‍या भक्तांना अखंड तृप्ती देणारे व कामाना पूर्ण करणारे ठरो . यज्ञ , इष्टदेवता , हविर्द्रव्य ही आपलीच रुपे आहेत . त्रिगुणादि विषयात आपणच व्याप्त असूनही केवळ साक्षी असणार्‍या आपणास आम्ही वंदन करितो . यावर भगवंतांनी आश्वासनपूर्वक म्हटले की या तीर्थाचे सेवन करणारे भक्त नित्यतृप्त होतील .

गोतीर्थाचे ठायी कामधेनूंनी अभिषेक केला असल्याने भक्तांच्या कामना येथे पूर्ण होतील . येथील भूमी इच्छा पूर्ती करणारी , वृक्ष हे कल्पवृक्ष , आणि शिला या चिंतामणीप्रमाणे चिंता हरण करतील . शंकरांनी म्हटले हे पार्वती , आम्ही सर्व देवदेवतांनी श्री लक्ष्मीनृसिंहास महाभिषेक केला , नीरांजनाने ओवाळले आणि मुनिवर्यांनी स्तवन केले . सर्वांनी नंतर भगवंतांना प्रार्थना केले की हे प्रभो , आपण भक्तांच्या कल्याणासाठी याच क्षेत्रात वास्तव्य करावे . श्रीनृसिंहांनी तसे आश्वासन देऊन ते अंतर्धान पावले . सर्वजण आश्चर्यमुग्ध होऊन बोलत असता आकाशवाणे झाली की , भक्तजनही , या तीर्थात मी अखंड वास्तव्य करीन . मातातीत अशा माझ्या स्वरुपाचे जे ध्यान करतील त्यांना कैवल्य प्राप्त होईल . नृसिंहमंत्राने स्तवन करणार्‍यांच्या अंतर्यामी मी नित्य असेन . माझ्या सर्वाव्याप्त , पण केवल साक्षी अशा स्वरुपाचे ध्यान करणार्‍यांना पुरुषोत्तम पद लाभेल . भक्त प्रल्हादाने स्थापन केलेल्या वालुकमय मूर्तीचे जे माहात्म्य आहे तेच या गोतार्थाचे आहे . कारण गुप्तरुपाने मी तेथे आहे . भगवान नृसिंह मुनिजनांना म्हणाले की तुम्ही आपल्या दिव्य साधनेने या तीर्थाचे नित्य रक्षण करावे . श्री नृसिंहाची ही वाणी ऐकून ऋषींनी त्यांना वंदन केले ; आणि आपल्या दिव्यशक्ती तेथे ठेऊन , ते स्वस्थानी निघून गेले . अशा या गोतीर्थाचे वर्णन वाणीस अशक्य आहे , ते मी आनंदाने केले आहे . असे शंकरांनी पार्वतीला सांगितले . या तीर्थाचे दर्शन वा माहात्म्हपठण निरंतर तृप्त करणारे आहे .

याप्रमाणे ‘गोतीर्थ प्रभाव वर्णन ’ हा नववा अध्याय पूर्ण झाला .

N/A

References : N/A
Last Updated : March 17, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP