ग्रहलाघव - अहर्गणसाधन

ज्योतिषशास्त्राविना हिंदू धर्मियांचे कार्य एक क्षणसुद्धा चालू शकत नाही .


द्वयब्धीन्द्राः शकरहितास्तो भवाप्तं चक्राख्यं रविहतशेषकं तु हीनम् ॥

चैत्राद्येः पृथगमुतः सदृग्घ्नचक्रात्सिद्धाढ्यादमरफलाधिमासयुक्तम् ॥१॥

खत्रिघ्नं तिथिरहितं निरग्रचक्राङ्गांशाढ्यं पृथगमुतोऽब्धिषट्कलब्धैः ॥

ऊनाहैर्वियुतमहर्गणो भवेद्वै वारः प्राक्छरहतचक्रयुग्गणोऽब्जात् ॥२॥

अर्थ -

१४४२ सांत इष्टशक वजा करावा , जी बाकी राहील तिला ११ नीं भागून भागाकारास चक्र असें म्हणावें ; आणि बाकी राहील तिला १२ नीं गुणून गुणाकारांत चैत्रादि गतमास वजा करावे म्हणजे मध्यम मासगण होतो . त्यांत चक्राची दुप्पट आणि २४ हे मिळवून त्या बेरजेला ३३ नीं भागावें म्हणजे अधिक मास येतात . ते मध्यम मास गणांत मिळवावे म्हणजे मासगण होतो . मासगणांस ३० नीं गुणून त्यांत गततिथि वजा करून चक्रास ६ नीं भागून जो पूर्ण भागाकार येईल तो मिळवावा म्हणजे मध्यम अहर्गण होतो . त्यास ६४ नीं भागावें म्हणजे क्षयदिवस येतात . ते मध्यम अहर्गणातून वजा करावे म्हणजे अहर्गण होतो . चक्रास ५ नीं गुणून त्यांत अहर्गण मिळवावा आणि बेरजेस ७ नीं भागून बाकी मात्र घ्यावी , मग ती बाकी शून्य असेल तर सोमवार १ असेल तर मंगळवार या रीतीनें वार आणावा .

उदाहरण -

शके १४४१ आषाढ शुक्ल १५ बुधवारी अहर्गण साधन

१४४२ - वजा १४४१ =१

१ ÷११ =०चक्र , बाकी १ .

१ x १२ =१२ -वजा ३ गतमास =९ मध्यम मासगण .

९ नध्यम मासगण + चक्र ० x२ =० + २४ = ३३

३३ ÷ ३३ = १ अधिकमास .

१ अधिकमास + ९ मध्यममासगण = १० मासगण .

१० मासगण x ३३ = ३०० गुणनफल .

३०० - वजा गततिथि १४ = २८६

२८६ + ० (चक्र० ÷६ =० ) = २८६

२८६ ÷ ६४ = ४ क्षयदिन .

२८६ - वजा ४ क्षयदिन = २८२ अहर्गण .

ग्रहसाधन .

चक्रनिघ्नध्रुवोपेताः सक्षेपा द्युगणोद्भवैः॥

खेटैरूनाः स्युरिष्टाहे द्य्वब्धीन्द्राल्पःशको यदा ॥३॥

अर्थ -

चक्रानें ध्रुवास गुणून गुणाकारांत क्षेपक मिळवावा म्हणजे ध्रुवयुक्त क्षेपक होतो त्यांतून पूर्वी सांगितल्याप्रमाणें अहर्गणावरून आणलेला ग्रह वजा करावा म्हणजे अभीष्ट ग्रह होतो .

उदाहरण .

रवि ध्रुव ० रा . १अं . ४९क . ११वि .  चक्र ० + रवि क्षेपक ११ रा . १९अं . ४१क . ० विक . = ११ रा . १९अं . ४१क . ०विक ., हा ध्रुवयुक्त रवि क्षेपक झाला . अहर्गणोत्पन्न रवि ९ रा . ७अं . ५६क . २६विक ., ध्रुवयुक्त क्षेपकांतून (११रा . १९अं . ४१क . ०विक .) वजा करून बाकी २ रा . ११ अंश . ४४ कला ३४ विकला हा रवि झाला .

ग्रंथांलंकार .

पूर्वे प्रौढतराः क्वचित्किमपि यच्चक्रुर्धनुर्ज्ये विना ते तेनैव महातिगर्वकुभृदुच्छङ्गेऽधिरोहन्ति हि ॥

सिद्धान्तोक्तमिहाखिलं लघुकृतं हित्वा धनुर्ज्ये मया तद्भर्वो मयि मास्तु किं न यदहं तच्छास्त्रतो वृद्धधीः ॥४॥

अर्थ -

पूर्वी भास्कराचार्यादिक मोठमोठ्या ग्रंथकारांनी यत्किंचित् छाया साधन ज्या चापावांचून केले , पण तेवढ्यानेंच ते मोठ्या गर्वरूप पर्वताच्या शिखरावर चढले आणि मीं तर या ग्रंथांत सर्व गणित ज्या चापा वांचून केले आहे म्हणून मला त्यापेक्षा ही अधिक गर्व असावा . परंतु त्यांच्याच शास्त्रावरून मला इतके ज्ञान प्राप्त झाले याकरितां मजमध्ये गर्व नसो .

ग्रंथकारनामादि

नन्दिग्राम इहापरान्तविषये शिष्यादिगीतस्तुतिर्योऽभूत्कौशिकवंशजः सकलसच्छास्त्रार्थवित्केशवः ॥

सूनुस्तस्य तदङ्घ्निपद्मभजनाल्लब्ध्वावबोधांशकं स्पष्टं वृत्तविचित्रमल्पकरणं चैतद्रणेशोऽकरोत् ॥५॥

अर्थ -

पश्र्चिमसमुद्र तीरीं नंदिग्रामांत वास करणारा , कौशिक गात्री , सकल शास्त्रज्ञ आणि शिष्यादिकांनी स्क्तत्य असा केशव नामक जो माझा पिता त्याच्या चरणार विंदाच्या प्रसाधें करून मला गणेश दैवज्ञाला जें काय यत्किंचित् ज्ञान प्राप्त झालें त्याच्या योगें मी वृत्तांनी शोभिवंत , स्पष्टार्थ , अर्थ बहुल असा हा करण ग्रंथ केला आहे .

ग्रहलाघव ग्रंथ समाप्त .

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP