ग्रहलाघव - परिभाषा

ज्योतिषशास्त्राविना हिंदू धर्मियांचे कार्य एक क्षणसुद्धा चालू शकत नाही .


परिभाषा .

ग्रंथानं योजलेलीं कार्यप्रकाशचिन्हें ही आहेत .

(+) या चिन्हास मिळवणीचें किंवा अधिक करण्याचें चिन्ह म्हणतात . जसें ५ + २ = ७

(-) या चिन्हास वजाबाकीचे किंवा उणे करण्याचें चिन्ह म्हणतात जसें ५ - २ = ३ .

( x ) या चिन्हास गुणाकाराचे चिन्ह म्हणतात जसें ५ x २ = १०

( ÷ ) या चिन्हास भागाकाराचे चिन्ह म्हणतात जसें ५ ÷ २ = ५ / २ = २ १ / २

( = ) या चिन्हास बरोबरीचे चिन्ह म्हणतात . वरील उदाहरणें पहा .

(::::) या चिन्हास त्रैराशिकाचें चिन्ह म्हणतात . जसें ३ : ४ :: ८ : १० २ / ३

ग्रंथांतील सांकेतिक अक्षरें .

रा . म्हणजे राशि . अ . म्हणजे अंगुल . घ . म्हणजे घटिका .

अं . म्हणजे अंश . प्र .अं .म्हणजे प्रतिअंगुल . प . म्हणजे पले .

क . म्हणजे कला . वा . म्हणजे बार

वि . म्हणजे विकला . दि . म्हणजे दिवस .

 

राश्यादिकांचे कोष्टक .

६० विकला . म्हणजे १ कला . ६० पलें . म्हणजे १ घटिका .

६० कला . म्हणजे १ अंश . ६० घटिका म्हणजे १ दिवस अथवा तिथि .

३० अंश . म्हणजे १ राशि . ७ दिवस . म्हणजे १ आठवडा किंवा

१२ राशि . म्हणजे १ भणिणकिंवाचक्र . ३० दिवस . म्हणजे १ महिना

६० प्रति अंगुले . म्हणजे १ अंगुल . २ १ / ४ नक्षत्रें म्हणजे १ राशि .

२४ अंगुलें म्हणजे १ हात . २७ नक्षत्रें म्हणजे १ भगण .

१० अंगुले म्हणजे १ अंश . २७ योग म्हणजे १ योगचक्र .

१० शराची म्हणजे १ अंश 7 करण . म्हणजे १ करण - चक्र .

राश्यादिकाचें चक्र म्हणजे पुरा फेरा झाल्यानंतर चक्र टाकून राशिवार व इत्यादिमात्र घेण्याची रीति आहे कारण चक्रांच्या फेरांचा उपयोग व्यवहार दृष्ट्यान जसें राशिचक्रांत २७ वा . राशि म्हटला म्हणजे ३ राच राशि येतो .

 

नक्षत्रांची नावें .

१ . अश्र्विनी . ८ . पुष्य . १५ . स्वाती . २२ . श्रवण .

२ . भरणी . ९ . आश्र्लेषा . १६ . विशाखा . २३ . घनिष्ठा .

३ . कृत्तिका . १० . मघा . १७ . अनुराधा . २४ . शततारका .

४ . रोहिणी . ११ . पूर्वा . १८ . ज्येष्ठा . २५ . पूर्वाभाद्रपदा .

५ . मृगशीर्ष . १२ . उत्तरा १९ . मूळ . २६ . उत्तराभाद्रपदा .

६ . आर्द्रा . १३ . हस्त . २० . पूर्वाषाढा . २७ . रेवती .

७ . पुनर्वस्क्त . १४ . चित्रा . २१ . उत्तराषाढा .

 

योगांची नावें .

१ . विष्कंभ . ८ . धृति . १५ . वज्र . २२ . साध्य .

२ . प्रीति . ९ . श्रूल . १६ . सिध्दि . २३ . श़ुभ .

३ . आयुष्यमान् १० . गंड . १७ . व्यतीपात . २४ श़ुक्ल .

४ . सौभाग्य . ११ . वृध्दि . १८ . वर्यान . २५ . ब्रह्मा .

५ . शोभन . १२ . ध्रुव . १९ . परिघ . २६ . ऐंद्र .

६ . अनिगंड . १३ . व्याघात . २० . शिव . २७ . वैधृति .

७ . स्क्तकर्मा . १४ . हर्षण . २१ . सिध्दि .

करणांची नावें .

१ . बव . ४ . तैतिल . ७ . भद्रा . १० . नाग .

२ . बालव . ५ . गर . ८ . शुकनी . ११ . . किंस्क्तघ्न .

३ . कौलव . ६ . वणिज . ९ . चतुष्यद .

राशींची नावें .

१ . मेष . ४ . कर्क . ७ . तूळ . १० . मकर .

२ . वृषभ . ५ . सिंह . ८ . वृश्र्चिक . ११ . कुंभ .

३ . मिथुन . ६ . कन्या . ९ . धन . १२ मीन .

N/A

References : N/A
Last Updated : February 22, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP