TransLiteral Foundation

ग्रहलाघव - पाताधिकार

ज्योतिषशास्त्राविना हिंदू धर्मियांचे कार्य एक क्षणसुद्धा चालू शकत नाही .


पाताधिकार

पातकालानुमान .

नन्दघ्नायनभागतुल्यघटिकोनाः सार्द्धविश्र्वे तथा तारास्तावति साग्रयोगविगमे पातो व्यतीपातकः ॥

ज्ञेयो वैधृतिरत्र यातघटिकाः सर्वर्क्षनाडीहताः स्पष्टाः स्युः शरषड्त्दृता इह तमोऽकौ सायनांशौ कुरु ॥१॥

अर्थ -

अयनांशांस ९ नीं गुणून जो घटिकादि गुणाकार येईल तो १३ योग आणि ३० घटिका यांतून वजा करावा . आणि जी बाकी राहील तुल्य योगादि जेव्हां होईल तेव्हां व्यतीपात योग होईल आणि वरील गुणाकार २७ योगांतून वजा करून जी बाकी राहील ततुल्य योगादि जेव्हा होईल तेव्हां वैधृति पात योग होईल असें अनुमान करावें . नंतर अभीष्ट पात योगाच्या घटिका आणि पलें या मात्र इष्ट दिवशींच्या नक्षत्राच्या गतैष्य घटिकांनी गुणून ६५ नीं भागावें म्हणजे त्या अभीष्ट पानयोगाच्या स्पष्ट घटिका होतात . मग स्पष्ट घटिकांतींचा स्पष्ठ रवि आणि राहू करून त्या दोघांस ही अयनांश मिळवावे .

उदाहरण .

शके १५३५ वैशाख कृष्ण ७ शनिवार घटी ११ पलें ३९ धनिष्ठा नक्षत्र घ . ५९ प . ६ , ब्रह्मायोग घ . २८प . ४६ या दिवशीं पात ज्ञानार्थ गणित करतों . चक्र ८ , अहर्गण १८८३ प्रातःकालीन मध्यम रवि १रा . १अं . ० क . ५९वि ., केंद्र १ रा . १६अं . ५९क . १विक ., मंदफलधन १अं . ३५क . ३५विक ., मंदस्पष्ट रवि १रा . २अं . ३६क . ३४वि . अयनांश . १८ कला ११ , सायन रवि १ रा . २०अं . ४७क . ३४वि . चर ऋण ८८ विक ., स्पष्टरवि १ रा . २अं . ३५क . ६वि ., स्पष्टग . ५७क . ३३विक . प्रातःकालीन मध्यमचंद्र ९रा . २९अं . ० क . ४४विक ., उच्च ११रा . २५अं . १३क . १४वि ., राहु ० रा . २५अं . ९क . ५२विक ., त्रिफलचंद्र ९ रा . १९अं . ३४क . ३विक ., मंदकेंद्र २ रा . ५अं . ३९क . ११वि . मंदफल धन ४अं . ३४क . ३२वि ., स्प .चं . ९ रा . २४अं . ८क . ३५वि . स्पष्टगति ७६२ कला ४८ विकला .

धनिष्ठा नक्षत्राच्या गतघटी ३ पलें ४९ , एष्य घ . ५९प . ६ , गतैष्यघटिका योग ६२ पलें ५५ , आतां (अयनांश १८क . ११ ९ = ) १६२घ . ३९ पलें ÷ ६० =२ योग ४३घ . ३९प . हे योगादि (१३ योग ३० घटी ) यांतून वजा करून बाकी १० योग ४६घ . २१प ., एततुल्य योग असतां व्यतीपात योगाचा संभव आहे आणि २७ योग -२ योग ४३ घ . ३९प . = २४योग १६ घ . २१ प ., एततुल्य योग असतां वैधृति पातयोगाचा संभव आहे .आतां , वैधृति पाताच्या घ . १६प . २१ तात्कालिक पंचांगांतील नक्षत्राच्या गतैष्य घटी ६२प . ५५ ( =१०२८घ . ४१प .) ÷ ६५ = १५घ . ४९प . या ब्रह्म योगाच्या स्पष्ट घटिका झाल्या .पूर्वदिवशीं म्हणजे शुक्रवारीं शुक्लयोग घ . ३०प . १ +ब्रह्मयोग पातस्प . घ . १५प . ४९ =४५घ . ५०प . या ६० घटिकांतून वजा करून बाकी १४ घ . १०प . हा मध्यम क्रांति साम्यकाल ; हा काल सूर्योदयापूर्वीचा आहे म्हणून ऋण चालन देऊन आणलेले ग्रह व सायन ग्रहः - सूर्य १रा . २अं . २१क . ३१वि ., राहु . ० रा . २५अं . १०क . ३७ विकला , सायनसूर्य १ रा . २० अंश ३२ कला ३१ विकला . सायन राहु १ रा . १३अं . २१क . ३७ विकला .

पातसंभवा संभव .

गोलैक्ये साग्वर्कभान्वोः सदा स्यात्पातोऽन्यत्वेचेद्रवेर्बाहुभागाः ॥

पञ्चेषुभ्योऽल्पास्तदाऽस्त्येव पातः पुष्टाश्र्चेत्तत्संशयस्तं च भिद्मः ॥२॥

अर्थ -

सूर्यांत राहू मिळवून जी बेरीज येते तिला साग्वर्क असें म्हणतात . जर साग्वर्क आणि सायन सूर्य एक गोलीय असतील किंवा ते एकगोलीय नसून ही जर सूर्याचें भक्तजांश ५५ अंशांपेक्षां कमी असतील तर पात होईलच . परंतु जर ते एक गोलीय नसून सूर्याचे भक्तजांश ५५ पेक्षां अधिक असतील तर पात होण्याचा संशय असतो . हा संशय पुढील श्र्लोकानें दूर होईल .

उदाहरण .

( सायन राहु १ रा . १३अं . २१क . ३७विक .+ सायन सूर्य १ रा . २०अं . ३२क . ३१विक .) = साग्वर्क ३रा . ३अं . ५४क . ८वि . आणि सायन सूर्य ( १रा . २०अं . ३२क . ३१वि .) एकगोलीय आहेत . म्हणून पात होईल .

आतां आपण समजूं कीं , रवि १ रा . २७अं . व राहु ६ रा . १५अं . आहेत तर यांची बेरीज ८ रा . १२अं . हा साग्वर्क आणि सायन सूर्य (१रा . २७अं .) हे भिन्न गोलीय असून सायन सूर्याचे भक्तजांश (५७ ) ५५ अंशा पेक्षां अधिक आहेत म्हणून पात होण्याचा संशय आहे .

पातसंशय परिहार .

खाभ्रेन्दुद्विरसा धृतिर्नगशराः साग्वर्कभान्वोः पदैक्येऽर्द्धानि त्र्यगरुद्रभूपतिनखास्त्र्यक्षीणि भेदे क्रमा ॥

क्षेपः षड्दश चार्ककोटिजलवेष्वंशप्रमार्द्धैक्यकं शेषांशैष्यवधेषुभागसहितं सन्धिर्भवेत्क्षेपयुक् ॥३॥

साग्वर्कभुजांशका यदाऽल्पाः सन्धेः क्रान्तिसमत्वमस्ति चेत् ॥

अधिका न तदा भुजांशसंध्यंतरसादृश्यमिहापमान्तरं स्यात् ॥४॥

अर्थ -

राशि चक्राचे चतुर्थांश पद म्हणजे चतुर्थ भाग म्हणतात . पहिल्या व तिसर्‍या पदांस म्हणजे मेषारंभापासून मिथुनांता पर्यंतचे आणि तुला रंभा पासून धनांना पर्यंतचे भागांस विषम पदें आणि दुसर्‍या व चवथ्या पदांस सम पदें असें म्हणतात . आतां साग्वर्क आणि सायन सूर्य हे एकपदीं म्हणजे विषम किंवा सम पदीं असतात तेव्हां सायन सूर्याचे कोट्य़ंशास मात्र ५ नीं भागावें आणि भागाकार परिमित खालीं दिलेले पदैक्य खंडाची बेरीज घ्यावी ; आणि साग्वर्क आणि सायन सूर्य हे भिन्न पदीं असतात तेव्हां खालीं दिलेल्या पदभेद खंडांची बेरीज घ्यावी ; आणि भागाकारांत एक मिळवून तत्परिमित अंकानें अंशादि बाकीस गुणावें आणि त्या गुणाकारास ५ नीं भागून अंशादि भागाकारात वरील अंशात्मक बेरीज मिळवावी म्हणजे मध्यम संधि होतो . यांत साग्वर्क आणि सायनसूर्य समपदीं असतात तेव्हां ६ अंश मिळवावे आणि भिन्न पदीं असतात तेव्हां १० अंश मिळवावे म्हणजे संधि होतो . नंतर जर साग्वर्काचे भक्तजांश संधीच्या अंशांपेक्षां कमी आहेत तर क्रांति साम्य म्हणजे पात होतो आणि अधिक आहेत तर क्रांति साम्य म्हणजे पात होत नाही . पात नसतो भुजांश आणि संध्यंश याचें अंतर करावें ह्म . तें क्रांत्यंतर होतें .

खण्ड

पदैक्यखण्ड

१८

५७

पदभेदखण्ड

११

१६

२०

२३

साग्वर्क ८ रा . १२अं . आणि सायनार्क १ रा . २७अं . हे समपदीं आहेत म्हणून सायनार्काचे कोट्यंशांस (३३ ) ५ नीं भागून भागाकार ६ आतां ६ पदैक्य खंडांची बेरीज २७ आणि ७ वें खंड ५७  बाकी ३ अंश ( =१७१ ) ÷ ५ =३४अं . १२क . यांत वरील बेरीज २७ मिळवून ६१अं . १२क . हा मध्यम संधि झाला ; यांत ६अं . मिळवून ६७अं . १२क . हा संधि झाला . संध्यांशापेक्षां साग्वर्काचे भक्तजांश (७२ ) अधिक आहेत म्हणून पात नाहीं म्हणून साग्वर्क भक्तजांश ७२ -संधि ६७अं . १२क . = ४ अंश ४८ कला हें क्रांत्यंतर आहे .

गतगम्यपात ज्ञान .

पदे युग्मौजेऽर्कः समविषमगोलः सतमसस्तदा यातः पातस्त्वगत इतरत्वे निगदितात् ॥

विभिन्ने गोले चेदिह कृतशरांघ्रेर्लघुतरा खेर्दोर्भागाः स्यादिह रविपदान्यत्वमुचितम् ॥५॥

अर्थ -

साग्वर्क आणि सायन सूर्य एक गोलीय असून जर सायन सूर्य समपदीं आहे किंवा साग्वर्क आणि सायन सूर्य भिन्न गोलीय असून जर सायन सूर्य विषम पदीं आहे तर पात होऊन गेला , आणि साग्वर्क आणि सायन सूर्य एक गोलीय असून जर सायन सूर्य विषम पदीं आहे किंवा ते भिन्न गोलीय असून जर सायन सूर्य समपदीं आहे तर पात होणार आहे . असें जाणावें . असेंच साग्वर्क आणि सायन सूर्य भिन्न गोलीं असतां सायन सूर्याचें पद उलट घ्यावें किंवा न घ्यावें याचा विचार खालीं सांगितलेल्या रीतीनें केल्यानंतर पातगत किंवा गम्य आहे याचा निर्णय करावा . पुढील रीतीने शर आणून त्याच्या चतुर्थांशांहून जर सायन सूर्याचें भक्तजांश कमी असतील तर सायन सूर्याचें पद उलट घ्यावें म्हणजे सम असतां विषम व विषम असतां सम घ्यावें .

उदाहरण .

सायन सूर्य (१रा . २०अं . ३२क . ३१वि .) विषम पदीं आहे आणि सायन सूर्य आणि साग्वर्क (३रा . ३अं . ५४क . ८वि .) एक गोलीय आहेत म्हणून वैधृति पात होणार आहे .

शर साधन .

पञ्चधा सागराः पञ्चधा वह्नयो द्वौ चतुर्धा कुभूखाभ्रमङ्का इषोः ॥

सागग्विनाद्दोलवेष्वंशतुल्यैक्यकं शेषभोग्याहतीष्वंशयुक्स्याच्छरः ॥६॥

अर्थ -

साग्वर्काचे भक्तजांश मात्र ५ नीं भागावें आणि भागाकार परिमित खालीं दिलेल्या शरांकांची बेरीज घ्यावी . आणि एकाधिक भागाकार परिमित शरांकांनें अंशादि बाकीस गुणून ५ नीं भागावें , आणि भागाकारांत शरांकाची बेरीज मिळवावी म्हणजे शर होतो .

अंकसंख्या

१०

११

१२

१३

१४

१५

१६

१७

१८

शरांक

उदाहरण .

साग्वर्क (३रा . ३अं . ५४क . ८वि .) भुज ८६अं . ५क . ५२वि ., ८६ अंशांस ५ नीं भागून भागाकार १७ ..१७ शरांकांची बेरीज ४५ ..१८ वा शरांक ०  बाकी १ अं . ५क . ५२वि . = ०अं . ०क . ०वि . यांत वरील बेरीज ४५ मिळवून = ४५अं . ० क . ० वि . हा शर झाला .

आतां साग्वर्क आणि सायन सूर्य भिन्न गोलीं मानून सायन सूर्याचें पद उलट घ्यावें किंवा न घ्यावें या विषयीं शर ४५ अंश ÷ ४ =११ अंश १५ कला यापेक्षां सायन सूर्याचा (१रा . २०अं . ३६क . ३१वि .) भक्तज ५० अंश ३२क . ३१वि . अधिक आहे म्हणून पद उलट मानण्याची गरज नाहीं .

शरस्पष्टीकरण .

खैकादिके रविभुजांशदशांशके स्याद्धारोऽर्कविश्र्वमनुधृत्युडवोऽङ्करामाः ॥

खाश्र्वा द्विशत्युडुगुणास्तु शरार्द्धराप्त्या हीनोऽत्र स ह्यपमसंस्कृतये स्फुटः स्यात् ॥७॥

अर्थ -

सायन सूर्याचें भक्तजांशांस १० नीं भागून भागाकार परिमित पुढील हारांक आणि एकाधिक भागाकार परिमित हारांक यांच्या अंतरानें अंशादि बाकीस गुणून १० नीं भागावें . आणि भागाकारांत प्रथम घेतलेला हारांक मिळवावा . म्हणजे हार होतो . नंतर पूर्वी आणलेल्या शरास हारानें भागून भागाकार त्याच शरांतून वजा करावा म्हणजे स्पष्ट शर होतो .

भागाकारांक

हारांक

१२

१३

१४

१८

२७

३६

७०

२००

३२७

उदाहरण .

सायन सूर्याचा (१रा . २०अं . ३२क . ३१वि .) भुज ५०अं . ३२क . ३१वि . ५० अंशांस १० नीं भागून भागाकार ५ म्हणून ५ वा हारांक ३६ आणि ६ वा हारांक ७० यांचे अंतर ३४  बाकी ० अं . ३२क . ३१वि ( =१८अं . २५ कला ३४ विकला ) ÷ १० =१ अं . ५०क . ३३वि . यांत प्रथम हारांक ३६ मिळवून ३७अं . ५०क . ३३वि . हा हार झाला . शर ४५अं . ० क . ० वि .— (शर ४५अं . ० क . ० वि .) ÷ ३७अं . ५०क . ३३वि . = १अं . ११क . = ४३अं . ४९ कला हा स्पष्ट शर झाला .

क्रांत्यंक .

चतुर्धा नखा गोभुवो द्विर्गजाब्जा नृपाष्टीन्द्रविश्र्वार्कदिग्वस्वगाक्षाः ॥

त्रयः क्ष्माऽपमाङ्काः क्रमादर्कबाहोर्लवेष्वंशतुल्यो गतोऽन्यस्य शेषम् ॥८॥

अर्थ -

सायन सूर्याचे भजांशांस ५ नीं भागून भागाकर परिमित खालीं दिलेला क्रांत्यंक घेऊन त्यास गतांक म्हणावें आणि जो अंशादि बाकी राहील ती मांडून ठेवावी .

लब्ध्यंक

१०

११

१२

१३

१४

१५

१६

१७

१८

क्रान्त्यक

२०

२०

२०

२०

१९

१८

१८

१६

१६

१४

१३

१२

१०

उदाहरण .

सायन सूर्याचा भक्तज ५०अं . ३२क . ३१वि .; अंशांस ५ नीं भागून भागाकार १० म्हणून १० वा क्रांत्यंक १४ हा गतांक झाला . बाकी . ० अं . ३२क . ३१ विकला .

क्रांत्यंक आणि शरांक याचा संस्कार .

क्रमोत्क्रमादुक्तशरापमाङ्कान्संख्याहि भोग्यात्क्रमतः षडङ्का ॥

स्थाप्या गतैष्या गतगम्यपाते युग्मेऽन्यथौजे स्युरिमेऽयनांशाः ॥९॥

अन्त्याद्विलोमा यदि तेऽन्यदिक्का अथापमाङ्काः क्रमशः शराङ्क ॥

सुसंस्कृतास्त्रीन्दुत्दृतापमैष्याङ्केनापि ते स्पष्टतरा भवेयुः ॥१०॥

अर्थ -

पूर्वी जे शरांक आणि क्रांत्यंक सांगितले आहेत ते क्रमानें मांडावें म्हणजे क्रांत्यंक पहिल्या पासून अठरापर्यंत आणि पुनः अठरा पासून पहिल्यापर्यंत असे ३६ क्रांत्यंक मांडावे . नंतर सायन सूर्य समपदीं असून जर गतपात आहे किंवा तो विषमपदी असून गम्यपात आहे तर पूर्वी आणलेल्या क्रांत्यंकांतील गतांका पुढील अंकापासून म्हणजे एष्यांकापासून मागील ६ क्रांत्यंक घ्यावे ; आणि जर सायन रवि विषमपदीं असून गतपात आहे किंवा समपदीं असून एष्य पात आहे तर एष्यांका पासून पुढील ६ क्रांत्यंक घ्यावे ; परंतु जर एष्यांक ६ व्याचे आंत आहे आणि मागील क्रांत्यंक घेणें असेल तर मागील अंक घेऊन ६ अंकांच्या भरतीचे क्रांत्यंक शेवटापासून घ्यावे . हे अंक सायन रवि उत्तरायणीं असेल तर उत्तर आणि दक्षिणायनीं असेल तर दक्षिण जाणावें . परंतु मागील ६ क्रांत्यंकांची भरती होण्याकरितां काही अंक उक्रमानें मांडलेल्या क्रांत्यंकांतून घेतले असतील तर ते मात्र मागील अंकांच्या उलट दिशेचे समजावे . असेंच साग्वर्काचे भक्तजांशांस ५ नीं भागून भागाकार परिमित क्रमानें मांडलेल्या शरांकांतून अंक घेऊन त्यास गतांक म्हणावे . आणि त्याच्या पुढील अंकापासून म्हणजे एष्यांकापासून मागील किंवा पुढील ६ अंक घ्यावे आणि साग्वर्कावरून त्यांची दिशा आणावी . नंतर त्या ६ क्रांत्यंकांचा आणि ६ शरांकांचा संस्कार करावा . एष्य क्रांत्यंकास १३ नीं भागून अंशादि भागाकार एष्यांकाच्या दिशेचा जाणून त्याचा आणि संस्कार करून आलेल्या प्रत्येक अंकाचा पुनः संस्कार करावा म्हणजे ते ६ अंक स्पष्ट होतात .

उदाहरण .

सायन सूर्य (१रा . २०अं . ३२क . ३१वि .) विषम पदीं असून एष्यपात आहे म्हणून मागें आणलेले गतांकापुढील (१४ ) अंक (१३ ) पासून मागील ६ अंक १३ , १४ , १६ , १८ , १८ . हे सायन रवि उत्तरायणीं आहे म्हणून उत्तर आहेत . तसेच साग्वर्का (३रा . ३अं . ५४क . ८वि .) चे भुजांश ८६ , ५क . ५२वि . यांस ५ नीं भागून भागाकार १७ म्हणून १७ वा शरांक ० हा गतांक झाला . आतां साग्वर्क समपदीं असून एष्यपात आहे म्हणून अंत्य शरांकांपासून पुढील ६ अंक ० ,० ,० ,१ ,१ ,२ हे साग्वर्कदक्षिणायनीं आहे म्हणून दक्षिण आहेत . म्हणून . क्रांत्यंक उत्तर १३ , १४ , १६ , १६ , १८ , १८ . शरांक ० दक्षिण ., ० उत्तर ., ० उत्तर ., १ उत्तर , १ उत्तर , २ उत्तर .

संस्कृत उत्तर १३ , १४ , १६ , १७ , १९ , २० .अनुक्रमे शरांक साठी

येथे साग्वर्क दक्षिणायनीं आहे म्हणून विलोम रीतीनें मांडलेले शरांकांतील शेवटचे पांच उत्तर आहेत . आतां क्रांत्यंकांतील प्रथमांक १३ ÷ १३ =१ अं . उत्तर याचा वरील प्रत्येक अंकाशीं संस्कार करून आलेले अंशात्मक सहा स्पष्टांक १४ , १५ , १७ , १८ , २० , २१ हे आहेत .

पातमध्यकालसाधन .

प्राक्स्थापिताः शेषलवाः शराप्ता रूपाद्विशुद्धा लघुसंज्ञकः स्यात् ॥

आद्यः स्फुटाङ्को लघुना हतो यस्तेनाढ्यबाणात्क्रमशोऽथ जह्यात् ॥११॥

तानङ्काञ्छेषमशुद्धभक्तं विशुद्धसंख्यासहितंलघूनम् ॥ त्रिघ्नं भनाडीघ्नमिभाप्तमाप्तयुतैष्यनाडीष्विह पातमध्यम् ॥१२॥

अर्थ -

पूर्वी सायन सूर्याचे भक्तजावरून गताक आणून जी अंशादि बाकी मांडली असेल तिला ५ नीं भागून भागाकार अंशादि येईल तो १ अंशांतून वजा करून जी बाकी राहील तिला लघुशेष म्हणतात . मग प्रथमस्पष्टांकानें लघुशेषास गुणून गुणाकारांत स्पष्टशर मिळवावा ; आणि त्या बेरजेंतून प्रथमापासून जितके स्पष्टांक वजा जातील तितके वजा करावे , आणि बाकीला जो स्पष्टांक वजा गेला नसेल त्यानें भागावें ; अंशादि भागाकारांत जितके स्पष्टांक वजा गेले असतील तत्परिमित अंश मिळवून लघुशेष वजा करावें आणि बाकीला ३ नीं गुणून पुनः नक्षत्राच्या गतैष्य घटिकांनीं गुणावें व ८ नीं भागावें म्हणजे भागाकार परिमित घटिका गतपात असतो पातमध्ये होऊन झाल्या आणि एष्यपात असतां पात मध्ये होण्यास लागतील असें समजावें .

उदाहरण .

जर पूर्व शेष ० अंश ३२ कला ३१ विकलाला ५ ने भाग दिल्यास बाकी उरते ० अंश ६ कला ३० विकला हे पात एष्य आहे म्हणून हे लघु शेष आहे . याला प्रथम स्पष्टांक १४ ने गुणाकार केल्यास १ अंश ३१ कला ० विकला गुणन फल मिळते . यात स्पष्ट शर ४३ अंश ४९ कला मिळविल्यास उत्तर मिळते ४५ अंश २० कला ० विकला . यातून प्रथम स्पष्टांक १४ आणि द्वितीय स्पष्टांक १५ असे एकूण २९ वजा केल्यास बाकी राहते १६ अंश २० कला ० विकला . यातून तृतीय स्पष्टांक १७ वजा जात नसल्याने १७ ने भाग दिला . भागाकार आला ओ अंश ५७ कला ३८ विकला . यात विशुद्ध संख्या २ मिळाविल्यास मिळतील २ अंश ५७ कला ३८ विकला . यातून लघुशेष ६ कला ३० विकला वजा केल्यास बाकी राहते २ अंश ५७ कला ३८ विकला . यातून आता लघुशेष ६ कला ३० विकला वजा केल्यास बाकी राहते २ अंश ५१ कला ८ विकला . आता याला ३ ने गुणाकार केल्यास मिळेल ८ अंश ३३ कला २४ विकला . आता याला पुनः नक्षत्राची गतैक्य घटि ६२।५५ ने गुणल्यास मिळतील ५३८ घटि ३१ पळें . आता याला ८ ने भाग दिल्यास भाकार येतो ६७ घटि १७ पळें . यात गणितकाल वैशाख कृष्ण षष्ठी शुक्रवार ४५ घटि ५५ पळें मिळविल्यास वैशाख कृष्ण सप्तमी शनिवार ५३ घटि ५० पळें पातमध्यकाल होईल .

पातस्थितिकालसाधन .

अविशुद्धत्दृता यमार्कनाड्यः प्राक्पश्र्चात्स्थितिरत्र पातमध्यात् ॥

शुद्धाः क्वचिदत्र चेत्षडङ्काः संस्कार्याश्र्च तदग्रतस्रयोऽङ्काः ॥१३॥

अर्थ -

एकशे बाबवसांत जो स्पष्टांक वजा गेला नसेल त्यानें भागावें म्हणजे घटिकादि पात मध्य कालापासून पातस्थिति काल येतो . नंतर पातमध्य कालांतून तो स्थितिकाल वजा करावा म्हणजे पात प्रवेश काल येतो . आणि पात मध्य कालांत पात स्थिति काल मिळवावा म्हणजे पात निर्गम काल येतो . पहिले श्र्लोकार्धाचा अर्थ १५५ पानावरील ठीपेंत दिला आहे .

उदाहरण .

१२२ घटि ० पळ याला अविशुद्ध तृतीय स्पष्टांक १७ ने भाग दिल्यास भागाकार येतो ७ घटि १० पळें हाच पातस्थिती काल . हा पातस्थितीकाल , पातमध्यकाल ५३ घटि ७ पळे ( वैशाख कृ . ७ सूर्योदयापासून ) मधून वजा केल्यास पातप्रवेशकाल ४५ घटि ५७ पळें मिळेल . ( वैशाख कृ . ७ सूर्योदयापासून ) आता पातमध्यकाल ५३ घटि ७ पळें आणि पातस्थितीकाल ७ घटि १० पळें याची बेरीज केल्यास ० घटि १७ पळें पातनिर्गमकाल मिळणार . वै . कृ . ८ सूर्योदयापासून .

सूर्यावरून चंद्रादिसाधन .

षड्भार्कमच्युतरविस्त्विह सावनाब्जोऽथार्के घटीसमकलाश्र्चलनं त्वथेन्दोः ॥

भुक्तयंशकाभघटिकाप्तखखाहयः स्युस्तच्चालितापमसमत्वामिह प्रतीत्यै ॥१४॥

अर्थ -

पात व्यतीपात असतां सायन सूर्य ६ राशींतून वजा करावा , आणि वैधृति असतां १२ राशींतून वजा करावा म्हणजे सायन चंद्र होतो . आणि नक्षत्राच्या गतैष्यघटिकांनी ८०० शांस भागावें म्हणजे अंशादि चंद्राची गति होते . नंतर सायनसूर्य आणि सायन चंद्र हे पात मध्य कालीन करून त्यांच्या क्रांत्या आणाव्या आणि त्यांचें समत्व पहावें .

उदाहरण .

वैधृति पात आहे म्हणून १२ राशि - सायन रवि १ रा . २०अं . ३२क . ३१विक . = १० रा . ९अं . २७क . २९विक . हा सायन चंद्र झाला ; आणि ८०० ÷ नक्षत्र गतैष्य घटि ६२ पलें ५५ =१२अं . ४२क . ५४वि . =७६२क . ५४वि . ही चंद्राची गति झाली . आतां सायन सूर्य आणि सायन चंद्र वै . कृ . ६ शुक्रवार घ . ४५ घ . ५७ या वेळचे आहेत , आणि ते पातमध्ये कालीन म्हणजे कृ . ७ सूर्योदयापासून ५९घ . ७ पलें या वेळेचे करावयाचे आहेत म्हणून १दि . ७घ . १०प . यांचें चालन धन देऊन आणलेले ग्रह ; रवि १रा . २१अं . ३९क . ४८वि ., चंद्र १० रा . २३अं . ४२क . ५९वि . राहु ० रा . २५अं . ७क . ३वि . रविक्रांति १८अं . ३०क . ५७वि . चंद्र क्रांति १३अं . ५०क . १०वि . विराहु चंद्र ९ रा . १०अं . २४क . ५७वि . यापासून याच अधिकारांत सांगितल्याप्रमाणें आणलेला शर स्पष्ट द . ४३ ..५० ..१९ यांस १० नीं भागून (अस्तोदयाश्र्लो . १०प . हा ) आणलेला अंशादि शर दक्षिण ४अं . २३क . २वि . याचा आणि चंद्र क्रांतीचा संस्कार करून चंद्र स्पष्ट क्रांति १८अं . १३क . १२वि . आता सूर्य आणि चंद्र यांच्या क्रांत्यांचे अंतर १७क . ४५वि . आहे , पण हे थोडे असल्यामुळें हें नाही असें म्हणून क्रांति समत्व आहे असें म्हटल्यास चिंता नाही .

पाताधिकार समाप्त .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2011-02-23T20:59:44.2770000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

remain

  • उरणे, बाकी रहाणे 
  • (to continue in the same place or condition) राहणे 
  • अंमलात असणे 
  • उरणे, राहणे 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

कोणती वस्तु खाण्यातून वर्ज्य अथवा तिचा त्याग केल्याने काय पुण्य किंवा फळ मिळते?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.