ग्रहलाघव - स्पष्टाधिकार

ज्योतिषशास्त्राविना हिंदू धर्मियांचे कार्य एक क्षणसुद्धा चालू शकत नाही .


दोस्त्रिभोनं त्रिभोर्ध्वं विशेष्यं रसैश्र्चक्रतोऽङ्काधिकं स्याद्भुजोनं त्रिभम् ॥

कोटिरेकैककं त्रित्रिभैः स्यात्पदं सूर्य्यमन्दोच्चमष्टाद्रयोंऽशा भवेत् ॥ १७ ॥

मन्दोच्चं ग्रहवर्जितं निगदितं केन्द्रं तदाख्यं बुधैः केन्द्रे स्यात्स्वमृणं फलं क्रियतुलाद्येऽथो विधेयं रवेः ॥

केन्द्रे स्यात्स्वमृणं फलं क्रियतुलाद्येऽथो विधेयं रवेः ॥

केन्द्रे तद्भुजभागखेचरलवोनघ्ना नखास्ते पृथक् तद्रोंऽशोननगेषुभिः परित्दृतास्तेंऽशादिकं स्यात्फलम् ॥ १८ ॥

अर्थ -

केंद्र किंवा ग्रहादिक तीन राशींपेक्षा कमी असेल तर तोच भुज होतो , तीन राशींपेक्षां अधिक असेल तर तें साहा राशींतून वजा करावें म्हणजे भक्त होतो ; सहा सहा राशींपेक्षां अधिक आणि नऊ राशीं पेक्षा कमी असेल तर त्यांतून सहा राशि वजा करावे आणि नऊ राशीं पेक्षा अधिक असेल तर तें बारा राशींतून वजा करावें म्हणजे भुज होतो . भुज तीन राशींतून वजा करावा म्हणजे कोटि होते . याचें उदाहरण पुढें दिलें आहे . तीन तीन राशींचे एकेक पद होते . २ राशि १८ अंश ० कला ० विकला , हें रवींचे मंदोच्च आहे . यांतून मध्यम रवि वजा करावा म्हणजे रवीचे केंद्र होते . रवीचें केंद्र घेऊन त्याचा भुज करावा ; आणि त्या भुजाचे अंशकरून त्यांस ९ नीं भागून जो भागाकार येईल तो , वीस अंशांतून वजा करावा ; जी बाकी राहील तिनें वर आलेला अंशादि भागाकार , द्वादशांश गुणाकाराच्या रीतीप्रमाणें गुणावा . जो गुणाकार येईल त्यास 9 नीं भागून भागाकार अंशादि येईल तो ५७ अंशांतून वजा करून जी बाकी राहील तिनें वरचे अंशादि गुणाकारास भागावे , जो भागाकार येईल तें अंशादि मंदफल होते ; हें केंद्र मेष राशी पासून तूळ राशींचे आंत असेल तर धन , आणि तूळ राशीपासून मेष राशीचे आंत असेल तर ऋण जाणावें . नंतर हे मंदफल मध्यम रवींत धन असेल तर मिळवावें आणि ऋण असेल तर ऋण करावें , म्हणजे मंद स्पष्ट रवि होतो .

उदाहरण .

रवीचे मंदोच्च २ रा . १८ अंश ० कला ० विकला - मध्यम रवि १ राशि ४ अंश १३ कला ४२ विकला = १ राशि १३ अंश ४६ कला १८ विकला हे रवीचे केंद्र झाले . आता हे केंद्र ३ राशीहून कमी आहे म्हणून हाच भुज होय . म्हणून

१ रा . १३अं . ४६क . १८वि . भागिले ९ = ४अं . ५१क . ४८वि . व वजा २०अं . = बाकी १५अं . ८क . १२वि . आणि भागाकार ४अं . ५१क . ४८वि . यांचा गुणाकार ७३अं . ३६क . ५२वि . याला भागिले ९ म्हणजे उत्तर ८अं १०क . ४५वि . आले हे ५७ अंशातून वजा करावे म्हणजे

४८अं . ४९क . १५वि . किंवा १७५७५५ विकला हे उत्तर मिळेल .

आता

७३अं ३६क . ५२वि .

----------------------

२६५०१२ विकला

----------------------

१अं . ३०क . २८वि .

हे मंदफल घन आहे , कारण केंद्र मेषादि म्हणजे ६ राशींपेक्षा कमी आहे म्हणून ,

१रा . ४अं . १३क . ४२वि . ( मध्यम रवी )+ १अं . ३०क . २८वि . ( मंदफल ) = १रा . ५अं . ४४क . १०वि . मंद स्पष्ट रवि .

टीप - वजाबाकी करते वेळी जर मंदेच्चाच्या राशींपेक्षां ग्रहांचे राशी अधिक असतील तर मंदोच्चाच्या राशीत बारा मिळवून नंतर वजाबाकी करावी .

पलभा आणि चर खंडे आणण्याची रीति

मेषादिगे सायनभागसूर्य्ये दिनार्द्धजा भा पलभा भवेत्सा ॥

त्रिस्था हता स्युर्दशभिर्भुजङ्गैर्दिग्भिश्र्चरार्द्धानि गुणोद्धृताऽन्त्या ॥ १९ ॥

अर्थ -

ज्या दिवशीं सायन रवि , ० राशि ० अंश ० कला ० विकला इतका होईल त्या दिवशीं मध्यान्ही सम भूमीवर बारा अंगुळें शंकु ठेवून जी छाया पडेल त्या छायेस पलभा असे म्हणतात . ती पलभा तीन ठिकाणी मांडून तिला अनुक्रमें १० , ८ , १ १० / ३ यांणी गुणून जे गुणाकार येतील , तीं अनुक्रमें पहिलें , दुसरें आणि तिसरें अशी चरखंडे होतील .

उदाहरण .

काशींतील पलभा ५ अं ., ४५ प्रति अं  १० = ५७ अंगुळें ३० प्रति अंगुळें ; हें प्रथम चरखंड झाले . पलभा ५ अं . ४५ प्रति अ  ८ = ४६ अंगुळें ; हें प्रथम चरखंड झालें . पलभा ५ अंगु . ४५ प्रतिअंगुळें  १० / ३ = ५७ अंगुळें ३० / ३ प्रति अंगुळे = १९ अंगुळें १० प्रति अंगुळें हें तिसरें चरखंड झालें . अनुक्रमें चरखंडें ५७ , ४६ , १९ अंगुळें .

चर स्पष्ट रवीस चर संस्कार आणि अयनांश

स्यात्सायनोष्णांशुभुजर्क्षसंख्यचरार्धयोगो लवभोग्यघातात् ॥

खाग्न्याप्तियुक्तस्तु चर धनर्णं तुलाजषड्भे तपनेऽन्यथाऽस्ते ॥ २० ॥

देयं तच्चरमरुणे विलिप्तिकासु मध्येन्दौ द्विगुणनवोद्धृतं कलासु ॥

भाप्तं तद्द्युमणिफलं लवेऽथ वेदाब्ध्यब्ध्यूनःखरसत्दृतःशकोऽयनांशाः ॥ २१ ॥

अर्थ -

सायन रवीच्या केंद्रावरून , भुज आणण्याच्या रीतीप्रमाणें भुजकरावा , आणि त्या भुजांत राशिशून्य आहे तर त्या भुजाचे राशि टाकून अंशादिकांस मात्र प्रथम चरखंडानें गुणावें ; आणि राशि एक आहे तर त्या भुजाचे राशि टाकून अंशादिकांस मात्र दुसरे चरखंडाने गुणावें ; आणि राशि दोन आहेत तर त्या भुजाचे अंशादिकांस मात्र तिसरे चरखंडानें गुणावे . जो गुणाकार येईल त्यास ३० नीं भागून जो भागाकार येईल तो विकलादि येईल ; त्यांत ज्या चरखंडानें गुणिलें असेल त्या चरखंडा पूर्वीचीं चरखंडें मिळवावी , जी बेरीज येईल ते चर झाले ; तें सायन रवि मेषादि षट्कांत म्हणजे ६ राशींपेक्षा कमी आहे तर ऋण , आणि तुलादि षट्कांत म्हणजे ६ राशींपेक्षा अधिक आहेत तर धन जाणावें . सायंकालीं ग्रह करणें असेल तर चर विपरीत घ्यावें . म्हणजे सायन रवि मेषादि षड्भांत आहे तर धन आणि तुलादि षड्भांत आहेतर ऋण असें जाणावें . तें चर मंद स्पष्ट रवीच्या विकलांत धन असेल तर मिळवावें आणि चर ऋण असेल तर वजा करावें म्हणजे स्पष्ट रवी होतो . २१ वे श्र्लोकाचे द्वितीय चरणाचा अर्थ - पुढें चंद्रास त्रिफल संस्कार देते वेळीं लिहू .

शालिवाहन शकांतून ४४४ वजा करावे , जी बाकी राहील त्या कला होतात , त्यांस ६० नीं भागून जो भागाकार येईल ते अयनांश होतात . ते मंद स्पष्ट रवींत मिळवावे म्हणजे सायन रवि होतो .

उदाहरण .

( शके १५३४ - ४४४ = ) १०९० कला ÷ ६० = १८ अंश १० कला अयनांश , म्हणून १८ अंश १० कला + मंद स्पष्ट रवि १ राशि ५ अंश ४४ कला १० विकला = १ राशि २३ अंश ५४ कला १० विकला , हा सायन रवि झाला . हा सायन रवि ३ राशींचे आंत आहे , म्हणून हाच भक्तज १ रा . २३ अं . ५४ कला १० विकला . आतां , त्द्या भक्तजांत १ राशि आहे म्हणून अंशादिकास ( २३ अंश ५४ कला १० विकला ) दुसरे चरखंडाने ( ४६ ) गुणून गुणाकार १०९९ अंश ३१ कला ४० विकला यांस ३० नीं भागून भागाकार ३६ विकला ३९ प्रति विकला . दुसरे चर खंडानें गुणिलें म्हणून प्रथम चरखंड ( ५७ ) भागाकारांत मिळवून बेरीज ९३ विकला ३९ प्रति विकला , हें चर झालें . हें सायन रवि मेषादि षट्कांत आहे म्हणून ऋण . आतां मंदस्पष्टरवि १ राशि ५ अंश ४४ कला १० विकला - चर ( ९३ विकला = ) १ कला ३३ विकला = १ राशि ५ अंश ४२ कला ३७ विकला हा स्पष्टरवि झाला .

दिनमान रात्रिमान आणि अक्षांश .

गोलौ स्तः सौम्ययाम्यौ क्रियधटरसभे खेचरेऽथायने ते नक्रात्कर्काच्च षड्भेऽथ चरपलयुतोनास्तु पंचेन्दुनाड्यः ॥

घस्त्रार्द्धं गोलयोः स्यात्तदयुतखगुणाः स्यान्निशार्द्धन्त्वथाक्षच्छायेषुघ्न्यक्षभायाः कृतिदशमलवोना यामाशापलांशाः ॥ २२ ॥

अर्थ -

जेव्हां सायन रवि मेषादि षडांत असतो तेव्हां त्यास उत्तर गोलीय म्हणतात .य आणि जेव्हां तुलादि षडांत असतो तेव्हां त्यास दक्षिण गोलीय म्हणतात . तसेंच जेव्हा सायन रवि कर्कादि षड्भांत असतो तेव्हां त्यास दक्षिणायनी असें म्हणतात , आणि जेव्हा मकरादि षड्भांत असतो तेव्हां उत्तरायणी असें म्हणतात . वर आलेलें चर पलात्मक समजून तें सायन रवि उत्तर गोलीं आहे तर १५ घटिकांत मिळवावे , आणि दक्षिण गोलीं आहे तर १५ घटिकांतून वजा करावें ; जी बाकी राहील तें दिनार्ध होतें . तें ३० घटिकांतून वजा करावें म्हणजे रात्र्यर्ध होते . नंतर दिनार्ध आणि रात्र्यर्ध यांची दुप्पट करावी म्हणजे दिनमान आणि रात्रिमान हीं होतात . पलभेस ५ नीं गुणून गुणाकार अंशादि येईल . त्यांतून , पलभेच्या वर्गास १० नीं भागून जो भागाकार अंशादि येईल तो वजा करावा . म्हणजे अक्षांश होतात . अक्षांश सर्वदा दक्षिण असतात . कारण हिंदुस्थानचे दक्षिणेस विषुवृत्र आहे . कितीएक स्थलांचे अक्षांश शेवटी कोष्टकांत दिले आहेत .

उदाहरण .

चर ९३ हें , सायन रवि उत्तर गोलीं आहे म्हणून १५ घटिकांत मिळवितों . १५ घटि + चर ( ९३ पळें = १६ घ . ३३ प . = १३ घटि २७ पळें हें रात्र्यर्ध झालें . दिनार्ध १६ घ . ३३ प .  २ = ३३ घ . ६ प . हें दिनमान झाले , रात्र्यर्ध १३ घ . २७ प .  २ = २६ घ . ५४ प . हे रात्रिमान झालें .)

( पलभा ५ अंगु . ४५ प्रतिअंगुळें .  ५ = ) २८ अंश ४५ कला - ( पलभा ५ अंश ४५ प्रति अंश इचा वर्ग ३३ अंश ३ प्रति अंश ÷ १० = ) ३ अं . १८ क . १८ विक . = २५ अं . २६ क . ४२ विक . हे काशीचे दक्षिण अक्षांश झाले .

त्रिफल चंद्र करण्याची रीति .

आपल्या गावापासून दक्षिणोत्तर रेषा किती योजनें आहे हें पाहून त्या योजनांस ६ नीं भागून जो भागाकार येईल त्या कला होतील . त्या आपला गांव दक्षिणोत्तर रेषेचे पश्र्चिमेस आहे तर धन आणि पूर्वेस आहे तर ऋण जाणाव्या . त्यास रेखांतर संस्कार किंवा प्रथम फल संस्कार म्हणतात . चरास २ नीं गुणून ९ नीं भागावें , जो भागाकार येईल तो कलादि येईल . तो चराप्रमाणेंच धन ऋण समजावा . यांस चर संस्कार किंवा द्वितीय फल संस्कार म्हणतात . रवीच्या मंदफलांस २७ नीं भागून भागाकार अंशादि येईल तो रवीचे मंदफलाप्रमाणें धन ऋण जाणावा . यास मंदफल संस्कार किंवा तृतीय फल संस्कार म्हणतात .

या तीन फलांचे एकीकरण करून जें धन किंवा ऋण येईल तें मध्यम चंद्रास धन किंवा ऋण करावें म्हणजे त्रिफल संस्कृत चंद्र होतो .

टीप - दक्षिणोत्तर रेषेपासून किती एक प्रसिद्ध स्थलांचे अंतर शेवटीं १ ले कोष्टकांत दिले आहे .

उदाहरण .

काशी दक्षिणोत्तर रेषेचे पूर्वेस ६४ योजनें आहे म्हणून ६४ ÷ ६ = १० कला ४० विकला हा प्रथम फल संस्कार ऋण आहे . ( चर ९३ .. ३९  २ = ) १८७ .. १८ ÷ ९ = २० कला ४८ विक . हा द्वितीय फल संस्कार , स्पष्ट रवीचे वेळेस चर ऋण आहे , म्हणून ऋण आहे . रवीचें मंदफल १ अंश ३० कला २८ विकला ÷ २७ = ० अंश ३ कला २१ विकला . हा तृतीय फल संस्कार मंदफल धन आहे म्हणून धन आहे .

आता

( १ )- १०क . ४०वि . + ( २ )- २०क . ४८वि . = ३१क . २८वि . वजा ३क . २१वि . = २८क . ७वि .

आता

६रा . २०अं . १०क . २४वि . ( मध्यम चंद्र ) - वजा ०रा . ०अं . २८क . ७वि . = ६रा . १९अं . ४२क . १७वि . ( त्रिफल संस्कार चंद्र )

स्पष्टचंद्र आणण्याची रीति .

विधोः केन्द्रदोर्भागषष्ठोननिघ्नाः खरामाः पृथक् तन्नखांशोनितैश्र्च ॥

रसाक्षर्त्दृतास्ते लवाद्यं फलं स्याद्रवीन्दृ स्फुटौ संस्कृतौ स्तश्र्च ताभ्याम् ॥ २३ ॥

अर्थ -

चंद्रोच्चांतून त्रिफलचंद्र वजा करून जी बाकी राहील तें चंद्राचें केंद्र होतें . नंतर त्याचा भुज करून त्या भक्तजाचे अंश करावे , आणि त्यांस ६ नीं भागून भागाकार अंशादि येईल तो ३० अंशांतून वजा करून जी बाकी राहील तिणें वरील गुणाकारास भागावें म्हणजे अंशादि चंद्राचे मंदफल येईल तें , केंद्र मेषादिषड्भांत असेल तर धन आणि तुलादि षड्भांत असेल तर ऋण जाणावें . नंतर हें मंदफल त्रिफल चंद्रास धन असेल तर मिळवावें आणि ऋण असेल तर वजा करावें म्हणजे स्पष्ट चंद्र होतो .

उदाहरण .

चंद्रोच्च १० राशि १० अंश ५४ कला ४३ विकला - त्रिफलचंद्र ६ राशि १९ अंश ४२ कला १७ विकला = ३ राशि २५ अंश १२ कला २६ विकला , हें केंद्र झालें . हें ६ राशींतून वजा करून बाकी २ राशि ४ अंश ४७ कला ३४ विकला हा भ्क्तज आहे म्हणून , ६४ अंश ४७ कला ३४ विकला ÷ ६ = १० अंश ४७ कला ५५ विकला . हा भागाकार ३० अंशांतून वजा करून बाकी १९ अंश १२ कला ५ विकला  भागाकार १० अंश ४७ कला ५५ विकला = २०७ अंश २० कला ५४ विकला हा गुणाकार , यास २० नी भागून भागाकार = १० अं . २२ क . ३ विक ; हा ५६ न्नांतून वजा करून बाकी ४५ अंश ३७ कला ५७ विकला . आतां , गुणाकार २०७ अंश २० कला ५४ विक ÷ ४५ अंश ३७ क . ५७ विकला , अथवा ७४६४५४ विकला ÷ १६४२७७ विकला = ४ अंश ३२ क . ३७ विकला . हें मंदफल केंद्र मेषादि आहे म्हणून धन आहे . हे + त्रिफलचंद्र ६ राशि १९ अंश ४२ कला १७ विकला = ६ राशि २४ अंश १४ कला ५४ विकला , हा स्पष्ट चंद्र झाला .

रवि , चंद्र यांच्यागतीचें स्पष्टीकरण .

केन्द्रस्य कोटिलवखाश्र्विलवोननिघ्ना रुद्रा रवेस्त्रिकुत्दृताः शशिनो द्विनिघ्नाः ॥

स्वांगांशकेन सहिताश्र्च गतौ धनर्णं केन्द्रे कुलीरमृगषट्कगते स्फुटा सा ॥२४॥

अर्थ -

रवीचे केंद्र घेऊन त्याचा भुज करावा आणि भुजा पासून कोटि आणून तिचे अंश करावे . नंतर त्या अंशांस २२ नी भागून जो भागाकार अंशादि येईल तो ११ अंशांतून वजा करून जी बाकी राहील ती आणि तो भागाकार ह्यांचा गुणाकार करून त्यास १३ नीं भागावें ; जो भागाकार येईल तें कलादि गतिफल होईल . ते केंद्र कर्कादि षड्भांत आहे तर धन आणि मकरादि षड्भांत आहे तर ऋण जाणावे . नंतर ते गतिफल रवीचे मध्यमगतीत धन ऋण करावे . म्हणजे रवीची स्पष्ट गति होते . चंद्राचें केंद्र घेऊन त्याचा भक्तज करावा . आणि त्या भ्क्तजा पासून कोटि आणून तिचे अंश करावे . नंतर त्या अंशास २० नीं भागून जो भागाकार कलादि येईल तो ११

कलांतून वजा करून जी बाकी राहील तिणें त्याच भागाकारास गुणून जो गुणाकार येईल त्यास पुनः २ नीं गुणावें आणि त्या गुणाकारास ६ नीं भागून जो भागाकार कलादि येईल तो त्यांतच मिळवून जी बेरीज येईल तें कलादि गतिफल होतें ; तें केंद्र कर्कादि षडांत आहे तर धन आणि मकरादि षड्भांत आहे तर ऋण जाणावें . नंतर हे गतिफल चंद्राचे मध्यम गतींत धन ऋण करावें . म्हणजे चंद्राची स्पष्ट गति होते .

रवि केंद्र १ राशि १३ अंश ४६ कला १८ विकला . हें तीन राशींचे आंत आहे म्हणून हाच भुज झाला . हा तीन राशींतून वजा करून बाकी १ राशि १६ अंश १३ कला ४२ विकला , ही कोटी झाली . कोटीचे अंश ४६ अंश १३ कला ४२ विकला ÷ २० = २ अंश १८ कला ४१ विकला ; हा ११ अंशांतून वजा करून बाकी ८ अंश ४१ कला १९ विकला  २ अंश १८ कला ४१ विकला २० अंश ४ कला ५७ विकला . यास १३ नीं भागून भागाकार १ कला ३२ विक . हे गतिफल . हें केंद्र मकरादि षड्भांत आहे म्हणून ऋण . आतां रवीची मध्यमगति ५९ कला ८ विकला , - १ कला ३२ विकला , = ५७ कला ३६ विकला . ही रवीची स्पष्ट गति झाली .

चंद्र केंद्र ३ राशि २५ अंश १२ कला २६ विकला . हें ६ राशींतून वजा करून बाकी २ राशि ४ अंश ४७ कला ३४ विकला . हा भक्तज . ३ राशींतून वजा करून बाकी ० राशि २५ अंश १२ कला १५ विकला , हा भागाकार , ११ कलांतून वजा करून बाकी ० राशि २५ अंश १२ कला २६ विकला . कोट्यंश २५ अंश १२ कला २६ विकला ÷ २१ = १ कला १५ विकला , हा भागाकार ११ कलांतून वजा करून बाकी ९ कला ४५ विकला  भागाकार १ कला १५ विकला १२ कला ११ विकला ; यास २ नीं गुणून गुणाकार २४ कला २२ विकला = २८ कला २५ विकला , हे गतिफल झालें ; हें केंद्र कर्कादि षडभांत आहे म्हणून धन , आतां , चंद्राची मध्यम गति ७९० कला ३५ विकला + गतिफल २८ कला २५ विकला = ८१९ कला ० विकला . ही चंद्राची स्पष्ट गति झाली .

तिथि , करण , नक्षत्र आणि योग .

भक्ता व्यर्कविधोर्लवा यमकुभिर्याता तिथिः स्यात्फलं शेषं यातमिदं हरात्प्रपतितं भोग्यं विलिप्तास्तयोः ॥

भुक्त्योरन्तरभाजिताश्र्च घटिकां यातैष्यिकाः स्युः क्रमात्पूर्वार्द्धे करणं बवाद्रततिथिर्द्विघ्नाऽद्रितष्टा भवेत् ॥ २५ ॥

तत्सैकं त्वपरे दलेऽथ शकुनेः स्युः कृष्णभूतोत्तरादर्धोच्चाथ विधोश्र्च सार्कसितगोर्लिप्ताःखखाष्टोद्धृताः ॥

याते स्तो भयुती क्रमाद्रगनषण्निघ्ने गतैष्ये तयोरिन्दोर्भुक्तित्दृते जवैक्यावित्दृते यातैष्यनाड्यः क्रमात् ॥ २६ ॥

अर्थ -

स्पष्ट चंद्रांतून स्पष्टरवि वजा करून बाकी राहील तिचे अंश करून त्यांस १२ नीं भागावें ; जो भागाकार येईल त्या गततिथि होतील . आणि जी बाकी अंशात्मक राहील ती भक्ततिथि म्हणजे तिथीचा गेलेला भाग होईल तो १२ अंशांतून वजा करून जी बाकी राहील ती भोग्यतिथि म्हणजे तिथीचा जाणारा भाग होईल . नंतर भक्ततिथि आणि भोग्य तिथि त्द्यांच्या विकला करून त्यांस प्रत्येकी ६० नीं गुणून जे गुणाकार येतील त्यांस अनुक्रमे रविचंद्राच्या स्पष्ट गतीच्या वजाबाकीच्या विकलांनी भागून जे भागाकार येतील ते घटिकादि येतील ; त्या अनुक्रमें भक्ततिथि आणि भोग्य तिथि यांच्या घटिका येतील .

गततिथीच्या संख्येस २ नीं गुणून ७ नीं भागावें , आणि बाकी मात्र घ्यावी ; म्हणजे बवकरणापासून तिथीच्या पूर्वार्धीचें करण होतें . त्यात १ मिळवावा म्हणजे ते तिथीच्या उत्तरार्धीचे करण होते . नंतर तिथीच्या भक्तभोग्य घटिकांची बेरीज करून तिचें अर्ध करावे , आणि त्यांतून भुक्त घटिका वजा कराव्या म्हणजे करणाऱ्याच्या घटिका होतात . जर तिथीच्या भुक्त घटिका स्क्तमारें ३० घटिकांच्या वर आहेत तर तिथींच्या भक्तभोग्य घटिकांतून भक्त घटिका वजा कराव्या म्हणजे करण्याच्या घटिका होतात . दर महिन्याच्या वद्यपक्षींच्या चतुर्दशीच्या उत्तरार्धी शुकुनि करण , आणि अमावास्येस पूर्वार्धीं चतुष्पद करण , आणि उत्तरार्धी नागकरण आणि शुद्धप्रतीपदे्स पूर्वार्धी किंरक्तघ्न करण ही असतात .

स्पष्ट चंद्राच्या कला करून त्यांस ८०० नीं भागावें जो भागाकार येईल ती गत नक्षत्रें होतात . जी बाकी कलादि राहील ते गत नक्षत्रांपुढील भक्त नक्षत्र म्हणजे नक्षत्राचा जाणारा भाग होतो . नंतर भक्त नक्षत्र आणि भोग्य नक्षत्र यांच्या विकला करून त्यांस प्रत्येकी ६० नीं गुणून चंद्र स्पष्ट गतीच्या विकलांनी भागावे . जे घटिकादि भागाकार येतील ते अनुक्रमे भुक्तनक्षत्र आणि भोग्य नक्षत्र यांच्या घटिका होतील .

स्पष्ट रवि चंद्राच्या बेरजेच्या कला करून त्यांस ८०० नीं भागावे . जो भागाकार येईल ते गत योग होतात . आणि जी बाकी कलादि राहील तो भुक्त योग म्हणजे योगाचा गेलेला भाग होतो . तो ८०० कलांतून वजा करून जी बाकी राहील तो भोग्य योग होतो . नंतर भक्तयोग आणि भोग्य योग याच्या विकला करून त्यांस प्रत्येकी ६० नीं गुणून गुणाकारास रवि चंद्रांच्या स्पष्टगतींच्या बेरजेच्या विकलांनी भागावें म्हणजे अनुक्रमें भक्तयोग आणि भोग्य योग यांच्या घटिका येतील .

उदाहरण .

स्पष्ट चंद्र ६ राशि २४ अंश १४ कला ५४ विकला - स्पष्ट रवि १ राशि ५ अंश ४२ कला ३७ विकला = ५ राशि १८ अंश ३२ कला १७ विकला = १६८ अंश ३२ कला १७ विकला . यांस १२ नीं भागून भागाकार १४ गततिथि , बाकी ० अंश ३२ कला १७ विकला , ही भुक्त पूर्णिमा , ही १२ अंशांतून वजाकरून बाकी ११ अंश २७ कला ४३ विकला , ही भोग्य पूर्णिमा . आतां भुक्त तिथीच्या विकला १९३७  ६० ( = ११६२२० ) ÷ ( चंद्रस्पष्टगति ८१९ कला ० विकला रविस्पष्टगति ५७ कला ३६ विकला = ७३१ कला २४ विकला = ) ४५६८४ विकला = २ घटि ३२ पले , त्द्या पूर्णिमेच्या भक्त घटिका झाल्या . पुनः भोग्य तिथीच्या विकला ४१२६३  ६० ( = २४७५७८० ) ÷ ५४ घटिका ११ पळें , त्द्या पूर्णिमेच्या भोग्य घटिका झाल्या . गततिथि १४  २ ( = २८ ) ÷ ७ = ४ , बाकी ० म्हणून पूर्णिमेच्या पूर्वाधी भद्राकरण आणि उत्तरार्धी बवकरण आहे . आतां तिथीच्या भुक्त घटिका २ फळें ३२ + भोग्य घटिका ५४ पळें ११ ( = ५६ घटी ४३ पळें ) ÷ २ = २८ घटी २१ पळें ; त्द्यांतून भुक्ततिथि घटी २ पळें ३२ वजा करून बाकी २५ घटी ४९ पळें त्द्या भद्रा करणाऱ्या घटिका झाल्या .

स्पष्टचंद्र ६ राशि २४ अंश १४ क . ५४ विकला ÷ ८०० = गतनक्षत्रे १५ बाकी २५४ कला ५४ विकला . हें भक्तनक्षत्र विशाखा . हें ८०० कलांतून वजा करून . बाकी ५४५ कला ६ विकला , हें भोग्य नक्षत्र विशाखा . आतां भुक्त नक्षत्राच्या विकला १५२९४  ६० ( = ९१७६४० ) ÷ चंद्रस्पष्टगति विकला ४९१४० = १८ घटी ४० पळें त्द्या विशाखा नक्षत्राच्या भक्त घटिका झाल्या . भोग्य नक्षत्राच्या विकला ३२७०  ६० ( = १९६२३६० ) ÷ चंद्रस्पष्टगतीच्या विकला ४९१४० = ३९ घटी ५६ पळें त्द्याविशाखा नक्षत्राच्या भोग्य घटिका झाल्या . स्पष्ट रवि १ राशि ५ अंश ४२ कला ३७ विकला + स्पष्टचंद्र ६ राशि २४ अंश १४ कला ५४ विकला ( = ७ राशि २९ अंश ५७ कला ३१ विकला = १४३९७ कला ३१ विकला ) ÷ ८०० = १७ गतयोग , बाकी ७९७ कला ३१ विकला , हा वरीयान भक्तयोग ; हा ८०० कलांतून वजाकरून बाकी २ कला २९ विकला , हा वरीयान भोग्य योग आतां भक्त योगाच्या विकला ४७८५१  ६० ( = २८७१०६० ) ÷ रविस्पष्टगति ५७ कला ३६ विकला + चंद्रस्पष्टगति ८१९ कला ० विकला ( = ८७६ कला ३६ विकला = ५२५९६ विकला ) = ५४ घटी ३५ पळें त्द्या वरीयान योगाच्या भक्तघटिका झाल्या पुनः भोग्य योगाच्या विकला १४९  ६० ( = ८९४० ) ÷ रवि चंद्राच्या स्पष्टगतींच्या बेरजेच्या विकला ५२५९ = ० घटि १० पळें त्द्या वरीयान योगाच्या भोग्य घटिका झाल्या .

स्पष्टाधिकार समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : February 22, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP