ग्रहलाघव - सूर्यग्रहणाधिकार

ज्योतिषशास्त्राविना हिंदू धर्मियांचे कार्य एक क्षणसुद्धा चालू शकत नाही .


हार , लम्बन आणि लम्बनसंस्कृत तिथि

लग्नं दर्शान्ते त्रिभोनं पृथक्स्थं तत्क्रान्त्यंशैः संस्कृतोऽक्षो नतांशाः ॥

तद्दिद्य्वशा वर्गितश्र्चेद्द्विकोर्ध्वोऽसौ द्य्वूनः खण्डितस्तद्युतः सः ॥१॥

सार्को हारः स्यात्रिभोनोदयार्कविश्र्लेषांशांशांशहीनघ्नशक्राः ॥

हाराप्ताः स्याल्लम्बनं नाडिकाद्यं तिथ्यां स्वर्णं वित्रिभेऽर्काधिकोने ॥२॥

अर्थ -

दर्शांतीच्या लग्नांतून ३ राशि वजा करावे म्हणजे त्रिभोन लग्न होते . त्यापासून क्रांति आणून तिला अक्षांशांचा संस्कार करून नतांश आणावे . नंतर नतांशांस २२ नीं भागून जो भागाकार येईल त्याचा वर्ग करावा . आणि त्या वर्गांत १२ अंश मिळवावे म्हणजे हार होतो . परंतु जर वर्गांतील अंश २ अंशांपेक्षां अधिक असेल त त्यांतून २ अंश वजा करून बाकीचें अर्ध त्या वर्गांतच मिळविल्यावर १२ अंश मिळवावे म्हणजे हार होतो .

स्पष्टरवि आणि त्रिभोन लग्न ह्यांच्या वजाबाकीच्या अंशांस १० नीं भागून जो भागाकार येईल तो १४ अंशांतून वजा करावा . आणि बाकीस त्याच भागाकारानें गुणून गुणाकारास हारानें भागावें म्हणजे टिकादिलंबन येते . ते त्रिभोज लग्न स्पष्ट सूर्यापेक्षां अधिक असेल तर धन आणि कमी असेल तर ऋण जाणावें .

दर्शांताचे घटिकांत लंबन , धन ऋण करावें म्हणजे लंबन संस्कृत दर्शांत होतो . हाच सूर्य ग्रहणाचा मध्यकाल असतो .

उदाहरण .

शके १५३२ मार्गशीर्ष वद्य ३० बुधवार , घटी १२ पलें ३६ मूळ नक्षत्र घटी ५१ पलें ५२ गंडयोग घटी २३ पलें ४५ ह्या दिवशीं सूर्य ग्रहणाच्या पर्वकाल साधनार्थ गणित .

चक्र ८ , अहर्गण १००५ ; प्रातःकालीन मध्यमरवि ८रा . ५अं . ३९क . २५ विक . मध्यचंद्र ८रा . १अं . १०क . ३३ विक . चंद्रोच्च ८रा . १७अं . २७क . २१ विक ; राहु २रा . ११अं . ४१क . ५९ विकला . इष्टकालीन मध्यमरवि ८ रा . ५अं . ५१क . ५० विकला , मध्यमचंद्र ८रा . ३अं . ५६क . ३४ विकला , चंद्रोच्च ८रा . १७अं . २८क . ४५ विकला , राहु २रा . ११अं . ४१क . १९ विकला .

स्पष्टीकरणः रवीचें मंद केंद्र ६रा . १२अं . ८क . १० विकला , मंदफल ऋण ० अंश २७क . ५० विकला ; मंदस्पष्टरवि ८रा . ५अं . २४क . ०विक ., अयनांश १८ ..८क ., चरधन ११७ , स्पष्टरवि ८रा . ५अं . २५क . ५७विकला . गतिफलधन २क . ७ विक ., स्पष्टगति ६१क . १५ विकला . त्रिफलचंद्र ८रा . ४अं . १०क . ५४ विकला , मंदकेंद्र ० रा . १३अं . १७क . ५० विकला , मंदफल धन १अं . ९क . ४८ विकला , स्पष्टचंद्र ८रा . ५अं . २०क . ४१ विकला , गतिफल ऋण ६४क . ५ विकला , स्पष्टगति ७२६क . ३० विकला . आतां , रवि चंद्रापासून गततिथि २९ , आणि अमावास्येच्या एष्यघटिका ० ..२८ पलें , ह्या पंचांगस्थ घटिकांत मिळवून १३ घटी ४ पलें ह्या दर्शांत घटिका झाल्या म्हणून दर्शांत कालीनग्रह करण्याकरितां ० घटी २८ पलें . ह्यांचें चालन देऊन आणलेले ग्रह .

स्पष्टरवि ८रा . ५अं . २६क . २५विक ., स्पष्टचंद्र ८रा . ५अं . २६क . २५ विक .; राहू २रा . ११अं . ४१क . १८ विकला ; विराव्हर्क ५रा . २३ अंश . ४५ कला ७ विकला .

आतां स्पष्ट रवि ८रा . ५अं . २६क . २५ विक ., लग्न भोग्यकाल ७३ पलें , दर्शांत १३घ . ४प . ह्यापासून आणलेलें लग्न ११रा . २अं . ४६क . १७ विकला - ३रा . = ८रा . २ अं . ४६क . १७ विकला हें त्रिभोन लग्न झालें ह्यापासून आणलेली क्रांति दक्षिण २३अं . ३८क . १० विकला +अक्षांश दक्षिण २५अं . २६क . ४२ विकला = ४९अं . ४क . ५२ विक . हे दक्षिण नतांश झाले . यांस २२ नीं भागून भागाकार २ अं ० १३क . ५१विक .; ह्यांचा वर्ग = ४अं . ५८क . ३५ विकला ; हा वर्ग २ अंशांपेक्षां अधिक आहे . म्हणून यातून २अं वजा करून बाकी २अं . ५८क . ३५ विकला +१२अं . = १८अं . २७क . ५२ विकला , हा हार झाला . पुनःस्पष्ट रवि ८रा . ५अं . २६क . २५ विकला - त्रिभोन लग्न ८रा . २अं . ४६क . १७ विकला = ० रा . २अं . ४०क . ८ विकला = २अं . ४०क . ८ विकला . यास १० नीं भागून भागाकार ०अं . १६क . ० विकला  भागाकार ० अंश १६क . ० विकला ( = ३अं . ३९क . ४४ विक .) ÷ हार १८अं . २७क . ५२ विकला = ० घटि ११ पलें , हें लंबन , त्रिभोन लग्न सूर्या पेक्षां कमी आहे म्हणून ऋण . दर्शांत १३ घटी ४ पलें - लंबन ० घटी ११ पलें = १२ घटी ५३ पलें हा लंबन सस्कृत दर्शांत झाला .

लंबन संस्कृतव्यग्वर्क व चंद्रशर .

त्रिकुनिघ्नविलम्बनं कलास्तत्सहितोनस्तिथिवद्य्वगुः शरोऽतः ॥ऽऽ॥

अर्थ -

लंबनास १३ नीं गुणून गुणाकार कलादि येईल तो लंबना प्रमाणेंच व्यग्वर्कास धन ऋण करावा . म्हणजे लंबन संस्कृत व्यग्वर्क होतो . त्यापासून शर आणावा .

उदाहरण .

व्यग्वर्क ५ रा . २३अं . ४५ विक . ७ विक . - (लंबन ० घ . ११प .  १३ = ) २क . २३ विकला = ५रा . २३अं . ४२क . ४४ विक . हा लंबन संस्कृत व्यग्वर्क ; ह्याचे भक्तजांश ६ ..१७क . १६वि .  ११ ( =६९अं . ९क . ५६ विक .) ÷ ७ =९ अंगुलें ५३ प्रति अंगुलें हा चंद्रशर , लंबन संस्कृत व्यग्वर्क मेषादि आहे म्हणून उत्तर आहे .

लंबन संस्कृत त्रिभोन लग्न व नतांश .

अथ षड्गुणलम्बनं लवास्तै ——

र्युगयुग्वित्रिभतः पुनर्नतांशाः ॥३॥

अर्थ -

लंबनास ६ नीं गुणून जो अंशादि गुणाकार येईल तो लंबनाप्रमाणेंच त्रिभोन लग्नांत धन ऋण करावा म्हणजे लंबन संस्कृत त्रिभोन लग्न होतें नंतर त्यापासून क्रांति आणून तिचा आणि अक्षांशाचा संस्कार करावा म्हणजे लंबन संस्कृत त्रिभोन लग्नोत्पन्न नतांश होतात .

उदाहरण .

त्रिभोन लग्न ८ रा . २अं . ४६क . १७ विक . - (लंबन ० घटी ११ पलें . ६ = ) १अं . ६क . = ८रा . १अं . ४०क . १७ विकला , हें लंबन संस्कृत त्रिभोन लग्न झालें . ह्यापासून आणलेली क्रांति दक्षिण २३अं . ३४क . ३५ विक . + अक्षांश २५ अं . २६क . ४२विक . = ४९अं . १क . १७ विक . हे लंबन संस्कृत त्रिभोन लग्नोत्पन्न दक्षिण नतांश झाले .

नति आणि स्पष्टशर .

दशत्दृतनतभागोनाहताष्टेन्दवस्तद्रहितसधृतिलिप्तैः षड्भिराप्तास्त एव ॥

स्वदिगिति नतिरेतत्संस्कृतः सोऽङ्गुलादिः स्फुट इषुरमुतोऽत्र स्यातस्थितिच्छन्नपूर्वम् ॥४॥

अर्थ -

लंबन संस्कृत त्रिभोन लग्नोत्पन्न नतांशांस १० नीं भागून जो कलादि भागाकार येईल तो १८ कलांतून वजा करून बाकीला त्याच भागाकारानें गुणावें आणि कलादि गुणाकार ६ अंश १८ कला ह्यांतून वजा करून जी वजाबाकी राहील ती कलात्मक मानून तिणें तोच कलादि गुणाकार भागावा म्हणजे अंगुलादि नति होते ; ती , नतांशांप्रमाणें दक्षिण किंवा उत्तर असते .

नंतर नतीचा आणि शराचा संस्कार करावा म्हणजे स्पष्ट शर होतो . चंद्रग्रहणाधिकारांत सांगितल्याप्रमाणें सूर्य आणि चंद्र यांची बिंबें मानैक्य खंड , ग्रास , मध्यस्थिति आणि शेष बिंब हीं आणावीं .

उदाहरण .

लंबन संस्कृत त्रिभोन लग्नोत्पन्न नतांश ४९ ..१ कला १७ विकला ÷ १० =४ क . ५४ विकला ; हा भागाकार १८ कलांतून वजा करून बाकी १३क . ६ विकला  भागाकार ४क . ५४ विक . ( = ६४क . ११ विक .) ÷ ६अं . १८क . - गुणाकार ६४क . ११वि . = ५क . १३ विकला ४९ प्र . विक . = १२अं . १६प्र . अं . ही नति लंबन संस्कृत त्रिभोन लग्नोत्पन्न नतांश दक्षिण आहेत म्हणून दक्षिण झाली . आतां नति दक्षिण १२अं . १६ प्र .अं . - शर उत्तर ९अं . ५३ प्र . अंगु . = २अं . २३ प्रति अंगुलें हा स्पष्टशर झाला .

सूर्यगति ६१क . १५ विक .  २ ( =१२२क . ३० विक .) ÷ ११ =१ अंगु . ८प्र . अंगु . हे सूर्यबिंब झालें ; चंद्रस्पष्टगति ७२६क . ३० विक ÷ ७४ =९ अंगु . ४९ प्र . अंगु . हें चंद्रबिंब झालें . मानैक्य खंड - स्पष्ट शर २ अंगु . २३प्र . अंगुलें = ८ अंगुलें ५ प्र .अं . हा ग्रास झाला . सूर्यबिंब ११ अंगुलें ८ प्रति अंगुलें - ग्रास ८ अंगुलें ५ प्रति अंगुलें = ३ अंगुलें ३ प्रति अंगुलें हे शेष विंब झालें .

मानैक्य खंड १० अंगुले २८ प्रतिअंगुले + शर २ अंगुले २३ प्रतिअंगुले = १२ अंगुले ५१ प्रतिअंगुले . x गुणिले १० = १२८ अंगुले ३० प्रतिअंगुले .

१२८ अंगुले ३० प्रतिअंगुले x गुणिले ग्रास ८ अंगुले ५ प्रतिअंगुले = १०३८ अंगुले ४२ प्रतिअंगुले याचे वर्गमूळ ३२ अंगुले १४ प्रतिअंगुले . x गुणिले ५ = १६१ अंगुले १० प्रतिअंगुले

१६१ अंगुले १० प्रतिअंगुले भागिले ६ = २६ अंगुले ५२ प्रतिअंगुले भागिले चंद्रबिंब ९ अंगुले ४९ प्रतिअंगुले = २ घटिका ४४ पळे मध्य स्थिती .

स्पर्शलंबन , मोक्षलंबन स्पर्शकाल आणि मोक्षकाल .

स्थितिरसहतिरंशा वित्रिभं तैः पृथक्स्थ रहितसहितमाभ्यां लम्बने ये तु ताभ्याम् ॥

स्थितिविरहितयुक्तः संस्कृतो मध्यदर्शः क्रमश इति भवेतां स्पर्शमुक्तयोस्तु कालौ ॥५॥

अर्थ -

मध्यस्थितीस ६ नीं गुणून जो अंशादि गुणाकार येईल तो त्रिभोन लग्नातून वजा करावा म्हणजे स्पर्श त्रिभोन लग्न होते . मग त्या पासून नतांश आणावे ; नंतर त्या नतांशांपासून पूर्वीं प्रमाणें हार आणावा , आणि दशांत कालीन सूर्यास मध्यस्थिति घटिकाचें चालन ऋण द्यावें म्हणजे तो स्पर्शकालीन सूर्य होतो . मग स्पर्शकालीन सूर्य , स्पर्शत्रिभोन लग्न , आणि हार यांपासून पूर्वीप्रमाणें लंबन आणावें म्हणजे तें स्पर्शकालीन लंबन होते . असेंच मध्यमस्थितीस ६ नीं गुणून आलेला अंशादि गुणाकार त्रिभोन लग्नांत मिळवावा म्हणजे तें मोक्ष त्रिभोन लग्न होतें . आणि त्यापासून पूर्वीप्रमाणें हार आणावा . आणि दर्शांत कालीन सूर्यास मध्यस्थितीच्या घटिकांचें चालन मिळवावें म्हणजे तो मोक्ष होतो . मग मोक्षकालीन सूर्य , मोक्षत्रिभोन लग्न आणि हार ह्यांपासून पुनः लंबन आणावें म्हणजे तें मोक्षकालीन लंबन होते . दर्शांत घटिकांतून मध्यस्थितीच्या घटिका वजा कराव्या , आणि जी बाकी राहील तींत स्पर्शकालीन लंबन धन असल्यास मिळवावें आणि ऋण असल्यास वजा करावें म्हणजे तो स्पर्श काल होतो . असेंच , दर्शांत घटिकांत मध्यस्थिति मिळवावी . आणि बेरजेस मोक्षकालीन लंबनाचा संस्कार करावा म्हणजे मोक्ष काल होतो .

उदाहरण .

त्रिभोन लग्न - ८रा . २अं . ४६क . ७ विकला -(मध्यमस्थिति २घ . ४४ पलें  ६ = ) १६अं . २४क . = ७रा . १६अं . २२क . १७ विकला ; हें स्पर्श त्रिभोन लग्न झालें . यापासून आणलेली क्रांति दक्षिण २१अं . २४क . ३९ विकला + अक्षांश दक्षिण २५अं . २६क . ४० विकला = ४६अं . ५१क . १९ विकला , हें दक्षिण नतांश झाले यांस २२ नी भागून भागाकार २अं . ७क . याचा वर्ग ४अं . २८ कला - २ अंश = २ अंश २८ कला , याचें अर्ध १अं . १४ कला +वर्ग ४अं . २८ कला + १२अं . = १७अं . ४२ कला , याचें अर्ध १अं . १४ कला +वर्ग ४अं . २८ कला +१२अं . =१७अं . ४२ कला , हा हार झाला . दर्शांत कालीन सूर्य ८रा . ५अं . २६क . २५ विकला -(मध्यस्थिति २घ . ४४ पलें  सष्टगति ६१क . १५ विकला = १६७क . २५ विक . ÷ ६० = ) २क . ४७ विकला =स्पर्श कालीन सूर्य ८रा . ५अं . २३क . ३८ विकला . यांतून स्पर्श त्रिभोन लग्न ७रा . १६अं . २२क . १७ विकला वजा करून बाकी ० रा . १९अं . १क . २१ विक . ÷ १० =१अं . ५४क . हा भागाकार १४ अंशांतून वजा करून बाकी १२अं . ६क . भागाकार १अं . ५४क . ( =२२अं . ५९क .) ÷ हार १७अं २२ कला = १ घटी १९ पलें हे स्पर्श कालीन लंबन , त्रिभोन लग्नांपेक्षा सूर्य अधिक आहे म्हणून ऋण आहे .

( मध्यमस्थिति २घ . ४४ पलें  ६ = ) १६अं . २४ कला + त्रिभोन लग्न ८रा . २अं . ४६क . १७ विकला = ८ रा . १९अं . १९अं . १०क . १७ विकला हें मोक्ष त्रिभोन लग्न झालें . यापासून आणलेली क्रांति दक्षिण २३अं . ४२क . २८ विकला + दक्षिण अक्षांश २५अं . २६क . ४२ विकला = ४९अं . ९ कला १० विकला , हे नतांश दक्षिण झाले . यांस २२ नीं भागून भागाकार २अं . १४ कला ; याचा वर्ग ४अं . ५९ कला - २अं . = २अं . ५९ कला याचे अर्ध १अं . २९ कला + १२अं . = १८ कला हा हार झाला . दर्शात कालीन रवि ८रा . ५अं . २६क . २५ विकला + मध्यस्थिति २घ . ४४ पलें  स्पष्टगति ६१ कला १५ विकला ( = १६७ कला २५ विकला ) ÷ ६० ( = २ कला ४७ विकला .) = ८ राशि ५अं . २९ कला १२ विकला हा मोक्षकालीन सूर्य झाला .

आतां , मोक्षत्रिभोन लग्न ८रा . १९अं . १०क . १७ विक . मोक्षकालीन रवि ८रा . ५अं . २९ कला १२ विकला = ० राशि १३अं . ४१क . ५ विकला ; यांस १० नीं भागून १अं . २२ कला हा भागाकार १४ अंशांतून वजा करून बाकी १२अं . ३८ कला  भागाकार १अं . २२ कला ( =१७अं . १५ कला ) ÷ हार १८अं . २८ कला = ० क . ५६ विकला हें मोक्षकालीन लंबन , मोक्षत्रिभोन लग्न मोक्षकालीन सूर्यापेक्षां अधिक आहे म्हणून धन आहे .

दर्शांत १३घ . ४ पलें - मध्यस्थिति २घ . ४४ पलें =१०घ . १ पल हा स्पर्शकाल झाला . दर्शांत १३घ . ४ पले + मध्यस्थिति २घ . ४४ पलें ( =१५घ . ४८ पलें ) + मोक्षकालीन लंबन ० घ . ५६ पलें = १६ घ . ४४ पलें हा मोक्षकाल झाला .

सम्मीलनकाल व उन्मीलनकाल आणि ग्रहणाचावर्ण

मर्दादेवं मीनलोन्मीलने स्तो ग्रासो नादेश्योऽङ्गुलाल्पो रवीन्द्वोः ॥

धूम्रः कृष्णः पिङ्गलोऽल्पार्द्धसर्वग्रस्तश्र्चन्द्रोऽर्कस्तु कृष्णः सदैव ॥६॥

अर्थ -

जर सूर्यग्रहण खग्रास असेल तर खग्रास आणि बिंबांतर या पासून मर्दस्थिति आणावी . नंतर मर्दस्थितीस नीं गुणून जो अंशादि गुणाकार येईल तो त्रिभोन लग्नांत रहित आणि युक्त करावा . म्हणजे ख स्पर्श त्रिभोन लग्न आणि रव मोक्ष त्रिभोन लग्न ही होतात . मग त्या पासून रख स्पर्शकालीन लंबन आणि ख मोक्ष कालीन लंबन हीं आणावीं . नंतर मर्दस्थिति दर्शांत घटिकांत रहित आणि युक्त करावी . आणि त्यांत ख स्पर्शकालीन लंबन आणि ख मोक्षकालीन लंबन , हीं धन आणि ऋण करावी . म्हणजे संमीलन काल आणि उन्मीलन काल हे होतात . जर रवीचा किंवा चंद्राचा ग्रास अंगुलापेक्षां कमी येईल तर ग्रहण सांगू नये . जर चंद्रग्रहणीं चंद्र अल्पग्रस्त आहे तर तो धूम्रवर्ण , जर अर्धग्रस्त आहे तर तो कृष्ण वर्ण आणि जर सर्वग्रस्त आहेतर तो पिंगट वर्ण असतो . सूर्यग्रहणीं सूर्य निरंतर कृष्णवर्णच असतो .

इष्टकालीनग्राससाधन .

इष्टं द्विघ्नं छन्नक्षुण्णं स्पर्शान्त्यान्तर्नाडीभक्तम् ।

रूपार्धेनोपेतं विद्यादिष्टे कालेऽर्कस्य ग्रासम् ॥७॥

अर्थ -

इष्टघटिकांस २ नीं गुणून त्या गुणाकारास ग्रासानें गुणावें आणि जो गुणाकार येईल त्यास स्पर्शकाल आणि मोक्षकाल यांच्या वजाबाकीने म्हणजे पर्वकालाच्या घटिकांनी भागावें ; जो भागाकार येईल तो अंगुलादि येईल त्यांत ० अंगुल ३० प्रति अंगुलें हीं मिळवावीं म्हणजे इष्टकालीन ग्रास होतो .

उदाहरण .

इष्ट घटी १ पल .   ( =२ घटिका ० पल )  ग्रास ८ अंगुलें ६ प्रति अंगुलें ( = १६ अंगुलें १२ प्रति अंगुलें .) ÷ (मोक्षकाल १६ घटिका ४४ पलें -स्पर्शकाल ९ घटिका ३ पलें = पर्वकाल ७ घटी ४१ पलें ) = २ अंगुलें = २ अंगुलें ३६ प्रति अंगुलें हा इष्टकालीन ग्रास झाला .

परि लेख म्हणजे ग्रहणाची आकृती .

चंद्रग्रहणाधिकारांत सांगितल्याप्रमाणें अयन वलन , मध्यनत , अक्षज वलन , वलनांध्रि , ग्रासांध्रि आणि खग्रासांध्रि हीं आणून त्यापासून ग्रहणाचा मध्य , स्पर्श आणि मोक्ष हीं कोणीकडे होतील यांचा परिलेख म्हणजे आकृति काढावी .

उदाहरण .

लंबन संस्कृत तिथि १२ घटी ५३ पलें ; एतत्कालीन स्पष्टरवि ८रा . ५अं . २६क . १४ विकला + ३ राशि + अयनांश १८ ..८ कला = ११ राशि २३अं . ३४क . १४ विकला . + ३ राशि + आयनांश १८ ..८ कला = ११ राशि २३अं . ३४क . १४ विकला ; त्यापासून आणलेलें अयन वलन दक्षिण १अं . ३० प्रति अंगुलें . आतां , १५ घटी -चर १ घटी ५७ पलें = १३ घटी ३ पलें , हें दिनार्ध आणि ग्रहण मध्यकाल १२ घटी ५३ पलें . ह्यापासून आणलेलें पूर्वनत ० घटी १० पलें ÷ ५ =० राशि २अं . क . ० विकला , ह्यापासून आणलेलें वलन ० अंगुलें  पलभा ५ अंगुलें ४५ प्रतिअंगुलें ( = १ अंगुल २० प्रति अंगुलें ) ÷ ५ =० अंगुल १६ प्रति अंगुलें हे अक्षज वलन , पूर्वनत आहे म्हणून उत्तर आणि अयन वलन दक्षिण १ अंगुल ३० प्रति अंगुलें , ह्यांचा संस्कार केल्यानें दक्षिण १ अंगुल १४ प्रति अंगुलें ÷ ६ =० अंगुल १२ प्रति अंगुलें हे दक्षिण वलनांध्रि झाले . ग्रास ८ अंगुलें ६ प्रति अंगुलें  ६० ( =४८६ ) ÷ मानैक्य खंड १० अंगुलें २८ प्रतिअंगुलें =४६ अंगुलें २५ प्रति अंगुलें . ह्याचे वर्गमूळ ६ अंगुलें ४८ प्रति अंगुलें हे ग्रासांध्रि झाले .

टीप - सूर्यग्रहणाची आकृती चंद्रग्रहणाच्या आकृतीप्रमाणेच काढावी . इतकाच विशेष कीं , स्पर्श मोक्ष स्थाने सू्र्यग्रहणी उलट असतात .

सूर्यग्रहणाधिकार समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP