काव्यरचना - दस्यूचा पोवाडा

महात्मा फुल्यांनी हे काव्य व्यक्तिमात्रास अनुलक्षुन लिहिले नसून फक्त उपमापर लिहून दिलगिरी व्यक्त केली.  हा पोवाडा जरी असेल तरी महात्मा फुल्यांनी याचा उल्लेख पोवाडा म्हणून करीत, सबब हा पोवाडा त्यांच्या काव्यसंग्रहात समाविष्ट करण्यात आला आहे.रणांगणीं आर्य धूर्तार्नी दस्यु जिंकुनी गणिले दासांत ॥
तुम्ही नव्हता तुमचा दास, पुसा वेदास, ओढा चौघांत ॥
बस्युजन होते सबळ, हदयीं निर्मळ, चोख वागले, ॥
यवनास वागवी रास्त, म्हणून दोस्त, नांव पावले ॥
महा दुष्टांच्या खोडी मोडून, भीड सोडून, नीट वर्तले ॥
भीती मनीं यवन, म्हणूनी दुष्मन, नांव पावले ॥
अतीरथी बुडविले किती, नाहीं ज्या गती, सत्तेच्या पायीं ॥
विर्य थोरांचे मिरवितां, मिशा पिळीतां, शरमता नाहीं ॥
आपण शहाणे म्हणवितां, नाक चढवितां, गोष्ट ही घ्यावी ॥
तुम्ही मुळचे क्षेत्नपती, झाली कोण गती, तोलुनी पाही ॥
मानवास आणिली हानी, बरें ना कोणी, म्हणे तुजलाही ॥
पराधीनत्व असे वाईट, मुलांचे नीट, दिसत नाहीं ॥
तुम्ही शोध करा दूरवर, सांगतों सार धरावी सोयी ॥१॥
रणांगर्णी ॥धृ.॥


मांगास बहुत पीडिले, सजीव दडविले, ग पायांत ॥
लेश उरले उष्टे मागती, नाहीं ज्यां गती, आर्यन्यायांत ॥
सत्याची नाहीं तुम्हां रुची, खर्‍या अब्रुची, वीर्यहीन झालां ॥
सत्तेवांचून सकळ कळा, झाल्या अवकळा, पुसा मनाला ॥
गोडी आर्जवाची लागली, लाज सोडली, पडतां पायां ॥
वस्त्नान्न नाहीं पुरतें, घरीं झुरते, शेजेची जाया ॥
पोटावांचून वाया गेली, पहातां खर्जूली, येते ओकाया ॥
आर्यां जेवितां लाळ घोटिती, दार लोटिती, बसतो जेवाया ॥
तनमनधनास अर्पीले, नित्य वारीले, नाहीं ज्या दया ॥
सुप्रसन्न भुदेव झाले, मुक्त तुम्हां केलें, क्लेश भोगाया ॥
तुम्ही कसे झालां निसंग, आर्यपदीं दंग,नित्य लोळाया ॥
आर्यांची मनुस्मृति बघा, तींत आहे दगा, वाची ग्रंथाला ॥
जंवर हात भिजे, तंवर भट भजे, आलें प्रत्ययाला ॥
तुझ्या भार्येस तुच्छ मानून, म्हणे कुळंबीण, तुझ्यादेखत ॥
क्षत्नीय पूर्वीचे खरें सांगतों, वेद दावितों, आझ ध्यानांत ॥२॥
रणांगर्णी ॥धृ.॥


बळी राज्यदि कुळस्वामीला, डाग लावीला, दंग क्लेशांत ॥
अन्नावांचून होती हाल, केली कमाल, सर्व जगांत ॥
पार्यीचे पितां तीर्थ, केली कीं शर्थ, खर्‍या मर्दांत ॥
छळती यवन दुराणी, शरम नाहीं, कांही मनांत ॥
तेलीतांबोळ्यादी ठोक दे,  खरीं माकडें, चेष्टा करिती ॥
भूमीनें सोडिलें पीक, झाल्यानें दिक्क, दुरुनी वाढीती ॥
विद्येचा अव्हेर कराल, देशोधडीला जाल, दाग वंशात ॥
लावितां कीर्तीध्वजा, उडविती मजा, आर्य पिंजर्‍यात ॥
तुम्ही कुलदीपक कसे, निपजले जसे, पक्षी राव्यांत ॥
जगानें काय वर्णावें, कवींनीं गावे, गुण चौघांत ॥
नाही पदरीं दमडी रोख, कल्याचा झोंक, सुत गळ्यांत ॥
घरीं मराठमोळा माजला स्त्निया साजल्या, जुन्या चिंध्यांत ॥
सर्व काळ बोधीतां मुढ, होईना जड, बिडी पायांत ॥
गंगेत वराह धुतला,  वर काढिला, लोळे गाळांत ॥३॥
रणांगर्णी ॥धृ.॥


तुम्हां सांगतों बहुतां परी, गोष्ट ही खरी, शुद्रहिताची ॥
दुर्दशा ती अविद्येपायीं, ऐकतों मीहि, कथा बहुतांची ॥
शिंदे होळकरादि भोसले, नाहीं भासले, ब्रह्मकूटाचा ॥
आजकाल टाकिती माप, भागीती व्याप, दास धर्माचा ॥
इंग्लिशे उघडे पाडिलें, गुढ आंतलें, वेद मंथून ॥
वेदमताचें केलें खंडण, सत्यमंडण, निकें स्थापून ॥
आर्यांची खुंटली मती, बाटले किती, आवड सत्याची ॥
जागोजाग सभा स्थापीती, देऊन गोविती, थाप एकीची ॥
भट कारस्थानी, आणावे मनीं, शोध सत्याचा ॥
परिणाम असे वाईट, करावा नीट,आर्यस्थापीचा ॥
बुध्दांनी खोड मोडिली, कीर्ती जोडली, सर्व जगांत ॥
मर्नी आर्यभट्ट कुढती, उघद रडती, उर पिटीत॥
जोतीस जोत जोडि लाविना, एकी होईना, सर्व जगांत ॥
फुले रावाचे निके बोल, नव्हती फोल, आणा ध्यानांत ॥४॥
रणांगर्णी ॥धृ.॥

N/A

References : N/A
Last Updated : January 18, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP