काव्यरचना - गणपती

महात्मा फुल्यांनी हे काव्य व्यक्तिमात्रास अनुलक्षुन लिहिले नसून फक्त उपमापर लिहून दिलगिरी व्यक्त केली.


पशुशिरीं सोंड पोर मानवाचें ॥ सोंग गणोबाचें ॥ नोंद ग्रंथी ॥ धृ.॥
बैसे उंदरावरी ठेवूनियां वूड ॥ फुकितो शेंदूड ॥ सोंडेंतून ॥१॥
अंत्यजासी दूर, भटा लाडू देतो ॥ नाकानें सोलीतो ॥ कांदे जणू ॥२॥
चिखला तुडवूनी बनविला मो-या ॥ केला ढंबढे-या ॥ भाद्रपदीं ॥३॥
******** वांचून ॥ करवी भ्रमण ॥ सर्व लोकीं ॥४॥
***** चंद्र हांसला म्हणून ॥ श्रापवरदान ॥ पाहील्यास ॥५॥
***** चंद्रास पाहीलें ॥ अस्वली वरीलें ॥ कृष्णदेवें ॥६॥
**** वस्त्र गणुजी दोंदीला ॥ नोवरा मिळाला ॥ देवबाप्पा ॥७॥
गणोबाची पूजा भावीका दाविती ॥ हरामाच्या खाती ॥ तूपपोळया ॥८॥
जे मंगलमूर्ती जै मंगलमूर्ती ॥ गाती नित्य कीर्ती ॥ टाळ्यांसह ॥९॥
उत्सवाच्या नांवें द्रव्य भोंदाडीती ॥ वाटी खिरापती ॥ धूर्त भट ॥१०॥
जातिमारवाडी गरीबा नाडिती ॥ देऊळें बांधीती ॥ कीर्तीसाठीं ॥११॥
देवाजीच्या नांवें जगाला पीडीती ॥ अधोगती जाती ॥ निश्चयानें ॥१२॥
खरे देवभक्त देह कष्टविती ॥ पोषण करीती ॥ घरच्यांचें ॥१३॥
अजाणाशी ज्ञान पांगळया अन्नदान ॥ हेंच बा स्मरण ॥ निर्मीकाचें ॥१४॥
भोळा वारकरी त्यास दिली हूल ॥ स्मरर्णाते फल ॥ आहे म्हणे ॥१५॥
क्षत्रिय रामाचा धूर्त बने दास ॥ गांठी शिवाजीस ॥ मतलबी ॥१६॥
दादु कोंडदेव त्या ठेवी अविद्वान ॥ करवी तूळदान ॥ ऐदी भटा ॥१७॥
स्वजातिहितासाठी बोधीलें पाखांड ॥ धर्मलंड खरे जोती म्हणे ॥१८॥

N/A

References : N/A
Last Updated : January 18, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP