काव्यरचना - सत्यपाठ

महात्मा फुल्यांनी हे काव्य व्यक्तिमात्रास अनुलक्षुन लिहिले नसून फक्त उपमापर लिहून दिलगिरी व्यक्त केली.



इंग्रजांसंगतीं मद्यमांस खाती ॥ मांगास निंदिती ॥ सोवळ्यानें ॥१॥
न्याय करतांना लांचास बा खाती ॥ पाठीशीं घालिती ॥ अन्यायास ॥२॥
यवनीचें मुख मौजेनें चोखिती ॥ म्हारास म्हणती ॥ नीच बेटे ॥३॥
असे जगद्वेष्टे आर्यास म्हणावे ॥ समूळ त्यागावे ॥ जोती म्हणे ॥४॥


सर्व भूतां धोड्याचा विठ्ठल ॥ पंढरी सकळ ॥ वेडी केली ॥१॥
विठ्ठलाची मूर्ती ध्यांनीं मनीं धरी ॥ गातां ताल धरी ॥ नाच्यापरी ॥२॥
निर्लज्य होऊनी फुगड्या खेळतो ॥ पक्‌व्यास घालितो ॥ स्त्नीयांसंगें ॥३॥
"सुखरुप होशी" उपदेश करी ॥ वेडा वारकरी ॥ जोती म्हणे ॥४॥


आर्याजींचा ब्रह्मा अवयवी व्याला ॥ टरफल झाला ॥ विंचू जैसा ॥१॥
वेदांतीं पहातां विष्णू ब्रह्मागळे ॥ कल्पना मावळ ॥ सत्य उरे ॥२॥
शुद्रादिक कांहीं का मुक्त झाले ॥ मानव बनले ॥ सुखासाठीं ॥३॥
तूं कां येथे व्यर्थ वाचा शिणविशी ॥ सत्या मोकलीशी ॥ जोती म्हणे ॥४॥


मुखें भावभक्ती आक्रोश फोडिती ॥ आर्या रिझवितो ॥  स्नेहासाठी ॥१॥
शुद्रा भुलवूनी गुलाम करीशी ॥ भटा मोकलीशी ॥ धनीपणा ॥२॥
भटजीचा  संग धरुं नको आतां ॥ देती खास गोता ॥ अखेरीस ॥३॥
दुर्गूणाची खाण कृत्नीमी अचाट ॥ जगांत बोभाट ॥ जोती म्हणे ॥४॥


इंग्रजासंगतीं आर्य खाती पिती ॥ सोवळे दाविती ॥ घरीं शुद्रा ॥१॥
न्याशनल सभा अज्ञ शुद्रा दावी ॥ तुलना करावी ॥ इंग्रजांशीं ॥२॥
सभा उपदेश धिंगाणे होतील ॥ शुद्र मरतील ॥ मौज आर्या ॥३॥
राजा तोच खरा बंदोबस्त  जारी ॥ मुढ शुद्रा तारी ॥ जोती म्हणे ॥४॥


सर्व धर्मी करा न्याशनल सभा ॥ तिजमध्यें उभा ॥  करा आर्या ॥१॥
त्यांच्या पूर्वजांनी रचिलें भारुड ॥ वेदांचें गारुड ॥ वैरभावें ॥२॥
शुद्रासह म्लेच्छा छळीलें ॥ उदंड ॥ खरे कलखंड ॥ मानवांत ॥३॥
यास तुम्ही करा ॥ सत्य वर्तणारा ॥ जगा सुखी करा ॥ जोती म्हणे ॥४॥


जातीभेद आर्या चोखड वाटतो ॥ स्लेंच्छास फाडतो ॥  हितासाठीं ॥१॥
आर्य श्रेष्ठ सर्व पिढीजादा होतो ॥  तुच्छ मानीतातो ॥ सर्व जग ॥२॥
धर्मभेद त्यांनी हितासाठीं केला ॥ शुद्र लुटण्याला ॥ धर्ममिशें ॥३॥
आर्यासह सांग ख्रिस्त महंमद ॥ नको त्यांत भेद ॥ जोती म्हणे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 18, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP