मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|महात्मा फुले|अखंडादि काव्यरचना|विभाग २| ढोंगी गुरु विभाग २ गणपती आर्यभट ब्राह्यणांचे कसब सत्यपाठ भटाची वाणी ढोंगी गुरु ब्राह्मणांचा भोंदूपणा फंड दस्यूचा पोवाडा काव्यरचना - ढोंगी गुरु महात्मा फुल्यांनी हे काव्य व्यक्तिमात्रास अनुलक्षुन लिहिले नसून फक्त उपमापर लिहून दिलगिरी व्यक्त केली. Tags : mahatma jyotiba phuleकाव्यमहात्मा ज्योतिबा फुले ढोंगी गुरु Translation - भाषांतर १निर्मीकाची दया केले प्राणीमात्न ॥ अवयवीं सुत्न ॥ निराळेच ॥१॥सारखीं इंद्रीर्ये सर्वांस बा दिलीं ॥ सोईवार केलीं ॥ सर्वोपरी ॥२॥त्यांपैकी मानव वर्णीतों थोड्क्यांत ॥ बुद्धी लक्षणांत ॥ सर्वांमध्यें ॥३॥बुद्धि न खर्चीतां कल्पना करीती ॥ मानवा नाडीती ॥ जोती म्हणे ॥४॥२ईशें मानवास दोन नेव्र दिले ॥ सुरक्षीत केले ॥ हितासाठीं ॥१॥पुढें येतां वस्तुप्रतीबिंब पडे ॥ बुबुळीं रोकडे ॥ हुबू चीत्न ॥२॥बुद्धीज्ञानबळें त्यास ओळखून ॥ करी समाधान लागलीच ॥३॥पाहिल्यावांचून डोळे झाकीताती ॥ मूर्ती कल्पीताती ॥ अंधारांत ॥४॥त्यास विश्वंभर नांव त्यांनीं केलें ॥ कल्पनीं निवाले ॥ ढोंगी गुरु ॥५॥हाच निजमंत्न फुंकीती कानांत ॥ बोधती एकांतीं ॥ पोटासाठीं ॥६॥कल्पनेचा विष्णू शिष्याशीं बोलेना ॥ खाईना पिईना ॥ सर्व ढोंग ॥७॥डोळे झांकल्यानें झाला हा अनर्थ ॥ वाया गेले व्यर्थ ॥ गुरुशिष्या ॥८॥मानवांत गुरु मूळ कोण झाला ॥ प्रश्न गुरुजीला ॥ जोती म्हणे ॥९॥३कर्णेद्रिये दिलीं नाद ऐंकण्यास ॥ सावध होण्यास ॥ सर्व कामीं ॥१॥सत्य बोल जेव्हां पडताच कानीं ॥ आनंदले मनीं ॥ सुख होई ॥२॥खोटे बोल जेव्हां कानीं ऐकूं येतो ॥ दु:ख सर्वा देती ॥ लागलीच ॥३॥कानामध्ये बोटें शरीरीं व्यापार ॥ होतसे व्यापार ॥ धडपड ॥४॥त्यास अनुहत धूर्त गुरु म्हणे ॥ जळो त्याचें जिणें ॥ जोती म्हणे ॥५॥४घ्राणेंदियें द्वारें स्वच्छ हवा येती ॥ अस्वच्छ टाकीती ॥ नाकांतून ॥१॥पोटीं सर्व घेती जिवनाची हवा ॥ काळजास मेवा ॥ क्षणोक्षणीं ॥२॥दुर्गंधी येतांच नाक भुरडती ॥ आंठ्या त्या घालीती ॥ कपाळास ॥३॥नाक दाबोनियां कोंडी श्वासोच्छवास ॥ क्लेश शरीरास ॥ देती धूर्तं ॥४॥डोळे झांकूनीयां भांबाऊन पाही ॥ ईश सर्व देहीं ॥ गुरु म्हणे ॥५॥भ्रमाचें गारुड ब्रह्म सोंग केलें ॥ अज्ञान्या दावीलें ॥ जोती म्हणे ॥६॥५हाडावीण जीभ रस इंद्रियांस ॥ गोड कडू तीस ॥ जाणण्यास ॥१॥सहज पदार्थ दाताखालीं दाबी ॥ चावीतां लोळवी ॥ सहजांत ॥२॥सत्य बोलण्याची जीभेस कसोटी ॥ घशाकडे लोटी ॥ लगलीच ॥३॥बारीक होतांच गच्च तोंड मिटी ॥ सुख उठाउठीं ॥ सर्वां देई ॥४॥खोटें बोलूनीयां अनर्थं करवी ॥ रक्तपाती होई ॥ जोती म्हणे ॥५६मानवशरीरीं चक्रास कल्पीती ॥ निर्मिका दावीती ॥ क्षणामध्ये ॥१॥पशूपक्षापदीकां चक्रें कां नसावीं ॥ त्यांच्यामध्ये दावीं ॥ चक्रें किता ॥२॥सर्वांचा जो कर्ता कोणास दिसेना ॥ गुरुच्या कल्पना ॥ व्यर्थ तर्क ॥३॥मानवांत प्राणी किती गुरुवीण ॥ वाया गेले जाण ॥ गुरुमतें ॥४॥गुरुवीण सर्व अधोगती नेती ॥ काळीमा लावीती ॥ निर्मीकास ॥५॥मुढा फसवून गुरु होऊं नका ॥ सत्यत्वास धक्का ॥ जोती म्हणे ॥६॥७शरीरीं चक्रास कल्पीती ओढाळ ॥ निर्मीकाची राळ ॥ मुढें केली ॥१॥वेड्यापरी सर्व गुरु बरळती ॥ दावीन म्हणती ॥ निर्मीकास ॥२॥कोणत्या गुरुनें निर्मीका पाहीला ॥ दावीं ना आम्हाला ॥ प्रत्यक्ष तो ॥३॥गुरु सर्व हीरे मैदानीं आणावे ॥ तपासुन घ्यावे ॥ जोती म्हण ॥४॥८गुरुजींनीं आता तोंड लपवितां ॥ होईल फजीता ॥ जगामाजीं ॥१॥गुरुजींनीं आम्ही निर्मीक दावीतां ॥ त्यास खरी वार्ता ॥ पुसूं आम्हीं ॥२॥तूंच का येशू खरा बाप होशी ॥ पुत्ना मोकलीशी ॥ दुष्टा हातीं ॥३॥कुराण हद्दीस यवनास देशी ॥ व्यर्थ लढवीशी ॥ सुन्नी शिया ॥४॥तूंच रामचंद्र झाला अयोध्येस ॥ वर्धा रावणास ॥ पत्नीसाठीं ॥५॥कृष्ण होऊनीयां मामास मारीलें ॥ कोळ्यानें वधीलें ॥ तोच तूं का ॥६॥सत्यआचरण निर्मीक आधार ॥ सुखाचें माहेर ॥ जोती म्हणे ॥७॥९शरीराचे पोटीं आत्मा जन्मे बेटा ॥ दिमाखाचा ताठा ॥ व्यर्थ करी ॥१॥घडामोड सर्व स्मरणांत ठेवी ॥ तुलना करवी ॥ सर्व कामीं ॥२॥झाला अनुभव टाका एकीकडे ॥ सत्याशी वांकडे ॥ होई मूर्ख ॥३॥गुरु म्हणे आत्मा आहे निराधार ॥ सांगे बडीवार ॥ त्याचा फार ॥४॥कुडीवीण आत्मा दावीना मजला ॥ धि:कार गुरुला ॥ जोती म्हणे ॥५॥१०धंदा येत नाही विद्येवीण पशू ॥ नाहीं तो जिज्ञासू ॥ भूमीभार ॥१॥भांग पिऊनीयां सदा डोळे लाल ॥ घरच्याच हाल ॥ साह्यावीण ॥२॥भटांमाजी ऐके गुरुचारित्नाला ॥ गुरुजी बनला ॥ पोटासाठीं ॥३॥धातू दगडाच्या मूर्तीस भजून ॥ घंटा वाजवून ॥ स्वत:खाई ॥४॥अन्नवीण मेली घरीं जन्मदाती ॥ सोंगाची फजीती ॥ जोती म्हणे ॥५॥११गुरुजींनीं ईशा देहांत कल्पीला ॥ गर्वाने फुगला ॥ मुढामध्यें ॥१॥नाशीवंत देह घाणीचें आगर ॥ देवा दीलें घर ॥ कैसें शोभे ॥२॥जास्ती खातां अन्न कुदर्पी ढेंकर ॥ येई तिरस्कार ॥ धाण येतां ॥३॥गुदचक्रांतून चा गजर ॥ होई वारंवार ॥ बाजापरी ॥४॥लाळीचे पाझर येती जिर्भेतून ॥ अभीयंकावीण ॥ स्नान होतें ॥५॥पदार्थांचे दोष वाही नाकांतून ॥ चंदनलेपन ॥ कशासाठीं ॥६॥देवास आश्रम गुरुजींनी दिले ॥ मुढ वेडे केले ॥ धूर्तापरी ॥७॥सर्वांचा निर्मीक शरीरांत कोंडी ॥ गुरुजी पाखांडी ॥ जोती म्हणे ॥८॥१२पुढचा घाबरा ठेंच लागे पडे ॥ पाही सर्वांकडे ॥ टकाटका ॥१॥सर्वांनी पाहाती ओशाळा तो होई ॥ म्हणे आई आई ॥ लाजेनीयां ॥२॥वाटेंत लोळतां लोक हासतांना ॥ रक्तु पुशीतांना ॥ वेळ जाई ॥३॥कोणी न पाहातां मुकाट्यानें उठे ॥ लागे नीट वाटे ॥ झपदिशीं ॥४॥शहाणपण येईं मागे चाले त्यास ॥ बोधी सर्वत्नास ॥ नीट चला ॥५॥ठेंच लागूनीयां खालीं पडणारा ॥ त्यास हासणारा ॥ पाहूनीयां ॥६॥मागचा तेव्हांच होतसे शहाणा ॥ बोधी सर्वजना ॥ चालतांना ॥७॥याजमध्यें गुरु कोणास म्हणावा ॥ गोठ्यांत कोंडावा ॥ जोती म्हणे ॥८॥१३मानवासारखा पोटीं जन्म घेतो ॥ गुळवणी पितो ॥ पाजीतांच ॥१॥अन्ना नित्य खाई उदकास पिई ॥ विष्ठामुत नाहीं ॥ पोटामध्यें ॥२॥सदगुणां सांडून दुर्गूंणाचा बेटा ॥ कळचेटा मोठा ॥ सर्वांमध्यें ॥३॥खोटे तर्क सर्व कल्पीतो मनांत ॥ लिहितो ग्रंथात ॥ धूर्तापरी ॥४॥बंड करुनीयां फाशीसुद्धां जाती ॥ जगांत फजिती ॥ भूदेवांची ॥५॥अंगररोग होतां क्लेशानें कण्हती ॥ भूदेव मरती ॥ सर्व कां हो ॥६॥जगांत भूदेव खरा कोण झाला ॥ दावावा आम्हाला ॥ जोती म्हणे ॥७॥ N/A References : N/A Last Updated : January 18, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP