मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|महात्मा फुले|अखंडादि काव्यरचना|विभाग २| आर्यभट ब्राह्यणांचे कसब विभाग २ गणपती आर्यभट ब्राह्यणांचे कसब सत्यपाठ भटाची वाणी ढोंगी गुरु ब्राह्मणांचा भोंदूपणा फंड दस्यूचा पोवाडा काव्यरचना - आर्यभट ब्राह्यणांचे कसब महात्मा फुल्यांनी हे काव्य व्यक्तिमात्रास अनुलक्षुन लिहिले नसून फक्त उपमापर लिहून दिलगिरी व्यक्त केली. Tags : mahatma jyotiba phuleकाव्यमहात्मा ज्योतिबा फुले आर्यभट ब्राह्यणांचे कसब Translation - भाषांतर १.सर्वाचा निर्मीक एक आहे जाण ॥ पाळणपोषण ॥ तोच करी ॥१॥स्त्रीपुरुष हक्क सर्वां कळवावे ॥ सत्यानें बोधावे ॥ मानवांस ॥२॥देशधर्मभेद नसावा अंतरी ॥ भावंडांचे परी ॥ घरी सर्वा ॥३॥असे बा शिक्षक सर्व ठाई नेमा ॥ आदीसत्य नमा ॥ जोती म्हणे ॥४॥२.सार्वभौम सत्य जाचें भांडवल ॥ निर्मीक अव्वल ॥ सर्व एक ॥१॥त्यानें निर्मीयले मानव हे सारे ॥ त्यांचीच लेकरें ॥ तोच रक्षी ॥२॥आपल्यावरुन जग ओळखावें ॥ सर्वा निववावें ॥ संसारांत ॥३॥जसजसे आम्ही मानवासीं वागूं ॥ त्याचीं फळें भोगूं ॥ जोती म्हणे ॥४॥३.आर्यानीं क्षत्रियां रणांत जिंकीलें ॥ त्यांना दास केलें ॥ पिढीजादा ॥१॥मत्सरानें दासा म्हणाले ते क्षुद्र ॥ अपभ्रंश शुद्र ॥ त्याचा झाला ॥२॥द्वेषानें पिडीले विद्या बंद केली ॥ घेईना साऊली ॥ जेवतांना ॥३॥अशा पंगु शुद्रा विद्या तुम्ही द्यावी ॥ भिक्षा ती मागावी ॥ जोती म्हणे ॥४॥४.विजयी आर्यानीं धर्मग्रंथ केले ॥ शुद्रा नागवीलें ॥ दासापरी ॥१॥धूर्त भटें मुळीं वेद लपविले ॥ पाहूं नाहीं दिले ॥ अंत्यजास ॥२॥शूद्रादिक म्हणे माझा वेद धर्म ॥ अज्ञानास वर्म ॥ ठावें नाहीं ॥३॥वेदांतील वर्म मैदानीं आणावें ॥ जगा दाखवावें ॥ जोती म्हणे ॥४॥५.ख्रिस्त सर्व ग्रंथ मैदानीं आणती ॥ वाचून दाविती ॥ स्त्रीपुरुष ॥१॥भटासह मांगा पोटाशीं धरिती ॥ वेव्हार करीती ॥ रोटीबेटी ॥२॥त्यांस ठावें सत्य तेंच सिद्व करी ॥ निववी अंतरीं ॥ सर्व जना ॥३॥सर्व खंडीं दावी नातें भावंडाचें ॥ पुत्र निर्मीकाचे ॥ जोती म्हणे ॥४॥६.महंमद म्हणे निर्मीक तो एक ॥ कल्पीना अनेक ॥ जगामाजी ॥१॥भावंडाचे परी मानवा आळवी ॥ सत्यानें वळवी ॥ ईशासाठीं ॥२॥देश जातीभेद अजि बुडविले ॥ मूर्तीस फोडीलें ॥ कुमांडयांच्या ॥३॥दास्यत्वापासून बहु मुक्त केले ॥ ईशाकडे नेले ॥ जोती म्हणे ॥४॥७.ईशें सर्व शुद्रा आर्यापरी दिले ॥ कमी नाहीं केलें ॥ कांहीं एक ॥१॥निर्मीकाची दया इंग्रजा आणलें ॥ भटा धि:कारलें ॥ सर्वोपरी ॥२॥आर्य कसे धनी, शुद्र कां हो दास? ॥ शोधा कुत्रीमास ॥ वेळ हीच ॥३॥आतां कां रे तुम्ही विचार कराना ॥ धूर्त धिक्काराना ॥ जोती म्हणे ॥४॥८.शुद्र दीनबंधू शेतांत खपतो? ॥ कुटुंबा पोषीतो ॥ बैलसह ॥१॥सा-यासह वारी लोकलफंडास ॥ धाली भरतील ॥ कांहीं धान्य ॥२॥गोळा सर्व फंड इंग्रज करीती ॥ शाळा ते घालीती ॥ नांवासाठीं ॥३॥भट शुद्रा मुला भट खेळवीती ॥ गो-या थापा देती ॥ जोती म्हणे ॥४॥९.अल्लड इंग्रज भटा जागा देती ॥ पंतोजी करीती ॥ गांवोगांवीं ॥१॥जगद्वेष्टे भट शिक्षक बनती ॥ शुद्रा शिकविती ॥ कृष्णलिला ॥२॥संधी साधल्यास शिवाजी वर्णिती ॥ मत्सरी करीती ॥ यवनांचे ॥३॥देशप्रीती दंभ इंग्रजी निंदीती ॥ गर्वे हंबरीती ॥ जोती म्हणे ॥४॥१०.सर्प विंचवांत ब्राह्यण ते दावा ॥ दोरा घालवावा ॥ त्यांच्या गळीं ।१॥स्वजाती पिडणें त्यांचे नव्हे कर्मी ॥ करी ना अधर्मी ॥ जातीमध्यें ॥२॥सर्व मानवांत ब्राह्यण बनला ॥ धि:कारी शुद्राला ॥ अहंपणें ॥३॥शुद्रांनी अर्पावें काठी जोडे दान ॥ आदराची खूण ॥ जोती म्हणे ॥४॥११.गर्धभी ब्राह्यण कुंभार पाळीती ॥ ओझें ते लादीती ॥ पाठीवर ॥१॥चुकारु ब्राह्यण टिकोरी मारीती ॥ वेगे चालवीती ॥ मार्गावर ॥२॥काम झाल्यावर मोकाट सोडती ॥ फुंकूनीया खाती ॥ उकिरडा ॥३॥पशूंतील भट अश्वलीद खाती ॥ कुल्ली करीती ॥ जोती म्हणे ॥४॥१२.मानवी ब्राह्यण बंडखोर होती ॥ काळेपाण्या जाती ॥ इंग्रजींत ॥१॥ब्राह्यणी वकील खॊटे स्टँप करी ॥ दगेबाज परी ॥ गो-या नाडी ॥२॥भट अभ्य़ंकरा पाँच पाटीं दीक्षा ॥ गाढवाची शिक्षा ॥ स्वारी देणें ॥३॥धूर्त ब्राह्यणाची धिंड मिरवीती ॥ मस्ती जिरवीती ॥ जोती म्हणे ॥४॥१३.आर्य ब्राह्यणांत पेशवा वाटोळा ॥ करितो सोहळा ॥ कानपुरीं ॥१॥स्त्रीपुरुषांसह तान्ह्या अर्भकांस ॥ वधी इंग्रजास ॥ सूडासाठीं ॥२॥हुके गोळीबार भाल्याने टोंचवी ॥ तान्ह्यास लोळवी ॥ पिस्तुलानें ॥३॥वंशज हा खरा ब्रह्यराक्षसांचा ॥ पुत सैतानांचा ॥ जोती म्हणे ॥४॥१४.चांडाळ ब्राह्यण मांगा दूर धरी ॥ स्वत: पाणी भरी ॥ आडावर ॥१॥तान्हेने व्याकूळ जरी मांग मेला ॥ दया ब्राह्यणाला ॥ येत नाहीं ॥२॥मानवाचे द्वेष्टे गर्व अभिमानी ॥ जगांत दुर्गुणी ॥ कळचेटे ॥३॥मांगाचे लग्नांत दक्षिणा ते घेती ॥ सोवळयानें खाती ॥ जोती म्हणे ॥४॥१५धूर्त आर्यभट मत्सरी नि:संग ॥ अहंपणी दंग ॥ दया नाहीं ॥१॥मुळचे क्षत्निय भिल्लासह कोळी ॥ घाली रसातळीं ॥ वैरभावें ॥२॥भोळ्या इंग्रजांनो, जागे का रे व्हाना ॥ विद्या त्यास द्याना ॥ जगबंधू ॥३॥तसें न कराल तर ईशा रागवाल ॥ प्रश्वात्तापी व्हाल ॥ जोती म्हणे ॥४॥१६अस्सल क्षत्निय जेर केले ॥ हाकलून दिले ॥ अरण्यांत ॥१॥कंदमुळे फळें भक्षून राहीले ॥ आर्यांनीं पीडीले ॥ बाहेरुन ॥२॥ब्राह्मणाचे वेद मैदानीं आणा ना ॥ वाचून दावा ना ॥ सर्व जगा ॥३॥वेदबळावर होती धर्मलंड ॥ कुभांडी अभंड ॥ जोती म्हणे ॥४॥१७विष्ठाखाती गाय म्हणे द्विज माता ॥ शुद्रास पीडीतां ॥ पुण्य वाटे ॥१॥यज्ञामध्ये आर्य घोडेगाया खाती ॥ इंग्रजा निंदिती ॥ म्लेंच्छासह ॥२॥कलनेचा धर्म शुद्रास दावीती ॥ हरामाचें खाती ॥ त्यांचे घरी ॥३॥पशूपेक्षां शुद्र भटा वाटे दुष्ट ॥ स्वत: सत्यभ्रष्ट ॥ जोती म्हणे ॥४॥१८मुक्या गाया सर्व इंग्रज बा खाती ॥ विलाप करीती ॥ भटी बोंब ॥१॥वेदामध्यें नाहीं गाईचा विलाप ॥ घोडे गपागप ॥ आर्य खाती ॥२॥ब्राह्मणांचे आप्त अंत्यज भावंडां ॥ छळीले उदंड ॥ बळी देतां ॥३॥मांगाचा विलाप भटा वाटे गोड ॥ खरे धर्मलंड ॥ जोती म्हणे ॥४॥१९व्यभीचारासवें व्यसनी अम्मल ॥ भायेंची अक्कल ॥ गुंग केली ॥१॥दारुच्या नादांत मुढ खर्च करी ॥ करीतो भिकारी ॥ मुलाबाळां ॥२॥धूर्त आर्य शुद्रा धर्मथापा देती ॥ उंद्रापरी खाती ॥ फुंकूनीयां ॥३॥अशा निद्रिस्तास विद्या कां हो द्याना ॥ भिक्षा ती मागाना ॥ जोती म्हणे ॥४॥२०भट कुलकर्णी शुद्रा चितवीती ॥ कज्जे लाविताती ॥ गांवोगांवी ॥१॥कज्यांच्या नादांत शुद्रा कर्ज देती ॥ भट लांच खाती ॥ सर्वांचीही ॥२॥विद्याहीन शुद्र ब्राह्मणांनी केले ॥ सूड उगविले ॥ सर्वकाळ ॥३॥अशा विद्या द्यावी जलदी करुन ॥ भिक्षेसी मागून ॥ जोती म्हणे ॥४॥२१न्यॉशनल सभा आर्याजी स्थापिती ॥ सामील करीती ॥ मुढ शुद्रां ॥१॥बाकी भोळ्या शूद्रा नाडीती जगांत ॥ खाती हॉटेलांत ॥ ब्रह्मबीज ॥२॥।आर्य हितसाधू गोर्या चिडवीती ॥ जागा मागताती ॥ जोखमिच्या ॥३॥भट अधिकारी द्रव्यास जोडीती ॥ शुद्रा त्नास देतो ॥ जोती म्हणे ॥४॥२२स्वत: आर्यभटे कंबरा बांधा ना ॥ क्षमा ती मागा ना ॥ जगापाशीं ॥१॥शुद्र दासां तुम्ही विद्या बंद केली ॥ घ्या ना ती साऊली ॥ अंत्यजाची ॥२॥शुद्रादीकां तुम्ही आधीं मुके द्यावे ॥ सत्याने वागावें ॥ मानवांशीं ॥३॥ब्राह्मणांनो, तुम्ही कृतघ्न कां होतां ॥ इंग्रजां निंदितां ॥ जोती म्हणे ॥४॥२३अज्ञानी शुद्रास नादीं लावूं नका ॥ देऊं नका धक्का ॥ यवनास ॥१॥ब्राह्मणाची जात कृत्निमी अखंड ॥ छळीले उदंड ॥ शुद्राकीकां ॥२॥मतलबी धर्म ज्यांत नाहीं दया ॥ कामापुर्ती माया ॥ पक्के धूर्त ॥३॥कोळ्यासह सर्व क्षेत्नी साक्ष देती ॥ वेदास दावीती ॥ जोती म्हणे ॥४॥२४शुद्र मांगाम्हारा अज्ञानी ठेविती ॥ ब्राह्मणास देती ॥ अधिकार ॥१॥परंशुरामाची जात अवघड ॥ वधी धडाधड ॥ क्षेत्नीबाळें ॥२॥सोवळा ब्राह्मण कानपुरीं नाना ॥ वधी अर्भकांना ॥ इंग्रजांच्या ॥३॥इंग्रजांनो, तुम्ही कां रे विसरतां ॥ शुद्र हातीं देतां ॥ जोती म्हणे ॥४॥२५मोठेमोठे हुद्दे ब्राह्मणा देशील ॥ वश करितील ॥ मुढ शुद्रां ॥१॥मारणें मरणें कुरणाचा धर्म ॥ सत्य कोण वर्म ॥ शोधी तेव्हां ॥२॥अज्ञानी शुद्रांस मुळ ज्ञान नाहीं ॥ आर्याकडे पाही ॥ सर्व कामीं ॥३॥आर्याहातीं सर्व अधिकार येतां ॥ शुद्रा नाहीं त्नाता ॥ जोती म्हणे ॥४॥२६इंग्रजांनो, तुम्ही बसूं नका उगे ॥ ब्रॉडलास वेगें ॥ आणा येथे ॥१॥त्याचे कान धरा दावा दुष्ट वेद ॥ आर्याजींचा मद ॥ शुद्रछळ ॥२॥त्याला ठावे नाहीं शुद्रादीक हाल ॥ कृत्नीमाचा लाल ॥ चमकेना ॥३॥अनुभवावीण व्यर्थ वाचाळतां ॥ जळो ती विद्वत्ता ॥ जोती म्हणे ॥४॥२७हिंदुधर्माचे ब्राह्मण वकील ॥ लुटीले सकळ ॥ जन त्यानें ॥१॥धर्ममिशें लोक नाडीले वकीलें ॥ स्वार्थ साधले ॥ आपुले ते ॥२॥नलगे वकील देवदरबारीं ॥ भक्ती एक खरी ॥ जोती म्हणे ॥३॥२८कोण ते ब्राह्मण मुखांतून झाले ॥ शुद्र तया केले ॥ कोण्या देवें ॥१॥ऋषीचें तें कुळ गंगेचे मुळ ॥ विचारीतो खूळ ॥ धूर्त म्हणे ॥२॥तैशी खोटीं लिहूनीयां जाण ॥ शपथाआणानें ॥ भय घाली ॥३॥आणीक भटांनी कपटें तीं केलीं ॥ विद्या ती ठेवीली ॥ आपले हातीं ॥४॥आजवर त्यांचे कपट चालले ॥ इतरां नाडलें ॥ जोती म्हणे ॥५॥२९हेच शास्त्नकर्ते हेच न्यानदेते ॥ गुरु हेच होते ॥ पूर्वकाळीं ॥१॥म्हणूनी निचांनी आम्हां नीच केलें ॥ श्रेष्ठत्व आणीलें ॥ आपणासी ॥२॥कोण्या ब्राह्मणास पुज्य तें मानावें ॥ कोणास आणावें ॥ धर्मकायीं ॥३॥ब्राह्मणेतरांनो, विचारासी करा ॥ अभिमान धरा ॥ मानवांचा ॥४॥ह्यांची उत्पत्ती सह्याद्रीखंडीं ॥ वर्णिली अखंडी ॥ जोती म्हणे ॥५॥ N/A References : N/A Last Updated : January 18, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP