मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|प्रवचन|सदगुरू ब्रह्मचैतन्य महाराज|नोव्हेंबर मास| नोव्हेंबर २० नोव्हेंबर मास नोव्हेंबर १ नोव्हेंबर २ नोव्हेंबर ३ नोव्हेंबर ४ नोव्हेंबर ५ नोव्हेंबर ६ नोव्हेंबर ७ नोव्हेंबर ८ नोव्हेंबर ९ नोव्हेंबर १० नोव्हेंबर ११ नोव्हेंबर १२ नोव्हेंबर १३ नोव्हेंबर १४ नोव्हेंबर १५ नोव्हेंबर १६ नोव्हेंबर १७ नोव्हेंबर १८ नोव्हेंबर १९ नोव्हेंबर २० नोव्हेंबर २१ नोव्हेंबर २२ नोव्हेंबर २३ नोव्हेंबर २४ नोव्हेंबर २५ नोव्हेंबर २६ नोव्हेंबर २७ नोव्हेंबर २८ नोव्हेंबर २९ नोव्हेंबर ३० भगवंत - नोव्हेंबर २० महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा , म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल . Tags : brahmachaitnya maharajgondavaleparamarthaगोंदवलेपरमार्थब्रह्मचैतन्य महाराज रामापरतें सत्य नाहीं । Translation - भाषांतर मी कोणाचा कोण? । मी आलों कोणीकडून । तू आहेसी अजन्म आत्माचि निधान । आत्म्यासी नाहीं जन्ममरण । हें सत्य आहे जाण ॥ आत्म्यास नसे जन्ममरण । तरी तो देहांत आला कैसा कोण? ॥ आत्मा निर्गुण, निराकारी । त्यास नाहीं जन्ममृत्यूची भरी । तो सत्तामात्र वसे शरीरीं ॥ आत्मा नाहीं कर्ता हर्ता । तो कल्पनेच्या परता ॥ तूं आहेस आत्मा । सर्व व्यापुनी वेगळा तो परमात्मा ॥ सर्व पोथ्यांचे सार । सर्व साधुसंतांचा विचार । परमात्मा एकच सत्य जाण ॥ रामापरतें सत्य नाहीं । श्रुतिस्मृति सांगतात हेंच पाहीं ॥ रामसत्तेविण न हाले पान । हें सर्व जाणती थोर लहान ॥ श्रीरामरुप ब्रह्मस्वरुप, निर्गुण, सगुण, सुंदर, । तयासी माझे अनंत नमस्कार ॥ रामाविणें सत्य कांही । सत्य जाण दुजें नाहीं ॥ दुःखाचा हर्ता व सुखाचा कर्ता । परमात्म्यावाचून नाही कोणी परता ॥ रामापरते हित । सत्य सत्य नाहीं त्रिभुवनांत ॥ आजवर जें जें कांहीं केलें । तें भगवच्चिंतनानें दूर झालें ॥ विषय मला मारी ठार । हा जेव्हां झाला निर्धार । तेव्हांच तो होईल दूर ॥सर्व कांहीं पूर्ववत चालावें । तरी पण मन रामाला लावावें ॥ वैभव, संपत्ति, मनास वाटेल तशी स्थिति, । ही भगवतकृपेची नाहीं गति ॥ न व्हावें कधी उदास । रामावर ठेवावा विश्वास ॥ स्वार्थरहित प्रेम । हीच परमात्म्याची खूण ॥ जसा सूर्याला अंधार नाहीं । तसें परमात्म्याशीं असत्य, अन्याय, नाहीं ॥ आपले आधीं आला । आपले संगत राहिला । आपले मागें उरला । त्याची संगत धरतो भला ॥ रामाचा आधार जन्माआधीं आला । पण माझे-मीपणानें सोडून गेला ॥ सर्व स्थिति-लय-कर्ता । एकच प्रभु माझा राम त्राता ॥ राम सर्वव्यापी भरला । तो माझेपासून दूर नाहीं जाहला ॥ परमात्मा सर्व ठिकाणीं भरला ॥ त्याचेविण रिता ठाव नाहीं उरला ॥ सर्व जीव पराधीन । सर्व परमात्म्याचे अधीन ॥ म्हणून जें जें घडेल कांहीं । तें तें त्याचे सत्तेनेंच पाहीं ॥ चातुर्य, बुद्धी, देहभाव, वासना, कल्पना । ही मायाच अवघी जाण ॥ माया बहुत जुनाट । तिनें बहुतांस भोगविले कष्ट ॥ मुख्य देहबुद्धी अविद्यात्मक । अविद्या पराक्रम साधी फार । तिची शक्ति फार मोठी । आत्मदर्शन न होऊं देई भेटीं ॥ म्हणून जें जें दिसतें तें तें नासते । हा बोध घेऊन चित्तीं । सज्जन लोक जगीं वर्तती ॥ N/A References : N/A Last Updated : November 01, 2010 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP