Dictionaries | References

बाप

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
bāpa m A father.

 पु. 
पिता ; जनक .
( बापासारखा ) चुलता . ( धृतराष्ट्र भीष्मास म्हणतो ) कीं माझा वधिला शिखंडिनें बाप । - मोकर्ण १ . १२ .
( काव्य . ) संस्कृतांतील तात शब्दाप्रमाणें अनुकंपार्हत्वदर्शक संबोधन ( लहानाला किंवा सत्कारार्थी योजतात ). जरी स्वधरर्मैकनिरत । वर्ताला बापा । - ज्ञा ३ . १०२ . - वि . फार ; पुष्कळ ; मोठा . बापु उपेगी वस्तु शब्दु । - अमृ ६ . १ . - उद्गा . आश्चर्य किंवा दु : ख यांचें दर्शक . बाप ! अज्ञानाची भुलि कैसी । - भाए ३ . १५ . [ सं . पिता , वप्तृ ; प्रा . बप्प , बप्पो ; का . बाप्प ; पोर्तु . जि . पतरौ , पात ( पितृशीं जास्त जुळणारा ); आर्मेजि . बाप ] म्ह० बापास बाप म्हणत नाहीं तो चुलत्यास काका कोठून म्हणणार ? बापासि बाप न म्हणे ऐशासी काय होय आजोबा । - मो . ( वाप्र . ) बाप शेटीची पेंड , बाब शेटीची पेंड - स्त्री . हवी त्यानें हवी तितकी न्यावी अशी वस्तु ; संपत्ति ; विपुल व सुसाध्य वस्तु . ( बापशेट नांवाच्या श्रीमान व उदार गृहस्थाच्या नांवावरुन हा शब्द रुढ झाला असेल ).
०होऊं   , म्हणविणें , बाप होऊन करणें , बाप होऊन बोलणें - बापाची किंवा मोठेपणाची जागा घेणें ; वर मोठेपणा मिरवणें . एखाद्याचा बाप होणें , बाप लागून राहणें - एखाद्यापेक्षां वरचढ असणें ; त्रास देणारा असणें . बापाचा माल - एक शिवी ; कोणीं उधळेपणानें दुसर्‍याचा माल खर्चू लागल्यास त्यास म्हणतात . बापावरुन पावणें - बापाच्या नांवानें , बापावरुन शिव्या देणें . बापास बाप म्हणणें - वाजवी गोष्टींत कोणाचीहि मुर्वत न धरणें . बापास बाप म्हणणारा - भीड मुर्वत न धरणारा ; खडखडीत स्वभावाचा .
लागणें   , म्हणविणें , बाप होऊन करणें , बाप होऊन बोलणें - बापाची किंवा मोठेपणाची जागा घेणें ; वर मोठेपणा मिरवणें . एखाद्याचा बाप होणें , बाप लागून राहणें - एखाद्यापेक्षां वरचढ असणें ; त्रास देणारा असणें . बापाचा माल - एक शिवी ; कोणीं उधळेपणानें दुसर्‍याचा माल खर्चू लागल्यास त्यास म्हणतात . बापावरुन पावणें - बापाच्या नांवानें , बापावरुन शिव्या देणें . बापास बाप म्हणणें - वाजवी गोष्टींत कोणाचीहि मुर्वत न धरणें . बापास बाप म्हणणारा - भीड मुर्वत न धरणारा ; खडखडीत स्वभावाचा .
०आजांचा   - पु . पूर्वजांचा धर्म ; पिढीजात आलेला धर्म . बापई - पु . ( माण . ) बाप्या ; वयांत आलेला पुरुष .
धर्म   - पु . पूर्वजांचा धर्म ; पिढीजात आलेला धर्म . बापई - पु . ( माण . ) बाप्या ; वयांत आलेला पुरुष .
०घर  न. माहेर . मग आप - घर त्यागूनि बापघरीं केली वस्ति । - सप्र ११ . ४९ .
०जन्मांत   जन्मीं - क्रिवि . सर्व आयुष्यांत ; जन्मापासून आजपर्यंत . मी बापजन्मीं कोणाचें उणें उत्तर बोलून घेतलें नाहीं . [ बाप + जन्म ]
०जादे   दादे - पुअव . वाडवडील ; पूर्वज . दिल्ली याचे बापजाद्याची नाहीं , जो सामर्थ्यवान होईल त्याची दौलत असें आहे . - गोखंचिशाब १२ . [ फा . बाब = पिता + अर . जद्द = आजोबा ]
०पण  न. सामर्थ्य ; पितेपण . तरि बापपण आपुलें कां दाखविजेना । - ऋ ३४ . पोरका वि . बाप मेल्यामुळें पोरका बनलेला .
०भाऊ  पु. भाईबंद ; भाऊबंद ; नातेवाईक ; दायाद ( वतनांतील वांटेदार ).
०भावकी  स्त्री. 
भाऊबंदकी ; नातें .
दाट परिचय ; परमस्नेह .
०भ्रम  पु. मोठा भ्रम . बापभ्रमाचें विंदान । केवढे सायास पक्षियांचे । - जै ७७ . ५४ . [ बाप = मोठा + भ्रम ]
०माय  स्त्री. ( काव्य . ) बाप आणि आई ( हा शब्द विशेष रुढ नाहीं . रुढ शब्द मायबाप , आईबाप , मातापिता हे आहेत ). जैसी अबला सासुरां राहे । चित्तीं आठवे बापमाये । बापया , पु . बाप्या ; पुरुष . बापयोद्धा पु . मोठा योद्धा . बापयोद्धा तो नि : शंक । - जै ७५ . १२६ . [ बाप = मोठा + योद्धा ]
०रोटी   बापुती बापोती - स्त्री . ( हिं . ) ( शब्दश : अर्थ - बापाची भाकरी , अन्न ). वडिलोपार्जित चालत आलेली वतनवाडी , मालमत्ता . बापा - पु .
( खा . ) बाप .
बापाचें संबोधन ; ( आदरार्थी हाक मारतांना ) अहो ! अरे ! अर्थाचा दास पुरुष अर्थ नव्हे पुरुषदास बापा हें । - मोभीष्म १ . ९० .
( कों . ) एक पिशाचदेव ; बापदेव . बापाजी - पु . ( संबोधन ) मोठ्या माणसाला हाक मारतांना म्हणतात . बापाजी ! आम्हीं हीं चित्रें तुमचा अनुग्रह चितारी । - मोउद्योग ११ . ५२ . बापाला - पु . ( गो . ) मावशीचा नवरा . बापाशीक झंवरी - वि . ( हेट . ) एक शिवी . बापाशीं संभोग करणारी . बापिक - पु . कुलपरंपरागत धर्म ; हव्यकव्य ; कुलधर्म . - वि . कुळांतील ; कुलपरंपरागत . एथ स्वामीचें काज । ना बापिकें व्याज । - ज्ञा १२ . ६७ . बापु - वि . मोठा . - उद्गा . बापरे ; अरे बापरे ! बापु ! कळा वानु कैसी । - ऋ ६ . बापुरजदा , बापूरजदा , बापुरझदा , बापूरझदा - वि . वंशपरंपरा . बापूरजदा घेत जाऊन ... - वाडथोमारो २ . १०६ . बापुलभाऊ , बापोलभाऊ , बापुलभाव , बापूलभाव - पु . ( गो . ) चुलत भाऊ . बापुलयों , बापोलयों - पु . ( गो . ) चुलता . बापुला , बापुय , बापूय , बापुस , बापूस - पु . ( गो . कु . कों . ) बाप . बापू - पु . आदरार्थी पुरुषास म्हणतात . बापोलभैण - स्त्री . ( गो . ) चुलत बहिण . बाप्या , बाप्यो - पु . बाप होण्याच्या वयाचा , वयांत आलेला पुरुष ; प्रौढ . ( - अव . बापे - प्ये ). बाप्यामाणूस - पु . पुरुष . याच्या उलट बाईमाणूस .

बा पहा.

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 m  A father.

Related Words

बाप   बाप जातो देऊळीं, पोर्‍या जातो राऊळीं   चूक नव्हे, चुकीचा बाप   (गु.) बापाने बाप नहि कहुं तो पडोसीने काको केहवानो?   गाय तेथे गोठा, बाप तेथे बेटा   बाप होऊन लागणें   बाप निघाला कामाला, बाळ आडवा झाला   बापापरी बाप गेला, शंख वाजवितां हात गेला   माय तेली, बाप तेलंग, बेटा होई रंगबेरंग   बापचा बाप गेला, बोंबलतांना हात गेला   बापासि बाप न म्हणे (ऐशाला काय होय आजोबा)   आवै जाणता भुरग्याचो बाप, आनी देव जाणता पाप   बापापरी बाप गेला बोंबलतापरी ओठ गेला   बापास बाप न म्हणणें   पुता हातीं व्यवहार बाप कष्टी जाय, नी सुने हातीं संसार सासू फटके खाय   बाप मरेगे जब (और) बैल बाटेंगे   आसका बाप, निरासकी मा, होतेकी बेहेन, न होतेका दोस्त, पैसा गांठ, जोरू साथ (जागे सो पावे, सोवे सो गमावे)   असत्याचा बाप, नसत्याची आई   लोक म्हणून खाणार, बाप म्हणून कोण देणार?   आप घर कीं बाप घर   आसका बाप, निरासकी मा   बापास बाप न म्हणणारा   बाप आजांचा धर्म   आई एली, बाप तेली आणि मुलगा शेख चिली   आई भेरी, बाप पडघम आणि संबळ भाऊ   आई गेली म्हणजे बाप पाहुणा   बाप चोर, पोर्‍या हाताळ   मार शेजार्‍या साप, मी मुलाबाळांचा बाप   मा मुळा, बाप गाजर, बेटा निकला समशेर बहादूर   रांडेच्या पोरास दिवसा बाप नाहीं व रात्रीं आई नाहीं   अंधळें मुला उपयोगी नातरी आई बाप डोळे चांगले तरी   बाप आला घरीं मुलगा (दारीं), रांडेच्या घरीं   बाजारचा मेवा, बाप लेकांनीं खावा   कहूं तो मा मरजाइगी ना कहूं तो बाप कुत्ता खाजाइगा   बाप मरतांच घर अंगावर पडलें   मार पाहुण्या साप, मी मुलाबाळांचा बाप   बाप पाहुणा आला म्हणून रेडा का दोहायाचा   माय बाप हेल्या, लेकरं पाहिलं कोल्ह्या   बोले तो मा मारी जाय, ना बोले तो बाप कुत्ता खाय   कुणब्‍याला जो म्‍हणेल आप, त्‍याचा गाढव बाप   बाप होऊन करणें   दुर्दैवानें बाप फसला, तें पाहून मुलगा सुधारला   न रहे आप, तो शूं करे मा ने बाप   बाप ठाऊक आईला, पाप ठाऊक मनाला   आई जेऊं घालीना, बाप भीक मागूं देईना   बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा   एखाद्याचा बाप होणें   बाप मेला आणि भावानें दावा केला   कुकर्मानें बाप फसला, ते पाहून मुलगा सुधारला   पापाचा बाप पैका   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Keyword Pages

 • ओवी गीते : आई बाप
  स्त्रीनिर्मित लोकगीतात, आई बापाबद्दल अत्यंत जिव्हाळ्याने ओव्या रचलेल्या आहेत,कारण स्त्रीच्या जीवनपटात आई बापाच्या प्रीतीचे धागे जुळलेले असतात.
 • आई बाप - संग्रह १
  स्त्रीनिर्मित लोकगीतात, आई बापाबद्दल अत्यंत जिव्हाळ्याने ओव्या रचलेल्या आहेत,कारण स्त्रीच्या जीवनपटात आई बापाच्या प्रीतीचे धागे जुळलेले असतात.
 • आई बाप - संग्रह २
  स्त्रीनिर्मित लोकगीतात, आई बापाबद्दल अत्यंत जिव्हाळ्याने ओव्या रचलेल्या आहेत,कारण स्त्रीच्या जीवनपटात आई बापाच्या प्रीतीचे धागे जुळलेले असतात.
 • आई बाप - संग्रह ३
  स्त्रीनिर्मित लोकगीतात, आई बापाबद्दल अत्यंत जिव्हाळ्याने ओव्या रचलेल्या आहेत,कारण स्त्रीच्या जीवनपटात आई बापाच्या प्रीतीचे धागे जुळलेले असतात.
 • आई बाप - संग्रह ४
  स्त्रीनिर्मित लोकगीतात, आई बापाबद्दल अत्यंत जिव्हाळ्याने ओव्या रचलेल्या आहेत,कारण स्त्रीच्या जीवनपटात आई बापाच्या प्रीतीचे धागे जुळलेले असतात.
 • आई बाप - संग्रह ५
  स्त्रीनिर्मित लोकगीतात, आई बापाबद्दल अत्यंत जिव्हाळ्याने ओव्या रचलेल्या आहेत,कारण स्त्रीच्या जीवनपटात आई बापाच्या प्रीतीचे धागे जुळलेले असतात.
 • आई बाप - संग्रह ५
  स्त्रीनिर्मित लोकगीतात, आई बापाबद्दल अत्यंत जिव्हाळ्याने ओव्या रचलेल्या आहेत,कारण स्त्रीच्या जीवनपटात आई बापाच्या प्रीतीचे धागे जुळलेले असतात.
 • आई बाप - संग्रह ६
  स्त्रीनिर्मित लोकगीतात, आई बापाबद्दल अत्यंत जिव्हाळ्याने ओव्या रचलेल्या आहेत,कारण स्त्रीच्या जीवनपटात आई बापाच्या प्रीतीचे धागे जुळलेले असतात.
 • आई बाप - संग्रह ७
  स्त्रीनिर्मित लोकगीतात, आई बापाबद्दल अत्यंत जिव्हाळ्याने ओव्या रचलेल्या आहेत,कारण स्त्रीच्या जीवनपटात आई बापाच्या प्रीतीचे धागे जुळलेले असतात.
: Folder : Page : Word/Phrase : Person

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP