|
न. वैभव ; झकाकी . - रा ५ . ७६ जलील पहा . [ अर . जल्ल ] न. पाणी ; उदक ; तोय ; अंबु ; नीर . [ सं . ] म्ह० जलांत राहून माशाशीं वैर . ( वाप्र . ) जलीं , स्थलीं , काष्ठीं , पाषाणीं - १ मूळ सर्व ठिकाणीं ज्याचें अस्तित्व अशा देवाबद्दल म्हणतात . २ ( ल ) ज्या त्या गोष्टींत व जेथें तेथें डोकें खुपसणारा , भेटणारा , पिच्छा पुरविणारा अशा माणसा बद्दलहि योजतात . सामाशब्द - ०कुक्कुट पु. पाणकोंबडा . ०कूप पु. विहीर ( पाणी असलेली ). याच्या उलट शुष्क कूप . कुंड - न . ( ख्रि . ) ज्या कुंडांत अगर पात्रांत बाप्तिस्म्याकरितां पाणी ठेवतात तें . ( इं . ) फाँट . बाळकांस घेऊन आलेल्या लोकांनीं ... प्रार्थनेंतील दुसरा पाठ झाल्यावर लागलेच जलकुंडाजवळ यावें . - साप्रा ९० . १०५ . ०केलि क्रीडा - १ विषयीपुरुष स्त्रियांसहवर्तमान जलामध्यें विलास करतात ती . २ पाण्यामधील खेळ ; नावा वल्हविण्याची , पोहण्याची शर्यत . क्षीरधितीर विहारी जलकेलि करूं नदींत गगनीच्या । - हंसकाकीय आख्यान , मोकर्ण २८ . २५ . ३ नदी - समुद्रपर्यटन . ०क्रिया स्त्री. १ पितरांचें तर्पण . २ पाण्याचें कार्य ; धुणें वगैरे . ०खोकड पु. एक मासा . प्राणिमो ८५ . ०गतिशास्त्र पु. ( शाप . ) पदार्थांच्या पाण्यांतील गतीसंबंधीं नियम दाखविणारें शास्त्र . ( इं . ) हायड्रो डायनामिक्स . ०चर न. १ पाण्यांतील प्राणी . जैसे जळचरा जळसांडे । आणि तत्क्षणी मरण मांडे । - ज्ञा ३ . ११७ . २ ( संकेतानें ) समुद्रापलीकडून आलेला परकीय माणूस , द्वीपांतरचा मनुष्य . ३ युरोपियन लोक ; इंग्रज लोक . जलचर तयार झाले . - रा १० . १७५ . प्रताप महिमा थोर जळामधिं परि जलचर अडविला । - ऐपो ३०४ . ०ज वि. ( काव्य ) पाण्यापासून उत्पन्न झालेला , पाण्यांत जन्म पावलेला ( मेघ , कमळ इ० ). ०जघोष मेघगर्जना . लक्ष दीपांचा प्रकाश । जलजघोष घंटावरी । ०जंतु पु. जलचर ; चलसंचारी प्राणी ; जलामध्यें उत्पन्न होणारे जंतू ( प्रत्येकी ). ०तरंग पु. १ लाट , लहरी . २ एक वाद्य ; बारापासून बावीसापर्यंत चिनीमातीचे लहानमोठे पेले घेऊन , वाजविणारा ते आपल्यापुढें अर्धवर्तुलाकार मांडतो , मग त्यांतून इच्छित स्वराचा ध्वनि निघण्यासाठीं त्यांत कमीअधिक पाणी घालतो व दोन बारीक छडया दोन हातांत घेऊन पेल्यावर मारून इच्छित रागाची गत वाजवितो , अशा रीतीनें तयार केलेलें वाद्य . ०ताडन न. ( पाण्यास कितीहि मारलें तरी तें दुभंग होत नाहीं यावरून ) ( ल . ) निष्फळ श्रम , प्रयत्न . ही बाब जलताडणासारखी व्यर्थ होती . - सासं २ . ९३ . ०द धर - पु . मेघ . जलदजालपटल - न . अभ्रपटल ; आभाळ ; ढगांनीं व्याप्त आकाश . जलदेवता - स्त्री . पाण्यांतील देवता ; अप्सरा . ०धर पु. ( संगीत ) एक राग ; यांत षडज , तीव्र ऋषभ , कोमल मध्यम , पंचम , तीव्र धैवत , तीव्र निषाद हे स्वर लागतात . जाति षाडव - षाडव . वादी पंचम , संवादी ऋषभ . गानसमय रात्रीचा पहिला प्रहर . केदार पु. ( संगीत ) एक राग ; यांत षडज , तीव्र ऋषभ , कोमल मध्यम , पंचम , तीव्र धैवत , तीव्र निषाद हे स्वर लागतात . जाति षाडव - षाडव . वादी पंचम , संवादी ऋषभ . गानसमय रात्रीचा पहिला प्रहर . ०धि निधि - पु . १ ( काव्य . ) पाण्याचा संचय ; समुद्र . जेणें जलनिधि आटला आचमनी । २ ( अंकगणित ) दहा शंकू किंवा एकावर चौदा पूज्यें इतकी संख्या . ०नाडी स्त्री. जमिनीच्या पोटांतून जाणारी पाण्याची शीर ; पृथ्वीच्या पोटांतील पाण्याचा मार्ग . ०पक्षी पु. पाण्यांतील पक्षी . ०पाई स्त्री. एक औषधी वनस्पति . ०पान न. १ जलप्राशन ; पाणी पिणें . २ ( काशी ) फराळ . ०पादचारी वि. पाण्यांतून पायांनीं चालणारा एक पक्षिवर्ग . याचे पाय लांब व उघडे असतात . - प्राणिमो ५८ . ०प्रलय पु. ज्या वेळीं सर्व पृथ्वी पाण्यांत बुडून जाते असा शेवटचा काल . ०प्रवाह पु. गंगाप्रवाह ; ( थोर पुरुषांची रक्षा , अस्थि , देवाचा निर्माल्य इ० ) पवित्र नदीमध्यें सोडावयाची क्रिया . ०प्राय वि. जलपूरित ; पाण्याची समृध्दि असलेला ( देश ). [ सं . ] ०बुदबुद पुन . १ पाण्यावरचा बुडबुडा . २ ( ल . ) क्षणभंगुरता , क्षणिकत्व दाखविणारी गोष्ट . पाण्यावरचा बुडबुडा पहा . ०मंदिर न. नदी , सरोवर यांच्या पाण्यांत बांधलेलें किंवा नदीच्या कांठीं तळघराप्रमाणें बांधलेलें घर ( उन्हाळयासाठीं ); जलांतील क्रीडागृह ; धारागृह . ०मय न. सर्वत्र पाण्याचा फैलाव ; भोंवतालीं पाण्यावांचून कांहीं नाहीं अशी जी अवस्था ती . समुद्रांत भारी लांब गेलें म्हणजे सर्व जलमय दिसतें . - वि . १ जलपूर्ण ; जलप्राय पहा . ( देश , जागा , फळ ). २ पाण्यानें झालेलें ( बर्फ , गार ). गार जलमय पडली यामुळें क्षणांत तिचें जल होऊन गेलें . ३ पाण्यांत बुडलेलें ( गांव , देश ). ०मनुष्य पुन . जळमाणूस पहा . ०मार्ग १ गलबतें वगैरे जाण्याचा पाण्यामधील मार्ग ; याच्या उलट खुष्कीचा मार्ग . २ समुद्रावरील कर ; आयातनिर्यात मालावरील पट्टी ; याच्या विरुध्द जकात , ही जमीनीवर असते . ०यंत्र न. १ कारंजें . उठेत जेथें जलयंत्र धारा । - सारुह ५ . १७ . २ रहाट , पाणचक्की , लाट इ० पाण्याचीं यंत्रें . ३ पाण्याच्या जोरावर चालणारें यंत्र . ०यात्रा स्त्री. जलप्रवास ; ( जलमार्गानें ) परदेशगमन . ०यान न. होडी नाव , गलबत , तरांडें इ० पाण्यांतील प्रवासाचें वाहन . ०राज पु. ( शाप . ) ज्यामध्यें सोनें विरघळतें असें अम्ल . ( इं . ) अॅक्वारेजिया . ०रुह न. पाण्यांत वाढणारें कमळ . ०वास पु. कांहीं काळ बेंबीपर्यंत पाण्यांत उभें राहण्याची तपश्चर्या ( साधूंची ). ०विहार पु. जलक्रीडा पहा . ०व्याल पु. पाणसाप . ०शाक स्त्री. ( ल . ) मासे ; पाणशेंगा . बंगाली बाबूस ताजी जलशाक व महाराष्ट्रीय ब्राह्मणांस लोणकढें तूप पाहिजे . - टि १ . ३७४ . [ जल + शाक = भाजी ] ०शोधक न. पाण्यांतील गाळ काढून शुध्द करणारें यंत्र अथवा पात्र ; ( इं . ) फिल्टर . ०शोष पु. १ तहानेनें घसा कोरडा होणें ; रुक्षता ; कोरड . २ दुष्काळ ; अनावृष्टि ; अवर्षण . ०शोषक वि. पाणी शोषून ओढून घेणारें , हवेंतील आर्द्रता दाखविणारें ( यंत्र ). ( इं . ) हायग्रोस्कोपिक . ०श्वासेंद्रियपुट न. माशास श्वासोच्छवास करण्यास साह्य करणारी शरीरांतील एक पिशवी ; गळचुंडी . ०सत्र न. पाणपोई ; जळछत्र पहा . ०समाधि स्त्री. १ पाण्यांत बुडून मरणें ; संन्याशानें पाण्यांत घेतलेली जिवंत समाधि ; पाण्यांत उतरून स्वत : स बुडवून घेणें ; फक्त संन्याशानेंच प्रयाग येथें जलसमाधि घ्यावी असा शास्त्रनिर्बंध आहे . ०स्थलभ्रम पु. १ हें पाणी कीं जमीन याबद्दलचा भ्रम पडणें . २ महापुरानें पाणी व जमीन एक होऊन जाणें ; सर्व जलमय होणें . ०स्थितिशास्त्र न. पाण्यामध्यें पदार्थ स्थिर राहण्यासंबंधींचे नियम व गुणधर्म सांगणारें शास्त्र : ( इं . ) हायड्रोस्टॅटिक्स . जलाचा विकार - पु . पाण्याची विकृति , अवस्थांतर ; ( गार , बर्फ , वाफ इ० ). जलांजली , जलांजुली - स्त्री . मृताच्या दहाव्या दिवशीं अश्म्यावर मृताच्या नांवानें तिळमिश्रित पाणी सोडणें ; तिलांजली देणें , सोडणें ; ( क्रि० सोडणें ; देणे ). देउनि जलांजली स्वप्रियसुत बंधूंसि म्हणुनि हा रडत । - मोसभा ७ . ७२ . [ जळ + अंजलि ] जलाधिवासन - न . १ एखाद्या देवतेच्या मूर्तीची मंदिरांत कायमची स्थापना करण्यापूर्वी एक रात्रभर ती मूर्ती पाण्यांत ठेवण्याचा विधि . २ ( सामा . ) मूर्तीची मिरवणुक काढण्याच्या पूर्वरात्रीं वरीलप्रमाणें अशीच करावयाची क्रिया . जलाबंब - वि . ( ना . ) पाण्यानें भरपूर , तुडुंब . [ जलबंब ] जलाभास - पु . मृगजल . जलाशय - पु . पाण्याचा सांठा , स्थान ( समुद्र , तळीं , डबकें , तलाव इ० ). शैल कक्षांचीं कुहरें । जलाशय परिसरें । - ज्ञा १३ . ६१२ . जलोत्सर्गक - न . पाणढोसळी . ( इं . ) फ्लशिंग पॉट . जलोदर - पु . पोटांत सांठल्यामुळें होणारा रोग ; उदर . [ सं . ]
|