Dictionaries | References

व्यवहार

See also :
VYAVAHĀRA , घेवपत , धंदा , व्यापार
ना.  देवघेव , धंदा , व्यापार ;
ना.  काम , कार्य , क्रिया ;
ना.  योग्य वर्तणूक , रीत , वहिवाट .
Operation or action generally; work, exercise. 2 Procedure, practice, course of action or being. 3 Trade, traffic, dealing, commerce, business: also a trade or business, an employment, occupation, profession, vocation. 4 The practice of the courts of law. 5 A lawsuit: also any matter actionable or cognizable in a court of law.
 पु. १ कार्य ; क्रिया ; व्यापार . २ वहिवाट ; पध्दत ; रीत . ३ धंदा ; देवघेव ; व्यापार . - ज्ञा ७ . २६ . ४ व्यवसाय ; उद्योग ; काम . ५ न्यायालयाची वहीवाट ; कोर्टाची रीत . ६ खटला ; चौकशी . कोणत्याही व्यवहाराचा निर्णय करतांना सात सभासदांचे सल्ल्याने निकाल करावा । - टि १ . १६० . ७ न्यायालयांत निर्णयासाठी येणारी गोष्ट . ८ योग्य वर्तणूक , वर्तन . ९ भांडवल . कृतघ्ना उपेगु केला । कां चोरा व्यवहारु दिधला । - ज्ञा ९३ . ७२८ . १० संज्ञा . मग उत्तम ओघ सिंधु । हा नुरेचि व्यवहारभेदु । - ज्ञा १६ . १३९ . [ सं . ]
 पु. नांवापुरतें भांडवल असून बहुतेक पतीवर चालविलेला धंदा , व्यापार . [ घेणें + पत + धंदा ]
०कुशल   चतुर दक्ष द्रष्टा निपुण - वि . व्यवहारांत हुषार , तरबेज , तज्ज्ञ .
०दर्शन  न. न्यायतत्त्वशास्त्राचा अभ्यास . राजाने व्यवहारदर्शन नित्य करीत असावे .
०धर्म  पु. व्यवहारशास्त्र पहा .
०पद  न. १ खटला होण्यासारखी गोष्ट . २ खटला ; कायदेशीर इलाज .
०यात्रा  स्त्री. व्यवसाय ; व्यवहारक्रम . शब्दांच्या व विचारांच्या भरभक्कम शिदोरीवरच सगळे लेखक , वक्ते , धर्मोपदेशक , वगैरे लोकांची व्यवहारयात्रा चालते . - शर ( प्रस्तावना ). विषय - पु . व्यवहारपद पहा .
०शास्त्र  न. सामाजिक चालीरीती , व्यवहार यासंबंधी नियम याच्या उलट धर्मशास्त्र .
०शुध्द वि.  योग्य वर्तनाचे , व्यवहाराचे ; चोख .
०शून्य   ज्ञानशून्य - वि . व्यवहाराच्या कामी अडाणी ; रीतीचा व्यवहार माहीत नसलेला .
०ज्ञ वि.  १ वयांत आलेला ; अज्ञान नसलेला ; सज्ञान ( कायद्याच्या दृष्टीने ). २ व्यवहारांत कुशल ; तरबेज .
०ज्ञान  न. व्यवहारासंबंधी चांगली माहिती . व्यवहारणें - उक्रि . योग्य कामी लावणें ; उपयोजणे . मनप्रवतें इंद्रियाव्दारे । बाह्यविषयी व्यवहारे । - परमा ६ . १२ . व्यवहारिक , व्यवहारीक - वि . व्यावहारिक पहा . व्यवहारी - वि . १ व्यवसायांत , धंद्यांत गुंतलेला ; धंदेवाईक . २ व्यापारी . व्यवहारी अपूर्णांक - पु . ( गणित ) एका संख्येचे वाटेल तितके भाग पाडून त्यांपैकी काही घेणे . व्यवहारी ज्योतिषी - पु . मुंज , लग्न इ० चे आन्हिक चालविणारा ब्राह्मण ; काही ठिकाणी याच्याकडे धर्माधिकार्‍याचेहि हक्क असतात . व्यवहारी बस्तानी - स्त्री . ( गणित ) रुपयाचे पैसे कितीहि असले तरी १६ गंडे ( खुर्द्यातले ) म्हणजे १ रुपाया असा हिशेब करणे . व्यवहार्य - वि . १ उपयोगाला व्यवहाराला योग्य , अवश्य , शक्य ( मनुष्य , वस्तु इ० ). २ अनुसरण्याला , करण्याला योग्य ( धंदा , उद्योग ). ३ कायदेशीर इलाज करण्याजोगा . व्यावहारीक - वि . १ व्यवहारासंबंधी ( भाषा , लिपि इ० ). २ रुढ ; सामान्य ; नेहमीचे . ३ व्यवहारोपयोगी ; व्यवहाराला योग्य , इष्ट . [ शं . ]
०अपूर्णांक  पु. व्यवहारी अपूर्णांक पहा .
०दिवस  पु. ( ज्यो . ) मध्यम सौरदिवस . हा रात्री १२ पासून दुसर्‍या रात्री १२ पर्यंत धरतात . ( इं . ) सिव्हिल डे .
०नाम   , नांव - न . १ प्रचारांतील , परिचयाचे नांव ; चालते - वाहते नाव . उदा० आण्णा , आबा , आत्या इ० . २ नक्षत्र नामाखेरीज मुला - मुलीचे नांव ठेवतात ते उदा० गणेश नर्मदा इ०
०नीति  स्त्री. शिष्टाचार ; सामान्य , व्यवहारातील नीति .
०वर्ष  न. सरकारी वर्ष ( ३६५ दिवसाचे ); कायद्याप्रमाणे ठरलेले वर्ष .
०शिक्षण  न. १ व्यवहार करण्यांस उपयुक्त असे शिक्षण याच्या उलट पुस्तकी शिक्षण . २ धंदेशिक्षण .
 m  Operation or action. Practice. Trade.

Related Words

व्यवहार   व्यवहार   अक्रीताचा व्यवहार   रोकड व्यवहार श्रीमंतीचा, उधार व्यवहार अधोगतीचा   करतां रोख व्यवहार, सधन होती सावकार   सांधींतला व्यवहार   बिनामी-निनामी व्यवहार   अलादियाशाही व्यवहार   अविश्र्वासें व्यवहार साधे, विश्र्वासे परमार्थ लाधे   उचापतीचा रोजगार,व्यवहार   व्यवहार-व्यवहार ज्ञान हें मनुष्य जीविताचें मुख्य अंगा आहे   करतां नये व्यवहार, त्‍यानें न करावा व्यापार   कोरडा व्यवहार   खिस्ताईचा - व्यवहार   घेवपत धंदा -व्यापार -व्यवहार -उद्दीम   घेवपत-धंदा-व्यापार-व्यवहार   जनरीत-रीति-रुढि-व्यवहार   पक तुटला, व्यवहार खुंटला   पुता हातीं व्यवहार बाप कष्टी जाय, नी सुने हातीं संसार सासू फटके खाय   माळीण-माळणीचा व्यवहार   राजकीय व्यवहार   लबाडीचा व्यवहार लबाडीनें जिंकावा   घेवपत-धंदा-व्यापार-व्यवहार   जनरीत-रीति-रुढि-व्यवहार   बिनामी-निनामी व्यवहार   माळीण-माळणीचा व्यवहार   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.