TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
स्वानंदपुरींचा रहिवासीं आ...

मोरया गोसावी - स्वानंदपुरींचा रहिवासीं आ...

श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.


॥ पद ६१ ॥

स्वानंदपुरींचा रहिवासीं आला ॥

आह्मासी भेटला मोरेश्वरीं ॥१॥

आहो मुर्ती गोजिरवाणी सेंदूर साजिरीं ॥

सिंहासनावरी मिरवतसे ॥२॥

आहो कोटिकंदर्पाला ओवाळुनी टाका ॥

सिद्धीच्या नायका वरोनियां ॥३॥

आहो ज्याच्या बीरुदाचा ॥

त्रैलोकी दणाणा ॥ पतिपावन नाम गर्जे ॥४॥

(माझ्या) वडिलांनीं जोडी जोडी केली ह्या पायाचीं ॥

हीच हो आमूची कामधेनू ॥५॥

आहो याजवीण आह्मा अन्य नसे कोणी ॥

मछीया जीवन तैशापरी ॥६॥

(मोरया) माझी लज्जा रक्षी सर्वही दिनानाथा ॥

तुजवीन आह्मा कोण आहे ॥७॥

आहो महाद्वारीं उभा उभा कर जोडुनियां ॥

भक्ती दान मोरया देंई मज ॥८॥

आहो मोरया गोसाव्यांच्या वंशींचा किंकर ॥

मागें निरंतर हेंचि सुख ॥९॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-04-23T00:18:56.8400000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

हुंदाडणें

  • उ.क्रि. १ शिंगानें , डोक्यानें हिसडा , ढुश्शी मारणें , देणें . २ ( ल . ) घालवून देणें . ३ ( ल . ) दूर लोटणें ; बाजूस करणें ; खोडून काढणें ( दोष , आरोप ). - अक्रि . बागडणे ; हुंदडणें ; नाचणें ; धुडगुस घालणें ( मूल इ० ने ). [ ध्व . का . हुडीद ] हुंदडा , हुंदाडा - पु . १ हुंडका २ पहा . २ डोके , खांदा यांनी मारलेली ढुस्सी ; धडक . ३ जरीमरीसारखा एक रोग आणि त्याची देवता . ४ धसमुसळ्या , मुसळकंद . आडदांड माणूस ; मार्गात कितीहि अडचणी आल्या तरी धडाक्यानें पुढे जाणारा माणूस . ५ ( सोंगटया ) एकच फिरती शेवटची सोंगटी . हुंदडी , हुंदाडी - स्त्री . दूध पितांना वासरानें कासेस दिलेली ढुशी . हुंडका पहा . 
RANDOM WORD

Did you know?

In Hinduism, are women and men treated as equals?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Dictionaries: 44
  • Hindi Pages: 4,328
  • Total Pages: 38,982
  • Words in Dictionary: 302,181
  • Tags: 2,508
  • English Pages: 234
  • Marathi Pages: 22,630
  • Sanskrit Pages: 11,789
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.