मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
मोरेश्वर स्थळ तुझें आदिस्...

मोरया गोसावी - मोरेश्वर स्थळ तुझें आदिस्...

श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.


मोरेश्वर स्थळ तुझें आदिस्थानक ॥ तेथें भक्त येती तुज शरणांगत ॥

तुझिया ठायासीं येती कर्म दोषी ॥ कामना तयाच्या तूं बा पुरवीसी ॥१॥

नाम घेतां तुम्ही कां रे लाजताती ॥ नामा साठीं तुम्हा होईल (स्वानंद) वैकुंठ प्राप्ती ॥धृ०॥

ध्याती देवा तुज मागती अपार ॥ कृपा करिसी देवा चुकविसी संसार ॥

स्मरण केलिया पापें दग्ध होती ॥ जडजीव उद्धरीले तूं बा गणपती ॥२॥

ऐसें दैवत मी न देखे दुसरें ॥ नाम घेतां तया नलगेची पै येणें ॥

तारिं तारिं भक्ता तूं रे गजानना ॥ एक वेळ लावी तूं आपुल्या चरणा ॥३॥

नवमास सोशील्या मी गर्भींच्या यातना ॥ बाळपण गेलें रे रुदन अज्ञाना ॥

तरुणपण बहर विषयाची वासना ॥ एक वेळ धांवें रे पावें गजानना ॥४॥

व्यर्थ सार्पेण माया झोंबली अंतरीं ॥ तुजवीण कोण आहे विष बा उतारी ॥

इचिया विखारे नाडलो बहूत ॥ उतरी देवराया माझें तूं त्वरित ॥५॥

इचिया लहरी जाळती शरीरी ॥ धांवे पावे देवा यावे बा लवकरी ॥

आता साहावेना उशिर न लावीं ॥ दास चिंतामणी तुझा तुज विनवी ॥६॥नाम घेता०॥

N/A

References : N/A
Last Updated : April 22, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP