TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
तिन्ही अक्षराचें नाम तुह्...

मोरया गोसावी - तिन्ही अक्षराचें नाम तुह्...

श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.


॥ पद २॥

तिन्ही अक्षराचें नाम तुह्मी ह्मणारे वाचे ॥

चुकतिल भवबंधने दोष जाती जन्माचे ॥

जय जय मोरया हो ॥ माझ्या मोरया हो ॥

रंगा यावे हो माझ्या मोरया हो ॥

वाट पाहातो रे तूझी मोरया हो ॥

भेटी द्यावी हो माझ्या मोरया हो ॥

कधी मज भेटसी रे बापा मोरया हो ॥

धावे धावप्या रे माझ्या मोरया हो ॥जय जय मोरया हो ॥ माझ्या मोरया हो ॥धृ.॥१॥

विघ्नेशाचे नाम तुह्मी कावा घोष ॥

नासती पातके दोष जाती भवक्लेश ॥ज.मो.॥२॥

गजानन गजानन ह्मणारे मना ॥

चुकतिल भव बंधने तुज नाहीं यातना ॥ज.मो.॥मा.मो॥३॥

मयुरक्षेत्री कर्‍हे तिरी (देवा) रहिवास केला ॥

ध्यारे भक्त हो तुह्मी त्याचा सोहळा ॥ज.मो.॥मा.मो.॥४॥

जन्मोजन्मी दास तूझा आहे गणराजा (महाराजा) ॥

आणिक दैवत आह्मा नलगे या काजा ॥ज.मो.॥मा.मो.॥५॥

सेंदुर डवडविले रुप देखिले डोळा ॥

कोटि सूर्य तेथें त्याच्या लोपल्या कळा ॥ज.मो.॥मा.मो.॥६॥

धावे धावे मोरया (मजला) देई तू भेटी ॥

अखंड नाम तूझे म्या धरीलेसें कंठीं ॥ज.मो.ज.मो.॥७॥

मृत्युलोकीं क हेतीरीं (देवा) रहिवास केला ॥

निजभक्ता द्यावया मुक्तिचा सोहळा ॥ ज.मो.।मा.मो.॥८॥

मुषकावरी आरुढ होऊनि (देवा) येई लवकरी ॥

बहुत देवा शीणलो ये मी संसारी ॥ ज.मो.।मा.मो.॥९॥

चतुर्भुज मंडित रुप देखिलें नयनी ॥

हें मन वेधलें तुझ्या बा देवा चरणी ॥ज.मो.॥मा.मो.॥१०॥

परशु कमळ अंकूश घेऊनी (माझी) आली माऊली ॥

हें मन वेधलें तुझ्या बा चरणा जवळी ॥ज.मो.॥मा.मो.॥११॥

गणनाथ गणनाथ ह्मणारे सदा ॥

भय नाहीं तुह्मासि यमाचे कदा ॥ज०मो०॥मा०मो०॥१२॥

मोरया गोसावी (देवा) तुज करितो विनंती ॥

तारी भक्ता वेगे तू येई गणपती ॥ज०मो०॥मा०मो०॥१३॥

मोरया मोरया हो (देवा) जे भक्त ध्याती ॥

तयाच्या कामना पूर्ण शिघ्रचि होती ॥ज०मो०॥मा०मो०॥१४॥

जन्ममरण गर्भवास (देवा) चुकविता नाहीं ।

एक अहे तो दाता गणराज पाही ॥ज०मो.॥मा.मो.॥१५॥

मोरया गोसावी यांचें (देवा) देहीं पै वासू ॥

द्वैत नाहीं तयासी हृदई गणेश ॥ ज.मो.मा.मो.॥१६॥

मयूरक्षेत्री कर्‍हे तिरीं (देवा) रहीवास केला भक्तिभाव देखोनिया चिंचवडी आला ॥ज.मो.॥मा.मो.॥१७॥

जपतप अनुष्ठान (देवा) नलगे साधन ॥

देई देवा मज तूं हृदई चरण ॥ज.मो.॥मा.मो.॥१८॥

दुष्ट भोग झाले (मोरया) मज न कळे गती ॥

चिंतामणी दास तुझा करितो विनंती ॥ जय मो.॥मा.मो॥१९॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-04-22T21:31:09.5830000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कोळंउदीर

 • पु. घूस . ( सं . प्रा . कोल ) 
RANDOM WORD

Did you know?

गणपतीचे प्रकार किती व कोणते?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.