TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
प्रथमारंभी ध्यातो गजानन द...

मोरया गोसावी - प्रथमारंभी ध्यातो गजानन द...

श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.


॥ पद ३९ ॥ गोंधळ

प्रथमारंभी ध्यातो गजानन देव ॥

त्याचेने कृपेनें ध्यातो विश्व बीज ॥

तुज हो ध्याति अंबे त्र्यैलोकिचे देव ॥

तुझा हो रहिवास नकळे कवणा हो माये ॥

सकळासि प्रसन्न जालिग जगदंबा ॥

गणराज ह्मणे तूं येई हो अंबे ॥

सकळासि भाव तुझा आहे हो निकट ॥

भक्तिलगी पाव वेगीं ह्मणतसे तुज ॥

जय जय जे आनंद सकळ परि वार ॥

दैत्य वधुन कैसे तारियेले जन ॥

भेटि देई सकळा जाई निजस्थाना ॥३॥

प्रथम अवतार तुझा अकळु हो माये ॥

ब्रह्मादिक प्रार्थिंलिसी सदोदित अंबे ॥

देवाच्या वचनासी पावलीस वेगीं ॥

निरांकार देह तुझा येई हो लवकरी ॥४॥

आकारा न येसि तरी पाहविस कोठे ॥

प्रतिमेवेगळी तूं न कळीस कोठे ॥

आराधे करुनि माता पावलीं सकळा ॥

रहिवास केला त्वां मार्कंडे वचना ॥५॥

अरण्यात वास तुझा ऋषिवरी कृपा ॥

आनंदली जगदंबा वचन बोलती ॥

कासया परि तुह्मी आलेती हो ऋषी ॥

ऋषी बोलती माते दे आह्मा भक्ति ॥६॥

आणिक नवल थोर जालि हो अंबिके ॥

मोरया गोसावी ह्मणे प्रार्थिले हो तुज ॥

पूर्विच्या वचने करुनि भेटलिस मज ॥

धरिलें चरण तूझे मोरेश्वरी आर्थ ॥७॥

दिनानाथ कृपा करी दारिद्र हो नाशि ॥

अकळु जननी तुज वर्णूं मी किती ॥

वर्णुं जो लागलो तुज निराकार गोष्टी ॥

वरद कृपेनें म्यां देखिलीस दृष्टि ॥८॥

मज हो ठेविले कैसे नये काकुलती ॥

कष्टाची गति कळली तुजसी ॥

मृत्युलोकीं ठेवियेले उपकारालागी ॥

देहधार शरीर होतसे कष्टी ॥९॥

पापच्या राशी देखतसे दृष्टी ॥

आणिक वचन एक ऐक हो माये ॥

विषयाचे गुण मज नाहीं कोठे ठाव ॥

काकुलती येतो अखंड हृदयीं ॥१०॥

जय जय जे जगदंबे पुजे लागि यावे ॥

सकळ देव मज केले हो सरत ॥

त्रिकाळ रुप तुझें हृदई संपूष्टी ॥

आरती करिन तुज सकळासारखी ॥११॥

मोरया गोसावी ह्मणे मागु तुज काय ॥

सकळ परिपूर्ण मज आहे हो जगदंबे ॥

नवरात्रें करितील नर नारि बाळे ॥

त्यांचे हो मनोरथ पुरवीं लवकरीं ॥१२॥

कष्टलिये शरीर लागलो चरणीं ॥

मोरया गोसावी म्हणे आहे देहधारी ॥

शरीराची गति मज नकळे हो परी ॥

प्रपंच तोडी आतां न करि वेरझारा ॥१३॥

मूळाविण यावें तरी अधोगती देहा ॥

सकळ मिळोनि मज मुळ पाठबावे ॥

सकळ परिवार मज न्याहो लवकरी ॥

उदंड बोलणें तरी समर्थासी काय ॥१४॥

मायेच्या लक्षणे करुनि सांड नाहीं देहा ॥

झडकरि न येसी तरी प्राण गेला वाया ॥

करुणेची शब्दें ऐकिले देवे ॥ मजचि असतां तुज गांजिल कवण ॥१५॥

अखंड हृदयीं आहे निरतर जवळी ॥ प्रतिमासि दर्शन आहे मजजवळी ॥

सकळिका जन मध्यें ठेविले तुज बाळा ॥

माझिया वचनाचा नको करु अनुभव ॥१६॥

मजचि कारणे तूं बा टाकिले सकळिक ॥

आवघाचि अभिमान आहे तूझा मज ॥

उपकार मूर्तिं केली तुजलागी ॥१७॥

देवाच्या वचने मज सकळ परिपूर्ण ॥

नलगे आसवरी हा सकळ दवा वंदी ॥

भक्तिच्या वचने गाईला गोंधळ ॥

पांहुजो लागलो तो एकचि मिळुनि ॥

उभयतां मिळुनि लागलो चरणीं ॥१८॥जय जय आ०॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-04-22T22:14:27.8600000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

bilateral exponential distribution

 • उभयपक्षी घातांकी वितरण 
RANDOM WORD

Did you know?

मृतव्यक्तीच्या तेराव्याच्या जेवणात कोणकोणते पदार्थ करतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.