TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
प्रथम नमू देव लंबोदरु ॥ ज...

मोरया गोसावी - प्रथम नमू देव लंबोदरु ॥ ज...

श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.


॥ पद २४ ॥

प्रथम नमू देव लंबोदरु ॥ जो ऋद्धिसिद्धिचा दातारु ॥

वेदाश्रुति शास्त्रासि जो आधारु ॥ तो (महाराजा) गणराजा नमियेला ॥१॥

रंगी उभी सारजा घन ॥ पुस्तक वीणा करि घेउन ॥

सानु सानुध्वनी उमटति जाण ॥ गंधर्व गायन करिताती ॥२॥

तया माजी उभे नारद तुंबर ॥ मृदंग वाजति धिमि धिमि कार ॥

ठाळांचा आहे महा गजर ॥ रंगी मोरेश्वर (कीडताती) खेळताती ॥३॥

गणनायक नृत्य करित ॥ धिमि धिमि भूमि दणाणींत ॥

गिरि गिरि गिरि भवरे देत ॥ थाक तोडि ताल छंदे ॥४॥

ऐसें तांडव नृत्य मांडलें ॥ विमानी देव तटस्थ राहिले ॥

मोरया गोसावी योगि बोलले ॥ रंगि भेटले (महाराजा) गणराज ॥५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-04-22T21:55:41.3900000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

रपोर्ट

  • पु. इतिवृत्त ; अहवाल ; बातमी ; हकीकत ; खालच्या अधिकार्‍याकडून वरच्या अधिकार्‍याकडे जाणारी कैफियत . त्यांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्यांवर रिपोर्ट करण्याकरितां एक कमिशन नेमण्याचा विचार आहे . - आगर ३ . ४६९ . [ इं . रिपोर्ट ] रिपोर्टर - पु . बातमीदार ; निवेदन करणारा ; माहिती सांगणारा . [ इं . ] 
RANDOM WORD

Did you know?

'डांबिस' हा शब्द मराठी कि कुठल्या भाषेतून आलाय ? त्याचा अर्थ किंवा उगम कोणता?
Category : Dictionary
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Dictionaries: 44
  • Hindi Pages: 4,328
  • Total Pages: 38,982
  • Words in Dictionary: 302,181
  • Tags: 2,508
  • English Pages: 234
  • Marathi Pages: 22,630
  • Sanskrit Pages: 11,789
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.