मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
जीवप्राण तुझ्यावर फिदा । ...

लावणी - जीवप्राण तुझ्यावर फिदा । ...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


जीवप्राण तुझ्यावर फिदा ।

माग सख्या काही, प्रसन्न झाले काय हवी संपदा ॥ध्रु०॥

आली संगत आपली घडून ।

आज स्नेहाचे सार्थक झाले गाठ एकांती पडून ॥

मन अगदिच गेले गढून ।

रात्रंदिवस किरे चैन पडेना जीव जाई तडफडून ॥

काय चूक जाहाली मजकडून ।

कारे असे बोल बोलशी उगीच पदरा आडून ॥चाल॥

पाया पडते घाउनी खरेच सारे सांग ।

झिजले पलंगी भोगिता नाजुक माझे आंग ॥चाल॥

असे असुन आले ह्या पदा । माग सख्या काही ॥१॥

मशी अंतर कधी करू नको ।

पाय पुढे जो दिल्हा तो काढुन सखू, मागे सरू नको ॥

पाहा भलत्या भरी भरू नको ।

पार पाड वचनास आता रे प्राणसख्या फिरू नको ।

अढि मनात काही धरू नको ॥

मार्ग त्यजुन अडमार्गी कुणाच्या फंदामध्ये शिरू नको ॥चाल॥

दृष्टीस पडता राजसा खुशाल होतो प्राण ।

धीर धरवेना अंतरी लागुन जातो बाण ॥चाल॥

मुख पाहावे आणिक एकदा । माग सख्या काही ॥२॥

मी स्वतांच श्रीमंतीण ।

ख्यालिखुशालीत काळ कंठिते सासुरवासावीण ॥

झाले जन्माची संगतीण ।

नामांकित सासरी माहेरी जातकुळी नाही हीण ॥

नव्हे कसबीण कलावंतीण ।

दिव्य स्वरुप सजदार सजले थेट जशी पद्मीण ॥चाल॥

ऋणानुबंधे जिवलगा पडली आपली गाठ ।

आठव करावा मानसी पवित्र होता काठ ॥चाल॥

ती साक्ष देईल नर्मदा । माग सख्या काही ॥३॥

स्नेह चालविला आजवर ।

फार कुटुंबापरीस मनातुन लोभ होता मजवर ॥

घरी भ्रतार आहे बिजवर ।

कोण सवत एक विवसी पकडली ते लंपट तिजवर ॥

मी म्हणून खुष तुजवर ।

माझे देहाचा करुन बिछोना चारी प्रहर निज वर ॥चाल॥

महाशूर गंगु हैबती विख्यात ज्याचे नाव ।

महादेव गुणीजन जाणती श्रीमंत राजेराव ॥चाल॥

करी कवन प्रभाकर सदा ।

माग सख्या काही ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP